Wednesday, December 27, 2017

समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचे कटकारस्थापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल संपविण्याच्या कटकारस्थानापर्यंत....!

                                               


विषय असा आहे की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना २४ सप्टेंबर १९२४ मध्ये केली.त्यांनी हा दिवस का निवडला,त्याची पाठीमागची कारणे काय....? याचा जर आपण विचार केला तर आपल्याला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही....कारण तो तुमच्या आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे.यादिवशी छत्रपती संभाजी  महाराज यांचे सांगण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी ब्राह्मणी राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत करून समतापर्वाची सुरुवात करून समतावादी स्वराज्य निर्माण केले होते.सनातनी वैदिक धर्मावरिल हल्ला पेशव्यांचा पूर्वजांना आवडला नाही....ते घाबरून गेले जर समता प्रस्थापित झाली तर आपला धर्म राहणार नाही याची त्यांना जाणीव झाली होती.सनातनी ब्राह्मणी व्यावस्था ही षड्यंत्रकारी घातक अशी व्यावस्था आहे.भारतात आल्यापासून त्यांनी या समतावादी भारतावर आपले वर्चस्व गाजविण्यासाठी गौतम बुद्धांना  तसेच संतांनाही या व्यवस्थेने सोडले नाही.तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना काय सोडणार होते काय.....? तर नाही त्यांना संधी मिळताच त्यांनी रायगडावर संभाजीराजे नसताना आणि स्वराज्याचे मराठा सरदार आणि मराठी सरदार नसताना मिर्झा राज्याची औलाद रजपूत मराठ्यांना हाताशी धरून छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर विषप्रयोग करून त्यांची हत्या करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंत्यदर्शन रयतेला होऊ दिले नाहीच पण स्वत:च्या लाडक्या मुलाला म्हणजे संभाजीराज्यांना देखील शेवटचे दर्शन होऊ दिले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूची बातमी गुप्त ठेवण्यात आली....कोणतेही अंत्यसंस्कार न करता त्यांना दहाग्नी देण्यात आला.समता प्रस्थापित करण्यासाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांना स्वत:चे प्राण अर्पण करावे लागले.असे असताना त्यांनी नाकारलेला पहिला राज्याभिषेक आज स्वत:ला मराठा सरदार यांचे वंशज म्हणविणारे का साजरा करतात याचे कोडे आजपर्यंत मला उलघडलेले नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांची हत्या करून सनातनी वैदिक धर्म पंडित संभाजीराजांची हत्या करण्याकरिता तयारीने पन्हाळगडावर निघाले होते.त्यांना मराठा सरदार हंबीरराव मोहिते यांनी कराड येथे अटक करून त्यांनी संभाजीराजांच्या स्वाधीन केले.वडिलांचे हत्येकरी समोर उभे होते म्हणून लगेच त्यांनी त्यांना मारले नाही प्रथम त्यांना तुरुंगात टाकण्याचे आदेश संभाजीराजांनी दिले.संभाजीराजांनी स्वत:चा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत करून ते स्वत: समतावादी स्वराज्याचे छत्रपती झाले.त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराज यांची समाधी बांधून हत्या करणाऱ्यांची चार वर्ष सुनावणी चालविली आणि दोषी ठरल्यानंतर त्यांना हत्तीच्या पायी देऊन मृत्यूदंडाची शिक्षा देऊन ते समतावादी स्वराज्य रक्षक झाले.आता या समतावादी स्वराज्य रक्षकाची हत्या करण्याचा ब्राह्मणी व्यवस्थेचा प्रयत्न परंतु ही हत्या आपल्या विचारांना आणि आपल्या वैदिक धर्माला फायदेशीर व्हावी यासाठी त्यांनी तशी तयारी रजपूत मराठ्यांना हाताशी धरून केली होती....पूर्वीपासून मोगलांना मदत करणारे हे लोक होते.समतावादी स्वराज्य रक्षकाच्या हत्येचा करारनामा यांनी औरंगजेब याचे बरोबर केला होता.तुळापुर येथे हत्या करण्याचे ठरले होते....आता स्वराज्यात रजपूत मराठ्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात झाला होता.स्वराज्यची गुप्तहेर संघटना मोडीत निघालेली होती....आता स्वराज्याचे बुडावे आणि गद्दार छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजुबाजुला होते.चोहोबाजूने स्वराज्यावरील हल्ला रोखण्यात छत्रपती संभाजी महाराज व्यस्त होते.विरोधातील यंत्रणा जोरात कामाला लागली होती.हळू हळू मराठा सरदार आणि मराठी सरदार छत्रपती संभाजी महाराज यांचेपासून दूर ठेवण्याचे कटकारस्थान सुरु होते.
