Wednesday, September 25, 2019

हिंदू राष्ट्र संकल्पना पूर्ण करण्यासाठीच शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्ला…! राजेश खडके सकल मराठी समाज


       विषय असा आहे की,२०२५ ला आरएसएस या संघटनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत….आणि २०२४ ला समता सैनिक दलाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत.त्यामुळे समतां प्रस्थापित होऊ नये आणि आरएसएसच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेला बाधा येऊ नये हा मुख्य हेतू लक्षात ठेवूनच दिल्लीचा तक्त हलविणाऱ्या मराठी माणसाना संपविण्याचे कटकारस्थान सुरु आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.हिंदू राष्ट्र म्हणजे काय आणि हिंदू राष्ट्राचा कायदा मनुस्मृती काय आहे याची माहिती आणि आभ्यास जवळ जवळ सर्वांचाच झालेला आहे.त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी २०१४ ला आलेले EVM सरकार पुन्हा २०१९ ला EVM च्या जोरावर आलेले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेला समतेचा संरक्षक बोध्द बांधव उध्वस्त करण्याचा डाव जवळ जवळ यशस्वी होत आलेला आहे असे मला वाटत आहे.त्यामुळेच पुरोगामी विचार धारेवर कार्यरत असणाऱ्या संस्था मोठ्या खुबीने संपविण्याचे कार्य जोरात सुरु आहे.बोध्द बांधवा मध्ये आपापसात भांडण लावून त्यांच्यातील काही अतिशहाणे यांचा गैरवापर सुरु आहे हे समजण्या इतपत तरी आपल्याला आकलन झालेले आहे.२०२३ ला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या तयारीत इथले आरएसएस भाजप सरकार आहे.महाराष्ट्र राज्य ही समतेची भूमी आहे...आणि स्वतंत्र भारताला सर्व समाजवेषक आणि धर्मनिरपेक्ष असे संविधान देणारी भूमी आहे….दिल्लीचा तक्त हलविणारी भूमी आहे त्यामुळे या भूमीतील पुरोगामित्व संपविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सातारा गादीचे वंशज आणि कोल्हापूर गादीचे वंशज यांचेवर ताबा मारलेला आहे.त्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज यांच्यावरही ताबा मारण्याचा प्रयत्न सुरु आहे.आज रजपूत मराठा जरी भाजपाने आपल्याकडे ओढला असेल तरी इथला कुणबी मराठा आणि मावळा अद्याप तरी त्यांच्या हाताला लागलेला नाही याची आपण दखल घेतली पाहिजे….आणि तो मावळा असुरक्षित करण्यासाठी त्यांचे अधिष्ठान असणारे शरद पवार यांचेवर हल्ला करण्याचा कुटील डाव आरएसएस भाजपा वाल्यांनी आखला आहे.या पूर्वी प्रधानमंत्री यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपात प्रकाश आंबेडकर यांना गोवण्यासाठी यंत्रणेने त्यांना नक्षलवादी घोषित करण्याचे काम केले होते….परंतु त्यांचा तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.अशाच प्रकारे सध्याचे सरकार पुन्हा न येण्याची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे.मुख्यमंत्र्याची जनादेश यात्रा सपशेल फेल ठरलेली दिसत आहे.वयाच्या ८० व्या वर्षी शरद पवार रस्त्यावर उतरून इथला तरुण जागरूक करताना दिसत आहे.यामुळे पुन्हा EVM वर सरकार आणण्याची रणनीती फोल ठरत आहे.त्यातच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा फॉर्मोला यशस्वी होताना दिसत आहे परंतु तो यशस्वी होऊ नये यासाठी काही लोक त्यांच्या आघाडीत सनातनी विचार घेऊन शिरलेले दिसत आहेत.त्यामुळेच संघटना फुटीच्या मार्गावर आहे असे मला वाटते.जर या गोष्टी रोखल्या नाहीत तर EVM सरकार पुन्हा सत्तेवर येईल आणि हिंदू राष्ट्र संकल्पना यशस्वी करण्यासाठी विरोध करणारे यांना मोठ्या प्रमाणात तुरुंगात डांबण्याचे कार्य जोरात सुरु होईल हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मध्यंतरी एका मुलाखतीत प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की नवीन तुरुंग बांधण्याचे आदेश आलेले आहेत ते का आले आहेत याचा शोध पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन त्यानी त्या मुलाखती दरम्यान केले आहे.माझ्या सुरु असलेल्या समता प्रस्थापित करण्याचे कामात बाधा आणण्याचे काम काही लोक करीत आहेत...आणि हळू हळू आता ते माझ्या समोर येत आहे असो.शरद पवार यांना जर थांबविले नाही तर आपल्याला EVM सरकार आणता येणार नाही.त्यासाठी शिखर बँकेच्या घोटाळ्यात शरद पवार यांचे नाव नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कटकारस्थान शिजले आहे आणि त्यांना त्या गुन्ह्यात गोवण्यात आले हे आता स्पष्टपणे समोर दिसत आहे.अशा खोटारडेपणा विरोध्द एकनाथ खडसे,राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांनी आवाज उठविलेला आहे.त्यामुळे ईडीला सध्या तरी माघार घ्यावी लागलेली आहे.त्यामुळे मला असे वाटते आपण आता सावध भूमिका घेतली पाहिजे नाहीतर दळभद्री हिंदू राष्ट्र निर्माण होऊन पुन्हा एकदा आपण गुलामीकडे जाऊ….!

No comments:

Post a Comment