प्रश्न असा आहे की गोकुळ,महानंदा,कात्रज इत्यादी सहकारी दुध संस्थावर मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यामुळे कब्जा होतोय.असा कब्जा झाल्यास जो पशुपालक शेतकरी आहे.जो दुध उत्पादक शेतकरी आहे तो उध्वस्त होताना दिसत आहे.खरेच तो पशुपालक दुध उत्पादक व्यावसायिक उध्वस्त होतो काय...? हे या लेखात आपण समजून घेणार आहोत.
गेल्या दोन लेखात आपण मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर भांडवलदार कंपनी “कुळ” म्हणून दाखल होणार असल्याबाबत समजून घेतलेले आहे.त्यामुळे शेतकऱ्याची जमीन नंतरच्या काळात भांडवलदार कंपनीच्या घश्यात जाऊन तो शेतकरी त्या कंपनीचा “पोटार्थी” गुलाम होणार असल्याचे समजून घेतले.त्याच प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या सहकारी साखर कारखान्यावर देखील भांडवलदार कंपनीचा कब्जा होऊन त्यांच्या दीडशे ते दोनशे एकर जमिनीवर भांडवलदार कंपनीचा कब्जा होणार आहे.त्यामुळे त्याचे भाग भांडवलावर कंपनीचा कब्जा होणार आहे.
मोदी सरकारच्या या तीन कृषी कायद्यामुळे पशुपालक शेतकरी हा पशुपालक व्यावसायिक राहणार आहे काय..? तर नक्कीच नाही.कारण शेतकऱ्याच्या जमिनीवर जर भांडवलदार कंपनीचा ताबा झाल्यास त्या शेतकऱ्याची बैल जोडी उपयोगात राहणार नाही.त्यामुळे शेतकऱ्याचा गोठा देखील राहणार नाही.जेव्हा गोठाच राहणार नाही तेव्हा गोठ्यात दुध देणारी जनावरे सुध्दा राहणार नाही.कारण शेतकऱ्याच्या जमिनी जर भांडवलदार कंपनीच्या ताब्यात गेल्यास जनावरांना “वैरण” मिळणार नाही.त्यामुळे गोठा उध्वस्त झाल्यास त्याला दुध उत्पादन करण्यास मिळणार नाही.दुध उत्पादन न झाल्यास ज्या दुध उत्पादक शेतकऱ्यानी दुध संस्था उभ्या केल्या आहेत त्या संस्था उध्वस्त होऊन त्यावर भांडवलदार कंपनीचा कब्जा होणार आहे.
जनावरांचे गोठे उध्वस्त झाल्यास जनावर राहणार नाही त्यामुळे जनावरांचे बाजार इथून पुढे भरणार नाहीत.आणि येणाऱ्या काळात जनावरांचा बाजार आपल्याला पाहिला मिळणार नाही.म्हणजेच या तीन कृषी कायद्यामुळे “गाव संस्कृती” मधून उभे राहिलेल्या “जत्रा” आपल्याला पाहिला मिळणार नाही.जनावर राहिले नाही तर जनावरांचे दवाखाने बंद होणार आहेत.त्यामुळे जनावरांचा डॉक्टर पेशा सुध्दा बंद होणार आहे
शासनाने पशुपालन खाते तयार करून त्यावर “आयुक्त” नेमणूक करून राज्यात पशुपालन कार्यलय उभे केले.त्यातून मोठ्या प्रमाणात नोकर भरती करून रोजगार उपलब्ध केला गेला.आरक्षित समाजाला या कार्यलयात मोठ्या प्रमाणात जागा निर्माण झाल्या.इथला पशुपालक शेतकऱ्याच्या उद्योगाला मोठी चालना मिळाली.कृषी विद्यापीठ उभे राहिले.कृषी महाविद्यालय उभे राहिले.शेतकऱ्यांची पोर कृषी शिक्षण घेऊन आपला व आपल्या शेतीचा तसाच पशुपालन उद्योगाचा विकास करू लागले.त्यामुळे आपला देश व आपले राज्याची “आर्थिक व्यवस्था” मोठ्या प्रमाणात उभी राहण्यास मदत होऊ लागली.परंतु या तीन कृषी कायद्यामुळे हे सर्व तर उध्वस्त होणारच आहे.त्यामुळे इथला पशुपालक व्यावसायिक म्हणतोय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब मला वाचवा...मी उध्वस्त होत आहे.
वतन बचाओ आंदोलन संघटनेने या सर्व घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे की यां तीन कृषी कायद्यामुळे इथली “गाव संस्कृती” उध्वस्त होणार आहे.इथला पशुपालन व्यावसायिक उध्वस्त झाल्यास सहकारी दुध संस्था उध्वस्त होणार आहे.पशुपालन आयुक्त कार्यालय उध्वस्त होणार आहे.त्यामुळे इथल्या सरकारी नोकऱ्या संपणार आहेत.सरकारी नोकऱ्या संपल्यास इथले आरक्षण देखील संपणार आहे.त्यामुळे कृषी विद्यापीठ व कृषी महाविद्यालय देखील बंद होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची पोर आपल्याला कृषी शिक्षण घेताना दिसणार नाहीत.भांडवलशाही मजबूत होऊन इथली लोकशाही उध्वस्त होणार आहे.या संदर्भात आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी संघर्ष उभा केलेला आहे.आपण त्या संघर्षात त्यांचे सोबत उभे राहुयात.(क्रमशJ