Wednesday, July 10, 2019
मी प्रकाश आंबेडकर यांचा भक्त नाही….बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे…! राजेश खडके सकल मराठी समाज
होय मी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचले आहे आणि अभ्यासले आहे...त्यामुळे मी त्यांच्या विचारांचा पाईक झालो आहे.होय मी हिंदू आहे परंतु आर्य सनातनी हिंदू धर्मीय नाही… कारण हा आर्य सनातनी हिंदू धर्म १८७५ ला स्थापन झालेला आहे...आणि त्याची पेरणी पेशवाई काळात झाली असून याच धर्माच्या नावाखाली जातीय व्यवस्था मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आहे.महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवरायांचे असलेले समतावादी स्वराज्य आपणास दाखविलेले आहे.बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक कार्याचे संशोधन केले तर असे लक्षात येईल की,इथली सिंधू संस्कृती त्यांनी उजागर केलेली आहे.विद्वतेचा, मानव कल्याणकारी विचारांचा आणि सामुहिक जीवन कार्यप्रणालीचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे.त्यामुळे सिधू संस्कृती ही भारताची जीवन प्रणाली आहे.त्यामुळे बोली भाषेतून या सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणण्याची प्रथा सुरु झालेली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणताही नवीन धर्म स्थापन केलेला नाही.आर्य सनातनी हिंदू धर्माच्या विरोधात जाऊन बौध्द धम्माची दीक्षा त्यानी घेतलेली आहे.जो बोध्द धम्म सिंधू संस्कृतीच्या विचारांचे समर्थन करतो.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,माझ्या बुध्द धम्म दिक्षेमुळे इथल्या हिंदुना कोणताही त्रास होणार नाही आणि आजही तो त्रास होताना दिसत नाही.हाच विचार मारण्यासाठी १८८४ ला पहिल्या हिंदू महासभेतून निर्माण झालेला कॉंग्रेस पक्ष पेशवाईचे समर्थन करीत आहे.त्यामुळे १९२५ चा आरएसएसचा इतिहास १८८४ मध्ये पेरला गेला असल्यामुळे त्यांचा इतिहास आभ्यास शास्त्रात घेण्यात आलेला आहे याची आपण दक्षता घेतली पाहिजे.अशा संघरुपी कॉंग्रेस पक्षाची अस्तित्व संपत आहे याचा आनंद इथल्या भूमीपुत्रांनी घेतला पाहिजे.कारण याच संघरुपी कॉंग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना या देशातील वंचितांच्या कल्याणकारी लढ्याला विरोध केलेला आहे...आणि याच संघरुपी कॉंग्रेसने बाबासाहेबांना खूप त्रास दिलेला आहे याचीही आठवण आपण ठेवली पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले नंतर त्यांची समाधी दिल्लीत उभारणे गरजेचे होते परंतु तसे त्यांनी केले नाही.त्यांचे साहित्य २० वर्षापासून गायब होते ते शासनाच्या कब्जेत घेण्यासाठी २० वर्ष लागले आहे.याच काळात त्यांच्या साहित्यात मोठ्या प्रमाणात बदल केले गेले आहेत याचेही संशोधन आपण केले पाहिजे.आणि याच काळात गोवळकर यांचा देखील आभ्यास आपण केला पाहिजे.परंतु जो सन्मान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांना समाजाकडून मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे...त्याचे तसे कारणही आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण नंतर गटटताचे राजकारण उभे राहिले आणि त्यांच्या वारसांना राजकारणा पासून दूर केले गेले.आज प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहे त्यांची कार्यपद्धती बघितली की आपल्या लक्षात येईल की ते संघरुपी कॉंग्रेसच्या आणि इथल्या सरंजामशाही घराण्याच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा मोगलांच्या कमी आणि सरंजामशाही घराण्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात होता.त्यामुळे या डूबत असलेल्या सरंजामशाही घराणेशाहीला वाचविण्यासाठी वामन मेश्राम पुढे आलेला आलेला आहे.छोटे मोठे रिपब्लिकन गटाचे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन पुढे प्रकाश आंबेडकर यांची बदनामी करताना पाहयला मिळत आहेत.ज्या छोट्या मोठ्यां समाजाला विकण्याच्या दुकानादाऱ्या बंद पडत चालल्यामुले ते दुकानदार प्रकाश आंबेडकर यांचेवर आरोप करताना पाहायला मिळत आहे.निवडणुकीच्या राजकारणात आज जरी भाजपाचा फायदा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होताना दिसत असला तरी तो तात्पुरता फायदा आहे याची जान आपण ठेवली पाहिजे.आणि समाजिक दृष्टीकोनातून पाहिले हे खूप मोठे परिवर्तन आहे याचाही अभ्यास आपण केले पाहिजे.कारण आज अलुतेदार आणि बलुतेदार ह्यांना सत्तेची दारे उघडण्यासाठीचा प्रकाश आंबेडकर यांचा मोठा संघर्ष आहे….आणि त्या हा संघर्ष यशस्वी होताना पाहायला मिळत आहे.जो लढा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेला आहे तोच लढा प्रकाश आंबेडकर लढताना दिसत आहे.यातून भविष्यात वंचित समुहाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे समतावादी स्वराज्य निर्माण होत आहे याचा आपण आभ्यास केला पाहिजे.परिवर्तन करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो ज्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना याच संघरुपी कॉंग्रेसने त्रास देण्यासाठी गद्दार उभे केले आज तेच संघरुपी कॉंग्रेसवाले प्रकाश आंबेडकर यांना त्रास देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुन्हा गद्दार उभे करीत आहेत याची आपण काळजी घेतेली पाहिजे. त्यामुळे मी प्रकाश आंबेडकर यांचा भक्त नाही….बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे…!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment