शहाजीराजे यांनी स्वराज्य निर्माण करण्यासठी पुणे (निजबत मुंजेरी ) येथे हाड्कीच्या (महार समाजाच्या) जागेत राशीनच्या बांगर यांचेकडून १६१६- १६१७ मध्ये लाल महाल बांधून घेतला होता...आणि तो झांबरे पाटील याला देखरेखीसाठी देण्यात आलेला होता.शहाजीराजे यांना पहिला पुत्र संभाजी झाल्यानंतर १६२३ मध्ये “नागरवास” गावात हत्तीच्या वजना एवढी तुळा करून तेवढ्या वजनाचे सोने चांदी धन धान्य रयते मध्ये वाटून स्वराज्य संकल्पित केले होते.तुळा झालेवरून “नागरवास” या गावचे नाव पुढे “तुळापुर” झाले.शिवनेरी गडावर शिवाजी महाराज यांचा १९ फेब्रुवारी १६३० मध्ये जन्म झाला.त्यांचे प्रशिक्षण कर्नाटक मध्ये वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलार मामा यांचेकडे झाले होते.आता संकल्पित स्वराज्याची स्थापना करण्याची वेळ आली होती. शहाजीराजे यांच्या संकल्पित स्वराज्याचे भगवे प्रतिक घेऊन शिवराय आणि माता जिजाऊ यांचे सोबत वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलार मामा हे शहाजीराजे यांनी प्रचंडगडाचे महार राजे रायनाक परवारी यांचे नावे दिलेला लखोटा घेऊन शिवगंगा खोऱ्यातील पासलकर वाड्यामध्ये येतात....आल्यानंतर स्वराज्य स्थापनेची गनिमी कावे सुरु होतात. शिवरायांची मांग दरीतील यल्ल्या मांग आणि मोसे खोऱ्यातील तवं गाव येथील खंड्या महार यांची पासलकर वाड्यात भेट होते.ठरल्याप्रमाणे शिवराय प्रचंडगडाच्या पायथ्याशी यल्ल्या मांग आणि खंड्या महार यांचे बरोबर थांबतात....आणि वीर बाजी पासलकर आणि नेताजी पालकर शहाजीराजे यांनी दिलेला लखोटा घेऊन गडावर जातात.गडावर रायनाक परवारी यांना भेट देतात आणि लखोटा त्यांच्या स्वाधीन करतात....लखोटा वाचल्यानंतर रायनाक परवारी अत्यंत आनंदित होतात.कारण तो लखोटा असतो स्वराज्य स्थापनेसाठी प्रचंडगड शिवरायांच्या हाती स्वाधीन करण्याचा....शहाजीराजे आणि त्यांची स्वराज्य संकल्पने संदर्भात पूर्वीच चर्चा झालेली होती. त्यामुळे ठरल्याप्रमाणे गड स्वराज्यात देण्याचे वचन आता रायनाक परवारी यांना पूर्ण करण्याची वेळ आले होती.सुरु असलेल्या स्वराज्याच्या गनिमी काव्याप्रमाणे गडाच्या पायथ्याशी थांबलेले शिवरायांना वचनपुर्तीचा सांगावा येतो.शिवराय आपल्या बरोबर असलेल्या यल्ल्या मांग आणि खंड्या महार यांना बरोबर घेऊन गडावर निघतात.स्वराज्याचे भगवे निशाण यल्ल्या मांग हातामध्ये घेऊन त्यांच्या सोबत निघतो.शिवराय गडावर पोहचल्यानंतर गड स्वाधीन करून घेण्याची प्रक्रिया सुरु होते.....प्रक्रीये दरम्यान वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलार मामा - यल्ल्या मांग - खंड्या महार इ.उपस्थित असतात.गड स्वराज्याच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिवराय यल्ल्या मांग याला स्वराज्याचे भगवे निशाण “पहिले तोरण” म्हणून प्रचंडगडावर उभारण्यास सांगतात.शिवरायांचे आदेश घेऊन यल्ल्या मांग समतावादी स्वराज्याचे भगवे निशाण प्रचंडगडावर उभारतो तो दिवस २८ जानेवारी १६४५ इतिहासात नोंद होतो.शिवराय या गडाचे नामकरण करतात ते म्हणतात प्रचंडगडावर यल्ल्या मांगाने चढविलेले हे भगवे निशाण म्हणजे समतावादी स्वराज्याचे पहिले तोरण आहे आणि आजपासून या “प्रचंडगडाचे” नाव “तोरणागड” झाले असे समजावे.समतावादी स्वराज्याच्या पहिल्या तोरणागडाची पहिला किल्लेदार म्हणून यल्ल्या मांगाची निवड करतात.यल्ल्या मांग पहिला किल्लेदार म्हणून शिवरायांना मुजरा करतो.शहाजीराजे संकल्पित स्वराज्याची स्थापना झाली होती....आता योजना आखण्याची गरज होती.शिवराय गडावरून पासलकर वाड्यात येतात पासलकर वाड्यामध्ये त्यांच्या बरोबर वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलारमामा – कान्होजी जेधे – झुंजारराव मरळ – हैबतराव शिळीमकर – माणकोजी (दहातोंडे) - रायनाक परवारी - यल्ल्या मांग – खंड्या महार – इ. बरोबर स्वराज्याची योजना (आपण सर्वजण त्याला स्वराज्याची शपथ म्हणतो ) पासलकर वाड्यामध्ये आखली.त्याच दिवशी महिलेची बेअब्रू झाली म्हणून पासलकर वाड्यात तक्रार आलेली होती.