तुम्हाला प्रत्येक जातीचा शोध का घ्यावासा वाटतो....? असा जर मला कोणी प्रश्न केला तर त्याला मी असे म्हणेन की, सिंधू संस्कृती व गावगाड्याच्या बौध्द संस्कृती वर जो आर्य सनातनी यांनी हल्ला करून इथला एकसंघ समाज जाती जातीमध्ये विस्तारित करून इथली दैवक संस्कृतीवर वेदिक धर्म देवतांचा प्रभाव निर्माण करून चातुवर्ण व्यवस्था उभी करून इथली प्रशासन व्यवस्था ताब्यात घेतली आहे.परंतु या आर्य सनातनी व्यवस्थेला नेहमी विरोध करणारी मंडळी उभी राहून त्यानी नेहमी “क्रांती” केलेली आहे.त्यामुळे प्रत्येक जातीचे प्राचीन अस्थित्व काय होते...? हा विषय इथे समजून घेण्याचा माझा एक प्रयत्न आहे.त्यामुळे या बामणी व्यवस्थेचे मूळ संरक्षक आणि प्रचारक शोधण्याची माझी भूमिका नेहमी प्रामाणिक राहिलेली आहे.त्यामुळे गणव्यवस्थेच्या विरोधात उभी राहिलेल्या ह्या वर्ण व्यवस्थेच्या विरोधात नेहमी महार गणाने संघर्ष केल्याचे प्राचीन काळापासून इतिहासात दिसत आहे.त्यामुळे या महार गणाचे नेहमी तुकडे तुकडे झाल्याचे दिसते.बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्यातून कुणबी उभा राहिल्याचा इतिहास दाखला देतो.त्याच प्रमाणे गावागाड्यात येणारे फिरस्ते आणि नंतरच्या काळात उभा राहिलेला अल्पसंख्याक वर्ग यावर नेहमी वैदिक व्यवस्थेने दबाव निर्माण केलेला आहे.परंतु इतिहास काळापासून ते आजपर्यंत नेहमी महार हा “योद्धा” म्हणून लढल्याचे दिसत आहे.त्यामुळे लढवय्या वर्गाला गावगाड्यापासून तोडण्याचा नेहमी प्रयत्न आतून व बाहेरून झाल्याचे दिसत आहे.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गावगाड्याचा आणि येथील वर्णव्यवस्था आणि येथील जात व्यवस्थेतून अस्पृश्य ठरविणाऱ्या महार योद्ध्यांचा इतिहास शोधून त्यांचे शौर्य म्हणून भीमा कोरेगावचा विजयस्तंभ दाखवून सेनेत “महार बटालियन” उभी केलेली आहे.महार योद्ध्यांचा इतिहास संपुष्टात यावा म्हणून “महार” शब्द उचारला जाऊ नये अशी एक व्यवस्था आतून व बाहेरून उभी राहिलेली आहे.त्यामुळे आपले अस्तित्व काय....? हे नेहमी आपल्याला जाती वरून दिसते म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जातींचे शेड्युल्ड तयार करून प्रत्येक जातीच्या याद्या तयार करून त्याला न्याय मिळवा यासाठी एससी,एसटी,एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी आणि अल्पसंख्यांक यांच्या “जातीच्या याद्या” करून त्याला शेड्युल्ड कास्ट असे संबोधलेले आहे.म्हणून या संपूर्ण जातींना न्याय मिळावा म्हणून “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” असे नाव देऊन राजकीय पक्ष स्थापन केलेला होता.परंतु “शेड्युल्ड कास्ट” म्हणजे “अनुसूचित जाती” असे विश्लेषण करून सदरचा पक्ष फक्त याच वर्गाच्या विकासासाठी स्थापन केल्याची चर्चा आतून व बाहेरून नेहमी उभी करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना गावगाड्यापासून तोडण्याचा प्रयत्न आतून व बाहेरून झाल्याचे दिसते.त्यामुळे जात लपवून कोणतेही कार्य होणार नाही यावरून मला दिसते.त्यामुळे तुम्ही धर्माने कोण आहात या पेक्षा जातीने कोण आहात हे महत्वाचे आहे.जात जर कळाली तर त्या जातीचा विकास किती झालेले आहे हे दिसून येते म्हणून जातीय “जनगणना” व्हावी असा नेहमी आवाज दिला जातो. मी “बौध्द” जरी असलो वा मी “हिंदू” जरी असलो तरी माझी जात कोणती....? हे या “शेड्युल्ड कास्ट” म्हणजे जातींच्या तयार झालेल्या याद्यावरून दिसते.त्या प्रमाणे महार समाजाच्या किती प्रमुख जाती व पोटजाती आहेत हे शोधण्याचा माझा प्रयत्न असून ज्या प्रमुख जाती मला सशोधनात सापडलेल्या आहेत त्या मी आपल्या समोर मांडीत आहे.त्यातील आपण कोण...? याचा शोध घेऊन आपले इतीहासातील अस्तित्व शोधावे....! त्याच प्रमाणे पोटजाती व त्याचे कार्य पुढील लेखात मी प्रसिध्द करेन....(क्रमशJ
खालील प्रमाणे प्रमुख महार जाती -:
१) थोरल्याघरचा :-
२) भुमीपुत्र किंवा धरणीपुत्र -: महारांच्या प्राचिन अस्तित्वाचे प्रतिक मानतात तेच देश व महाराष्ट्राच्या मुळ जमाती आहेत.
३) मिराशी :- जमिनीचा मालक
४) परवारी :-लढाऊ जमात इंग्रज महारांना आदराने परवारीच म्हणायचे
५) वेसकर :- वेशीवरचा सुरक्षा रक्षक
६) काठीवाला :- न्यायमंदिरात व नोंदणी खात्यातील प्रमुख पदाधिकारी
७) धेड :- गुजरात (पुर्वीचा महाराष्ट्र) तेथील प्रमुखाला धेड महार म्हणतात
८) डोंब :- गुजरात मधिल लढाऊ महारवर्ग
९) तराळ :- खंड गोळा करून आणणारा महारवर्ग
१०) भुयाळ :- भोई (मुख्या शब्द भुई म्हणजे जमिन
११) चोखामेळा :- संत परंपरेत समतेसाठी उभा राहीलेला वर्ग
१२) हुलसव किंवा हुळसव :- महाराची कर्णाटकातील महारांची जात तिला माला किंवा माळा असेही म्हणतात.देशभर जन्ममृत्यीची व वंशवेलाची माहीती ठेवणारा महार
१३) अतिशुद्र :- अतिअर्वाचीन वापरण्यात आलेला शब्द
१४) म्हेत्रे :- मोठ्ठा प्रमुख नेता
१५) अंत्यज :- समाज रचनेतील शेवटचा घटक किंवा गोतसभा/गोतावळ्यातील शेवटचा/अंतिम निर्णय देणारा !परवारी
No comments:
Post a Comment