Wednesday, July 10, 2019

मी प्रकाश आंबेडकर यांचा भक्त नाही….बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे…! राजेश खडके सकल मराठी समाज

            होय मी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचले आहे आणि अभ्यासले आहे...त्यामुळे मी त्यांच्या विचारांचा पाईक झालो आहे.होय मी हिंदू आहे परंतु आर्य सनातनी हिंदू धर्मीय नाही… कारण हा आर्य सनातनी हिंदू धर्म १८७५ ला स्थापन झालेला आहे...आणि त्याची पेरणी पेशवाई काळात झाली असून याच धर्माच्या नावाखाली जातीय व्यवस्था मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आहे.महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवरायांचे असलेले समतावादी स्वराज्य आपणास दाखविलेले आहे.बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक कार्याचे संशोधन केले तर असे लक्षात येईल की,इथली सिंधू संस्कृती त्यांनी उजागर केलेली आहे.विद्वतेचा, मानव कल्याणकारी विचारांचा आणि सामुहिक जीवन कार्यप्रणालीचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे.त्यामुळे सिधू संस्कृती ही भारताची जीवन प्रणाली आहे.त्यामुळे बोली भाषेतून या सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणण्याची प्रथा सुरु झालेली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणताही नवीन धर्म स्थापन केलेला नाही.आर्य सनातनी हिंदू धर्माच्या विरोधात जाऊन बौध्द धम्माची दीक्षा त्यानी घेतलेली आहे.जो बोध्द धम्म सिंधू संस्कृतीच्या विचारांचे समर्थन करतो.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,माझ्या बुध्द धम्म दिक्षेमुळे इथल्या हिंदुना कोणताही त्रास होणार नाही आणि आजही तो त्रास होताना दिसत नाही.हाच विचार मारण्यासाठी १८८४ ला पहिल्या हिंदू महासभेतून निर्माण झालेला कॉंग्रेस पक्ष पेशवाईचे समर्थन करीत आहे.त्यामुळे १९२५ चा आरएसएसचा इतिहास १८८४ मध्ये पेरला गेला असल्यामुळे त्यांचा इतिहास आभ्यास शास्त्रात घेण्यात आलेला आहे याची आपण दक्षता घेतली पाहिजे.अशा संघरुपी कॉंग्रेस पक्षाची अस्तित्व संपत आहे याचा आनंद इथल्या भूमीपुत्रांनी घेतला पाहिजे.कारण याच संघरुपी कॉंग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना या देशातील वंचितांच्या कल्याणकारी लढ्याला विरोध केलेला आहे...आणि याच संघरुपी कॉंग्रेसने बाबासाहेबांना खूप त्रास दिलेला आहे याचीही आठवण आपण ठेवली पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले नंतर त्यांची समाधी दिल्लीत उभारणे गरजेचे होते परंतु तसे त्यांनी केले नाही.त्यांचे साहित्य २० वर्षापासून गायब होते ते शासनाच्या कब्जेत घेण्यासाठी २० वर्ष लागले आहे.याच काळात त्यांच्या साहित्यात मोठ्या प्रमाणात बदल केले गेले आहेत याचेही संशोधन आपण केले पाहिजे.आणि याच काळात गोवळकर यांचा देखील आभ्यास आपण केला पाहिजे.परंतु जो सन्मान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांना समाजाकडून मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे...त्याचे तसे कारणही आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण नंतर गटटताचे राजकारण उभे राहिले आणि त्यांच्या वारसांना राजकारणा पासून दूर केले गेले.आज प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहे त्यांची कार्यपद्धती बघितली की आपल्या लक्षात येईल की ते संघरुपी कॉंग्रेसच्या आणि इथल्या सरंजामशाही घराण्याच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा मोगलांच्या कमी आणि सरंजामशाही घराण्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात होता.त्यामुळे या डूबत असलेल्या सरंजामशाही घराणेशाहीला वाचविण्यासाठी वामन मेश्राम पुढे आलेला आलेला आहे.छोटे मोठे रिपब्लिकन गटाचे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन पुढे प्रकाश आंबेडकर यांची बदनामी करताना पाहयला मिळत आहेत.ज्या छोट्या मोठ्यां समाजाला विकण्याच्या दुकानादाऱ्या बंद पडत चालल्यामुले ते दुकानदार प्रकाश आंबेडकर यांचेवर आरोप करताना पाहायला मिळत आहे.निवडणुकीच्या राजकारणात आज जरी भाजपाचा फायदा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होताना दिसत असला तरी तो तात्पुरता फायदा आहे याची जान आपण ठेवली पाहिजे.आणि समाजिक दृष्टीकोनातून पाहिले हे खूप मोठे परिवर्तन आहे याचाही अभ्यास आपण केले पाहिजे.कारण आज अलुतेदार आणि बलुतेदार ह्यांना सत्तेची दारे उघडण्यासाठीचा प्रकाश आंबेडकर यांचा मोठा संघर्ष आहे….आणि त्या हा संघर्ष यशस्वी होताना पाहायला मिळत आहे.जो लढा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेला आहे तोच लढा प्रकाश आंबेडकर लढताना दिसत आहे.यातून भविष्यात वंचित समुहाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे समतावादी स्वराज्य निर्माण होत आहे याचा आपण आभ्यास केला पाहिजे.परिवर्तन करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो ज्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना याच संघरुपी कॉंग्रेसने त्रास देण्यासाठी गद्दार उभे केले आज तेच संघरुपी कॉंग्रेसवाले प्रकाश आंबेडकर यांना त्रास देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुन्हा गद्दार उभे करीत आहेत याची आपण काळजी घेतेली पाहिजे. त्यामुळे मी प्रकाश आंबेडकर यांचा भक्त नाही….बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे…!

