Thursday, May 31, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ५) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! भारतातील पहिली महिला शिक्षिका समाज सुधारिका सावित्रीबाई फुले यांचे मानव कल्याणासाठी १० मार्च १८९७ मध्ये बलिदान गेले आहे....!


१८५७ च्या उठावा नंतर ब्रिटीश सेनेत असलेली महार बटालियन बंद करून महार सैनिकांची भरती बंद करण्यात येऊन १८७४ ला गाव नोकर वतन कायदा पास करून अस्पृश्यता निर्माण करण्यात आली.ती मोडीत काढण्यासाठी महत्मा फुले यांनी लढा देऊन १९८४ ला वतन कायदा मंजूर करून घेण्यात आला.त्यामुळे मराठा समाजाला हाताशी धरून अस्पृश्यता कशी मजबूत होईल यासाठी साल १८८४ मध्येच पहिली हिंदू महासभा आयोजित करून मराठा समजामध्ये भाऊ लक्ष्मण जाधव म्हणजेच भाऊ रंगारी याच्या माध्यमातून गणपती उत्सव सुरु करून हिंदू – मुस्लीम तेढ निर्माण करण्यात आले.आता हिंदू – मुस्लीम तेढ आणि अस्पृश्यता निर्माण झालेली होती.समाजातील प्रमुख घटक आपल्या हाताशी धरून गणपती नावाची भीती त्यांच्या मनात निर्माण करून एक मराठा समाजाचे नेतृत्व असलेल्या छोट्या मोठ्या समाजावर दबाव निर्माण करून आता हिंदू – मुस्लीम तेढ आणि अस्पृश्यता आणखी मजबूत केली गेली.१८८४ ला पहिल्या हिंदू महासभे नंतर १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस स्थापन करण्यात आलेली होती यातील जहाल गटाचे नेतृत्व बाळकृष्ण गंगाधर टिळकांनी केले आहे.आता सार्वजनिक गणपती उत्सव टिळकांच्या हातामध्ये आला होता त्यामुळे हिंदू धर्माच्या प्रचाराला मोठा जोर निर्माण झाला होता.यातच १८९७ मध्ये प्लेगची साथ आली होती महत्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे दत्तक पुत्र डॉ यशवंत फुले यांनी प्लेगच्या रुग्णासाठी हडपसर येथील ससाणे नगर मध्ये हॉस्पिटल सुरु केले होते.मुंढवा येथे गायकवाड घराण्यातील एकुलता एक १० वर्षाचा मुलगा प्लेगच्या रोगाने पिडीत झाला होता याची खबर सावित्रीबाई फुले यांना लागली होती.त्या मुलाला बैलगाडीमध्ये टाकून त्या हडपसर येथील ससाणे नगर येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्या होत्या त्याची लागण सावित्रीबाई फुले यांना झाली होती.त्या गायकवाड घराण्यातील त्या एकुलत्या एक मुलाला वाचविण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचे बलिदान गेले.भारतातील पहिली महिला शिक्षिका समाज सुधारिका सावित्रीबाई फुले यांचे मानव कल्याणासाठी १० मार्च १८९७ मध्ये बलिदान गेले आहे.(क्रमश😊

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ४) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! भाऊ रंगारी म्हणजे मराठा समाजाचा लक्ष्मण जावळे याला पुढे करून गणपती उत्सव सुरु केला....!


