Wednesday, September 25, 2019
हिंदू राष्ट्र संकल्पना पूर्ण करण्यासाठीच शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्ला…! राजेश खडके सकल मराठी समाज
विषय असा आहे की,२०२५ ला आरएसएस या संघटनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत….आणि २०२४ ला समता सैनिक दलाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत.त्यामुळे समतां प्रस्थापित होऊ नये आणि आरएसएसच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेला बाधा येऊ नये हा मुख्य हेतू लक्षात ठेवूनच दिल्लीचा तक्त हलविणाऱ्या मराठी माणसाना संपविण्याचे कटकारस्थान सुरु आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.हिंदू राष्ट्र म्हणजे काय आणि हिंदू राष्ट्राचा कायदा मनुस्मृती काय आहे याची माहिती आणि आभ्यास जवळ जवळ सर्वांचाच झालेला आहे.त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी २०१४ ला आलेले EVM सरकार पुन्हा २०१९ ला EVM च्या जोरावर आलेले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेला समतेचा संरक्षक बोध्द बांधव उध्वस्त करण्याचा डाव जवळ जवळ यशस्वी होत आलेला आहे असे मला वाटत आहे.त्यामुळेच पुरोगामी विचार धारेवर कार्यरत असणाऱ्या संस्था मोठ्या खुबीने संपविण्याचे कार्य जोरात सुरु आहे.बोध्द बांधवा मध्ये आपापसात भांडण लावून त्यांच्यातील काही अतिशहाणे यांचा गैरवापर सुरु आहे हे समजण्या इतपत तरी आपल्याला आकलन झालेले आहे.२०२३ ला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या तयारीत इथले आरएसएस भाजप सरकार आहे.महाराष्ट्र राज्य ही समतेची भूमी आहे...आणि स्वतंत्र भारताला सर्व समाजवेषक आणि धर्मनिरपेक्ष असे संविधान देणारी भूमी आहे….दिल्लीचा तक्त हलविणारी भूमी आहे त्यामुळे या भूमीतील पुरोगामित्व संपविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सातारा गादीचे वंशज आणि कोल्हापूर गादीचे वंशज यांचेवर ताबा मारलेला आहे.त्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज यांच्यावरही ताबा मारण्याचा प्रयत्न सुरु आहे.आज रजपूत मराठा जरी भाजपाने आपल्याकडे ओढला असेल तरी इथला कुणबी मराठा आणि मावळा अद्याप तरी त्यांच्या हाताला लागलेला नाही याची आपण दखल घेतली पाहिजे….आणि तो मावळा असुरक्षित करण्यासाठी त्यांचे अधिष्ठान असणारे शरद पवार यांचेवर हल्ला करण्याचा कुटील डाव आरएसएस भाजपा वाल्यांनी आखला आहे.या पूर्वी प्रधानमंत्री यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपात प्रकाश आंबेडकर यांना गोवण्यासाठी यंत्रणेने त्यांना नक्षलवादी घोषित करण्याचे काम केले होते….परंतु त्यांचा तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.अशाच प्रकारे सध्याचे सरकार पुन्हा न येण्याची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे.मुख्यमंत्र्याची जनादेश यात्रा सपशेल फेल ठरलेली दिसत आहे.वयाच्या ८० व्या वर्षी शरद पवार रस्त्यावर उतरून इथला तरुण जागरूक करताना दिसत आहे.यामुळे पुन्हा EVM वर सरकार आणण्याची रणनीती फोल ठरत आहे.त्यातच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा फॉर्मोला यशस्वी होताना दिसत आहे परंतु तो यशस्वी होऊ नये यासाठी काही लोक त्यांच्या आघाडीत सनातनी विचार घेऊन शिरलेले दिसत आहेत.त्यामुळेच संघटना फुटीच्या मार्गावर आहे असे मला वाटते.जर या गोष्टी रोखल्या नाहीत तर EVM सरकार पुन्हा सत्तेवर येईल आणि हिंदू राष्ट्र संकल्पना यशस्वी करण्यासाठी विरोध करणारे यांना मोठ्या प्रमाणात तुरुंगात डांबण्याचे कार्य जोरात सुरु होईल हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मध्यंतरी एका मुलाखतीत प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की नवीन तुरुंग बांधण्याचे आदेश आलेले आहेत ते का आले आहेत याचा शोध पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन त्यानी त्या मुलाखती दरम्यान केले आहे.माझ्या सुरु असलेल्या समता प्रस्थापित करण्याचे कामात बाधा आणण्याचे काम काही लोक करीत आहेत...आणि हळू हळू आता ते माझ्या समोर येत आहे असो.शरद पवार यांना जर थांबविले नाही तर आपल्याला EVM सरकार आणता येणार नाही.त्यासाठी शिखर बँकेच्या घोटाळ्यात शरद पवार यांचे नाव नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कटकारस्थान शिजले आहे आणि त्यांना त्या गुन्ह्यात गोवण्यात आले हे आता स्पष्टपणे समोर दिसत आहे.अशा खोटारडेपणा विरोध्द एकनाथ खडसे,राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांनी आवाज उठविलेला आहे.त्यामुळे ईडीला सध्या तरी माघार घ्यावी लागलेली आहे.त्यामुळे मला असे वाटते आपण आता सावध भूमिका घेतली पाहिजे नाहीतर दळभद्री हिंदू राष्ट्र निर्माण होऊन पुन्हा एकदा आपण गुलामीकडे जाऊ….!
