Sunday, January 7, 2018

आमच्या गळ्यात गाडगे,मडके आणि कमरेला झाडू होता....तर आमचे सैनिकी प्रशिक्षण कसे झाले.,,,! प्रकाश आंबेडकर नेते भारिप बहुजन महासंघ


सोशल मिडीयावर भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या लढाईस झालेल्या २०० वर्षापूर्ती निमित्त एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या लेखाचे जर विश्लेषण केले तर प्रत्येकाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेले उदगार आठ्विल्याशिवाय राहणार नाही.एक विश्लेषक म्हणून मला याठिकाणी त्यांचे ते उदगार का...? महत्वाचे वाटत आहे.तर त्याचे कारण तुमच्या समोर आणू इच्छितो. प्रकाश आंबेडकर यांनी महार समाजाचे ऐतिहासिक महत्व शोधण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या महार समाजावर टाकली असल्याचे सदरच्या लेखावरून दिसून येते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यामध्ये स्वराज्याला खूप महत्वाचे स्थान दिलेला आहे. स्वराज्यातील भगव्या ध्वजाला खूप मोठा सन्मान दिलेला आहे.लपविलेले शिव छत्रपती शोधून रयते समोर आणण्याचे कार्य ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आहे....त्यांना गुरुचे स्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहे.वैदिक धर्म पद्धतीत झालेला राज्याभिषेक नाकारून संभाजीराजांच्या सांगण्यावरून तीनच महिन्यानंतर म्हणजे २४ सप्टेंबर १६७४ मध्ये दुसरा     राज्याभिषेक करून त्यांनी समतांपर्व सुरू केले होते.२४ सप्टेंबर या दिवसाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या समाज सुधारक चळवळीमध्ये मोलाचे स्थान दिलेले आहे.त्यांनी २४ सप्टेंबर १८७४ मध्ये म्हणजे स्वराज्याच्या दुसऱ्या राज्याभिषेक दिनाच्या २०० वर्षापुर्ती निमित्त सत्यशोधक धर्माची स्थापना करून रयतेच्या हातामध्ये भगवा ध्वज देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले आहे.बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या पर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.सातारचे छत्रपती प्रतापसिह महाराज यांनी स्थापन केलेल्या शाळेमध्ये भीमराव रामजी सपकाळ (डॉ बाबासाहेब आंबेडकर) यांचे १ ली ते ४ थी शिक्षण झाले आहे.राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या काळात त्यांना खूप मदत केलेली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखाणाच्या माध्यमातून रयतेचे प्रबोधन केले.....आणि जेव्हा त्यांना वाटले की,आता रयतेमध्ये जाऊन काम करण्याची वेळ आलेले आहे.तेव्हा स्वराज्याचा दुसरा राज्याभिषेक आणि सत्यशोधक समाज स्थापनेच्या २४ सप्टेंबर या दिनाला महत्व देऊन २४ सप्टेंबर १९२४ मध्ये “समता सैनिक दल” स्थापन केले आहे.याठिकाणी मुद्दामून आपले लक्ष केंद्रित व्हावे म्हणून उल्लेख करतो की,महात्मा ज्योतिबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७४ मध्ये जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती...तेव्हा त्यांनी भगवा ध्वज रयतेच्या हातामध्ये दिला होता.म्हणजे “भगवा ध्वज” हा कधीही वैदिक धर्म सानातनांच्या हातामध्ये नव्हता.मग त्यांचा ध्वज कोणता होता असा प्रश्न साहजिकच आपल्याला उद्भविलेला असेल.