Tuesday, April 16, 2019

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना कॉंग्रेसने का फसविले…...का लावला त्यांनी कपाळी बामणी टिळा….? राजेश खडके सकल मराठी समाज

          बामसेफ या संघटनेच्या केडरबेसमध्ये तयार झालेला कार्यकर्ता म्हणजे प्रवीण गायकवाड यांचे नाव आदराने घेतले जायचे…! कारण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार धारेवर तयार झालेला पहिला बहुजन मराठा कार्यकर्ता म्हणून प्रवीण गायकवाड यांची ओळख झालेली होती.पुढे युगपुरुष खेडेकर यांनी स्थापन केलेल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्षपद त्यांच्याकडे आले होते.याच प्रवीण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बामणी वर्चस्व असणारे छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांची बदनामी करणारे साहित्य निर्माण करणाऱ्या भांडारकरवर हल्ला करून त्याची तोडफोड केली होती.मी राजेश खडके निळ्या झेंड्याखाली १०० मुले घेऊन जाऊन त्यांना पाठींबा दिला होता.नंतरच्या काळात पुरुषोत्तम खेडेकर यांनी हिंदू धर्माला विरोध करीत शिवधर्माची स्थापना केली त्यावेळी प्रवीण गायकवाड यांनी घरातील देवारा रत्यावर फेकून शिवधर्म स्विकारल्यामुळे त्यांचे मोठे कौतुक झाले होते.
ओबीसीच्या मेळाव्यात भाषण करताना ते म्हणाले होते की,शिवधर्म हा बौध्द धर्माची पहिली पायरी आहे आणि ती मी चढलो आहे.सिंधू संस्कृती मधून आलेली हिंदू संस्कृतीतून बामन हद्दपार केला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती.त्यामुळे इथली आरएसएस आणि कॉंग्रेस संपल्याशिवाय जनसामन्य माणसाला चांगले दिवस येणार नाहीत.एका कार्यक्रमात भाषणात ते म्हणाले होते की “ज्या वेळेस या देशात जनमत तयार होईल त्या दिवशी ब्राह्मण आणि कॉंग्रेस शिल्लक राहणारा नाही" त्यामुळे अशी बोली भाषा करणारा आणि नेहमी बामणी व्यवस्थेच्या विरोधात उभा टाकणारा माणूस म्हणून प्रवीण गायकवाड यांची ओळख निर्माण झाल्यामुळे त्यांची आणि प्रकाश आंबेडकर यांची जवळीक निर्माण झालेली होती.त्यामुळे संभाजी ब्रिगेडने स्विकारलेला भगवा ध्वज हा समतेचे प्रतिक होते


            नंतर त्यानी आनंततारा ग्रुप म्हणून बांधकाम उद्योग सुरु केला त्यातून चांगले मोठ मोठे बांधकाम प्रोजेक्ट उभे केले.मध्यंतरीच्या काळात पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रवीण गायकवाड यांच्यात खटके उडाले आणि त्यांनी संभाजी ब्रिगेड सोडून उद्योग व्यवसायात लक्ष देण्यास सुरुवात केली.सामाजिक क्षेत्रातून बाहेर पडल्यामुळे त्यांना व्यवसायात बऱ्याच अडचणी निर्माण होऊ लागल्या परंतु खेडेकर आणि त्यांचे जमत नसल्यामुळे त्यानी संभाजी ब्रिगेडमध्ये येणे पुन्हा टाळणे मग त्यांनी आपल्या सहकारी यांना बरोबर घेऊन शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.त्यानंतर सोडलेली संभाजी ब्रिगेड पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन त्यानी पुन्हा मोठ बांधण्यास सुरुवात केली,ही मोठ मजबूत व्हावी यासाठी आपल्या सहकारी यांच्या माध्यमातून मराठा मूक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रात आयोजित करून इथला मराठा सामाजिक स्थरावर जागरूक करण्याचे कार्य त्यानी केले.देशात नरेंद्र मोदीच्या विरोधात वातावरण निर्माण झाल्यामुळे नेहमी पवार साहेबांच्या संपर्कात असणारे प्रवीण गायकवाड यांना लोकसभेसाठी तयारी करा असे सांगण्यात आले.मात्र पुणे लोकसभा कॉंग्रेसकडे असल्यामुळे त्यांच्याकडून उमेदवारी मागावी असा सल्ला पवार साहेबानी त्यांना दिला होता.परंतु सामाजिक स्थरावरील बहुजन मराठा चळवळीतील मोठा कार्यकर्ता कॉंग्रेसच्या दावणीला जर गेला तर तो संपवून जाईल अशी प्रामाणिक भावना प्रकाश आंबेडकर यांनी ठेवून पुणे लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घ्यावी असे सुचविले होते.परंतु आपल्या सारख्या व्यक्तीला कॉंग्रेस नाकरू शकत नाही असा गायकवाड यांचा भ्रम झाला होता.प्रकाश आंबेडकर यांना माहित होते की कॉंग्रेस गायकवाड यांची फसवणूक करणार आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा जाहीर झालेला उमेदवार याला एबी फॉर्म आंबेडकर यांनी दिला नाही.कॉंग्रेसमध्ये प्रवीण गायकवाड यांनी प्रवेश केल्यानंतर जो पर्यंत कॉंग्रेसच्या उमेदवारीचा निर्णय होत नाही तो पर्यंत वाट बघायची असा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी घेतला होता.अखेर प्रवीण गायकवाड यांची फसवणूक झाली त्यांची उमेदवारी कट होऊन ते विरोध करीत असलेल्या बामन समाजातील मोहन जोशी यांना देण्यात आली.त्यानंतरही प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लढावी असे पुन्हा एकदा सुचविण्यात आले.परंतु गायकवाड यांनी नकार दिल्यावर जाहीर केलेल्या उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आला. प्रकाश आंबेडकर यांनी एवढा वेळ वाट का बघितली तर बहुजन चळवळीचा मोठा कार्यकर्ता संपवू नये अशी भावना त्यांची होती.परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणा किंवा व्यावसाय वाचविण्यासाठीची धडपड म्हणा अशी भावना झाल्यामुळे केवळ मी एक व्यावसायिक आहे हीच भावना मनात ठेऊन प्रवीण गायकवाड यांनी कपाळी बामणी टिळा लावून बामन समाजाचे कुलदैवत कसबा गणपती यांची आरती करून बामन समाजाचे मोहन जोशी यांचा प्रचार सुरु केला आहे.
 


