शहाजीराजे यांनी १६१६-१७ मध्ये पुणे (निजबत
मुंजेरी) येथील हाडकीच्या (महार समाजाच्या) जागेत लाल महाल बांधला.”नागरवास” गावात
हत्तीच्या वजना एवढी तुळा करून तेवढ्या वजनाचे सोने चांदी धन धान्य गोरगरीब रयतेला
देऊन स्वराज्याची संकल्पना निर्माण केली. तुळा केले वरून ”नागरवास” गावचे नाव “तुळापुर”
पडले.१९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी येथे शिवरायांचा जन्म झाला.शहाजीराजे यांचे
सहकारी नेताजी पालकर - वीर बाजी पासलकर – शेलारमामा यांचेकडून शिवरायांना युध्द
कलेचे शिक्षण मिळाले.आता संकल्पित स्वराज्य अस्तित्वात आणण्याची वेळ आली होती.“प्रचंडगड”
याचे रायनक परवारी महार राजे शहाजीराजे यांचे सहकारी होते.शहाजीराजे यांच्या
संकल्पित स्वराज्यासाठी “प्रचंडगड” शहाजीराजे यांचेकडे स्वाधिन करण्याचे रायनक परवारी
यांचे “वचन” होते.आता संकल्पित स्वराज्य स्थापन करण्याची वेळ आली होती.शहाजीराजे
यांनी गौतम बुद्धांचा भगवा विचार आणि सम्राट अशोक यांच्या समतावादी लोकशाही लोकहितवादी
राज्याचे भगवे निशाण शिवरायांच्या हातामध्ये देऊन माता जिजाऊ यांचे सोबत नेताजी
पालकर - वीर बाजी पासलकर – शेलारमामा यांना शिवगंगा खोऱ्यामध्ये रायनाक परवारी
यांचे नावे लखोटा देऊन पाठविले.वीर बाजी पासलकर यांचा मांग दरीतील सहकारी यल्या मांगाला
बरोबर घेऊन रायनाक परवारी यांचेकडे लखोटा सोपवून “प्रचंडगड” स्वराज्याच्या स्वाधिन करून यल्या मांगाच्या
हातून स्वराज्याचे पहिले तोरण म्हणून प्रचंडगडावर पहिले भगवे निशाण उभारले....आणि त्याचे
पुढे नामकरण झाले ते “तोरणगड” या तोरणागडाचा म्हणजे स्वराज्याचा पहिला गडकरी
म्हणून शिवरायांनी यल्ल्या मांगाची निवड केली.शिवरायांच्या स्वराज्यात दोन सरदार
कार्यरत होते एक होता तो “मराठी सरदार” म्हणजे अठरा पगड अलुतेदार आणि बारा
बलुतेदार होय.त्यामध्ये सुरुवातीचे “मराठी सरदार” म्हणजे रायनाक परवारी आणि यल्ल्या
मांग आहेत.आणि दुसरा होता तो “मराठा सरदार” त्यामध्ये होते ते मराठा....! स्वराज्याचे
पहिले सरसेनापती म्हणून वीर बाजी पासलकर यांची शिवरायांनी निवड केली.नेताजी पालकर –
वीर बाजी पासलकर – हैबतराव शिळीमकर हे स्वराज्याचे पहिले “मराठी सरदार” होय.शिवरायांनी
काशीच्या गागा भट्टा कडून पहिला राज्यभिषेक करून घेतला.मात्र ब्राह्मण धर्माने
त्यांना राजा मानण्यास नकार दिला होता.....कारण शिवराय हे “महार राजे” होते.संभाजी
राजांच्या सांगण्यावरून शिवरायांनी पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्यभिषेक
शाक्त धर्म पध्दतीत करून घेऊन समतावादी पर्व सुरु करून मनुस्मृतीने लादलेली सप्त
बंदी मोडण्याची सुरुवात त्यानी केली.सनातनी धर्मावरील हल्ला वैदिक धर्म पंडितांना
रुचणारा नव्हता त्यानी स्वत:चा सनातनी धर्म प्रस्थापित करण्यासाठी गौतम बुद्धांची हत्या
करून एक लाख बौध्द भिकुंच्या कत्तली त्यांनी केल्या होत्या.वारकरी सांप्रदायाची