Thursday, July 4, 2019

जिजाऊ प्रकाशन आणि संभाजी ब्रिगेड यांनी निर्माण केलेले साहित्य विसर्जित का करू नये…? इतिहास सशोधनात राजकारण शिरले काय….? राजेश खडके सकल मराठी समाज


                    विषय असा आहे की,महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून त्यांची पहिली जयंती साजरा करून त्यांचे समतेचे विचार आमच्या समोर आणले.मनुवादी विचारांच्या मनुस्मृतीचे दहन केले पाहिजे असे त्यानी जाहीर वक्तव्ये केले होते.अशा महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानून त्या मनुस्मृतीचे दहन केले आहे
.                        परंतु २५ वर्षापूर्वी कुणबी समाजाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी जिजाऊ प्रकाशन स्थापन करून त्या माध्यमातून इतिहासकार यांनी संशोधन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे समतेचे विचार जगासमोर आणले.या विचारांना बाधक प्रवृत्ती ठोकून काढण्यासाठी त्यांनी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या संघटनेची स्थापना केली.आणि माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या भांडारकर संस्थेच्या प्रवृत्ती ठेचून काढल्या आहेत.याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रवीण गायकवाड यांनी घेतली होती.अशा त्यांच्या कर्तुत्वाचे गुणगान गाऊन आम्ही रिपब्लिकन मोर्चाच्या माध्यमातून साधारण फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे १०० कार्यकर्ते घेऊन समर्थन केलेले आहे.
                        जिजाऊ प्रकाशन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची धर्म पंडितांनी केलेली हत्या जगासमोर आणली आहे.धर्म पंडित यांचा खरा चेहरा उघड करून धर्म पंडित यांनी शिवरायांचा केलेला ६ जूनचा पहिला राज्याभिषेक शंभूराजे यांनी नाकारण्यास सांगून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथ पद्धतीत म्हणजे समतावादी विचारांचा राज्याभिषेक २४ सप्टेंबर रोजी करायला लावलेला आहे.त्यामुळे धर्म पंडित शंभूराजे यांचेवर चिडलेले होते त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त बदनामी कशी होईल याची तजवीज त्यांनी केलेली होती.या सगळ्या गोष्टी संशोधन करून जिजाऊ प्रकाशन यांचे माध्यमातून संभाजी ब्रिगेड यांनी त्यांच्या प्रवक्ते यांच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेल्या आहेत.
                   जिजाऊ प्रकाशन यांनी छत्रपती शिवराय यांच्या महापरिनिर्वाणानंतर शंभूराजे यांना स्वराज्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांची अटक करून त्यांना संपविण्याचे धर्म पंडित यांचे कटकारस्थान उघड केलेले आहे.या सर्वाना शंभूराजे यांनी कशी तोड दिली हे दाखवून त्यानी स्वत:चा राज्याभिषेक शाक्त पंथ पद्धतीत करून धर्म व्यवस्था नाकरून त्यांनी त्यांची राजमुद्रा पिंपळाच्या पानावर कोरलेली होती याचे पुरावे समोर आणले आहेत.
                         समतावादी पंथ संपविण्यासाठी याच धर्म पंडित यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे बरोबर स्वराज्यद्रोह करून औरंगाजेब याचे बरोबर संधान बांधून याच धर्म पंडित यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा मनुस्मृती प्रमाणे कशी हत्या केला होती याचा खरा इतिहास जगासमोर आणलेला आहे.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण नावाचा लिहिलेला ग्रंथ समोर आणलेला आहे.याच बुधभूषण ग्रंथाचे काव्य रुपांतर संभाजी ब्रिगेडचा छावा शरद गोरे यांनी करून ते जनतेसमोर आणलेले आहे.