Monday, September 23, 2019
कसबा विधानसभा मतदार संघात VBA चाच उमेदवार विजयी होणार...सक्षम उमेदवार देण्यास भाजप असक्षम…! राजेश खडके
कसबा विधानसभा मतदार संघात संघाचे कार्यालय म्हणजे मोतीबाग आहे...आणि या मोतीबागेची पकड या मतदार संघात मजबूत रहावी म्हणून संघ कार्यकर्त्यानी नेहमी विधानसभेच्या गिरीष बापट यांना मजबूत करण्याचे कार्य केले आहे.या संघ कार्यकर्त्यानी टिळक घराणे कधीही या मतदार संघात उभे राहू दिलेले नाही.याचाच फायदा घेत गिरीष बापट यांनी स्वत: विरोधात कधीही प्रतिस्पर्धी उभा राहू दिलेला नाही...आणि याचाच परिपाक म्हणून गिरीश बापट खासदार झालेनंतर भाजपाला सक्षम असा उमेदवार आजच्या परिस्थितीत देता येईना.कॉंग्रेसची परिस्थिती जर पाहिली तर फारच भयानक परिस्थिती झालेली आहे.२०१४ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असे दोन्ही पक्ष वेगळे वेगळे निवडणूक लढल्यामुळे मतांचे विभाजन झाले आणि राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांनी १० हजार मते खाल्यामुळे मतांचे विभाजन होऊन कॉंग्रेच्या रोहित टिळक यांचा पराभव होऊन गिरीष बापट निवडून आले.नंतरच्या काळात कॉंग्रेसचे उमेदवार रोहित टिळक आजच्या परिस्थितीत बलात्कारच्या केसमध्ये गुंतले आहेत.तसेच अपक्ष नगरसेवक रवींद्र धंगेकर कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत त्यांना कॉंग्रेस मधून उमेदवारी मिळणार नाही याची शाश्वती झाल्यामुळे ते कॉंग्रेस कडून उमेदवारी लढण्यास इच्छुक आहे असे म्हणता येणार नाही.परंतु यांची लोकप्रियता कमी करण्याचे काम गेल्या २-३ वर्षात झालेले आहे त्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे मला वाटत नाही.त्यातच कॉंग्रेस हा निष्ठावंतांचा पक्ष असल्याचे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण पुणेशहराने पाहिले आहे. पुणेस्टेशनचे नगरसेवक अरविंद शिंदे यांची निष्ठा कमी पडल्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली नाही.ती उमेदवारी भाजपा उमेदवार गिरीष बापट यांचे मित्र मोहन जोशी यांना दिली गेली होती आणि त्यांची निष्ठा साऱ्या पुणेशहराने पाहिली आहे.त्यामुळे कसबा विधानसभा मतदार संघातून मला उमेदवारी मिळावी म्हणून निष्ठावान काँग्रेसी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी दिल्लीला हजेरी लावलेली आहे.त्यामुळे ते उमेदवारी आणतील यात काही शंका असायचे कारण नाही असे मला वाटते.परंतु ते मतदार संघाच्या बाहेरचे आहेत आणि त्यांची पकड या मतदार संघात नाही याची चर्चा जोरदार असताना कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचे आणि त्यांचे संबध चांगले आहे असे वाटत नाही.त्यामुळे या मतदार संघात दलितांची मते ते अरविंद शिंदे यांना ते मिळवून देतील असे वाटत नाही.आपल्याला प्रतिस्पर्धी नको म्हणून गिरीष बापट यांनी मनपा निवडणुकीत भाजपाचे गणेश बिडकर यांना निवडून आणण्यात अयशस्वी झाले आहेत.त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पद मिळविण्यासाठी गणेश बिडकर यांना महापलिका भाजपा कार्यालयात हाणामारी करावी लागली असल्याचे साऱ्या शहराने पाहिले आहे.त्यामुळे याचाच फायदा घेऊन खासदार गिरीष बापट कसबा विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीच्या रिंगणात आपल्या घरातला व्यक्ती उतरू पहात आहे.परंतु विधानसभेच्या राजकारणात तो व्यक्ती चालू शकत नाही अशी भाजपाच्या नेत्यांची धारणा झालेली आहे.त्यामुळे कॉंग्रेसकडे आणि भाजपाकडे सक्षम असा उमेदवार नसल्याच्या चर्चानी उधाण मांडले आहे.यातच आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी स्वराज्यातील अलुतेदार यांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे.हा मतदार संघ डायरेक्ट स्वराज्याला जुडत असल्यामुळे आणि शिव-फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा मतदार संघ असल्यामुळे इथला कुंभी,साळी, माळी,कोळी, कुंभार,भोई,तांबट,काची,दलित,मुस्लीम,रामोशी अशा समाजाची नाळ बांधली आहे. आणि त्यातच याच मतदार संघात स्वराज्याची लाल महालाच्या माध्यमातून पेरणी झालेली आहे.छत्रपती शिवरायांचे विचार पुर्नस्थापित करण्याचे कार्य करणारे महात्मा फुले यांचा प्रेरणा देणारी वाड्याच्या माध्यमातून समताभूमी उभी राहिलेली आहे.फुले-आंबेडकर यांच्या बरोबर काम करणारा ब्राह्मण समाज समाजवादी म्हणून तो आंबेडकरी विचारांच्या बाजूने उभा राहिलेला आहे.आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या माध्यमातून याच मतदार संघात प्रबुध्द भारत या वृत्तपत्राचे कार्यालय ऐतिहासिक गायकवाड वाड्या समोर उभारून सर्वांची मुठ बांधण्याचे कार्य केले आहे.अशा या मतदार संघात २०१४ पासून मी कार्यरत आहे.२०१६ पासून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचा फॉलोअर्स म्हणून काम करीत आहे.त्यांचे विचार संपूर्ण समजात पोहचविण्यासाठी कार्य करीत आहे.अशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीसाठी हा मतदार संघ अत्यंत मजबूत मतदार संघ म्हणून पुढे आलेला आहे.या मतदार संघातील खाचे खोसे आता मला महित झालेले आहेत.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने ह्या मतदार संघात मला उमेदवारी दिल्यास वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार निश्चितपणे निवडून येईल अशी मला खात्री आहे.
Monday, September 2, 2019
महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल शुक्रवारी वाजले. राज्यात १५ ऑक्टोबरला मतदान आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात फटाके फुटणार आहेत. सत्तेत असलेल्या आघाडी सरकारला जनता पुन्हा एकदा संधी देणार की महायुतीच्या पारड्यात आपले दान टाकणार, हे महिन्याभरातच कळेल. महाराष्ट्रात एकूण २८८ मतदारसंघ असून त्यापैकी २९ मतदारसंघ अनुसूचित जाती आणि २५ मतदारसंघ अनुसूचित जमाती जागांसाठी राखीव आहेत.
