प्रथम आपणा
सर्वाना
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय भीम
बुद्धम शरणंम
गच्छामी....! म्हणजे विद्वान लोकांना नमन करतो.
धम्म शरणंम
गच्छामी....! म्हणजे सिंधू संस्कृतीच्या चांगल्या विचारणा नमन करतो.
संघम शरणं
गच्छामी.....? म्हणजे सिंधू संस्कृतीच्या सामुहीकतेला नमन करतो.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली बौध्द
धम्माची दीक्षा घेतली आहे.बौध्द विचार मानणाऱ्या व्यक्तींना २२ प्रतिज्ञा दिल्या
आहेत.आणि त्यातील प्रतिज्ञा क्रमांक १० अशी आहे की,मी समता
प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन.आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा प्रयत्न
करण्यासाठी मित्रानो आपण याठिकाणी एकत्र जमलो आहोत.,,आणि त्यातील एक प्रयत्न
म्हणून “समतावादी राज्याभिषेक अभिवादन कार्यक्रम” याठिकाणी सकल मराठी समाज आणि
समता सैनिक दल यांचे विद्यमाने आयोजित केलेला आहे....आणि हा समतावादी राज्याभिषेक
जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सिंधू संस्कृती व गौतमी पुत्र सिद्धार्थ
समजून घ्यावे लागतील.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,महात्मा
ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरही समजून घ्यावे लागतील.
इतिहास हा साक्षीला आहे की,ही सिंधू
संस्कृती मानवतावादी संस्कृती होती हे प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे.विद्वानांची
संस्कृती होती आणि स्त्री शक्तीची आणि स्त्री सन्मानाची संस्कृती होती हे आपण
लक्षात घेतले पाहिजे.सिधू संस्कृती ही विकासाची जनक होती आणि समतावादी संस्कृती
होती हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे.या स्त्री संस्कृतीने आपल्याला महत्वाच्या
काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत.त्यातील पहिला भाग
म्हणजे या स्त्री शक्ती विद्वानवादी होत्या यांनीच शेतीचे संशोधन (कृषी संशोधन)
केले,यांनीच शेतीतील बी-बियाणे शोधून त्याला लागणारी अवजारे निर्माण करून शेती
विकसित केली म्हणून ही सिंधू संस्कृती शेती प्रधान संस्कृती होती याचे इतिहास
आपल्याला दाखले देतो.आणि याच संस्कृतीने आपल्याला लोकशाहीची आणि समतेची मुल्ये
दिली आहेत....आणि या स्त्री शक्तीला “निऋती” असे म्हटले गेले आहे.त्यामुळे हा एक सामुहिक
संघ होता कारण संघ असल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाहीत.त्यामुळे या
सिंधू संस्कृतीने आपल्याला बुद्धी म्हणजे विद्वता,धम्म म्हणजे विचार आणि संघ
म्हणजे सामाजिकता (संघटन) दिलेले आहे.
गौतमी पुत्र सिद्धार्थ यांना हेच ज्ञान
पिंपळाच्या वृक्षाखाली प्राप्त झाले आणि त्यानी भगवे वस्त्र धारण करून हा
मानवतावादी संदेश समतेचा विचार संपूर्ण जगाला दिलेला आहे.म्हणून आपण त्या
पिंपळाच्या वृक्षाला “बोधीसत्व वृक्ष” असे म्हणतो.गौतमी पुत्र सिद्धार्थ यांना हेच
ज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्यांनी बौध्द वंदना पाली भाषेत विकसित केली.ते एक सिद्ध
पुरुष होते त्यामुळे ते स्वत:ला कधीही श्रेष्ठ मानणार नाहीत आणि स्वत:ला काधेही ते
वंदन करायला सांगणार नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणून त्यांनी जे नमन केले
आहे ते बुद्धीला केले आहे.जे नमन केले आहे ते धम्माला केले आणि जे नमन केले ते संघाला
केले आहे.म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा”
त्यामुळे गौतमी पुत्र सिध्दार्थ यांना आपण भगवे वान धारण केल्यामुळे “भगवान गौतम”
म्हणून नमन करतो.
