Sunday, July 8, 2018

वेळीच मनोहर भिडेचे षड्यंत्र मोडीत काढले नाही तर....मानवाचे पुढील भवितव्य धोक्यात येईल...!


सर्वात महत्वाची बाब म्हणजे भीमा कोरेगाव हल्यातून मनोहर भिडे याला वाचविण्यासाठी संपूर्ण मनुवादी व्यवस्था उभी राहिलेली आहे.याचे मुळ कारण म्हणजे या जातीयवादी सरकारला संविधान बदलून मनुस्मृतीची अमलबजावणी करायची आहे ही गोष्ट आता जवळ जवळ सर्वश्रुत झालेली आहे.याचा प्रचार आणि प्रसार सुरळीत व्हावा यासाठी मनोहर भिडेची निवड आरआरएस यांनी केल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे.एकंदरीत संपूर्ण देशाचे चित्र पहिले तर आपल्याला असे लक्षात येईल की,देश पातळीवर संविधान संरक्षण करणारे लोक शिल्लक राहिलेले दिसत नाही.परंतु त्यांच्या या भूमिकेला जर कडाडून देशात कोण विरोध करत असेल तर ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर आहेत.याचीही पूर्ण कल्पना आता या देशातीलो जवळ जवळ प्रत्येक नागरिकांना होताना दिसत आहे.त्यामुळे त्यांच्यावर नक्षलवादी असल्याचा आरोप लावून प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र आखल्याचे यल्गार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समोर आलेले आहे.वारकरी सांप्रदाय संस्थापक संत नामदेव महाराज यांनीही मनुस्मृतीच्या विरोधात कार्य करून इथल्या मूळ निवासी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार यांनी केलेला आहे.या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातुन अनेक संत घडविलेली आहेत.त्यामध्ये चांडाळ पुत्र संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांची तीन भावंडे यांचे संरक्षण करून सिंधू संस्कृतीच्या संस्कारात संत नामदेव महाराज यांनी वाढविले आहे.याच वारकरी सांप्रदाय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी मानव कल्याण करण्यासाठी उभारलेल्या स्वराज्यासाठी या वारकरी यांच्या वारीतून सेना पुरविण्याचे कार्य संत तुकाराम महाराज यांनी केलेले आहे.ज्या मनुस्मृतीने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वडीलांनी शुद्र महिले बरोबर लग्न केले म्हणून त्यांना चांडाळ ठरविले आहे हे आपल्याला विसरून चालता येणार नाही.अशा संत ज्ञानेश्वर महाराज यांनी १४ व्या वर्षी समाधी घेतली आणि त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ३३ कोटी देव पृथ्वी तळावर उतरले होते अशी भंपक कथा तयार करण्यात आलेली आहे.आज प्रत्येक व्यक्ती विज्ञान युगात वावरत आहे तो अशा कथांना मान्यता देऊ शकत नाही.आणि ज्या लोकांना संत नामदेव महाराज यांनी गौतम बौध्द रुपी पांडुरंग यांच्या मानव कल्याण मार्गवर जाण्याचे ज्ञान दिले असे लोक जिवंत समाधी घेण्यासारखा निर्णय घेऊ शकत नाही हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे.तसेच ज्यांनी स्वराज्याला सेना पुरविण्याचे कार्य केले असे संत तुकाराम महाराज यांना वैकुंठात नेण्यासाठी गरुड रुपी विमान या पृथ्वी तळावर येते आणि त्यांना घेऊन जाते अशा भंपक कथेला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या समतावादी स्वराज्यात स्थान नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्यात मनुला स्थान असल्याचे पुरावे कुठेही उपलब्ध होत नाही मात्र पेशवाई मध्ये मनुला आणि त्याच्या मनुस्मृतीला स्थान असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध होतात.त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचेही पुढे मनु होता असे म्हणणे म्हणजे संपूर्ण मानव जातीचा अपमान केल्यासारखे आहे.अशा मनुची मनुस्मृती जाळली पाहिजे असे जाहीरपणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेले होते.ज्या मनुवादी लोकांनी छत्रपती शिवराय यांची लपवून ठेवलेली समाधी शोधून रयतेसमोर आणून त्यांचे समतावादी विचार आपल्या समोर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडले  आहेत.शाक्त पंथीय छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे करण्यात आली.अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला पेशवाई संपवून स्वराज्याच्या मावळ्यानी घेतला आहे....अशा मनुवादी लोकांना भीमा कोरेगाव येथे जागा दाखवून दिली आहे.समतावादी  स्वराज्य दाखविणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून डॉ भीमराव रामजी आंबेडकर (सकपाळ) यांनी त्या स्वराज्याच्या शूर वीरांना भीमा कोरेगाव याठिकाणी जाऊन मानवंदना देऊन अशी मनुची  मनुस्मृती स्वराज्याची राजधानी असलेले रायगडाच्या परिसरात जाळून टाकून स्वतंत्र भारताला संविधान देऊन मनूचा कायदा मोडीत काढला आहे याची सल वारवार इथल्या मनुवादी व्यवस्थेला होत आहे.अशा साविधांचे संरक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर करीत आहे म्हणून त्यांना बदनाम करून संविधान बदल्याची तयारी जवळ जवळ जोरात सुरु झालेली आहे.वारकरी संप्रदाय तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा आणि मनुवादी लोकांचा कोणताही संबध येत नाही.असे असताना गेल्या दोन वर्षापसून हा मनुचा चाहता मनोहर भिडे या वारकरी संप्रदाय यांचेवर ताबा घेण्यासाठी आणि लाखोच्या जनसमुदायाला आपल्या प्रचार यंत्रणेचे साधन बनविण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत शिरून यांच्यापेक्षा मनु किती श्रेष्ठ होता हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.वेळीच या मनोहर भिडेचे प्रयत्न जर मोडीत काढला नाही तर येणारे भवितव्य भारत देशातील प्रत्येक नागरिकांचे जीवन धोक्यात आणेन.....!


राजेश खडके
सकल मराठी समाज