                      स्वराज्यातील अलुतेदार आणि बलुतेदार यांचे काय महत्व होते याचा खरा इतिहास संभाजी ब्रिगेड यांनी उजागर केलेला आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला भीमा कोरेगावचा इतिहास आहे.त्याठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज यांची वढू बुद्रुक येथील गोविंद महार याने बांधलेली समाधी आणि तुळापुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची झालेली हत्या ही मनुस्मृती प्रमाणे होती याचे उदाहरण आणि पुरावा देण्यासाठी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात मनुस्मृती दहन केली आहे.
                         डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा “बुधभूषण” नावाचा ग्रंथ डोळ्यासमोर ठेऊन “बुध्दभूषण” नावाची प्रिंटींग प्रेस उभारलेली होती.पिंपळाच्या पानावर असलेली राजमुद्रा डोळ्यासमोर ठेऊन बुध्द धम्म दीक्षा घेऊन धम्मात पिंपळाच्या पानाचे महत्व आपल्याला समजून सांगितलेले आहे.
                   असे विचार जिजाऊ प्रकाशनच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड यांनी देऊन त्या प्रकारचे साहित्य निर्माण केले आहे.वैदिक धर्म पंडित यांना कधीही छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यात महत्व दिलेले नाही हे दाखविण्यासाठी जिजाऊ प्रकाशन यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केले आहे.
                                 परंतु गेल्या दोन चार वर्षापासुन संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता भांबाविलेला दिसत आहे.त्यामुळे तो कट्टर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन आपल्या जीवनात धर्म पंडित यांना स्थान देऊन आपले कर्मकांड बामणांच्या हातून करून घेताना पहायला मिळत आहे.आपण शिवधर्मीय आहोत असे दाखवून तो शिवविवाह न करता तो शुभविवाह करून त्याचे कर्मकांड बामणांच्या हातून करून नव्या जोडीने सत्यनारायण महापूजा घालताना दिसत आहे.यातून प्रवीण गायकवाड यांचे देखील कुटुंब सुटलेले नाही.
                   जिजाऊ प्रकाशन आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आता पुरुषोत्तम खेडेकर यांना त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून भाजपाच्या माध्यामतून राजकारण दिसत आहे...तर प्रवीण गायकवाड यांना शरद पवार यांच्या माध्यमातून राजकारण दिसत आहे.त्यामुळे खासदार अमोल कोल्हे हे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या टीव्ही मालिकेच्या माध्यामतून वैदिक धर्म पंडित यांचे उदात्तीकरण करून छत्रपती शिवराय यांचे स्वराज्य हिंदुत्ववादी असल्याचे दाखवीत असताना युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रवीणदादा गायकवाड शांत बसलेले आहेत.त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,जर इतिहास सशोधनात राजकारण घुसले असेल तर….मग जिजाऊ प्रकाशन आणि संभाजी ब्रिगेड यांनी निर्माण केलेले साहित्य विसर्जित का करू नये….?