1 – अक्कलकुवा (एसटी) (नंदूरबार जिल्हा) (नंदूरबार लोकसभा ) के.सी.पडवी (कॉंग्रेस) - अशोक तडवी (VBA)
2 – शहादा एसटी) (नंदूरबार जिल्हा) (नंदूरबार लोकसभा )पद्माकर विजयसिंग वाळवी (कॉंग्रेस)
3 – नंदुरबार (एसटी) (नंदूरबार जिल्हा)(नंदूरबार लोकसभा ) - दीपा दळवी (VBA)
4 – नवापूर (नंदूरबार जिल्हा)(नंदूरबार लोकसभा ) श्रीरीश नाईक (कॉंग्रेस) - गावित जगत हरजी (VBA)
5 – साक्री (धुळे जिल्हा) (नंदूरबार लोकसभा ) = माळचे यशवंत देवमन (VBA)
6 – धुळे ग्रामीण (धुळे जिल्हा) (धुळे लोकसभा )
7 – धुळे शहर (धुळे जिल्हा) (धुळे लोकसभा ) - मोहम्मद युसुफ अब्दुल हमीद मुल्ला (MIM) - इमान शेख ईसाल (VBA)
8 – सिंदखेडा (धुळे जिल्हा) (धुळे लोकसभा ) - नामदेव देविदास येवले (VBA)
9 – शिरपूर (नंदूरबार लोकसभा ) (नंदुरबार लोकसभा) - प्रा.मोतीलाल सोनावणे (VBA)
10 – चोपडा (जळगाव जिल्हा) (रावेर लोकसभा) - अरुण संजय बाविस्कर (VBA)
11 – रावेर (जळगाव जिल्हा) (रावेर लोकसभा) - विवेक देविदास ठाकरे (MIM) श्रीरीश चौधरी (कॉंग्रेस) - हाजी सय्यद मुश्ताक सय्यद कमरुद्दिन (VBA)
12 – भुसावळ (जळगाव जिल्हा) (रावेर लोकसभा) प्रा.सुनील दादा सरवदे (VBA)
13 – जळगाव शहर (जळगाव जिल्हा) (जळगाव लोकसभा) - शेख शफी अब्दुल नबी शेख (VBA)
14 – जळगाव ग्रामीण (जळगाव जिल्हा) (जळगाव लोकसभा) उत्तम पंडित सपकाळे (VBA)
15 – अमळनेर (जळगाव जिल्हा) (जळगाव लोकसभा) श्रावण धर्मां वंजारी (VBA)
16 – एरंडोल (जळगाव जिल्हा) (जळगाव लोकसभा) गोविंद एकनाथ शिरोळे (VBA)
17 – चाळीसगाव (जळगाव जिल्हा) (जळगाव लोकसभा)Mमोरसिंग गोपा राठोड (VBA)
18 – पाचोरा (जळगाव जिल्हा) (जळगाव लोकसभा) नरेश पंडित पाटील (VBA)
19 – जामनेर (जळगाव जिल्हा) (रावेर लोकसभा )Sसुमित चव्हाण (VBA)
20 – मुक्ताईनगर (जळगाव जिल्हा) (रावेर लोकसभा)
21 – मलकापूर (बुलढाणा जिल्हा) (रावेर लोकसभा) नितीन नांदूरकर (VBA)
22 – बुलढाणा (बुलढाणा जिल्हा) (बुलढाणा लोकसभा ) हर्षवर्धन सपकाळ (कॉंग्रेस) - तेजल शरद काळे (VBA)
23 – चिखली (बुलढाणा जिल्हा) (बुलढाणा लोकसभा ) अशोक सुराडकर (VBA)
24 – सिंदखेडराजा (बुलढाणा जिल्हा) (बुलढाणा लोकसभा ) सविता शिवाजी मुंडे (VBA)
25 – मेहकर (एससी) (बुलढाणा जिल्हा) (बुलढाणा लोकसभा )अनंत वानखेडे (कॉंग्रेस)
26 – खामगाव (बुलढाणा जिल्हा) (बुलढाणा लोकसभा ) हार्ड वत्स्कार (VBA)
27 – जळगाव(जामोद) (बुलढाणा जिल्हा) (बुलढाणा लोकसभा ) शरद शिवाजी बनकर (VBA)
28 – अकोट (अकोला जिल्हा) (अकोला लोकसभा)
29 – बाळापूर (अकोला जिल्हा) (अकोला लोकसभा) धैर्यवान पुंडकर (VBA)
30 – अकोला पश्चिम (अकोला जिल्हा) (अकोला लोकसभा) इम्रान पंजांनी (VBA)
31 – अकोला पूर्व (अकोला जिल्हा) (अकोला लोकसभा) हरिभाऊ भदे (VBA)
32 – मुर्तिजापूर (अकोला जिल्हा) (अकोला लोकसभा)
33 – रिसोड (वासिम जिल्हा) (अकोला लोकसभा) अमित झनक (कॉंग्रेस) - दिलीप जाधव (VBA)
34 – वाशिम (वासिम जिल्हा) (यवतमाळ वासिम लोकसभा)
35 – कारंजा (वासिम जिल्हा) (यवतमाळ वासिम लोकसभा) राम चव्हाण (VBA)
36 – धामणगाव रेल्वे (वर्धा जिल्हा ) (वर्धा लोकसभा ) वीरेंद्र जगताप (कॉंग्रेस) - निलेश विश्वकर्मा (VBA)
37 – बडनेरा (अमरावती जिल्हा ) (अमरावती लोकसभा ) प्रमोद इंगळे (VBA)
38 – अमरावती (अमरावती जिल्हा ) (अमरावती लोकसभा ) आलीम वाहिद पटेल (VBA)
39 – तिवसा (अमरावती जिल्हा ) यशोमती ठाकूर (कॉंग्रेस) (अमरावती लोकसभा ) - दीपक देवराव सरदार (VBA)
40 – दर्यापूर (अमरावती जिल्हा ) (अमरावती लोकसभा )रेखा साहेबराव वाकपांजर (VBA)
41 – मेळघाट (अमरावती जिल्हा ) (अमरावती लोकसभा )
42 – अचलपूर (अमरावती जिल्हा ) (अमरावती लोकसभा ) नंदेश शेहशेराव आबाडकर (VBA)
43 – मोर्शी (वर्धा जिल्हा ) (वर्धा लोकसभा ) - नंदकिशोर कुयटे - भोई (VBA)
44 – आर्वी ( वर्धा जिल्हा ) (वर्धा लोकसभा )अमर काळे (कॉंग्रेस) - रुपचंद टोपले (VBA)
45 – देवळी ( वर्धा जिल्हा ) (वर्धा लोकसभा )रणजीत कांबळे (कॉंग्रेस) - सिध्दार्थ भोजराज डोईफोडे (VBA)
46 – हिंगणघाट ( वर्धा जिल्हा ) (वर्धा लोकसभा )
47 – वर्धा ( वर्धा जिल्हा ) (वर्धा लोकसभा ) आनंद उमाटे (VBA)
48 – काटोल (नागपूर जिल्हा) (रामटेक लोकसभा) दिनेश गुणवंत कुळे (VBA)
49 – सावनेर (नागपूर जिल्हा) सुनिल केदार (कॉंग्रेस)
50 – हिंगणा (नागपूर जिल्हा) (रामटेक लोकसभा)