अशा भगवान गौतम बुद्धांचे विचार घेऊन सम्राट
अशोक याने आपल्या राज्याला समतेचा विचार असणारा भगवा ध्वज देऊन हे समतेचे बौध्द
साम्राज्य असल्याचा संदेश संपूर्ण जगाला दिला आहे.हा बौध्द धम्म आणि ही सिंधू
संस्कृती आनंत काळापर्यंत पर्यंत टिकून राहावी यासाठी सम्राट अशोक पुत्रांनी
संपूर्ण भारतभर बौध्द विहार,शिलालेख,स्तूप,लेण्या निर्माण केलेल्या आहेत.या
भारतातील दक्षिणे मधील म्हणजे महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यातील लेण्या जर आपण
पाहिल्या तर आपल्याला गौतम बुद्धा बरोबर काही ठिकाणी आद्य गणमाता स्त्री शक्ती
“निऋती” कोरलेली दिसेल.त्यामुळे इथला मूळ भारतीय तिलाच पुजक मानतो.त्यामुळे शाक्य
कुलीन समाज म्हणजे विद्वान (बौध्द लोक) लोक या लेण्यामध्ये जाऊन या आद्य गणमाता “निऋती”
चे पूजन करीत असे त्यामुळे या वर्गाला नंतरच्या काळात “शाक्त पंथीय” म्हणून ओळख
निर्माण झाली आहे.
पंढरपूर येथे सम्राट अशोक पुत्रांनी बौध्द
विहार उभारून त्यामध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती उभारली होती.त्या विहारातील
मूर्तीला पांडुरंग (कमळाचे फुल) अशी उपमा देऊन संत नामदेव महाराज यांनी विषमते
विरुध्द लढणारे विद्वान (बौध्द) एकत्र करून समतेचे निशाण भगवा ध्वज घेऊन वारकरी
संप्रदाय निर्माण केला.त्यामधील संत तुकाराम महाराजांना छत्रपती शिवरायांनी गुरु
मानले तर संत कबीराला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले आहे.
शहाजीराजे यांनी हेच समतेचे भगवे निशाण घेऊन
माता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांच्या हातामध्ये देऊन इथल्या अलुतेदार
व बलुतेदार यांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण करण्यास सांगितले.स्त्री शक्तीचा
सन्मान स्वराज्यात व्हावा यासाठी स्त्रीची बेअबदा करणाऱ्या लोकांचे हातपाय कलम
करून चौरंगा करण्याच्या शिक्षा दिलेल्या आहेत.पुन्हा हे राज्य कृषी संस्कृतीचे
म्हणजे सिंधू संस्कृतीचे असल्याचा संदेश जावा यासाठी शेतकरी यांचे व त्यांच्या
पिकांचे संरक्षण केले आहे.युवराज शंभूराजे हे विद्वान (बौध्द) होते त्यांनी वयाच्या
चौदाव्या वर्षी म्हणजे १६७१ मध्ये संस्कृतमध्ये “बुधभूषण” नावाचा ग्रंथ लिहून
“विद्वान” हा भूषणावह असतो अशी प्रचती त्यांना आली.त्यांचे वाडीलोपार्जीत गाव हे
“वेरूळ” होते त्यामुळे अजंठा लेण्या बद्दल त्यांना आस्था होती.त्या लेण्यामुळे
त्यांना “गौतम बुध्द” आणि आदि गणमाता “निऋती” यांच्या बद्दल त्यांचा आभ्यास होता
त्यामुळे त्यांचेवर त्यांची आस्था होती.त्यामुळे आदि गणमाता “निऋती” पूजक यांना
शाक्त पंथीय धर्म स्विकारून कृषी संस्कृतीचे संरक्षण त्यांनी केले होती.