१८५६ साली बाळकृष्ण गंगाधर टिळक यांचा जन्म झाला होता.महात्मा फुले यांनी ज्या वेळेस पहिली शिवजयंती १८६९ साजरा केली तेव्हा टिळक १३ वर्षाचे होते येथे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे येथे छत्रपती शिवराय आणि टिळकांचा काहीही संबध नाही.१८७३ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना करून भगवा ध्वज घेतला होता.यावेळी टिळकांचे वय १७ वर्ष होते आपण येथे लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे भगव्या ध्वजाचा आणि टिळकांचा काहीही एक संबध नाही.१८७५ मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य सनातन हिंदू धर्माची स्थापना केली होती.त्यामुळे छत्रपती शिवराय आणि हिंदू धर्माचा काहीही संबध नव्हता येथे आपण लक्षात घेतले पाहिजे.शिवरायांच्या काळी वैदिक धर्म होता आणि तो फक्त वैदिक धर्म पंडित यांच्या साठीच होता.त्यामुळे वैदिक धर्म पद्धतीत पहिला राज्याभिषेक करूनही  शिवरायांना ही वैदिक धर्म व्यवस्था शुद्र मानीत होती.त्यामुळे शिवरायांनी पहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत करवून घेतला होता त्यामुळे वैदिक धर्माचा आणि शिवरायांचा काहीही संबध नव्हता असे स्पष्टपणे दिसते.सर्व बामणी व्यवस्थेने इंग्रजी राजवटीच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये आपला शिरकाव व्हावा आणि इथली प्रशासन व्यावस्था आपल्या ताब्यात यावी यासाठी त्यांनी १८५७ मध्ये इंग्रजी राजवटीच्या विरोधात उठाव केला.जेव्हा इंग्रजी राजवटीने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या तेव्हा हा उठाव याच बामणी व्यवस्थेने मोडीत काढला.तेव्हा १८७४ मध्ये शुद्रातून अति शुद्र म्हुणुन अस्पृश्यत निर्माण केली.ही अस्पृश्यता मजबूत व्हावी यासाठी १८८४ मध्ये बाळकृष्ण गंगाधर टिळक हे २८ वर्षाचे होते त्यांनी पहिली हिंदू महासभा आयोजित केली होती.सत्यशोधक धर्म आणि त्यांचा भगवा या बामणी व्यवस्थेला खूप टोचत होता.महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेली शिवजयंती यांना झोप येऊ देत नव्हती.पहिली हिंदू महासभा झाल्यानंतर त्यांचे असे लक्षात आले की,जो पर्यंत महात्मा फुले जिवंत आहेत तो पर्यंत हिंदू धर्म व्यवस्था निर्माण करता येणार नाही...अखेर महात्मा ज्योतिबा फुले यांचा १९९० मध्ये मृत्यू झाला(म्हणजेच बामणी व्यवस्थेने हत्या केली).आता या बामणी व्यवस्थेला थांबविणारे कोण नव्हते महात्मा जोतीबा फुले म्हणाले होते की,ही मनुस्मृती दहन केली पाहिजे.कारण ही जो पर्यंत ही मनुस्मृती दहन होणार नाही तो पर्यंत इथला मानव सुखी होणार नाही.महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर पूर्ण रान मोकळे मिळाले होते.महात्मा फुले यांना माळी समाजाने कधीही जवळ केलेले नाही माळी समाजाने मनुवादी व्यवस्थेच्या नादाला लागून त्यांचेवर अन्यायच केलेला आहे.महत्मा फुलेंच्या मृत्यूनंतर टिळकांनी पाच वर्ष हिंदू धर्माचा प्रचार करण्यासठी जमीन तयार केली.भाऊ रंगारी म्हणजे मराठा समाजाचा लक्ष्मण जावळे याला पुढे करून काल्पनिक हत्तीचे मुख आणि मानवाचे शरीर असलेला मोदक खाणारा गणपती हा देवतांचे अधिष्टान मानून समाजातील प्रमुख घटक असणारा मराठा समाजात १९९१ पासून रुजविण्यात येऊन त्याच्या हस्ते सार्वजनिक गणपती उत्सव १९९४ मध्ये सुरु करण्यात आला.आणि लगेच पुढच्या वर्षी म्हणजे १९९५ मध्ये बाळकृष्ण गंगाधर टिळकांनी स्वत: पुढकार घेऊन हिंदू धर्माचे अधिष्टान म्हणून हा गणेश उत्सव सार्वजनिक व्हावा आणि त्याला हिंदू धर्माची मान्यता मिळावी म्हणून हिंदू – मुस्लीम दंगल घडविण्यात आली.यावेळी टिळकांचे वय वर्षे ३९ होते.आणि नंतर हिंदूचा अधिष्टाता म्हणून गणपतीला स्थान मिळाले.इकडे १८९१ मध्ये जन्म घेतलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे चार वर्षाचे होते.(क्रमश😊

Wednesday, May 30, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ३) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा मनुवादी व्यावस्थेबरोबर आणि त्यांच्या मानुमृतीच्या विरोधातच का...?