51 – उमरेड (नागपूर जिल्हा) (रामटेक लोकसभा) रुक्षांदास बनसोडे (VBA)
52 – नागपूर दक्षिण-पश्चिम (नागपूर जिल्हा) (नागपूर लोकसभा )
53 – नागपूर दक्षिण (नागपूर जिल्हा) (नागपूर लोकसभा )
54 – नागपूर पूर्व (नागपूर जिल्हा) (नागपूर लोकसभा ) रोशन गान्धीराम साव (VBA)
55 – नागपूर मध्य (नागपूर जिल्हा) (नागपूर लोकसभा )
56 – नागपूर पश्चिम (नागपूर जिल्हा) (नागपूर लोकसभा ) अंबर मलिक (VBA)
57 – नागपूर उत्तर (एससी) (नागपूर जिल्हा) (नागपूर लोकसभा ) नितीन राउत (कॉंग्रेस) -विनय भांगे (VBA)
58 – कामठी (नागपूर जिल्हा) (रामटेक लोकसभा) राजेंद्र काकडे (VBA)
59 – रामटेक (नागपूर जिल्हा) (रामटेक लोकसभा) भोजराज बोर्डे (VBA)
60 – तुमसर (भंडारा जिल्हा) (भंडारा लोकसभा ) विजय शहारे (VBA)
61 – भंडारा (भंडारा जिल्हा) (भंडारा लोकसभा )नितीन बोरकर (VBA)
62 – साकोली (भंडारा जिल्हा) (भंडारा लोकसभा ) चन्द्रशेखर टेंबूर्णे (VBA)
63 – अर्जुनी मोरगाव (भंडारा जिल्हा) (भंडारा लोकसभा ) रिता लांजेवार (VBA)
64 – तिरोडा (भंडारा जिल्हा) (भंडारा लोकसभा ) संदीप राजकुमार पोमामे (VBA)
65 – गोंदिया (भंडारा जिल्हा) (भंडारा लोकसभा )
66 – आमगाव (गोंदिया जिल्हा) (गडचिरोळी चिमूर लोकसभा) सुभाष रामराजे (VBA)
67 – आरमोरी (गडचिरोली जिल्हा) (गडचिरोळी चिमूर लोकसभा)Rरमेश लालसाहेब कोरपा (VBA)
68 – गडचिरोली (गडचिरोली जिल्हा) (गडचिरोळी चिमूर लोकसभा) गोपाळ मगरे (VBA)
69 – अहेरी (गडचिरोली जिल्हा) (गडचिरोळी चिमूर लोकसभा) - लालसू नागोटी - माडिया (VBA)
70 – राजुरा (चंद्रपूर जिल्हा) (चंद्रपूर लोकसभा ) गोदारू पाटील जुमनाके (VBA)
71 – चंद्रपूर (चंद्रपूर जिल्हा) (चंद्रपूर लोकसभा )तथागत पेटकर (VBA)
72 – बल्लारपूर (चंद्रपूर जिल्हा) (चंद्रपूर लोकसभा )
73 – ब्रम्हपुरी (चंद्रपूर जिल्हा) (गडचिरोळी चिमूर लोकसभा) चंद्रलाल मेश्राम - ढीवर (VBA) - विजय बडटीवार (कॉंग्रेस)
74 – चिमुर (चंद्रपूर जिल्हा) (गडचिरोळी चिमूर लोकसभा) - अरविंद सांडेकर -माना (VBA) - सतीश वानजुरकर (कॉंग्रेस)
75 – वरोरा (चंद्रपूर जिल्हा) (चंद्रपूर लोकसभा ) -अड आमोद बावणे -ढीवर (VBA) - प्रतिभा धानोरकर (कॉंग्रेस)
76 – वणी (यवतमाळ जिल्हा) (चंद्रपूर लोकसभा ) महेंद्र अमरचंद लोढा (VBA) 7
77 – राळेगांव (यवतमाळ जिल्हा) (यवतमाळ वासिम लोकसभा) - माधव कोहळे - गोवारी (VBA)
78 – यवतमाळ (यवतमाळ जिल्हा) (यवतमाळ वासिम लोकसभा) अनिल बाळासाहेब मांगुळकर (कॉंग्रेस) - योगेश पारवेकर (VBA)
79 – दिग्रस (यवतमाळ जिल्हा) (यवतमाळ वासिम लोकसभा) समिउल्ला खान (VBA)
80 – आर्णी (यवतमाळ जिल्हा) (चंद्रपूर लोकसभा ) निरजन मेश्राम (VBA)
81 – पुसद (यवतमाळ जिल्हा) (यवतमाळ वासिम लोकसभा) ज्ञानेश्वर बाले (VBA)
82 – उमरखेड (यवतमाळ जिल्हा) (हिंगोली लोकसभा ) विजय मानकर मून (VBA)
83 – किनवट (नांदेड जिल्हा) (हिंगोली लोकसभा ) हमराज उईके (VBA)
84 – हदगाव (नांदेड जिल्हा) (हिंगोली लोकसभा )
85 – भोकर (नांदेड जिल्हा) अशोक चव्हाण (कॉंग्रेस) नामदेव आईलवार (VBA)
86 – नांदेड उत्तर (नांदेड जिल्हा) (नांदेड लोकसभा ) - मोहम्मद फिरोज खान (MIM) - डी.पी.सावंत (कॉंग्रेस) - मुकुंद चावरे (VBA)
87 – नांदेड दक्षिण (नांदेड जिल्हा) (नांदेड लोकसभा ) फारूक अहमद इकबाल अहमद (VBA)
88 – लोह (नांदेड जिल्हा)(लातूर लोकसभा) विनोद वसंतराव पापीनवार (VBA)
89 – नायगाव (नांदेड जिल्हा) (नांदेड लोकसभा ) वसंतराव चव्हाण (कॉंग्रेस) मारुतीराव व्यंकटराव कवळे (VBA)
90 – देगलूर (एससी) (नांदेड लोकसभा ) (नांदेड जिल्हा) रावसाहेब आनंतपुरकर (कॉंग्रेस) - रामचंद्र गंगाराम भरांडे (VBA)
91 – मुखेड (नांदेड जिल्हा) (नांदेड लोकसभा )
92 – बसमत (हिंगोली जिल्हा) (हिंगोली लोकसभा ) शेख फरीद इम्तीयाक पटेल
93 – कळमनुरी (हिंगोली जिल्हा) (हिंगोली लोकसभा ) संतोष तारफे (कॉंग्रेस)
94 – हिंगोली (हिंगोली जिल्हा) (हिंगोली लोकसभा )
95 – जिंतूर (परभणी जिल्हा) (परभणी लोकसभा ) मनोहर रुस्तम वाकळे (VBA)
96 – परभणी (परभणी जिल्हा) (परभणी लोकसभा ) शेख मोहम्मद गौस (VBA)
97 – गंगाखेड (परभणी जिल्हा) (परभणी लोकसभा )करुणा बाळसाहेब कुड्गीर (VBA)
98 – पाथरी (परभणी जिल्हा) (परभणी लोकसभा ) सुरश वरपूडकर (कॉंग्रेस) विलास साहेबराव बाबर