त्यानी स्थापित केलेल्या सत्यशोधक धर्मास कॉर्टर करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांनी एक वर्षानंतर म्हणजे १८७५ मध्ये गुजरात मधील काठीयावाड जिल्ह्यातील टंकारा गावातील (त्यावेळी गुजरात मुंबई प्रांतामध्ये होता) त्यांच्या आश्रमात आर्य सनातन हिंदू धर्माची स्थापना केली होती.एक विश्लेषक म्हणून मला असा प्रश्न पडला आहे की,जर सत्यशोधक धर्माचा ध्वज भगवा होता....तर आर्य सनातन हिंदू धर्माचा ध्वज कोणता होता...? मानव कल्याणात भगव्या ध्वजाला खूप मान होता व आहे.त्याचे कारण असे की,भगवान गौतम बुद्धांचा ध्वज “भगवा” तर सम्राट अशोकांचाही ध्वज “भगवा” तर बौध्द भिकुंचे “चीवर” पण भगवेच....! वारकरी संप्रदाय यांचा ध्वजही “भगवा”च तर शहाजीराजे यांनी स्वराज्याचे प्रतिक म्हणून शिवरायांच्या हातामध्ये भगवाच ध्वज दिलेला आहे.म्हणूनच संता (वारकरी संप्रदाय) बाबत शिवरायांना अत्यंत आदर होता.सत्यशोधक धर्माचा ध्वज “भगवा” तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर या दिनाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १९२४ मध्ये “समता सैनिक दल” स्थापन केले....त्याच्या प्रत्येक सदस्याला समतेचे संरक्षणाचे प्रतिक म्हणून डोक्यावर निळी टोपी धारण केलेली आहे.१९२७ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथे एकदाच भेट देऊन तेथील महार योद्ध्यांना मानवंदना केली आहे....आणि प्रकाश आंबेडकरांचेही तेच म्हणणे आहे ते म्हणतात की,माझ्या माहिती प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगावला एकदाच भेट दिलेली आहे.त्यांनतर बाबासाहेब यांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात मनुस्मृतीचे दहन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी असे उदगार काढले आहे की,”जो इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाही” एक विश्लेषक म्हणून मला असे वाटते की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना इतिहासाचा आभ्यास होता.कारण इतिहास हे सांगतो की छत्रपती संभाजी महाराज यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या झाली होती.....आणि त्यांचे तुकडे गोळा करून महार समाजाने अंत्यसंस्कार करून त्यांची समाधी उभारलेली आहे.संभाजीराजांच्या या हत्येचा बदला स्वराज्याचे तिसरे छत्रपती शाहू महाराज यांचे भोरचे सरदार सिद्धनाक महार याने स्वराज्याची फौज घेऊन पेशवाईचा अंत केल्याची माहिती असल्यामुळेच त्यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास १९२७ साली भेट देऊन अभिवादन केले.आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात मनुस्मृती दहन करून आर्य सनातनी हिंदू धर्माला असा एक मॅसेज दिला की,तुमचे सर्व कृत्य आम्हाला माहित झाले असून पुढील काळात रयतेलाही माहित होईल यासाठीच त्यानी आपल्या सर्वांना इतिहासाकडे वळविले असल्याचे माझे विश्लेषण आहे.त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह्यांच्या हातामध्ये भगवा ध्वज देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देण्यास सांगितल्या असल्याचे हे सर्वश्रुत आहे.ब्रिटीश सरकारला ज्या लेटरहेडवर बाबासाहेबांनी निवेदन दिले त्या लेटरहेडवर बाबासाहेबांनी “जय भवानी जय शिवाजी” असे लिहिलेले होते.असे प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या लेखात नमूद केलेले आहे....ते पुढे असे म्हणतात की,या घोषणेचा घरंदाज मराठ्यांच्या इतिहासात उल्लेखही सापडत नाही.