माता जिजाऊ यांचे आदेशावर शिवरायांनी छत्रपती
होण्याचे जाहीर केले परंतु त्यांना छत्रपती होण्यास वैदिक धर्म पंडितांचा विरोध
होता तो विरोध मोडून काढण्यसाठी त्यांनी वैदिक धर्म पद्धतीत राज्याभिषेक ६ जून
१६७४ मध्ये करून घेतला.तरीही इथल्या वैदिक धर्म पंडितांनी त्यांना छत्रपती
मानण्यास विरोध केला.त्यामुळे छत्रपती शिवरायांनी पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा
राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४ मध्ये शाक्त पंथीय राज्याभिषेक म्हणजे सिंधू
संस्कृतीच्या आदि गणमाता “निऋती” यांना साक्ष ठेऊन समतावादी राज्याभिषेक करवून
घेतला हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.याचाच स्पष्ट अर्थ असा होतो की,छत्रपती शिवराय
आणि संभाजीराजे वैदिक धर्म मानीत नव्हते.ते सिंधू संस्कृती मधून आलेला शाक्त पंथ
मानीत होते.त्याचे कारण असे की,छत्रपती संभाजी महाराज
यांनी त्यांची राजमुद्रा ही पिंपळाच्या पानावर कोरलेला होती.पिंपळाच्या पानाची
त्यांची राजमुद्रा होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी
महाराज यांची रायगड याठिकाणी असलेली समाधी शोधली.छत्रपती शिवराय यांचे समतावादी
स्वराज्य समजून घेतले सिंधू संस्कृतीचा स्त्री सन्मान समजून घेतला.तेव्हा त्यानी
स्त्री या समाजाचा महत्वाचा भाग आहे आणि ती कुटुंब व्यवस्था प्रमुख आहे.ती अज्ञान
राहून जमणार नाही तेव्हा त्यांनी सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिक्षण देऊन पहिली
मुलींची शाळा चालू करून स्त्री सन्मानाचा पाया रचला....आणि छत्रपती शिवाजी महाराज
यांची १८६९ मध्ये पहिली शिवजयंती साजरा केली.असे सत्य त्यांना उलगडले म्हणून
त्यांनी समतावादी समाज निर्माण करण्यासाठी २४ सप्टेंबर या समतावादी राज्याभिषेक
दिनाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्य शोधणारा सत्यशोधक समाजाची
स्थापना केली.असे कार्य पाहून ते समजून घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा
ज्योतिबा फुले यांनाही गुरु मानले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भगवान गौतम
बुद्धांच्या माध्यमातून सिंधू संस्कृती म्हणजे विद्वानाची संस्कृती माहित
झाली.स्त्री शक्ती आणि स्त्री सन्मान महत्वाचा आहे हे माहित झाले.कृषी संस्कृती
माहित झाली,सामूहिकरीत्या संघर्ष माहित झाला...आणि हाच खरा बौध्द धम्म आहे आणि
यातली “समता” महत्वाची आहे हे त्यांच्या लक्षात आले.त्यामुळे पुढे कार्य करायचे
असेल तर समतेचे संरक्षण होणे महत्वाचे आहे.यासाठी समतेच्या संरक्षणासाठी एक वेगळा
समूह म्हणजे संघटन उभारावे लागेल.तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समतावादी
राज्याभिषेक दिनाचे व सत्यशोधक समाज स्थापना दिनाच्या २४ सप्टेंबर दिनाचे औचित्य
साधून २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले.
शाक्त पंथीय शंभूराजे यांनी १६७१ मध्ये
बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला होता त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या प्रिटींग
प्रेसचे नाव बुध्दभूषण प्रिटींग प्रेस असे ठवले यावरून ते छत्रपती संभाजी महाराज
यांना मानीत होते हेच स्पष्ट होते.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांची मनुस्मृती
प्रमाणे हत्या वैदिक धर्म पंडितांनी केली हे सिद्ध होते.छत्रपती संभाजी महाराज
यांची हत्या करून जातीयवादी पेशवाई उभी राहिली.त्या जातीयवादी पेशवाईचा भीमा
कोरेगाव येथे अंत करून सिद्ध्नाक महार याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा
बदला घेतला आहे.म्हणून त्या ठिकाणच्या विजयस्तंभास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट
देऊन त्या शूर वीरांना मानवंदना दिलेली आहे.मनुस्मृतीचा कायदा मोडीत काढण्यासाठी
महाड येथील चवदार तळ्याचा सत्यग्रह करून मनुस्मृतीचे दहन त्यानी केले आहे.
यावरून एकच दिसते की,सिंधू संस्कृती
पासून बौध्द धम्म चालत आलेला आहे आणि तो शांततेचा आणि समतावादी धम्म आहे.स्त्री
सन्मानाचा आणि स्त्री गणराज्य पद्धतीचा असल्यामुळे प्रत्येक महापुरुषाने ही समता
प्रस्थापित करण्यासाठीच कार्य केले आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असोत,
छत्रपती संभाजी महाराज असोत,महात्मा ज्योतिबा फुले असोत किंवा डॉ बाबासाहेब
आंबेडकर असोत हे सर्व एकच आहे आणि यांनी विद्वानांची चळवळ चालविलेली आहे.म्हणून
१९५६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्माची दीक्षा घेऊन २२ प्रतिज्ञा
बौध्द विचार मानणाऱ्या लोकांना देऊन “समता” प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यास
लावला आहे.आणि या बौध्द धम्म मानणाऱ्या व्यक्तीसाठी बुध्द वंदना दिली आहे म्हणजे
विद्वानाचा समूह तयार करण्यास सांगितले आहे.म्हणून आपण त्या विद्वानाची असलेली
सिंधू संस्कृती हिला आपण नमन करीत असतो.