             छत्रपती संभाजी महाराज यांचे बरोबर अखेर स्वत:ला मराठा म्हणविणारे त्यांचे बरोबर विश्वासघात करतात.पेशवाई स्थापन करण्याचे ठिकाण वैदिक धर्म पंडितांनी निवडले होते आणि ते म्हणजे शहाजीराजे यांनी स्वराज्य संकल्पित केलेले ठिकाण “तुळापुर” होय.औरंगाजेबाचे अडीच हजार सैन्य घेऊन वैदिक धर्म पंडित आपले गुलाम असलेले रजपूत मराठा यांना वाटसरू म्हणून ज्याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आहेत त्याठिकाणी म्हणजे संगमेश्वर येथील त्यांची सासरवाडी असलेले गाव शृंगारपूर येथे घेऊन जातात.अचानक अडीच हजार सेना असलेली फौज त्याठिकाणी येथे आणि अचानक छत्रपती संभाजी महाराज यांना जेरबंद करते.असा प्रकार आजूबाजूला विश्वासघातकी असल्याशिवाय घडू शकत नाही.त्याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज वध करून स्वराज्य आपल्या ताब्यात औरंगाजेबाची फौज घेऊ शकत होती.परंतु वैदिक धर्म पंडितांनी पेशवाईच्या मुहुर्तमेढाचे ठिकाण ठरविले होते.स्वराज्यातून मिरवीत संभाजीराज्यांना घेऊन जाण्याचा बेत त्यांनी पूर्वनियोजित कटकारस्थान करून शिजविला होता.समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर बनविण्याचे कटकारस्थान त्यांना करायचे होते.....त्यामुळेच संताजी घोरपडे संभाजीराजांना फितूर झाला होता.छत्रपती संभाजी महाराज यांची धिंड मिरवणूक स्वराज्यातून सुरु झाली होती.....स्वराज्यातून ३८ दिवसात ७०० कि.मी.चा प्रवास करून छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य संकल्पित ठिकाण “तुळापुर” येथे आणण्यात आले.वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबा बरोबर करार केल्याप्रमाणे मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्याचे ठरले होते.परंतु मनुस्मृती प्रमाणे असलेल्या शिक्षेचे ज्ञान त्या औरंगाजेबास नव्हते.आता छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षेचा अमल सुरु झाला...त्यांची जीभा छाटण्यात आली,त्यांच्या कानात शिसे ओतण्यात आले,त्यांचे डोळे फोडण्यात आले,त्यांची चामडी शरिरापासून छिलण्यात आली,त्यांचे हातपाय छाटण्यात आले,त्यांचे शरीर कलम करण्यात आले.....आणि त्यांचे तुकडे तुकडे करून ते वढू गावात फेकण्यात आले,आणि अशी आरोळी देण्यात आली की, छत्रपती संभाजी महाराज यांना जो कोणी अंत्यसंस्कार करीन त्याचे शीर कलम केले जाईल.ही बाब वढू येथील महार समाजाला कळाली.त्यांनी त्यांचे तुकडे गोळा करून ते शिवून त्यांचेवर ६२ लोकांनी मिळून अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यानंतर त्या पंचक्रोशीतील ४० ब्राह्मणांची घरे जाळण्यात आली. ही बाब जेव्हा वैदिक धर्म पंडितांना कळाली तेव्हा त्यांनी त्यांचे शीर कलम केले....आणि त्यांच्या इतर नातेवाईकाना दिवसा घराबाहेर पडण्यास बंदी घातली.हे सर्व करण्यासाठी त्यांचे बरोबर रजपूत मराठा होता.हा राजकीय वध नव्हता हा समतेवर धर्म पंडितांचा हल्ला होता.अशा शिक्षेची अपेक्षा औरंगाजेबास नव्हती तो राजकीय हेतूने आलेला होता.हे सर्व पाहून त्याने स्वराज्य ताब्यात घेण्याचा विचार सोडून दिला.असल्या धर्म पंडिता बरोबर न राहण्याचा बेत करून तो औरंगाबाद येथे निघून गेला.