याठिकाणी एक विश्लेषक म्हणून जो महार समाजाचा इतिहास माझ्या समोर आलेला आहे त्यामध्ये “महार” कसा पराक्रमी योध्दा होता ते समोर आलेले आहे.तोरणागडाचे पूर्वीचे नाव “प्रचंडगड” होते आणि त्याचा राजा रायनाक प्रवारी महार होता हा किल्ला जिंकण्यासाठी मोगलांनी या किल्ल्यावर २२ वेळा हल्ला केला होता परंतु तो त्यांना जिंकता आलेला नाही.मात्र जेव्हा या किल्ल्याला मोगलांनी तीन वर्ष वेढा घालून रसद बंद केली तेव्हा या महार राजाला मोगला बरोबर तह करून त्यांचे मांडलिकत्व पत्करावे लागले.शहाजीराजे आणि रायनाक परवारी यांचे सलोख्याचे संबध होते.२८ जानेवारी १६४५ मध्ये शिवरायांकडे पाटलांनी बेअब्रू केले म्हणून पासलकर वाड्यात एका महीलेची तक्रार आलेली होती.तेव्हा त्या पाटील बाबाजी भिकाजी गुजर यांचे हात पाय कलम करून त्याचा चौरंगा करण्याचे आदेश जेव्हा शिवरायांनी दिले तेव्हा मोसे खोऱ्यातील तवं गाव येथील महार योद्धा “खंड्या महार” याने या पाटलाचे हातपाय तोडून त्याचा चौरंगा केला.असे स्त्री संरक्षणासाठी महार समाजाचे पूर्वीपासून योगदान राहिलेले आहे.स्वराज्यात सर्वात जास्त सहभाग महार योध्यांचा होता एक विश्वासू जमात म्हणून शिवरायांच्या दरबारी या महार योध्यांचा मोठा सन्मान होता.छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक किल्ल्याची जबाबदारी या महार योद्ध्यावर सोपविली होती....त्यांना “नाक” किंवा “नाथ” म्हणत असत ब्राह्मणी इतिहासकारांना महार समाजाचे इतिहासातील योगदान लपविता आलेले नाही.एवढे मोठे योगदान महार समाजाचे स्वराज्याच्या इतिहासात आहे.तेव्हा प्रकाश आंबेडकर त्यांच्या लेखात असे नमूद करतात की,अशा किल्ल्याच्या रखवालदार यांना “नाथ” म्हणायचे तेव्हा आपल्या सर्वाना इतिहासाकडे वळवायचे असल्याचे संकेत त्यांनी आपल्याला दिले असल्याचे एक विश्लेषक म्हणून मला वाटत आहे.संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती नुसार औरंगाजेबाच्या माध्यामतून करण्यात आली हे जेवढे सत्य आहे.तेवढे संभाजी महाराजांना वढू येथील महार समाजाने अंत्यसंस्कार केले असल्याचे सत्य आहे.....आणि त्या महार समाजाचा प्रमुख गोविंद महार असल्याने त्याच्या पुढाकाराने हे कार्य पार पाडल्याने त्याचा सन्मान म्हणून त्याठिकाणी त्याची समाधी बांधलेली आहे.याच संभाजीराजांच्या हत्तेनंतर औरंगाजेबाने स्वराज्य ताब्यात घेतलेले नाही तो औरंगाबाद येथे निघून गेला आणि स्वराज्यात पेशवाईचा पाया रचला गेला.त्यानंतर स्वराज्याच्या दोन गाद्या निर्माण करण्यात आल्या.....एक गादी साताऱ्यात तर दुसरी गादी कोल्हापुरात निर्माण झाली......पेशव्याने स्वत:चे साम्राज्य उभे केले होते.सातारा गादीचे तिसरे छत्रपती शाहू महाराज यांच्या दप्तरी विचित्रगडाचा सरदार सिद्धनाक महार नावाचा सरदार होता.जेव्हा संभाजी महाराजांच्या मनुस्मृती प्रमाणे हत्येचे उकल स्वराज्याला झाली....आणि दुसऱ्या बाजीरावाने स्वराज्याची टांकसाळ (चलन) बंद करून स्वत:ची टांकसाळ (चलन) सुरु केल्याची बातमी सातारा गादीला झाली तेव्हा तिसरे छत्रपती शाहू महाराज यांनी सिद्धनाक महार ह्या आपल्या प्रामाणिक सरदाराला बोलावून घेतले....आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेऊन पेशवाई संपविण्याचे आदेश केले होते.