Friday, November 24, 2017

पुणे शहर आमचे ब्राह्मण व मराठ्यांचे नाही....म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पुतळा पुण्यात उभारण्यास छत्रपती शाहू महाराजांना विरोध.....!








               पुणे परगणा हा पूर्वीपासून भोसले घराण्याकडेच होता.पुणे या गावचे ऐतिहासिक नाव हे "निसबत मुंजेरी" असे होते.जेव्हा पुणे परगणा शहाजीराजे भोसले यांचेकडे आला तेव्हा त्यांनी स्वराज्य संकल्पित केले होते....आणि स्वराज्य चालविण्यासाठी स्वराज्याचा पहिला राजवाडा म्हणून १६१६-१७ मध्ये शहाजीराजे यांनी महार समाजाची असणारी हाडकीच्या जमिनीवर राशींचे बांगर यांचेकडून लाल महाल बांधून घेतला होता...आणि त्याची जबाबदारी ही विश्वासू अशा झांबरे पाटालावर सोपविली होती.लाल महालाच्या अधिकार क्षेत्रातून महसूल गोळा करण्याचे अधिकार झांबरे पाटालाला बहाल करण्यात होते.या झांबरे पाटालाने स्वराज्या बरोबर कधीही गद्दारी केली नाही. शहाजीराजे यांनी सोपविलेली जबाबदारी त्याने अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली आहे.त्यामुळे स्वराज्यातील पहिला “मराठा सरदार” म्हणून त्यांचे जर नाव पुढे आले तर कोणाला दुमत असायचे कारण नाही.१६३० चा काळ उजाडला होता माता जिजाऊ त्यावेळी शिवनेरी गडावर होत्या.१९ फेब्रुवारी १६३० हा दिवस अठरा पगड जातीसाठी आणि बारा बलुतेदार यांच्यासाठी सोन्याचा दिवस होता....कारण याच दिवशी शिवराय यांचा जन्म झाला.शिवरायांचा जन्म होऊन नुकतेच १२ दिवस झाले असतील.२ मार्च १६३० चा दिवस उजाडला आणि स्वराज्यावर पहिला हल्ला झाला तो वैदिक धर्म पंडित मुरार जगदेव याचा...! या मुरार जगदेवाने लाल महालावर हल्ला करून संकल्पित स्वराज्य ताब्यात घेतले होते....तेव्हा शहाजीराजे कर्नाटकात होते.१६३० पासून ते १६३६ पर्यंत लाल महालावर वैदिक धर्म पंडित मुरार जगदेव ठाण मांडून बसला होता.लाल महालावर ताबा मारून बसलेल्या मुरार जगदेवावर हल्ला करून लाल महाल पुन्हा ताब्यात घेण्यात आला....आणि पुन्हा तो झांबरे पाटलाच्या ताब्यात देण्यात आला.तेव्हा ब्राह्मण पुण्यात राहावयास नव्हते....नंतरच्या काळात जेव्हा स्वराज्याने पहिला पेशवा (म्हणजे महसुली गोळा करणारा नोकर) नेमला तेव्हा त्या पेशव्याने कोकणातील ब्रह्मण यांना पुण्यात बोलाविली तेव्हा पुण्यात ब्राह्मणाच्या पेठा वसविल्या गेल्या.तेव्हा बाळकृष्ण गंगाधर टिळकांचे कुटुंब पुण्यात राहावयास आले.अशा पुण्यात शाहू महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यास याच ब्राह्मणांनी विरोध केला तेव्हा शाहू महराजांनी भांबुर्ड्यातील कांबळे महारांच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे इंग्रज अधिकाऱ्याच्या हस्ते अनावरण केले.
 

No comments:

Post a Comment