Saturday, April 13, 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझे दोन शब्द…..! समता राखण्याची जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुध्द म्हणून आमच्याकडे दिलेली आहे…..! राजेश खडके सकल मराठी समाज


प्रथम महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम…..!

विषय असा आहे की,इतिहासा काळापासून चालत आलेला समतेचा भगवा पताका आम्ही स्विकारीत नाही तो पर्यंत समता आम्ही प्रस्थापित करू शकत नाही.म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवे वान धारण करून झालेले भगवान गौतम बुद्धांच्या माध्यमातून बुध्द म्हणून ज्या २२ प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्यामधील १० वी प्रतिज्ञा जी दिलेली आहे ती म्हणजे “मी समता प्रस्थापित करण्याचा मी प्रयत्न करेन” अशी दिलेली आहे.त्यामुळे धम्म विचार घेऊन चालणारा व्यक्तीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता राखण्याची जबाबदारी दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते.त्यामुळे जो बुध्दाला मानतो आणि त्यांच्या विचाराचे जो अनुकरण करतो त्याचीच समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी आहे.त्यामुळे या भगव्या पताक्याचे महत्व आम्ही समजून घेतले असल्यामुळे इतिहासातील महार योद्ध्यांचे योगदान समजून घेऊन साल २०१४ पासून फुले-शाहू-आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांना आम्ही समजून सांगत आलेलो आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणेस्टेशन या ठिकाणी याच महार योद्ध्यांच्या माध्यमातून महार योध्दा या भगव्या पताकाखाली आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करून त्या भगव्या पताक्याचे महत्व समजून सांगत आलेलो आहे.

या भगव्या पताक्याखाली महार योद्ध्यांच्या कार्यक्रमाला मान्यता आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते एल डी भोसले आणि मुरलीधर जाधव यांनी दिली आहे.सदर कार्यक्रमात वेळोवेळी उपस्थित राहून समतेची पताका भगवा म्हणून त्यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील त्यांच्या पुतळ्याला साक्ष देऊन त्याचा सन्मान केलेला आहे.

याची जबाबदारी समाजातील प्रत्येक समाज घटकातील व्यक्तींनी घ्यावी अशी सकल मराठी समाजाचीअपेक्षा होती.आणि ती अपेक्षा आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी पूर्ण केली आहे.मुंबई येथील यल्गार मोर्चा आयोजित केला होता.त्या मोर्चात सकल मराठी समाजाच्या वतीने उभारलेला सिहाची छाप आणि महार योध्दा नमूद असलेला भगवा पताका घेऊन सहभागी झालेला कार्यकर्ता हा भीम साम्राज्य संघटनेचा अध्यक्ष गणेश भोसले होता त्यालाही भगव्या पताक्याचे महत्व समजले होते.त्यामुळे त्या ध्वजावर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची नजर पडावी अशी धारणा मनात बाळगून तो त्या मुंबईच्या यल्गार मोर्चात सहभागी झाला.
सहभागी झालेल्या त्या कार्यकर्त्याच्या हातातील ध्वजावर प्रकाश आंबेडकर यांची नजर गेली लागलीच त्यांनी त्याला बोलावून घेतले आणि मंचकावर तो ध्वज लावून टाकण्यास सांगितले आणि इतर कार्यकर्त्यांना तो महार योध्दा असलेला भगवा पताका लावण्यास मदत करायला सांगितली.आणि तो भगवा ध्वज यल्गार मोर्चाच्या मंचकावर फडकला.
 ह्या सगळ्या घडामोडी होण्यासाठी दोन वर्षाचा काळ लोटावा लागला याची जनजागृती संघर्षाचा आवाज या वृत्तपत्राच्या माध्यमातून संपादक संजय सोनवणे यांनी केले आहे.त्यांनी सकल मराठी समाजाची भूमिका नेहमी आपल्या वृत्तपत्रात प्रसिध्द करून ते वृत्तपत्र आदरणीय प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांच्या पर्यंत पोहचत असे.


याच महार योध्दा भगव्या ध्वजाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आदरणीय प्रकाश आंबेडकर,अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली.