स्थापना करणारे संताची हत्या त्यांनी केली होती ते गप्प बसणारे नव्हते.त्यांचेकडे
त्यांचे गुलाम म्हणून स्वराज्याचे विरोधक राजपूत मराठा होता.त्यांना बरोबर घेऊन त्यांनी
रायगडावर संभाजीराजे नसताना छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर विषप्रयोग केला त्यात
त्यांची हत्या झाली.मराठा सरदार हंबीरराव मोहिते यांनी या मारेकऱ्याना अटक करून
संभाजी महाराज यांचे समोर हजर केले.संभाजीराजे यांना त्यांना तुरुंगात टाकण्याचे
आदेश केले....आणि संभाजीराजेनी त्यांचा राज्यभिषेक शाक्त धर्म पध्दतीत करून ते
छत्रपती झाले.त्यानी शिवाजी महाराज यांच्या मारेकरी यांनी चार वर्ष सुनावणी चालवून
दोषी ठरल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी मनुस्मृती लादलेले सप्त बंदी मोडून
त्यानी समतावादी स्वराज्य विस्तार मोठ्या प्रमाणात वाढविला.सनातन्यांना याचा खूप
राग आला होता त्यांना त्यांचा सनातनी धर्म पुन्हा धोक्यात आल्याची जाणीव झाली
त्यानी रजपूत मराठा यांना बरोबर घेऊन संभाजीराजांची हत्या करण्याचे षड्यंत्र सुरु
केले तीन वेळा संभाजीराजाना विषप्रयोग करण्याचा प्रयत्न सुरु केला....परंतु संभाजी
महाराज त्यातून बचावले.मग त्यांनी शिवाजी महाराज यांनी उभी केलेली गुप्तचर यंत्रणा
पोखरण्यास सुरु केले त्यामध्ये आपले गुलाम रजपूत मराठा घुसविण्याचे कटकारस्थान
सुरु केले.स्वराज्याचे “मराठा सरदार” गुपचूप पध्दतीत संपविण्याचे कार्य जोरात सुरु
झाले.त्यांना माहित होते की संभाजी महाराज संपले की स्वराज्य संपणार आहे आणि ते
आपल्या ताब्यात येणार आहे.औरंगाजेबाचे स्वराज्य ताब्यात घेण्याचे खूप जूने स्वप्न
होते.रजपूत मराठा आणि वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबास त्याचे स्वप्न पूर्ण
करण्याचे लालच दिले.तेव्हा संभाजी महाराज यांना पकडून देण्याचे आश्वासन या लोकांनी
दिले...त्याला ते मान्य झाले.संगमेश्वर येथील शृंगारपुरात संभाजी महाराज गेले
होते....त्यांचे बरोबर त्यांचे काही निवडक लोक बरोबर होते...त्यामध्ये संताजी
घोरपडे होता.पूर्व नियोजित कटकारस्थाना नुसार संभाजी महाराज यांना औरंगाजेबाच्या
अडीच हजार सैनिकांना धरून दिले....तेथून ठरल्याप्रमाणे संताजी घोरपडे पळून गेला.सनातनी
यांनी ठरल्याप्रमाणे जेरबंद संभाजी महाराज यांना ७०० कि.मी चा प्रवास करीत ३८ दिवस
धिंड काढीत स्वराज्य संकल्पित “तुळापुर” येथे आणले.औरंगाजेबास मनुस्मृती प्रमाणे
शिक्षा देण्यास भाग पाडले....त्याच्याकडून आपल्या मनाप्रमाणे छत्रपती संभाजी
महाराज यांना हालहाल करून त्यांची “तुळापुर” येथे हत्या करून स्वराज्य संपवून पेशवाईची
मुहूर्तमेढ रोवली गेली.एका राजाची एवढी अमानुष हत्या आपल्याकडून करून घेतली त्याला
त्याचा पश्चाताप झाला....स्वराज्य संपले होते.मनुवादी विचारांनी समतावादी संभाजी
महाराज यांना औरंगजेबाच्या माध्यमातून धर्मवीर बनविण्यात आले.स्वराज्याच्या दोन
