Friday, August 24, 2018

बहुजानांनो सावधान...! गणपती उत्सव येत आहे सनातनी यांचे पासून बहुजानांनो सावधान...!!


विषय असा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी गौतम बुध्दा पासून ते सम्राट अशोकापासून ते वारकरी सांप्रदाय पासून चालत आलेला भगवा ध्वज घेऊन समतावादी स्वराज्य निर्माण केल्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला सांगितलेले आहे.आणि हे स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी छत्रपती शिवराय यांनी गुप्तचर यंत्रणा सुरु करून त्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांना केल्याचे इतिहास आपल्याला सांगत आहे.हीच यंत्रणा मनुवादी व्यावस्थेने पोकळी करून आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्य संपवून पेशवाई स्थापन केलेली होती.परंतु हीच यंत्रणा उध्वस्थ करण्याचे कार्य सातरा गादीचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांनी केलेले आहे.त्यामुळे १ जानेवारी १८१८ चा लढा यशस्वी होऊन पेशवाई संपुष्टात आणल्याचे सिद्ध्नाक महार या सरदाराची इतिहासाने नोंद केलेली आहे.१८१८ चा लढा यशस्वी लढा लयास नेण्यासाठी १८५७ चा उठाव मनुवादी व्यावस्थेने उभा केल्याचे इतिहास आपल्याला सांगतो.परंतु मनुवादी व्यावस्थेने लयास घालविलेले स्वराज्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८६९ ला पुन्हा दाखविलेले आहे.त्यामुळे मनुवादी व्यावस्थेने उभी केलेली गुप्तचर यंत्रणा जवळ जवळ संपुष्टात आलेली होती.आणि पुन्हा समतेचे स्वराज्य उभारावे अशी महात्मा फुले यांची इच्छा होती त्यामुळे त्यांनी १८७३ ला भगवा ध्वज घेऊन सत्यशोधक समाज उभारला होता याची आजही इतिहासात नोंद आहे.उध्वस्थ झालेली मनुवादी व्यवस्था पुन्हा एकदा उभी रहावी हा दृष्टीकोन ठेऊन त्यानी १८७५ ला आर्य सनातन हिंदू धर्म व्यवस्था उभी केलेली आहे.परंतु ही व्यवस्था प्रसारित करण्यासाठी या सनातनी व्यावस्थेने महात्मा ज्योतिबा फुले यांची समाज मान्यता संपविण्यासाठी त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र करून त्यांची हत्या केली असल्याचे जवळ जवळ सर्वश्रुत झाले आहे.बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी १८८४ ला आर्य सनातन हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पहिली हिंदू महासभा आयोजित करून १८८५ ला त्याचे कॉंग्रेस मध्ये रुपांतर केली आहे.ही आर्य सनातनी व्यवस्था संपूर्ण भारतात उभी रहावी म्हणून आणि व्दिराष्ट्र व्यवस्था निर्माण होऊन संपूर्ण भारत देश हिंदुराष्ट्र निर्माण करण्याची संकल्पना निर्माण करून १८८७ मध्ये (आयबी) नावाची गुप्तचर यंत्रणा उभी केलेली आहे.आणि याच यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण भारत आपल्या ताब्यात ठेवण्याचे कार्य त्यांनी केले आहे.१८९४ मध्ये भाऊ रंगारी याच्या माध्यमातून बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी गणपती उत्सव सुरु करून १८९५ आपल्या ताब्यात घेतला आणि पहिली हिंदू मुस्लीम दंगल होऊन व्दिराष्ट्र संकल्पना अस्थित्वात आली.परंतु कॉंग्रेसचे बाळकृष्ण गंगाधर टिळक यांचे निधन झाले.त्यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण सुरु होते आणि त्यावेळेस त्यांचे आणि छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे चांगले संबध निर्माण झाले.महात्मा ज्योतिबा फुले यांनी दाखविलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पहिला पुतळा शनिवार वाड्यात उभारावा असे स्वप्न छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे होते परंतु याला आर्य सनातनी यांनी विरोध केला आणि त्यांना तो पुतळा शिवाजीनगर येथे उभा करावा लागला. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे हे थोर कार्य आर्य सनातनी यांना आवडले नाही त्यांचीही हत्या झाली.याची खबर तारेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना लंडन मध्ये कळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतात आल्यावर या सर्व बाबी त्यांनी समजून घेतल्या आणि त्यांनी १९२४ मध्ये भगवा ध्वज घेऊन समता सैनिक दल थापन केले.यामुळे व्दिराष्ट्र संकल्पनेला आणि हिंदुराष्ट्र निर्मितीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध असल्याचे लक्षात येताच या आर्य सनातनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १९२५ ला स्थापन करून (आयबी) ही गुप्तचर यंत्रणा ताब्यात घेतली.परंतु संविधान लिहित असताना कोठेही या गुप्तचर यंत्रणेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक मान्यता दिलेली नाही त्यामुळे आजही या गुप्तचर यंत्रणेचे ऑडीट होत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.याच संघटनेच्या आधारावर संपूर्ण देशात सनातनी दहशतवाद माजला असल्यामुळे पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या आणि तपास अधिकारी यांच्या हत्या होत आहे.हिंदुराष्ट्र संकल्पना अस्थित्वात यावी यासाठीच कोणताही उत्सव असो ते तो टार्गेट करणारच अशा गोष्टी आता पुढे आलेल्या आहेत.त्यामुळे आर्य सनातनी यांचे कडे सापडलेले बॉम्ब व पिस्तुले याचा एक भाग आहे त्यामुळे गणपती उत्सव टार्गेट तर करून देशात अशांतता प्रस्थापित केली जाणार तर नाही ना असा विचार करून प्रत्येक बहुजन तरुणानी सावध झाले पाहिजे.


राजेश खडके
सकल मराठी समाज
 


No comments:

Post a Comment