त्यामुळे विविध कार्यक्रम राबवून भगव्या ध्वजामध्ये इतिहास काळापासून समता आहे.आणि ती प्रस्थापित करण्याचे कार्य सम्राट अशोकापासून ते वारकरी संप्रदायपासून ते छत्रपती शिवाजी महाराजापासून ते महात्मा ज्योतिबा फुले पासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेपर्यंत आले होते,आणि आता ते कार्य प्रकाश आंबेडकर यानी भगवे उपरणे परिधान करून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले आहे.



Wednesday, April 10, 2019

होय मी पुणेकर बोलतोय….गिरीष बापट उत्तर द्या….! तुम्हाला मत म्हणजे मोदी-शहा जोडीला मत…! राजेश खडके सकल मराठी समाज

 
        विषय असा आहे की,पुणे हे स्वराज्याचे माहेर घर आहे.कारण शहाजीराजे यांच्या स्वराज्य संकल्पनेतून पुण्यामध्ये लाल महाल उभारला गेला होता.ह्याच संकल्पनेला शिवरायांनी अठरा पगड जातीचा मावळा बरोबर घेऊन अस्तित्वात आणली होती.प्रत्येकाला आपले वाटेल असे स्वराज्य निर्माण करून शिवराय छत्रपती झाले होते.अशा स्वराज्याच्या संकल्पनेचे अस्तित्व पेशवाईने संपवून शनिवार वाडा निर्माण केला आहे.इथला स्वत:ला मावळा समजणारा याच पेशवाईचा गुलाम झाला आहे.युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संपलेले स्वराज्य संविधानाच्या माध्यमातून पुन्हा इथल्या जनतेला दिलेले आहे.परंतु इथला अठरा पगड जातीचा मावळा याला या मनुवादी व्यवस्थेने धार्मिक गुलाम बनवून वंचित केले आहे.अशा वंचित समुहाला एकत्रित करण्यासाठी सकल मराठी समाज स्थापित करून गेल्या दोन वर्षापासून तसा प्रयत्न आम्ही केला आहे.या प्रयत्नाला यश म्हणून आज प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करून मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात यल्गार उभारलेला आहे.यातच गेल्या पाच वर्षाच्या काळातील नरेंद्र मोदी सरकारचा अभ्यास केला तर असे समोर येते की,ज्याप्रमाणे पेशवाईने स्वराज्य संपविले त्याप्रमाणे स्वतंत्र भारताला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपविण्याचा घाट या मनुवादी मोदी सरकारने घातला आहे.या सरकारच्या माध्यमातून स्वराज्यात काळग्या करणारा जसा अन्नोजी दत्तो नावाचा मंत्री होता आणि जसा तो इतर लोकांना अमिष दाखवून किंवा कारवाईची धमकी देऊन आपल्या गोटात सामवून घ्यायचा त्याप्रमाणे इथले संविधान संपविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने इथले लोक आपल्याकडे वळविलेले आहे.त्यांची नावे येथे घेणे मला योग्य वाटत नाही.परंतु त्यांना हाताशी धरून त्याने भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारा बळीराजा याला संपविले आहे.भारताचे भविष्य असणारे तरुण बेरोजगार करून संपविले आहे.इथल्या सरकारी यंत्रणा खासगी उद्योजक यांच्या ताब्यात दिलेले आहे.इथली सैनिकी व्यवस्था उद्योग समूहाच्या हातात देण्याची यंत्रणा उभी केलेली आहे.पत्रकारिता ताब्यात घेऊन इथल्या जनतेचा बुद्धीभेद करण्यासाठी त्याचा वापर करीत आहे.हे केवळ इथल्या नागरिकाच्या हक्काची असणारे संविधान बदल्यासाठीचा आणि एकाधिकारशाही निर्माण करण्यासाठी केले आहे.त्यामुळे २०१९ ची निवडणूक ही इथल्या अठरा पगड जाती समुहाचे उद्याचे भविष्य ठरविणार आहे.त्यामुळे जनतेने कोणाच्या पाठीशी उभे रहायचे आहे ते ठरवायचे आहे.परंतु या सरकारने आपले वाटोळे कसे केले आहे आणि कसे करणार आहे हे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे.त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा उमेदवाराला आपण नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणूनच बघितले पाहिजे आणि त्याप्रमाणे कोणाला मतदान करायचे ते ठरविले पाहिजे.म्हणून आमचा या अभियानाच्या माध्यमातून असा प्रयत्न राहणार आहे की कोण उमेदवार आहे त्याला बघून मतदान करू नका फक्त सरकार बघून आणि त्याचे द्रुषकृत्य बघून त्याला नाकरून त्याच्याकडे खालील उपस्थित प्रश्न प्रत्येक भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षाच्या उमेदवाराला विचारा..! आम्ही पुणेकर म्हणून पुणे लोकसभा उमेदवार गिरीष बापट यांना नरेद्र मोदी आणि अमित शहा म्हणून प्रश्न विचारतो की होय मी पुणेकर बोलतोय गिरीष बापट उत्तर द्या….!

१ नोटाबंदीमुळे फायदा कोणाचा झाला…? नुकसान मात्र आमचे झाले…..गिरीष बापट उत्तर द्या….!