99 – परतूर (जालना जिल्हा) (परभणी लोकसभा ) राजपालसिंग गारुसिंग राठोड (VBA)
100 – घनसावंगी (जालना जिल्हा) (परभणी लोकसभा )
101 – जालना (जालना जिल्हा) ( जालना लोकसभा ) अशोक रामराव खरात (VBA)
102 – बदनापूर (जालना जिल्हा) ( जालना लोकसभा )राजेंद्रNनामदेव मगरे (VBA)
103 – भोकरदन (जालना जिल्हा) ( जालना लोकसभा ) दीपक भीमराव बोराडे (VBA)
104 – सिलोड (औरंगाबाद जिल्हा) ( जालना लोकसभा ) दादाराव किसनराव वानखेडे (VBA)
105 –कन्नड (औरंगाबाद जिल्हा) (औरंगाबाद लोकसभा) अनिल चव्हाण (VBA)
106 – फुलंब्री (औरंगाबाद जिल्हा) ( जालना लोकसभा ) कल्याण काळे (कॉंग्रेस) - जगन्नाथ कचरू रेठे (VBA)
107 – औरंगाबाद मध्य (औरंगाबाद जिल्हा) (औरंगाबाद लोकसभा) अमित भुईगळ (VBA)
108 – औरंगाबाद पश्चिम (औरंगाबाद जिल्हा) (औरंगाबाद लोकसभा) विजय अंबादास चव्हाण (VBA)
109 – औरंगाबाद पूर्व (औरंगाबाद जिल्हा) (औरंगाबाद लोकसभा)
110 – पैठण (औरंगाबाद जिल्हा) ( जालना लोकसभा )Vविजय अंबादास चव्हाण (VBA)
111 – गंगापूर (औरंगाबाद जिल्हा) (औरंगाबाद लोकसभा) अंकुश बाबुराव काळवणे (VBA)
112 – विजापूर (औरंगाबाद जिल्हा) (औरंगाबाद लोकसभा) प्रमोद नांगरे पाटील (VBA)
113 – नांदगाव (नाशिक जिल्हा) (दिंडोरी लोकसभा)
114 – मालेगाव मध्य (नाशिक जिल्हा)- (धुळे लोकसभा ) मुक्ती मोहम्मद इस्माईल खलिक (MIM) - शेख असिफ शेख रशीद (कॉंग्रेस)
115 – मालेगाव बाह्य (नाशिक जिल्हा) (धुळे लोकसभा )
116 – बागलाण (नाशिक जिल्हा) (धुळे लोकसभा )
117 – कळवण (नाशिक जिल्हा) (दिंडोरी लोकसभा)
118 – चांदवड (नाशिक जिल्हा) (दिंडोरी लोकसभा)
119 – येवला (नाशिक जिल्हा) (दिंडोरी लोकसभा) सचिन अलगट (VBA)
120 – सिन्नर (नाशिक जिल्हा) (नाशिक लोकसभा )
121 – निफाड (नाशिक जिल्हा) (दिंडोरी लोकसभा)
122 – दिंडोरी (नाशिक जिल्हा) (दिंडोरी लोकसभा)
123 – नाशिक पूर्व (नाशिक जिल्हा) (नाशिक लोकसभा ) संतोष अशोख नाथ (VBA)
124 – नाशिक मध्य (नाशिक जिल्हा) (नाशिक लोकसभा ) संजय भारत साबळे (VBA)
125 – नाशिक पश्चिम (नाशिक जिल्हा) (नाशिक लोकसभा ) धोंडीराम एल कराड (VBA)
126 – देवळाली (नाशिक जिल्हा) (नाशिक लोकसभा ) गौतम वाघ (VBA)
127 – इगतपूरी (नाशिक जिल्हा) (नाशिक लोकसभा )
128 – डहाणू (पालघर जिल्हा) (पालघर लोकसभा ) शिवानंद काटेला (VBA)
129 – विक्रमगड (पालघर जिल्हा) (पालघर लोकसभा ) संतोष रामदास वाघ (VBA)
130 – पालघर (पालघर जिल्हा) (पालघर लोकसभा ) विजय गदग (VBA)
131 – बोईसर (पालघर जिल्हा) (पालघर लोकसभा ) राजेशसिंग मंगा कोळी (VBA)
132 – नालासोपारा (पालघर जिल्हा) (पालघर लोकसभा ) प्रवीण गायकवाड (VBA)
133 – वसई (पालघर जिल्हा) (पालघर लोकसभा ) शाहीन कमाल शेख (VBA)
134 – भिवंडी ग्रामीण (ठाणे जिल्हा) (भिवंडी लोकसभा )स्वप्नां महादेव कोळी (VBA)
135 – शहापूर (ठाणे जिल्हा) (भिवंडी लोकसभा )
136 – भिवंडी पश्चिम (ठाणे जिल्हा) (भिवंडी लोकसभा ) मंगलदास म्हात्रे (VBA)
137 – भिवंडी पूर्व (ठाणे जिल्हा) (भिवंडी लोकसभा ) उनील पाटील (VBA)
138 – कल्याण पश्चिम (ठाणे जिल्हा) (भिवंडी लोकसभा ) अजय सावंत (VBA)
139 – मुरबाड (ठाणे जिल्हा) (भिवंडी लोकसभा )
140 – अंबरनाथ (एससी) (ठाणे जिल्हा) (कल्याण लोकसभा) रोहित साळवे (कॉंग्रेस) - जानु मानकर (VBA)
141 – उल्हासनगर (ठाणे जिल्हा) (कल्याण लोकसभा) राजनसिंग लभाना (VBA)
142 – कल्याण पूर्व (ठाणे जिल्हा) (कल्याण लोकसभा)
143 – डोंबिवली (ठाणे जिल्हा) (कल्याण लोकसभा)
144 – कल्याण ग्रामीण (ठाणे जिल्हा) (कल्याण लोकसभा)
145 – मीरा-भाईंदर (ठाणे जिल्हा) (ठाणे लोकसभा ) सय्यद हुसेन (कॉंग्रेस) - सलीम अब्बास खान (VBA)
146 – ओवळा-माजीवडा (ठाणे जिल्हा) (ठाणे लोकसभा )
147 – कोपरी-पाचपाखाडी (ठाणे जिल्हा) (ठाणे लोकसभा )
148 – ठाणे (ठाणे जिल्हा) (ठाणे लोकसभा ) उन्मेष बागवे (VBA)
149 – मुंब्रा-कळवा (ठाणे जिल्हा) (कल्याण लोकसभा) अनिल भगत (VBA)
15 – ऐरोली (ठाणे जिल्हा) (ठाणे लोकसभा ) प्रकाश ढोकणे (VBA)
151 – बेलापूर (मुंबई जिल्हा) (ठाणे लोकसभा )
152 – बोरीवली (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर लोकसभा ) निखील विनेरकर (VBA)
153 – दहिसर (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर लोकसभा )
154 – मागाठणे (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर लोकसभा )