गाद्य निर्माण करण्यात आल्या.एक गाडी सातारा येथे तर दुसरी गादी कोल्हापूर येथे
हलविण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांची संभाजी महाराज यांनी बांधलेली समाधी
दुर्लक्षित करण्यात आली.लाल महालावर ताबा मारून त्याचा शनिवार वाडा करण्यात
आला.शनिवार वाड्यातून स्वराज्याची सूत्रे हळू लागली स्वराज्याचे “मराठा सरदार”
यांना भूलविण्यात आले.स्वराज्य चालवीत असल्याचा भ्रम निर्माण करण्यात आला. “मराठा
सरदार” सरदार संपविण्यासाठी पेशवाईकडून सूत्रे हलविण्यात येऊ लागली.संभाजी महाराज
यांची हत्या औरंगजेबाने स्वराज्य म्हणून केली असे बिंबविण्यात आले....आणि पानिपतचे
युध्द घडवून स्वराज्यातील एक लाख घरामध्ये बांगड्या फोडण्यास भाग पाडले.....आता “मराठा
सरदार” संपला होता.पेशवाईने “मराठी सरदार” संपविण्यासाठी पराकोटीचा जातीवाद
निर्माण केला.सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज यांचेकडे भोरचे “मराठी सरदार”
म्हणून सिद्धनाक महार होते.आता पेशवा “रजपूत मराठा” यांचे माध्यमातून राजा झाला
होता....त्याने स्वराज्याचे टाकसाळ (चलन) बंद करून स्वत:ची टाकसाळ (चलन) निर्माण
केली होती.पेशव्याची स्वराज्याची गद्दारी आता पुढे आली होती.छत्रपती संभाजी महाराज
यांच्या हत्येची खरी उकल स्वराज्याला झाली होती....ते समतावादी विचारांचे होते आणि
त्यांनी सप्तबंदी मोडून मनुस्मृतीला विरोध केला होता....म्हणून औरंगजेबाच्या
माध्यमातून मनुस्मृती प्रमाणे त्यांना शिक्षा देऊन हत्या केल्याची माहिती शाहू
महाराजांना आणि “मराठी सरदार” यांना झाली होती.शाहू महाराजांनी सिद्धनाक महार या
मराठी सरदाराला बोलावून घेतले होते.....आणि त्याला आदेश केले की,आता संभाजी महाराज यांच्या
हत्येचा बदला घेण्याची वेळ आली आहे.पराकोटीचा जातीवाद निर्माण करणारा पेशवा
संपविण्याची वेळ आली आहे.तेव्हा सिद्धनाक महार याने स्वराज्यातील अडीचशे इतर “मराठी
सरदार” यांना प्रत्येकी १०० ठोकळ गडी भीमा कोरेगाव याठिकाणी घेऊन येण्यास सांगितले
होते.नगर मधून ब्रिटीश फलटण खडकी येथे युध्द करायला निघाली होती.....त्यांना भीमा
कोरेगाव येथील युध्दाची माहिती मिळाली होती.त्या फलटण मध्ये ५०० महार सैनिक होते
त्यांनी भीमा कोरेगाव येथे आपल्या भाऊबंदा बरोबर पेशव्याच्या विरोधात लढण्याचे
ठरविले.“मराठी सरदार” सिद्धनाक महार यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सामील झाले.आता
मराठी सरदार यांच्या नेतृत्वाखाली २५ हजार ५०० सैनिक लढण्यास तयार झाले होते.पेशव्या
बरीबर रजपूत मराठा होता....युध्द सुरु झाले मराठी सरदार समोर येणाऱ्या रजपूत
मराठ्यांना आडवे करीत चालला होता.संभाजी राजांच्या हत्येने रक्ताने माखलेले भीमा नदी
रजपूत मराठ्यांच्या रक्ताने धुवून निघत होती....आता लाल महाला वरील शनिवार वाड्याच्या
माध्यमातून स्वराज्यावरील ताबा उठण्याची वेळ आली होती....अखेर पेशवा हरला आणि तो