२ अनिल अंबानी यांना राफेल ठेका कसा काय दिला…? नुकसान मात्र आमचे झाले…..गिरीष बापट उत्तर द्या….!

३ मला १५ लाख रुपये देतो म्हणाले...परंतु ते दिलेच नाही…! माझी फसवणूक का केली...गिरीष बापट उत्तर द्या….!

४ एकाच्या बदल्यात दहा शिर न आणता नवाब शरीफचा केक का खालला...? गिरीष बापट उत्तर द्या….!

५ आमचे दोन कोटी रोजगाराचे काय झाले….? गिरीष बापट उत्तर द्या….!

६ ज्यांनी परीक्षा पास केल्या त्यांना कॉल लेटर का नाही आली….! गिरीष बापट उत्तर द्या….!

७ नोटाबंदीमुळे मिळणारे लाखो कोटी रुपये कुठे गेले…? गिरीष बापट उत्तर द्या….!

८ नोटाबंदी करू आतंकवादी यांची कंबर मोडली ना..मग जावांची प्रेत का पडत आहे…? गिरीष बापट उत्तर
द्या….!

९ इम्रानखान याला प्रेमपत्र पाठवून..शहिदांच्या जीवावर आपले बूथ का बांधीत आहात…? गिरीष बापट उत्तर
द्या….!

१० मुकेश अंबानी यांचे जिओ 4 G माझे BSNL 3G असे का…? गिरीष बापट उत्तर द्या….!

११ सरकारी हॉस्पिटल आणि विमानतळ अडाणी याला का विकली…? गिरीष बापट उत्तर द्या….!

१२ ना दाऊदला परत आणला ना महसूदला परत आणला…? गिरीष बापट उत्तर द्या….!

१३ तुम्ही ज्यांचे गुणगान गायले ते मल्ल्या आणि निरव मोदी चोर का निघाले...!? गिरीष बापट उत्तर द्या….!

१४ धनगर आरक्षणाची फाईल गायब होते कसे….? गिरीष बापट उत्तर द्या….!

१५ मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाची फसवणूक का केली…? गिरीष बापट उत्तर द्या….!

अमोल कोल्हे यांनी खासदार होण्यासाठीच….“स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज” ही टीव्ही मालिका विकली…? राजेश खडके सकल मराठी समाज


छत्रपती संभाजी महाराज हे समतावादी विचारांचे होते म्हणून शिवरायांनी केलेला पहिला वैदिक धर्म पद्धतीतील राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार शंभूराजे यांनी करावयास लावला.शाक्त पंथ म्हणजे सिंधू माता नेऋती पूजक असणारा समूह होय.आणि हा समूह बौध्द लेण्यातील सिंधू माता पूजक होतां तिलाच आज आपण काली माता आणि मरीआई म्हणून मानतो.त्यामुळे हा शाक्त पंथ आणि वैदिक धर्म एकमेका परस्पर विरोधी आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापरिनिर्वाण नंतर शंभूराजे यांनी वैदिक धर्म पद्धत नाकारून शाक्त पंथानुसार स्वत:चा राज्याभिषेक करवून घेतला आणि स्वराज्याची राजमुद्रा ही पिंपळाच्या पानावर कोरली आहे. त्यामुळे त्यांनी रामदास स्वामी कधी मान्य केला नाही.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांची मोठ्या प्रमाणावर रयतेत बदनामी करण्यात आली.परंतु काही इतिहासकार यांनी शंभूराजे सन्मान अभियान राबवून त्यांचा सत्य इतिहास बाहेर काढला परंतु इथल्या मनुवादी व्यवस्थेने तो नाकरून त्यांचेवर दबावतंत्र निर्माण केले.याचाच एक भाग म्हणून अमोल कोल्हे यांनी “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज” ही टीव्ही मालिका सुरु केली त्यात त्यानी सुरुवातीला चांगली मांडणी केली परंतु ज्यावेळेस रामदास स्वामी यांचे पात्र दाखविण्याची वेळ आली तेव्हा इथल्या बहुजन मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेड यांनी अमोल कोल्हे यांना मोठ्या प्रमाणात विरोध केला की रामदास हे पात्र नसताना त्याचा इतिहास का तयार करीत आहात.तेव्हा त्यांनी रयतेला भावनिक साद घालीत मी कोणत्या दबावात ही मालिका दाखवीत आहे त्याचे कथन करीत असताना मी माझे घर या मालिकेसाठी विकले आहे असे ठासून सांगत मला ही मालिका पूर्णपणे दाखवू द्या असे म्हटले.लोकांनी त्याचे भावनिक ह्केला मान्यता दिली.परंतु जेव्हा त्यांनी राजकीय निर्णय घ्यायचे ठरविले तेव्हा इतिहासात न घडलेल्या वैदिक धर्म पंडित यांची जवळीक शंभूराजे यांचे बरोबर दाखवायचे काम सुरु केले आणि राज्यभिषेक बदलण्याचे कार्य करून शंभूराजे यांना धर्मवीर करण्याचा प्रयत्न करून समतेपासून दूर नेण्याचे काम सुरु केले आहे.जेव्हा त्यानी त्यांचा उमेदवारी अर्ज शिरूर लोकसभेतून दाखल केला आणि त्यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र पाहिले असता असे दिसून येते की,छत्रपती संभाजी महाराज यांना भावनिक असलेल्या मावळ्यांची घोर फसवणूक केली आहे.कारण त्यांनी भरलेला आयकर पहाता २०१२ ते २०१८ पर्यंत लाखोंचा आयकर भरला आहे.जी सदनिका त्यांनी विकली आहे असे म्हणतात आजही ती मुंबईची सदनिका तशीच आहे.त्यांची एकंदरीत मालमत्ता पाहिली तर ती कोट्याच्या घरात आहे.त्यांची मालमत्ता किती आहे याचे आम्हाला देणे घेणे नाहीये परंतु मालिका तयार करण्यासाठी घर विकले आहे असे म्हणणे गैर आहे.त्यातच वैदिक धर्म पंडित यांचे संभाजीराजे यांनी लागून पालन केले आहे हे दाखविणे चुकीचे आहे.केवळ मला खासदार व्हायचे आहे म्हणून जर हा खेळ असेल तर आम्ही सकल मराठी समाज म्हणून पचनी का पाडून घ्यायचा असा आमचा प्रश्न आहे.म्हणून आम्ही असे म्हणतो की,अमोल कोल्हे यांनी खासदार होण्यासाठी “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज” ही मालिका विकली आहे.ज्या बाबासाहेब पुरंधरे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केली अशांचा सत्कार राज ठाकरे यांनी केला आहे.आणि आज तेच या अमोल कोल्हे यांचा प्रचार करणार आहे.आमच्या सकल मराठी समाजाचे एवढेच आहे की,छत्रपती संभाजी महाराज यांचे राजकारण करू नका…! तुम्हाला खासदार व्हायचे असेल तर आपल्या कार्य कर्तुत्वावर व्हा पण शंभूराजे सन्मान अभियानास कोणतेही गाल बोट लावू नका.ते समतावादी होते त्यांना धर्मवीर बनवू नका…!

