Saturday, December 11, 2010

चंगळावादी तरुणांचा हुक्का

परवाना देण्याची जबाबदारी आमच्याकडे...पण कारवाई करुन परवाना रद्द करण्याची जबाबदारी ही अन्न व ओषध प्रशासनाची...पुणे महानगरपालिकेची ! हा सर्व कारभार मेजवानीचा !


                                                                                 पुणेशहराला आज ग्लोबल शहर म्हणून ओळखले जाते.अशा या पुणे शहराची जर्मन बेकरी बाम्ब स्फ़ोटानंतर ओळख संपूर्ण जगाला झाली आहे.कारण या स्फ़ोटा मागचा हेतू हा विदेशी नागरिकांना टारर्गेट करण्याचा होता,आणि पुणेशहरातील विदेशी नागरिकांचे बस्तान म्हणून कोरेगाव पार्क हे सर्वत्र परिचित आहे.अशा या पुणेशहरात परराज्यातून तरुणांचा घोळका शिक्शणाच्या आणि नोकरीच्या बहाण्याने वास्तव करु लागला.आपल्या कुटुंबापासून शेकडो किलोमिटर दूर आलेल्या तरुणांना कैंटुंबिक दबाब राहिला नसल्याने हे तरुण आपली संस्कुती विसरत चालल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे.आय.टी.पार्क आणि काल सेंटरच्या नावाखाली हा तरुण रात्रो-अपरात्री बाहेर राहु लागला.

ह्या सर्व बाबी व्यावसायिकांनी हेरल्या,आणि ह्यांच्या चंगळवादाचा फ़ायदा घेत पुण्याची संस्कुती वेशीवर टांगत या शहरात हुक्का पार्लर सुरु केले.या ठिकाणी तरुणांचे टोळकेच्या टोळके चंगळवाद करण्यास येऊ लागले.या तरुण व तरुणींची मैजमजा पाहून स्थानकही यांच्यात सहभागी होऊ लागले.याचा परिणाम शहराच्या वाढत्या गुन्हेगारित हूओ लागला.महिलांचा व जेष्ठ नांगरिकांचा,संरणाचा प्रश्न निर्माण झाला.वाढत्या व्यावसायिकामुळे शहराच्या भष्ट्राचारात वाढ झाली.जमिनीचे भाव गगनाला भिडू लागले.नदी नाल्या मध्ये अतिक्रमणाचे प्रमाण वाढले,आणि पुणेकर नागरिकांची सुरशितता धोक्यात आली.

जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे दिपक मानकर,राजेश पिल्ले,अजय भोसले सार्खे लड माफ़िया समोर येऊ लागले.रामकुमार आग्रवाल,राजेश बन्सल,शाम आग्रवाल सारखे बांधकाम व्यावसायिक यांचा वापर जमिनीचे ताबे मिळविण्यासाठी करु लागले.हा सर्वस्वी प्रकार केवळ चंगळवादाच्या जोरावर सुरु होता.पब क्लब व हुक्का पार्लरवर चंगळ्वाद व नशा करणारा तरुणांमुळे मादक पदार्थ विक्रेत्यांची चांदी होऊ लागली,एका ग्राम मागे शेकडो रुपये कमाविण्यास मिळाल्यामुळे पु्णेशहर मादक पदार्थ विकणांराची बाजारपेठ बनू लागली आहे.सिंहगड येथिल रेव्ह पार्टीच्या कारवाई मुळे याची माहिती पुढे आली आहे.मादक पदार्थाच्या सेवनासाठी तरुणी वेशा व्यावसाय करित असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत.

याची खरी सुरवात ही हुक्का पार्लरपासून होत असल्याची बाब समोर आली आहे.महाविद्यालयातील तरुण त्यांच्या मित्र सहकारी यांना हुक्का रेस्टारंट मध्ये खाद्य पदार्थाच्या नावाने त्यांना घेऊन येतात.चांगली मेजवानीचा विश्वास तरुण तरुणीना देऊन अशा नावाजलेल्या हुक्का रेस्टारंट मध्ये घेऊन येतात.असेच प्रसिध्द असलेले व उच्चभ्रू अशा कोरेगाव पार्क येथे भरपूर हुक्का रेस्टारंट आहेत."मोका"नावाने प्रसिध्द असलेला अधिक्रुत परवानाधारक रेस्टारंट आहे, या रेस्टारंट्म्ध्ये अल्पवयीन मुली पश्चिम संस्कितीचे कपडे परिधान करुन अनाधिक्रुत हुक्का पदार्थ विकत घेऊन ओढत बसतात.हुक्का या पदार्थाची शासन दफ़्तरी कोणतीही नोंद नाही.तो आरोग्यास योग्य आहे की अपायकारक आहे या बाबत या बाबत अन्न प्रशासन, पोलिस प्रशासन आणि परवाना देणारे आयोग्य विभाग पुणॆ महानगरपालिका यांना कोणतीच कल्पना नाही.या तिन्ही विभागांना नागारिकांच्या आरोग्याचे आणि शासनाच्या तिजोरीचे काहीही घेणे देणे नाही.

या बाबत बहुजन मोर्चा संघटनेने मा.आयुक्त पुणॆ मनपा,सह आयुक्त अन्न प्रशासन व पोलिस प्रशासन यांना तक्रार केली असून याबाबत हुक्का या पदार्थाचे सम्पल संबधित विभागास पाठविले असून त्याचा अहवाल येण्यास चाळीस दिवसांचा कालावधी लागणार आहे.हुक्का पदार्थ अरोग्यास घातक आहे असा जर अहवाल प्राप्त झाल्यास अधिक्रुत परवानाधारक रेस्टारंट्मध्ये अनाधिक्रुत हुक्का पदार्थ विकणारांना शासन कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.