पळून गेला.याची खबर शनिवार वाड्यातील पेशव्याचा वंशज नातू याला कळाली त्याच्या लक्षात
आले की,सिद्धनाक महार पुन्हा एकदा स्वराज्याचे भगवे निशाण शनिवार वाड्यावर उभारून
लाल महालाचे अस्तित्व उभे करणार...! लागलीच त्याने लाल महाल जाळला....आणि ब्रिटीशांचा
युनियन जॅक उभारून त्याने शरणागती पत्करली.शहाजीराजे संकल्पित स्वराज्य शिवराय
स्थापित स्वराज्य समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची मनुस्मृती प्रमाणे
हत्या करून स्वराज्य संपवून उभी राहिलेली पेशवाई मराठी सरदार यांनी संपवून समतावादी
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येच्या बदल्याची तारीख १
जानेवारी १८१८ इतिहासात नोंद केली.त्या ५०० महार सैनिकांचा इतिहास अमर रहावा
यासाठी ब्रिटीश सरकारने भिमा कोरेगाव याठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ “विजयस्तंभ”
उभारला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या विजयस्तंभाला भेट देऊन अभिवादन करून त्यांनी
असे वकतव्य केली की जो इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाही.अशा पराकोटीचा जातीवाद
असणारी आणि समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची ज्या मनुस्मृती प्रमाणे
हत्या केली त्याच मनुस्मृतीचे दहन करून संविधानाच्या माध्यमातून स्वतंत्र भारताला
संविधान देत असतांना संसदेतील भाषणात असा उल्लेख केला की,सम्राट अशोक आणि छत्रपती
शिवाजी महाराज यांचे राज्य लोकशाही लोकहितवादी होते म्हणून मला संविधान लिहिण्यास
सहज शक्य झाले.तेव्हापसुन आपण आपल्या ऐतिहासिक महार योध्यांचा इतिहास जागृत
ठेवण्यासाठी भीमा कोरेगाव याठिकाणी जाऊन त्यांच्या शौर्याच्या “विजयस्तंभ’’ येथे
अभिवादन करतो.
राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी समाज
किती विसंगत विधाने यात आहेत )
ReplyDelete१)" शहाजीराजे यांनी १६१६-१७ मध्ये लालमहाल बांधला " वास्तविक १६३८ पर्यंत पुण्यात आदिलशाहीची राजवट होती १६३८ ला आदिलशाहने पुण्याची जहागिरी शाहजी राजे याना दिली आणि लाल महाल जो बांधला तो १६४० मध्ये तो सुद्धा कोंडदेवाकडून
२)"नागरगावात हत्तीच्या वजनाइतकी तुला करून तेवढ्या वजनाचे सोने चांदी धन धान्य गोरगरीब जनतेला देऊन शाहजी राजे यांनी स्वराज्याची संकलपना निर्माण केली" वास्तविक शाहजी राजे यांची तुला न करता मुरार जगदेवाची तुला १६३३ मध्ये करण्यात आली आणि त्यावेळेस शाहजी राजे उपसिथ होते एवढेच हा मुरार जगदेव म्हणजे पुणे शहर जाळून उद्वस्थ करणारा सरदार
३)"ब्राह्मणांनी रायगडावर शिवाजी राजे याना विष देऊन ठार मारले " एकदम बकवास लिखाण एकही पुरावा नाही
४)" शाहू महाराज यांनी सिद्धनाक महाराला बोलून घेतले आणि त्याचेकडून पेशव्यांचा पराभव करण्यात आला ." वास्तविक शाहू महाराजांचा मृत्यू झाला तो १७४९ मध्ये आणि सिद्धनाक याने पेशव्यांचा (तथाकथित )पराभव केला तो १८१८ मध्ये म्हणजे शाहू राजे यांच्या मृत्यूनंतर ६९ वर्षांनी