राष्ट्रीय
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सन 2013-2014 अंतर्गत दिनांक 24 फेब्रुवारी 2013
या दिवशी 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीची एक-एक मात्रा
दिली जाणार आहे.
लाभार्थीना 2 कि.मी. पेक्षा जास्त अंतर चालत जावे लागणार नाही याची दक्षता
घेऊन बुथची स्थापना करण्यात आली आहे.लसीकरणाच्या दिवशी सर्व बालकांना लस
मिळावी यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा, नाके, एस.टी. स्टॅन्ड, रेल्वे
स्थानके, विमानतळ, टोलनाके इत्यादी ठिकाणी ट्रान्सिट टीम कार्यरत राहणार
आहे. बांधकामाची ठिकाणे, रस्त्याची कामे, खाणकामगार, ऊसतोड कामगार,
वीटभट्टया, मंदिरे, बगीचे, फुटपाथवरील लाभार्थी, तात्पुरत्या व फिरत्या
वसाहती, फिरते प्रसूतीगृह व खाजगे दवाखाने, तुरळक वाड्या वस्त्या इ.
ठिकाणच्या बालकांच्या लसीकरणासाठी मोबाईल टीम स्थापन करण्यात आल्या आहेत.
दि. 19 जानेवारी 2008 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची नोंदणी आरोग्य
कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी इ. व्दारा लाभार्थीची नोंदणी करण्यात येत आहे.
नोंदणी केलेल्या बालकांना बुथवर येणे सोयीचे व्हावे यासाठी बुथचे ठिकाण व
लसीकरणाचा दिनांक असलेली स्लिप वाटण्यात आली आहे. 100 पर्यंत लाभार्थी
असलेल्या केंद्रावर दोन व 100ते 250 लाभार्थी असलेल्या केंद्रावर तीन
याप्रमाणे प्रत्येक बुथवर लसपाजक, लेखनिक व केंद्रप्रमुख अशा स्वयंसेवकांची
नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय अधिकारी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक
यांचे प्रशिक्षण दि. 13 डिसेंबर 2012 रोजी पूर्ण करण्यात आले आहे.जिल्हा,
तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरीय पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण दि. 7
जानेवारी 2013 रोजी घेण्यात आले आहे. बुथ कर्मचारी व पर्यवेक्षकांचे
प्रशिक्षण 29 ते 31 डिसेंबर 2012 या कालावधीमध्ये प्राथमिक आरोग्य
केंद्रस्तरावर पूर्ण करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय
पर्यवेक्षक यांचे पुन:प्रशिक्षण दिनांक 14 व 15 जानेवारी 2013 रोजी पूर्ण
करण्यात आले आहे.
प्रत्येक बुथच्या कार्यक्षेत्रामध्ये पोलिओ विषयक म्हणी लिहिण्यात आल्या
आहेत. प्रा.आ.केंद्र, उपकेंद्र, लसीकरण केंद्र, मोक्याच्या ठिकाणी बुथचे
ठिकाण व दिनांक असलेले बॅनर, पोस्टर्स लावण्यात आले आहेत. लसीकरणाची तारीख,
ठिकाण व महत्व इत्यादी विषयी लाऊड स्पीकरव्दारे प्रसिध्दी लसीकरणाच्या
अगोदर 3 दिवस करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत, शाळा
इत्यादीच्या वार्ताफलकांवर लसीकरणाच्या तारखा व ठिकाण लिहून आवाहन करण्यात
येत आहे. जिल्हास्तरावर व गावस्तरावर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
सन 1995-96 पासून सर्व विभागांच्या सहकार्याने सांगली जिल्ह्यामध्ये 100
टक्के पोलिओ लसीकरण झाले आहे. देवी या रोगाचे उच्चाटन केलेले आहेच. पोलिओ
या रोगाचे निर्मूलनही सर्वांच्या सहकार्याने निश्चित होईल. त्या दिशेने
जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
No comments:
Post a Comment