तेव्हा सिद्धनाक महार याने स्वराज्यातील २५० प्रमुख योद्ध्यांना लखोटा पाठवून प्रत्येकी १०० ठोकाळगडी घेऊन वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर येण्यास सांगितले.सर्वजण म्हणजे पंचवीस हजाराचे सैन्यबळ ३१ डिसेंबर १८१७ मध्ये समाधी स्थळी जमा झाले संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ येथे संकल्प करून शनिवार वाड्यावर हल्ला करायला निघाले होते.याची खबर पेशव्याला लागली होती....त्याने असे ठरविले की,सिद्धनाक महार याला संभाजी महाराज प्रमाणे हत्या करायची आणि त्या महार समाजाला आठवण द्यायची असा विचार करून तो २८००० चे सैन्यबळ घेऊन निघाला होता.ब्रिटीशांना याची खबर लागली होती ते त्यांची सेना घेऊन निघाले त्यांची आणि सिद्धनाक महार याची भीमा कोरेगाव याठिकाणी भेट झाली त्यांचे ५०० सैनिक सिद्धनाक महार याच्या नेतृत्वात लढण्यास तयार झाले.तो पर्यंत पेशवा त्याचे सैन्य घेऊन भीमा कोरेगाव याठिकाणी पोहचला होता त्या सैन्याचे नेतृत्व बापू गोखले करीत होता.आमने सामने युद्ध सुरु झाले पेशवा युध्द हरला आणि पळून गेला युद्ध जिंकले होते.परंतु संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदल पूर्ण झाला नव्हता पेशव्याचा पाठलाग सुरूच होता....इकडे शनिवार वाडा स्वराज्याच्या स्वाधीन जाईल याची भीती पेश्व्याचा पाहुणा बाळाजी नातू याला लागली  होती.लागलीच त्याने ब्रिटीश युनियन जॅक शनिवार वाड्यावर चढवून तो त्यांना शरणागत झाला.गद्दार पेशव्याच्या पाहुण्याला ब्रिटिशांनी संरक्षण देऊन ६९ लाखाची पेन्शन देऊन त्याला मध्य प्रदेश मध्ये पुण्यात न येण्याच्या करारावर पाठविले तिकडेच त्याचा अंत झाला.पाठलाग करणाऱ्या महार सरदार यांची आणि पेशवाई सरदार बापू गोखले यांची आष्टी जवळ भेट झाली पुन्हा युध्द सुरु झाले त्याठिकाणी बापू गोखले मारला गेला आणि पेशवा पुन्हा एकदा पळून जाण्यास यशस्वी ठरला.पुढे तो पेशवा कोठे गेला..? त्याचे काय झाले...? तो कधी व कोठे मेला....? याचे इतिहासात गूढ आहे.(स्वराज्याचे तिसरे छत्रपती शाहू महाराज यांचेकडे हरलेला पेशवा गेला नाही त्यामुळे तो स्वराज्यात नव्हता एवढे मात्र नक्की झाले) इंग्रजांनी त्याठिकाणी पेशवाई अंताचा विजयस्तंभ उभारला आहे.१९२७ साली बाबासाहेबांनी त्या विजयस्तंभास एकदाच भेट दिली आहे.जेव्हा इंग्रजांनी त्यांच्या सैन्यात महार समाजाला घेण्यात बंद केले तेव्हा त्यांना बाबासाहेबांनी सुनावले होते की, “आमचे पूर्वजांनी शिपाईगिरीच केलेली आहे” तेव्हा त्यांना पुन्हा एकदा सेनेत घेण्यास इंग्रजांनी सुरु केले.तेव्हा प्रकाश आंबेडकर त्यांचा लेखात नमूद करतात की,छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास बाहेर आला पाहिजे.त्यांना भाऊ बहिण होते की नव्हते...? होते तर किती होते..? त्यांची नावे काय....? स्वराज्याच्या सुरुवातीला त्यांचे बरोबर कोण होते....? किल्याचे रखवालदार “नाथ” होते तर मग ते कोण होते.हा इतिहास एखाद्या शिकलेल्या अस्पृश्याने किंवा महाराने लिहिला पाहिजे त्याचे संशोधन केले पाहिजे अशी अपेक्षा त्यानी त्यांच्या लेखात व्यक्त केली आहे.जर आमच्या गळ्यात गाडगे मडके होते.....तर आमचे सैनिकी प्रशिक्षण केव्हा झाले...? कसे व कुठे झाले आम्हाला प्रशिक्षण देणारे कोण होते...? त्यांचे नेतृत्व करणारे कोण होते....? असा प्रश्न त्यांनी इतिहासाला विचारला आहे.

No comments:

Post a Comment