Friday, April 5, 2019

वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असताना माझी उमेदवारी का….? राजेश खडके (भाग-२)

पुढे राज्यात देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले.लोकशाहीला निर्माण झालेला प्रतिगामी धोका मोडून काढण्यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचित अलुतेदारा बलुतेदार यांना संघटीत करून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली.याची घोषणा होताच मोठ मोठ्या जनसागराच्या सभा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात गाजू लागल्या.आणि येथील प्रस्थापित राजकीय व्यवस्था हादरली.आम्हीही महाराष्ट्रात होणाऱ्या कार्न्तिकारी बदलात सहभागी होऊन देशातील लोकशाही टिकविण्यसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी स्वातंत्र्यचा विचार घेऊन सदर आघाडीत सामील होण्याचे ठरविले.

मी सकल मराठी समाजच्या सर्व सहकारी यांच्यासह बैठक घेऊन त्या संदर्भातील चर्चा केली.सर्व संमतीने आठ मागण्यांचा प्रस्ताव आम्ही वंचित बहुजन आघाडीतील भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष मा.अशोक सोनाने यांची रीतसर भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी प्रस्ताव सादर केला.तसेच हा प्रस्ताव सादर केल्यानंतर सोशल मिडीयावर त्याचे स्वागत झाले.आणि या प्रस्तावाला मान्यता म्हणून संभाजी ब्रिगेड,बहुजन मोर्चा,भीम साम्राज्य संघटना,सम्राट अशोक सेना,क्रांती मजदूर सेना,रिपब्लिकन मान्तंग सेना,मानवी हक्क सुरक्षा महासंघ,भोईराज समाजिक संस्था या संघटनांनी प्रस्तावासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सहभागी होऊन पाठींबा दिला.



                       प्रस्ताव सादर करून सदरच्या प्रस्तवावर विचार होणेसंदर्भात आदरणीय अंजलीताई आंबेडकर मा.लक्ष्मण माने आणि मा.अशोक सोनाने यांच्या संपर्कात राहिलो.परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे किंवा इतर काही कारणामुळे आम्हाला या प्रस्तावावर उत्तर मिळाले नाही.तरी देखील मी माझ्या लिखाणाच्या माध्यमातून,कार्यक्रमाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी व आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थनात सकल मराठी समाजाची भूमिका मांडीत राहिलो.वास्तविक वंचित घटकांना न्याय देत असताना होणाऱ्या राजकीय बदलांनी महाराष्ट्र ढवळून निघत असताना आमच्या प्रस्तावावर निर्णय होऊन या संदर्भात आम्हाला कळविले जाईल अशी अपेक्षा होती.परंतु एकंदरीत घडणाऱ्या घटनांमध्ये आमचा प्रस्ताव कुठेतरी मागे पडला अये दिसते.नेमकी कारणे न कळाल्यामुळे या संदर्भात कोणालाही दोषी धरण्याचा संबध नाही.अशातच काही दिवस गेल्यानंतर प्रत्यक्ष आचारसंहिता लागू होऊन निवडणुकांची घोषणा झाली.प्रकाश आंबेडकरानी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदार संघात ताकदीने उमेदवारी लढविली जाईल.जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील असे जाहीर करून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभांचा धडाका चालू करून उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली.इतर पक्ष आघाड्या उमेदवारासाठी चाचपडत असताना सर्व प्रथम वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली.