रयत ज्या छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांना विसरली होती.त्यांचा स्वराज्याचा इतिहास विसरली होती.मनुस्मृतीने ज्या लादलेल्या सप्तबंदी शिवराय व शंभूराजे यांनी मोडीत काढल्या होत्या त्याची आठवण महात्मा ज्योतिबा फुले यांना झाली.त्यांनी लपलेला इतिहास पुन्हा एकदा शोधायला सुरुवात केली.जेव्हा ते रायगडावर गेले तेव्हा त्यांना छत्रपती शिवराय यांची समाधी सापडली.त्यांनी लपलेला शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा रयतेसमोर यावा आणि आपला राजा कसा होता याची पुन्हा रयतेला जाणीव व्हावी यासाठी त्यानी १८६९ मध्ये छत्रपती शिवराय यांची पहिली जयंती साजरा करून त्यांचे विचार रयतेमध्ये पोहचविण्याचे कार्य करून मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेने केलेली घाण साफ करण्याची सुरुवात करून ही मनुस्मृती जाळली पाहिजे असे बोलून दाखविले. मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेने या महात्मा फुले यांना खूप छळले खूप त्रास दिला.एवढे महान कार्य करीत असताना १८९० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.१८९१ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता.सातरा गादीचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांनी स्थापन केलेल्या शाळेमध्ये १ ली ते ४ थी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झाले.त्यामुळे शिवरायांचा इतिहास त्यांना जवळून माहित होता.त्यानी पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करण्याचे कार्य सुरु केले होते.त्यांना या कार्यात कोल्हापूर गादीचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी मदत केले.हेच ते शाहू महाराज यांनी बामणाला चापकाचे फटके मारून अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठविला होता.त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी मनुवादी बामणी व्यवस्था कशी फसवणूक करीत आहे हे त्यांच्या लक्षात आले होते.तेव्हा त्यांनी असे जाहीर केले की,या बामणाला राज्याच्या खजिन्यातून काही दिले जाणार नाही.त्याचा मान सन्मान केला जाणार नाही अलुतेदार आणि बलुतेदार यांना ५०% आरक्षण देऊन ते आरक्षणाचे जनक झाले आहेत.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि छत्रपती शिवराय यांचे पहिले पुत्र एक संभाजीराजे यांच्या सातारा गादी बरोबर तर दुसरे पुत्र राजाराम यांच्या कोल्हापूर गादी बरोबर कौटुंबिक संबध निर्माण झाले होते.बडोद्याचे संस्थानिक सयाजी गायकवाड यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर संबध प्रस्थापित केले होते.त्यामुळे स्वराज्याचे भगवे निशाण काय आहे याचा संपूर्ण आभ्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा झाला होता येथे आपण लक्षात घेतले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु म्हणून स्वीकारले होते त्याचे कारण मनुवादी व्यवस्था निकाली काढून शाक्त धर्मा नुसार राज्याभिषेक करून मानवता वादी समतेचा धर्म छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांनी रयतेत पोहचविला होता.अशा शिवरायंचे विचार रयतेमध्ये पोहचून स्त्री शिक्षणाचे दारे उघडे करून इथले दासत्व संपविण्याचे महान कार्य त्यांनी केले होते.सत्यशोधक धर्म स्थापन करून रयतेला भगवे निशाण महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिले असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना माहित झाले होते.त्यामुळे त्यांच्या लक्षात आले होते मानवतेचा खरा शत्रू इथली मनुवादी व्यवस्था आणि त्यांची मनुस्मृती आहे.त्यामुळे त्यांनी या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात जोमाने लढा सुरु केला.(क्रमश😊