माता जिजाऊ आणि शिवराया समोर त्या महिलेची तक्रार होताच शिवराय गडगडले त्यांनी लागलीच त्या महिलेची बेअब्रू करणाऱ्या बाबाजी भिकाजी गुजर ह्या मोगलाच्या पाटलाला धरून हजर करण्याचे आदेश केले.त्या बाबाजी भिकाजी गुजर याला धरून माता जिजाऊ आणि शिवराया समोर उभे केले असता त्याचे हातपाय कलम करून त्याचा चौरंगा करण्याचे आदेश शिवरायांनी दिले असता यल्ल्या मांग आणि खंड्या महार यांनी त्या पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा चौरंगा स्त्री संरक्षणासाठी करून आपल्या मांग समाजचे योगदान स्वराज्यात २८ जानेवारी १६४५ मध्ये निश्चित केले आहे.समतावादी स्वराज्याचा पहिला गडकरी होण्याचा मान यल्ल्या मांगाला मिळाला आहे.याच यल्ल्या मांगाने स्वराज्याची पहिली बाजारपेठ तोरणागडाच्या गावतील लोकांसाठी उभारून व्यावसायिक दुष्टीकोन दाखवून दिलेला आहे.आजही त्या बाजारपेठेला येल्याची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते.आज जे लोक तोरणगडा जवळ राहतात त्यांना हा इतिहास पूर्णपणे माहित आहे.आजही तोरणागड किल्ल्याला भेट द्यायला जाणारे पर्यटक दिंडी दरवाज्यातून आत प्रवेश करताना “येलोजी बुवाचा चांग भले” अशी घोषणा देत प्रवेश करीत असतात.परंतु हा येलोजी बुवा कोण...? असा प्रश्न कोणीही इतिहासाला विचारीत नाही.जो पर्यंत इतिहासाला प्रश्न विचारले जाणार नाही तो पर्यंत अठरा अलुतेदार यांचे स्वराज्यातील योगदान तुमच्या आमच्या समोर येणार नाही.मग हा इतिहास कोणी लपविला असा जर प्रश्न आपण इतिहासाला विचारला तर इतिहास आपल्याला सांगतो की,हा इतिहास वैदिक धर्म पंडीत आणि त्यांचे असणारे गुलाम यांनी आणि शिवरायांचे विरोधक मोगलांचे समर्थक असणारे मराठा यांनी लपविले असल्याचे सांगतो.तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यदर्शन रयतेला होऊ दिले नाही....त्यांचा अंत्यसंस्कार कोणत्या धर्म पद्धतीत केला गेला हे गुढ इतिहासाने सांगितले आहे.परंतु तो इतिहास वैदिक धर्म पंडित आणि त्यांचे गुलाम असणारे स्वराज्याचे विरोधक यांनी लपविलेले आहे.परंतु शिवरायांनी पहिला स्वराज्यभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत २४ सप्टेंबर १६७४ मध्ये केल्याचे इतिहास सांगत आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वराज्य हे समतावादी स्वराज्य होते असे इतिहासाचे गूढ उकल करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी रयतेला सांगितले आहे.मोगल समर्थक मराठा यांनी आणि वैदिक धर्म पंडित तसेच त्यांचे गुलाम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्याचे समतावादी विचार रयते समोर आणण्याचे कार्य केले आहे.अशा महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले आहे.इतिहास आपल्याला सांगतो की,छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे करून जी पेशवाई उभी राहिली ती पेशवाई स्वराज्यातील अठरा अलुतेदार यांनी स्वराज्याचा सरदार सिद्धनाक महार यांच्या नेतृत्वात भीमा कोरेगाव येथील १ जानेवारी १८१८ मध्ये झालेल्या युध्दात संपुष्टात आणली.दुसरा बाजीराव पेशवा याचा पाठलाग करून त्याचा सरदार बापू गोखले याला आष्टी जवळ पुन्हा झालेल्या युध्दात ठार केले.....तेथून दुसरा बाजीराव कोठे पळून गेला याचे इतिहासामध्ये गुढ कायम आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा समतेचा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढला.....त्यांची लपविली गेलेली समाधी जेव्हा महात्मा फुले यांनी बाहेर काढून पहिली शिवजयंती साजरी केली.तेव्हा वैदिक धर्म पंडितांनी त्यांना छळण्यास सुरु केले त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा वस्ताद लहूजी साळवे यांनी त्यांचे संरक्षण करून पुन्हा एकदा स्वराज्यात मातंग समाजाचे योगदान निश्चित केले आहे.....म्हणून वस्ताद लहूजी साळवे यांचा स्वराज्याची रयत सर्वत्र सन्मान करते.महात्मा ज्योतिबा फुले यांचे मार्गदर्शन घेऊन सातारा गादीचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी अठरा अलुतेदार यांच्यासाठी पहिली शाळा स्थापन केली....