155 – मुलुंड (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पूर्व लोकसभा )
156 – विक्रोळी (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पूर्व लोकसभा ) सिध्दार्थ भास्करराव मोकळे (VBA)
157 – भांडुप पश्चिम (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पूर्व लोकसभा ) सुरेश कोपरकर (कॉंग्रेस) - सतीश जयसिंग माने (VBA)
158 – जोगेश्वरी पूर्व (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा ) दिलबाग (VBA)
159 – दिंडोशी (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा ) मिलिंद भोळे (VBA)
160 – कांदिवली पूर्व (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर लोकसभा )
161 – चारकोप (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर लोकसभा ) मोरीस केणी (VBA)
162 – मालाड पश्चिम (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर लोकसभा ) सयीद सोहेल असगर रिझवी (VBA)
163 – गोरेगाव (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा )
164 – वर्सोवा (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा )
165 – अंधेरी पश्चिम (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा ) अशोक जाधव (कॉंग्रेस) - प्रकाश कोकरे (VBA)
166 – अंधेरी पूर्व (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा ) - आरिफ मौनुद्दिन शेख (MIM) - शरद यटम (VBA)
167 – विलेपार्ले (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर मध्य लोकसभा )
168 – चांदिवली (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर मध्य लोकसभा ) मोहम्मद असिफ नसीम खान (कॉंग्रेस) अब्दुल हसन आली हसन खान (VBA)
169 – घाटकोपर पश्चिम (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पूर्व लोकसभा ) जालिंदर सरोदे (VBA)
170 – घाटकोपर पूर्व (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पूर्व लोकसभा ) विकास पवार (VBA)
171 – मानखुर्द शिवाजीनगर (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पूर्व लोकसभा ) मोहम्मद हफीज अकबल खान (VBA)
172 – अनुशक्ती नगर (मुंबई जिल्हा) - शाहवाज सर्फराज हुस्सेन शेख (MIM) - लालासाहेब लोमटे (VBA)
173 – चेंबुर (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण मध्य लोकसभा ) चंद्रकांत हंडोरे (कॉंग्रेस)
174 – कुर्ला (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर मध्य लोकसभा ) - रत्नाकर डावरे (MIM)
175 – कलिना (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर मध्य लोकसभा ) मनीषा जाधव (VBA)
176 – वांद्रे पूर्व (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर मध्य लोकसभा ) - मोहम्मद सलिम कुरेशी (MIM) - झीशान झियाउद्दीन सिद्धिकी (कॉंग्रेस) - शेख जावेद अहमद (VBA)
177 – वांद्रे पश्चिम (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर मध्य लोकसभा )इम्तियाज जहागिरदार (VBA)
178 – धारावी (एस्सी) (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण मध्य लोकसभा ) वर्षा गायकवाड (कॉंग्रेस)
179 – सायन कोळीवाडा (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण मध्य लोकसभा ) गणेश यादव (कॉंग्रेस) - आमीर इंद्र्सी (VBA)
180 – वडाळा (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण मध्य लोकसभा ) लक्ष्मण पवार (VBA)
181 – माहिम (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण मध्य लोकसभा )
182 – वरळी (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण लोकसभा )
183 – शिवडी (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण लोकसभा )
184 – भायखळा (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण लोकसभा ) - वारीस पठाण (MIM)
185 – मलबार हिल (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण लोकसभा )
186 – मुंबादेवी (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण लोकसभा ) अमीन पटेल (कॉंग्रेस) -समशेरखान पठाण (VBA)
187 – कुलाबा (रायगड जिल्हा) (मुंबई दक्षिण लोकसभा ) अशोक जगताप (कॉंग्रेस) -जितेंद्र कांबळे (VBA)
188 – पनवेल (रायगड जिल्हा) (मावळ लोकसभा)
189 – कर्जत (रायगड जिल्हा) (मावळ लोकसभा)
190 – उरण (रायगड जिल्हा) (मावळ लोकसभा)