या यादीचे वैशिष्ठ म्हणजे वंचितातील वंचित घटकांना लोकशाही प्रक्रियेत सामावून घेण्याचे काम केले.सकल मराठी समाजाच्या वतीने मी ही पुणे लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आगाडीकडून उमेदवारी मिळावी अशी अशा बाळगली.लोकशाही प्रक्रियेत गेले अठरा वर्ष काम करीत असताना मी केलेल्या कामांचा जनसंपर्काचा एक वंचित घटक म्हणून उं प्रक्रियेत समाविष्ठ होण्याचा माझा प्रयत्न राहिला.त्यासाठी माझे सहकारी यांनी त्यांना शक्य ते प्रयत्न केले.परंतु या प्रयत्नात असताना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विठ्ठल सातव यांचे नाव उमेदवार म्हणून समोर आले.अशाही परिस्थितीत मी वंचित बहुजन आघाडीकडून मला प्रचार करण्यासाठी अधिकृत संधी द्यावी अशी जाहीर मागणी केली.त्यावरही काही उत्तर मिळाले नाही.तरीही आम्ही आघाडीसाठीच्या प्रबोधनाचे काम चालू ठेवले.पुढे जसजशी निवडणूक रंगात आली.तसतश्या घडामोडी घडत गेल्या आणि अचानक अनिल जाधव यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर झाले.यासाठी लक्ष्मण मानेंचा पुढाकार महत्वाचा ठरला अशी चर्चा आहे.पुढे लोकसभेसाठी उमेदवारी सर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी एबी फॉर्म शिवाय अर्ज दाखल केला.वास्तविक वंचित बहुजन आघडीच्या उमेदवाराने जोरदार शक्ती प्रदर्शन करून वाजत गाजत फॉर्म भरण्याची गरज असताना असे का झाले हे माझ्या लक्षात आले नाही.


मला वाटते मला उमेदवाराकडून किंवा पुण्यातील पदाधिकारी यांच्याकडून संपर्क करून मी केलेल्या कार्याचा विचार करून मला सामावून घेतले जाईल असा अंदाज होता.तसे न घडल्याने एकंदरीत सार्वजनिक चर्चेने संभ्रम अवस्था निर्माण झाली.त्यावेळी मी मला मिळालेल्या लोकशाहीचा अधिकार वापरून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.यातील माझी भूमिका हीच संसदीय लोकशाहीत राजकारणाच्या माध्यमातून एक वंचित घटक म्हणून मानवतावादी समाज निर्मितीसाठी पुढाकार घेऊन लोकशाही प्रणाली बळकट करण्याचा माझा प्रयत्न आहे.परंतु आजपर्यंत केलेल्या कामातून काही जणांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असताना तुम्ही निवडणूक का लढवीत आहात अशी विचारणा केली.वास्तविक माझी भूमिका आजही आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसारच आहे.वंचित घटकांना न्याय मिळालाच पाहिजे व त्यातून लोकशाहीला बळकटी आली पाहिजे.आजही माझी भूमिका ही महामानवांच्या विचारांना धरूनच आहे.परंतु माझ्या भूमिकेशी कसा प्रामाणिक आहे.तसेच आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला पुणे मतदार संघ सोडून इतर मतदार संघात जाहीर पाठींबा दिलेला आहे.माझ्या अधिकाराचे संरक्षण करण्याची भूमिका ही मतदार यांचे समोर मीच मांडू शकतो असे मला वाटते.मला तो अधिकार घटनेने दिलेला आहे.आणि त्या अधिकाराचा वापर करूनच प्रतिगामी शक्ती विरोधात माझी उमेदवारी सकल मराठी समाजाचा पुरस्कृत म्हणून मी दाखल केलेली आहे.लोकशाही तत्व मानणाऱ्या सर्व नागरिकांना याव्दारे मी असे आवाहन करतो की,माझ्या उमेदवारीचा गैर अर्थ काढून आजपर्यंत मी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना मूठमाती देऊ नये.कोणत्याही पदाधिकारी यांना माझ्याशी चर्चा करायची असेल तर मी तयार आहे.


वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असताना माझी उमेदवारी का….? राजेश खडके (भाग-१)

               माझ्या आयुष्यातील गेली १७ वर्ष मी शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारावर माझ्या पूर्ण ताकदीनिशी येईल त्या परिस्थितीला तोंड देत सामाजिक कार्य करीत आहे.हे करीत असताना माझ्या वाटचालीतील या टप्प्यावर असताना काही म्हत्वाचे निर्णय हे घ्यावेच लागतात.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मला जो मार्ग दाखविला आहे.त्यावरून चालताना भारतीय लोकशाहीच्या न्यायिक तत्वांची जपवणूक करणे हे माझे पहिले कर्त्यव्य आहे.सध्या देशात सरंजामशाहीने वागणारे प्रतिगामी सरकार आलेले आहे.त्यांचा उद्देश येथील लोकशाही व्यवस्था भोई सपाट करून हुकुमशाही लादण्याचे प्रकार चालू आहेत.यातच भारतीय लोकशाहीचा म्हणजेच सर्वात महत्वाची २०१९ ची निर्णायक निवडणूक आहे.आणि याक्षणी माझ्यावर झालेल्या समता बंधुता न्याय व स्वतंत्र असा मानवतावादी विचारांना प्रामाणिक राहून मी याक्षणी शांत कसा बसू.....?



