विषय असा आहे की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशातील
प्रत्येक नागरिकांना भरभरून दिलेले आहे.खरा भारत घडविण्याचे कार्य त्यांनी संत
कबीर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून केले आहे. संत कबीर यांच्या
वारकरी सांप्रदाय यांच्या माध्यमातून खरा “बुध्द” समजून घेतला आहे तर महात्मा
ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून समतावादी स्वराज्य आणि समतावादी बुध्द छत्रपती
संभाजी महाराज समजून घेतले आहे.त्यामळे शेतकरी,कष्टकरी,स्त्री संरक्षण आणि इथला
निवासी समजून घेतला आहे.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंधू संस्कृती पासून
ते पेशवाई पर्यंत चांगला आभ्यास झालेला होता म्हणून त्यांच्या लक्षात आले की,खरा भारत घडवायचा असेल तर
पुन्हा येथे सिंधू संस्कृती प्रस्थापित केली पाहिजे.म्हणजे इथली शेती विकसित केली
पाहिली,इथली रुपयाची समस्या सोडविली पाहिजे.कष्टकरी कामगार यांचे शोषण थांबविले
पाहिजे.इथली जातीय व्यवस्था नष्ट केली पाहिजे थोडक्यात काय तर “समता” प्रस्थापित
केली पाहिजे....हाच खरा “बौध्द” भारत असेन तो मला घडवायचा आहे.म्हणून डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी बौध्द धम्माची दीक्षा स्वत: घेतली आहे.संविधानात डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी “आम्ही” शब्द वापरला आहे.आणि बौध्द धम्माची दीक्षा घेत असताना “मी”
शब्द वापरला आहे हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे “बौध्द” हा धर्म नसून
गौतमी पुत्र सिध्दार्थ यांनी सिंधू संस्कृती समोर ठेऊन दिलेले विचार आहे.आणि ते
विचार आपल्या पर्यंत पोहचावे आणि इथला “मानव” विकसित व्हावा यासाठी त्यांनी “पाली”
भाषेत बुध्द वंदना विकसित केली आहे.त्यामुळे बौध्द विचार हे केवळ मानवाचे कल्याण
करणारा विचार आहे.आणि हेच विचार “मी” पाळीन यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:
बावीस प्रतिज्ञा तयार करून त्या लाखो जन समुदायी यांच्या समोर घेतल्या आहेत.परंतु
काही अज्ञानी व्यक्तींनी या बौध्द विचारांना धर्माचे स्वरूप दिलेले आहे.जर बौध्द
हा धर्म असता तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “मी” शब्दाचा वापर केला नसता त्यानी “आम्ही”
या शब्दाचा वापर केला असता हे आपण का लक्षात घेत नाही.कारण संविधानात सर्व
भारताच्या नागरिकांना गृहीत धरून “आम्ही” या शब्दाचा प्रयोग डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांनी केला आहे.परंतु येथे त्यांनी “मी” शब्द वापरून स्वत:ने या मानव कल्याणाची जबाबदारी
घ्यावी असे संकेत दिलेले आहे.
No comments:
Post a Comment