191 – पेण (रायगड जिल्हा) (रायगड लोकसभा)
192 – अलिबाग (रायगड जिल्हा) (रायगड लोकसभा) रविकांत येरेकर (VBA)
193 – श्रीवर्धन (रायगड जिल्हा) (रायगड लोकसभा) इर्शाद हुसेन खातीब (VBA)
194 – महाड (रायगड जिल्हा) (रायगड लोकसभा) माणिक जगताप (कॉंग्रेस) संजय अर्जुन घाग (VBA)
195 – जुन्नर (पुणे जिल्हा) (शिरूर लोकसभा)
196 – आंबेगाव (पुणे जिल्हा) (शिरूर लोकसभा) लक्ष्मण डामसे
197 – खेड आळंदी (पुणे जिल्हा) (शिरूर लोकसभा) ह.भ.प. पांडुरंग एन शितोळे (VBA)
198 – शिरुर (पुणे जिल्हा) (शिरूर लोकसभा) चंदन किशोर सोन्डेकर (VBA)
199 – दौंड (पुणे जिल्हा) (बारामती लोकसभा) दत्तात्रय ताम्हाणे (VBA)
200 – इंदापूर (पुणे जिल्हा) (बारामती लोकसभा)
201 – बारामती (पुणे जिल्हा) (बारामती लोकसभा) अविनाश गोफणे (VBA)
202 – पुरंदर (पुणे जिल्हा) (बारामती लोकसभा) संजय जगताप (कॉंग्रेस) - अतुल नांगरे पाटील (VBA)
203 – भोर (पुणे जिल्हा) (बारामती लोकसभा) संग्राम थोपटे (कॉंग्रेस) -
204 – मावळ (पुणे जिल्हा) (मावळ लोकसभा)
205 – चिंचवड (पुणे जिल्हा) (मावळ लोकसभा)
206 – पिपरी (पुणे जिल्हा) (मावळ लोकसभा) प्रवीण गायकवाड (VBA)
207 – भोसरी (पुणे जिल्हा) (शिरूर लोकसभा) - शहानवाला शेख -छप्परबंद (VBA)
208 – वडगाव शेरी (पुणे जिल्हा) (पुणे लोकसभा) - डॅनिअल लांडगे (MIM) - प्रवीण गायकवाड (VBA)
209 – शिवाजीनगर (पुणे जिल्हा) (पुणे लोकसभा) - अनिल कुऱ्हाडे -वडार (VBA)
210 – कोथरुड (पुणे जिल्हा) (पुणे लोकसभा) - दिपक शामदिरे - कैकाडी (VBA)
211 – खडकवासला (पुणे जिल्हा) (बारामती लोकसभा)
212 – पर्वती (पुणे जिल्हा) (पुणे लोकसभा) ॠशिकेश नांगरे पाटील (VBA)
213 – हडपसर (पुणे जिल्हा) (शिरूर लोकसभा) घनशाम हाके (VBA)
214 – पुणे कॅन्टोन्मेंट (पुणे जिल्हा) (पुणे लोकसभा) - हिना शफिक मोमीन (MIM) - रमेश बागवे (कॉंग्रेस) लक्ष्मण आरडे (VBA)
215 – कसबा पेठ (पुणे जिल्हा) (पुणे लोकसभा) - मिलिंद काची - राजपूत (VBA)
216 – अकोले (अहमदनगर जिल्हा) (शिर्डी लोकसभा) दीपक यशवंत पधवे (VBA)
217 – संगमनेर (अहमदनगर जिल्हा) (शिर्डी लोकसभा) विजय थोरात (कॉंग्रेस ) बापूसाहेब भागवत ताजने (VBA)
218 – शिर्डी (अहमदनगर जिल्हा) (शिर्डी लोकसभा) विशाल कोलगे (VBA)
219 – कोपरगाव (अहमदनगर जिल्हा) (शिर्डी लोकसभा) - अशोक गायकवाड - भिल्ल (VBA)
220 – श्रीरामपूर (अहमदनगर जिल्हा) (शिर्डी लोकसभा)
221 – नेवासा (अहमदनगर जिल्हा) (शिर्डी लोकसभा)
222 – शेवगाव पाथर्डी (अहमदनगर जिल्हा) (अहमदनगर लोकसभा) - किसन चव्हाण - पारधी (VBA)
223 – राहुरी (अहमदनगर जिल्हा) (अहमदनगर लोकसभा) विजय तमनर (VBA)
224 – पारनेर (अहमदनगर जिल्हा) (अहमदनगर लोकसभा) दगडू रामजी शेडगे (VBA)
225 – अहमदनगर शहर (अहमदनगर जिल्हा) (अहमदनगर लोकसभा) किरण काळे (VBA)
226 – श्रीगोंदा (अहमदनगर जिल्हा) (अहमदनगर लोकसभा)Mम्चीन्द्र पांडुरंग सुपेकर (VBA)
227 – कर्जत जामखेड (अहमदनगर जिल्हा) (अहमदनगर लोकसभा) - अरुण जाधव =कोल्हाटी (VBA) रोहित पवार (राष्ट्रवादी)
228 – गेवराई (बीड जिल्हा) (बीड लोकसभा ) विष्णू भगवानराव देवकाते (VBA)
229 – माजलगाव (बीड जिल्हा) (बीड लोकसभा ) रविकांत अंबादास राठोड (VBA)
230 – बीड (बीड जिल्हा) (बीड लोकसभा ) अशोक सुखदेव हिंगे (VBA)
231 – आष्टी (बीड जिल्हा) (बीड लोकसभा ) नामदेव सुग्रीव सानप (VBA)
232 – केज (बीड जिल्हा) (बीड लोकसभा )अजिंक्य चांदणे (VBA)
233 – परळी (बीड जिल्हा) (बीड लोकसभा ) भीमराव सातपुते (VBA)
234 – लातूर ग्रामीण (लातूर जिल्हा) (लातूर लोकसभा ) मंचकराव ढोणे (VBA)
235 – लातूर शहर (लातूर जिल्हा) (लातूर लोकसभा )- मणियार राजासाब -मणियार (VBA) - अमित देशमुख (कॉंग्रेस)
236 – अहमदपूर (लातूर जिल्हा) (लातूर लोकसभा )
237 – उदगीर (लातूर जिल्हा) (लातूर लोकसभा ) सुशीलLलक्ष्मण कांबळे (VBA)
238 – निलंगा (लातूर जिल्हा) (लातूर लोकसभा )अशोक निलंगेकर (कॉंग्रेस) गोविंद वीरभद्र भांताडे (VBA)
239 – औसा (लातूर जिल्हा) (उस्मानाबद लोकसभा ) - सुधीर पोतदार -सोनार (VBA) - बसवराज पाटील (कॉंग्रेस)
240 – उमरगा (उस्मानाबाद जिल्हा) (उस्मानाबद लोकसभा ) रमाकांत लक्ष्मण गायकवाड (VBA)
241 – तुळजापूर (उस्मानाबाद जिल्हा) (उस्मानाबद लोकसभा ) मधुकरराव चव्हाण (कॉंग्रेस)
242 – उस्मानाबाद (उस्मानाबाद जिल्हा) (उस्मानाबद लोकसभा ) धनजय शिंगाडे (VBA)