                                            गेली दोन वर्ष मी अलुतेदार आणी बलुतेदार सहकारी यांच्यासह सकल मराठी समाज हा लोकशाही विचार घेऊन विविध उपक्रम,आंदोलने करून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे.याची सुरुवात आम्ही स्वराज्यापासून करून संविधानापर्यंत त्याचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत.याचाच भाग म्हणून मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आम्ही केली आहे.त्यासाठी सामान्य नागरीकापासून ते खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यापर्यंत सर्वच स्तरातून या उपक्रमास पाठींबा मिळाला.त्यानंतर विविध उपक्रम राबवीत असताना २०१७ च्या शेवटी व १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव याठिकाणी प्रतिगामी शक्तीकडून मानवतेवर हल्ला झाला.त्यानंतर एकंदरीत महाराष्ट्रातून एक राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतर येऊन या प्रतिगामी विरुद्ध मानवतावादी आंदोलनाची सूत्रे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी हातात घेऊन प्रतीगाम्यंचा डाव उधळून लावला.अशा परिस्थितीत सकल मराठी समाजाने या येणाऱ्या सामाजिक बदलात कृतीशील सहभाग घेतला.त्यानंतर प्रतीगामी शक्तीकडून या सामाजिक बदलात खोडा घालण्यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचेवर टीकेची झोड उडविली.अशा वेळी आम्ही प्रतिगामी शक्तीकडून बोलणाऱ्या सरकारच्या प्रतिनिधीवत तात्काळ कारवाई करावी.अशी मागणी केली.त्यातूनच पुढे आगळा वेगळा उपक्रम म्हणून प्रकाश आंबेडकर यांना झेडप्लस सुरक्षा द्यावी असा उपक्रम राबविला.त्यातही सर्व मानवतावादी समाज घटकांनी सहभाग घेतला.अशा वेगवेगळ्या घटना घडत असताना मी माझ्या सहकारी यांच्यासह आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासंदर्भात पुण्यातील शासकीय विश्रामगृह याठिकाणी फुलपगार सर यांची भेट घेतली व निवेदन दिले.परंतु महाराष्ट्रभर चाललेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या झंझावातामुळे त्यावेळी भेट होऊ शकली नाही.त्यानंतर फुलपागार सरांच्या संपर्कात राहून भेट घेण्याचा प्रयत्न चालू ठेवला.त्यावेळी आम्हाला मुंबई किंवा अकोला याठिकाणी आपल्याला जाऊन भेट घ्यावी लागेल असे सांगितले.तशी तयारी आमची असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला तुम्हीच प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात जा असा निरोप दिला.


पुढे सकल मराठी समाजाचे चाललेले कार्यक्रम बघून भारिपच्या पदाधिकारी यांनी मला बाळासाहेब व्यस्त असल्याने आपण आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांची भेट घ्यावी असे सांगितले.त्यानुसार माझ्या सहकारी यांच्यासह अंजलीताईंची पुण्यात भेट घेतली व आमची भूमिका त्यांचे समोर मांडली.भूमिका मांडीत असताना या प्रतिगामी शक्तीना नेस्तनाबूत करण्याचे कार्य करणाऱ्या आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची इच्छा आम्ही मांडली.पुढे सकल मराठी समाजाच्या वतीने पुणेस्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान याठिकाणी समतावादी राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे नियोजन केले.या सोहळ्यासाठी अंजलीताई आंबेडकर यांना आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातसून म्हणून आमंत्रित करून मार्गदर्शन करण्याची विनंती केली.त्याचा मान ठेवून आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांनी सदर कार्यक्रमात उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन करून आम्हाला पुढील कार्यासाठी उर्जा दिली.(क्रमश:)




















































Thursday, April 4, 2019

प्रकाश आंबेडकर यांचेवर गुन्हा दाखल करणे म्हणजे संविधानिक अधिकारचे हनन करणे होय…! निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा विचार करावा….! उमदेवार राजेश खडके पुणे लोकसभा

               विषय असा आहे की,लोकसभेत निवडून जाणारा खासदाराने देशाचे संरक्षण करावे असे कार्य त्याचे असते आणि त्या निवडून आलेल्या खासदार यांनी ज्याला संसदेत प्रतिनिधित्व दिले आहे म्हणजे प्रधानमंत्री बनविले आहे त्याने देशातील आणि देशा बाहेरील सुरक्षा चोख ठेवणे गरजेचे आहे.असे असताना जर देशाच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न उपस्थित होत असेल आणि साडेतीनशे आरडीएक्स भारतात येऊन सहजपणे जवानाच्या चालत्या वाहनावर हल्ला होत असेल आणि त्यात ४० जवान मृत्युमुखी पडत असतील तर त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीविरोधात जर कोणतीही कारवाई होत नसेल तर हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या संविधानिक संरक्षणाच्या अधिकाराचा प्रश्न निर्माण होतो.आणि तो प्रश्न जर लोकशाही उत्सवात उपस्थित करण्यावर जर बंदी येत असेल तर तशी बंदी करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला प्राप्त होत नाही.आणि निवडूक आयोग जर तसे करीत असेल तर तो संविधानिक अधिकाराचे हनन आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी त्याच संविधानिक अधिकाराचा उपयोग करून पुलवामा संदर्भातील निवडणूक आयोगाच्या भुमिकेसंदर्भात जनतेमध्ये प्रश्न उपस्थित करून देशाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि तशी चिंता व्यक्त करणे हा या देशातील प्रत्येक नागरिकाचा संविधानिक अधिकार आहे.त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रकाश आंबेडकर यांचेवर दाखल केलेल्या गुन्ह्या संदर्भात पुनर्विचार करावा अशी मी राजेश नारायण खडके पुणे लोकसभा अपक्ष उमेदवार निवडूक आयोगास विनंती करीत आहे.आमच्या विनंतीचा मान ठेऊन पुलवामा हल्यामुळे देशाच्या सुरक्षेबाबतच्या उपस्थित झालेल्या प्रश्नाला वाट करून देण्यासाठी तो लोकशाही उत्सवात मांडण्याची परवानगी द्यावी.