त्या शाळेमध्ये भीमराव रामजी सपकाळ (डॉ बाबासाहेब आंबेडकर ) यांचे १ ली ते ४ थी पर्यंत शिक्षण झालेले आहे.कोल्हापुर गादीचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मोलाची मदत केलेली आहे त्यामुळे स्वराज्या बरोबर त्यांचा घनिष्ट संबध आला असल्यामुळे त्यांना इतिहासाने भरपूर काय सांगितलेले आहे.त्यामुळेच त्यांनी रयतेला स्वराज्याची उकल व्हावी यासाठी पहिले आंदोलन सुरु करण्यापूर्वी पेशवाईचा अंत ज्याठिकाणी झाला म्हणजे भीमा कोरेगाव याठिकाणी शूरवीर यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या विजयस्तंभास भेट देवून तेथे मानवंदना देऊन स्वराज्याची असलेली राजधानी रायगडाच्या परीसरात मनुस्मृतीचे दहन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा सत्याग्रह्याना देण्यास सांगितल्या आहेत.आणि महाड येथील चवदार तळ्याच्या प्रश्ना संदर्भात जे इंग्रज सरकारला ज्या लेटरहेड वर निवेदन दिले त्या लेटरहेड वर “जय भवानी जय शिवाजी” असे लिहिले होते.त्यानंतर स्वतंत्र भारताला जे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर देत असताना संविधान सभेच्या भाषणात असा उल्लेख केला आहे की,सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य लोकहितवादी लोकशाही राज्य असल्याने मला संविधान लिहिण्यास सोपे झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ मध्ये महापरीनिर्वाण झालेनंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित कार्यक्रम अंधेरी येथे एका हॉलमध्ये होता तेथे आण्णाभाऊ साठे उपस्थित होते.जेव्हा श्रद्धांजली अर्पित करण्याची त्यांची वेळ आली तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांनी मातंग समाजाला उद्देशून एक कविता केला ते म्हणतात की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण स्वराज्याचा इतिहासाचा आभ्यास आहे.त्यामुळे त्यांनी मला सांगितले आहे की,तू इतिहासातील ऐरावत आहे म्हणजे हत्तीसारखा बलदंड आहेस.या गुलामगिरीच्या खाईत का अडकून बसलास तू...तूला या धर्ममार्तंडानी छळले आहे.उठ अंग झाडुनी मज सांगून गेले भीमराव अशा तऱ्हेची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून त्यांनी मातंग समाजाचे योगदान स्वराज्यात निश्चित केले आहे. त्यामुळे शहाजीराजे संकल्पित स्वराज्य शिवरायांनी समतावादी स्वराज्य म्हणून प्रचंडगडावर समतेचे प्रतिक असलेले पहिले भगवे निशाण यल्ल्या मांगाच्या हातून चढवून त्यांचे तोरणगड असे नामकरण करून समतेच्या स्वराज्याचा पहिला गडकरी म्हणून मान दिलेले आहे अशा समतेच्या स्वराज्याचा मराठी सरदार असणारा यल्या मांगाच्या सन्मानासाठी २८ जानेवारी १६४५ च्या दिनाचे औचित्य साधून भीमा कोरेगावच्या युध्दाच्या २०० वर्षपूर्ती निमित्त २८ जानेवारी २०१८ रोजी “येलोजी बुवाचा चांग भले” असे म्हणत चलो तोरणागड..! चलो तोरणागड...!! चलो तोरणागड....!
धन्यवाद
राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी समाज
जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।।
गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।
धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।
मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।
ठरवून आम्हा हीन अवमानीत । जन्मोजन्मी करुनी अंकित ।।
जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।।
एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।।
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रगट निज नाव ।
गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।
धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।
मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।
ठरवून आम्हा हीन अवमानीत । जन्मोजन्मी करुनी अंकित ।।
जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।।
एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।।
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रगट निज नाव ।
No comments:
Post a Comment