243 – परांडा (उस्मानाबाद जिल्हा) (उस्मानाबद लोकसभा ) काकासाहेब मरकड (VBA)
244 – करमाळा (सोलापूर जिल्हा) (माढा लोकसभा ) दशरथ कांबळे (VBA)
245 – माढा (सोलापूर जिल्हा) (माढा लोकसभा )
246 – बार्शी (सोलापूर जिल्हा) (उस्मानाबद लोकसभा )महादेव एकनाथ काकडे (VBA)
247 – मोहोळ (सोलापूर जिल्हा) (सोलापूर लोकसभा )
248 – सोलापूर शहर उत्तर (सोलापूर जिल्हा) (सोलापूर लोकसभा ) आनद चंदनशिवे (VBA)
249 – सोलापूर शहर मध्य (सोलापूर जिल्हा) (सोलापूर लोकसभा ) - फारूक मकबूल शब्दी (MIM) - प्रणिती शिंदे (कॉंग्रेस)
250 – अक्कलकोट (सोलापूर जिल्हा) (सोलापूर लोकसभा ) धनराज राठोड (VBA)
251 – सोलापूर दक्षिण (सोलापूर जिल्हा) (सोलापूर लोकसभा )- सुफिया तौफिक शेख (MIM) - मौलाबी सय्यद (कॉंग्रेस) - बाळासाहेब बंडगर पाटील आनद चंदनशिवे (VBA)
252 – पंढरपूर (सोलापूर जिल्हा) (सोलापूर लोकसभा )
253 – सांगोला (सोलापूर जिल्हा) (माढा लोकसभा )- शंकर भगवान सलगर (MIM) - विष्णू यलमार (VBA)
254 – माळशिरस (सोलापूर जिल्हा) (माढा लोकसभा ) राज यशवंत कुमार (VBA)
255 – फलटण (सातारा जिल्हा) (माढा लोकसभा )
256 – वाई (सातारा जिल्हा) (सातारा लोकसभा )रामदास भिवा महानवर (VBA)
257 – कोरेगाव (सातारा जिल्हा) (सातारा लोकसभा )- डॉ बाळासाहेब चव्हाण - कैकाडी (VBA)
258 – माण (सातारा जिल्हा) (माढा लोकसभा ) प्रमोद रामचंद्र गावडे (VBA)
259 – कराड उत्तर (सातारा जिल्हा) (सातारा लोकसभा )
260 – कराड दक्षिण (सातारा जिल्हा) (सातारा लोकसभा ) -बाळकृष्ण देसाई - लोहार (VBA)
261 – पाटण (सातारा जिल्हा) (सातारा लोकसभा ) अरुण परशुराम वीर (VBA)
262 – सातारा (सातारा जिल्हा) (सातारा लोकसभा )
263 – दापोली (रत्नागिरी जिल्हा) (रायगड लोकसभा ) अनिरुध्द सूर्यभान जाधव (VBA)
264 – गुहागर (रत्नागिरी जिल्हा) (रायगड लोकसभा ) विकास यशवंत जाधव (VBA)
265 – चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) (रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा )
266 – रत्नागिरी (रत्नागिरी जिल्हा) (रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा ) दामोदर शिवराम कांबळे (VBA)
267 – राजापूर(रत्नागिरी जिल्हा) (रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा ) पाकिजा असलं खान (VBA)
268 – कणकवली (रत्नागिरी जिल्हा) (रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा ) मनाली संदीप वंजारे (VBA)
269 – कुडाळ (रत्नागिरी जिल्हा) (रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा )
270 – सावंतवाडी (रत्नागिरी जिल्हा) (रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा )
271 – चंदगड (कोल्हापूर जिल्हा) (कोल्हापूर लोकसभा ) गंगाधर वास्कोटी (VBA)
272 – राधानगरी (कोल्हापूर जिल्हा) (कोल्हापूर लोकसभा )
273 – कागल (कोल्हापूर जिल्हा) (कोल्हापूर लोकसभा )
274 – कोल्हापूर दक्षिण (कोल्हापूर जिल्हा) (कोल्हापूर लोकसभा )-बबनराव उर्फ दिलिप पांडुरंग कावडे - गोंधळी (VBA)- ऋतुराज पाटील (कॉंग्रेस)
275 – करवीर (कोल्हापूर जिल्हा) (कोल्हापूर लोकसभा ) - डॉ आनंद गुरव - गुरव (VBA) -पी.एन.पाटील सोदालीकार (कॉंग्रेस)
276 – कोल्हापूर उत्तर (कोल्हापूर जिल्हा) (कोल्हापूर लोकसभा )
277 – शाहुवाडी (कोल्हापूर जिल्हा) (हातकणगले लोकसभा )
278 – हातकणंगले (कोल्हापूर जिल्हा) (हातकणगले लोकसभा ) एस पी कांबळे (VBA)
279 – इचलकरंजी (कोल्हापूर जिल्हा) (हातकणगले लोकसभा ) प्रमोद आमले (VBA)
280 – शिरोळ (सांगली जिल्हा) (हातकणगले लोकसभा ) राजेंद्र एड्रावकर (VBA)
281 – मिरज (सांगली जिल्हा) (सांगली लोकसभा ) नानासो वाघमारे (VBA)
282 – सांगली (सांगली जिल्हा) (सांगली लोकसभा )
283 – इस्लामपूर (सांगली जिल्हा) (हातकणगले लोकसभा )-शाकीर तांबोळी - तांबोळी (VBA)
284 – शिराळा (सांगली जिल्हा) - सुरेश जाधव -रामोशी (VBA)
285 – पळूस खडेगाव (सांगली जिल्हा) (सांगली लोकसभा ) विश्वजित कदम (कॉंग्रेस)
286 – खानापूर (सांगली जिल्हा) (सांगली लोकसभा )
287 – तासगाव-कवठेमहाकाळ (सांगली जिल्हा) (सांगली लोकसभा ) प्रशांत शेजाळ (VBA)
288 – जत (सांगली जिल्हा) विक्रम सावंत (कॉंग्रेस) (सांगली लोकसभा ) अशोक शिवप्पा बन्नेनवार (VBA)
Subscribe to:
Posts (Atom)