Wednesday, April 3, 2019

पुणेकरानो तुम्ही मला मतदान का करावे…..! (भाग -१) पुणे लोकसभा उमेदवार राजेश खडके पुरस्कृत उमेदवार सकल मराठी समाज

प्रथम आपणास जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय

आपण पुणेकर नागरिक सुज्ञ आणि जाणकार असल्याचे मत साऱ्या जगात झालेले आहे.परंतु ज्यावेळेस मतदान बजाविण्याची वेळ जेव्हा आपल्यावर येते तेव्हा आपण आपल्यातील सुज्ञ आणि जाणकारपणा का गमावितो असा माझा प्रश्न आहे.जेव्हा मतदान होते तेव्हा मतदानाची टक्केवारी ही ५५ ते ६० टक्के पर्यंतच जात असते.उरलेले ४० ते ४५ टक्के सुज्ञ आणि जाणकार पुणेकर नागरिक काय करतात असा माझा प्रश्न आहे.म्हणून त्या ४० ते ४५ टक्के लोकांना माझे आवाहन आहे की आपले बहुमुल्य मत वाया घालवून पुण्याला असणारे ऐतिहासिक महत्व कमी करू नका. ”पुणे तिथ काय उणे” अशा शब्दाला खोडा घालून तेथे ४५ ते ४० टक्के मतांचे उणे अशी म्हण प्रचलित होऊ देऊ नका.आपण खासदार का निवडतो आणि तो निवडण्यासाठी आपल्याला मताचा का अधिकार दिलेला आहे याची जाण करून घ्या.५५ ते ६० टक्के मतदान करणारे कित्येक असे मतदार आहेत की आपण कोणाला आणि का मतदान करतो हे समजत नाही.आता उदाहरण द्यायचे झाले तर माझ्या फ्रेडलिस्ट मध्ये ५००० मित्र आहेत.परंतु यामध्ये लोकशाही प्रक्रियेला किती लोक मानतात असा माझा प्रश्न आहे.कारण ते लोक प्रतिक्रिया देत नाहीत आणि आपले विचारही मांडत नाही.चर्चा मसलत करीत नाही.हे आपले सामजिक खाते आहे याचे त्यांना कोणतेही भान रहात नाही.फक्त आपले फोटोशेषन करीत असतात...असो आपला मुद्दा आहे लोकशाही उत्सवात सहभागी होण्याचा आणि आपला खासदार निवडण्याचा…!
निवडणूक प्रक्रिया आणि त्या पर्क्रीयेतील मत जातीयवादावर नसून कार्य कर्त्युत्वावर दिले पाहिजे असे असताना केवळ इथला प्रस्थापित आणि घराणेशाही म्हणून पूर्वीपासून मतदार यांनाच मत देत आलेला आहे.तो उमेदवार आपण लोकसभेत का निवडून पाठवितो हे बघणे गरजेचे असताना त्याचे कार्य समजून घेणे असताना आपण लाल पिवळ्या निळ्या रंगात अडकवून आपले मत देत असतो परंतु त्या लाल पिवळ्या निळ्या आणि भगव्या रंगाचा कधी अभ्यास करीत नाही.परंतु त्या रंगाच्या आधारावर आपण आपले मतदान करीत असतो.सद्या आपण कट्टरवादाकडे वळलो आहे.कारण जो धर्म चौकटीच्या आतमध्ये पाळायचा असतो तो धर्म रस्त्यावर आणून धार्मिक दहशतवाद निर्माण करून इथला सर्व धर्म समभाव या व्याख्यालाच मूठमाती देत आहोत.इथली देव व्यवस्था आपण आपल्या घराच्या चौकटीच्या आत सांभाळायला हवी ती आपण रस्त्यावर आणून सामजिक सुव्यवस्था बिघडवीत असतो.त्यामुळे आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये याच आधारावर मतदान करीत असतो जेणेकरून आपले नुकसान होते याची आपल्याला कल्पनाही नसते.असो तो समजून घेण्याचा मुद्दा आहे समजून घ्याल तर उमजून जाल नाहीतर जसे आहात तसेच चालाल.
मी लोकसभेला मतदान का ….? करावे…! आणि या मतदानामुळे माझा आणि माझ्या देशाचा आणि माझ्या देशातील नागरिकांचा फायदा काय…? हा प्रश्न मला महत्वाचा वाटतो.आपण लोकसभेसाठी मतदान का करतो हे आपण पुढील भागात पाहू….! (भाग २)