त्यानंतर त्याने कधिही स्वराज्याकडे डोकुनही बघितले नाही.आता समतावादी स्वराज्यावर पेश्वाईचा ताबा निर्माण झाला होता...आता फक्त नामधारी छत्रपती राहिले होते.पहिले शाहू महाराज गेले,दुसरे शाहू महाराज गेले,आता तिसरे शाहू महाराज आले होते.त्यांचेकडे विचित्रगड भोरचा मराठी सरदार म्हणून सिध्द्नाक महार होता.छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येच्या कटकारस्थानाची माहिती स्वराज्याला पूर्ण समजली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांचे समतावादी स्वराज्य फक्त १६ वर्षाचेच होते.मात्र पेशवाईचे राज्य हे १३८ वर्षांचे होते....असे का ? असा प्रश्न मलाही पडलेला होता आणि त्याचे उत्तर मला मिळालेले आहे....आणि ते उत्तर म्हणजे वैदिक धर्म पंडिता बरोबर असलेला रजपूत मराठा होय.या रजपूत मराठ्यांनी वैदिक धर्म पंडितांच्या गुलामी शिवाय स्वराज्यात दुसरे कोणतेही  कार्य केलेले नाही.नेहमी हा रजपूत मराठा स्वराज्याचा विरोधक राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे प्रामणिक मराठा सरदार आणि मराठी सरदार यांचे केलेले कार्य निपटून टाकण्यासाठी या वैदिक धर्म पंडितांनी त्यांच्या पेशवाईच्या माध्यमातून अष्टविनायक या गणपती मंदिराची स्थापना करून जातीयवादाची पेरणी त्यानी प्रथम स्वराज्यात केली होती.आज सगळे लोकजन या अष्टविनायक मोदक खाणाऱ्या गणपती मंदिराचे उपासक झालेले आहेत.आता पेशव्यांनी स्वराज्याचे चलन (टांकसाळ) बंद करून स्वत:चे चलन (टांकसाळ) सुरु केले होते.याची बातमी तिसरे शाहू महाराज यांना कळाली होती....लागलीच त्यांनी सिद्धनाक महार या आपल्या प्रामाणिक सरदाराला बोलावून घेतले...आणि त्याला आदेश दिला की,ज्या वैदिक धर्म पंडितांनी समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या करून समतावादी स्वराज्य संपवून जातीयता निर्माण केली.स्वराज्याची चलन (टांकसाळ) बंद करून स्वत:चे चलन (टांकसाळ) सुरु करून स्वराज्य संपविण्याचा प्रयत्न केला आहे आता अशी पेशवाई संपविण्याची वेळ आलेली आहे.वेळ आल्याशिवाय कोणतेच कार्य तडीस जाऊ शकत नाही यांची कल्पना आपल्या सर्वांनाच आहे.छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेले आदेश घेऊन सिद्धनाक महार पेशवाई संपविण्यासाठी निघाला.
          छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या आदेश प्रमाणे सिद्धनाक महार याने अडीचशे मराठी सरदार यांना वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळा जवळ प्रत्येकी शंभर ठोकाळ गडी घेऊन येण्यास संदर्भात लखोटे पाठविले.ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने शंभर शंभर ठोकाळ गडी घेऊन समाधी जमा झाले होते.....आता स्वराज्याची पंचवीस हजाराची फौज झाली होती.यांची खबर शनिवार वाड्यातील पेशव्याला लागली होती त्याने त्याचे गुलाम असलेले रजपूत मराठा यांना बरोबर घेऊन त्याने असे ठरविले की,सिद्धनाक महार याला संभाजीराजा प्रमाणे तेथेच शिक्षा करायची....त्यामुळे तो अठ्ठावीस हजारांची रजपूत मराठा फौज घेऊन वढू कडे निघाला.ब्रिटीश सेना नगरहून खडकीला युद्ध करण्यासाठी निघाली होती. सिद्धनाक महार आणि पेशवाईमध्ये युध्द होणार असल्याची खबर त्यांना मिळाली होती.ब्रिटीश सैन्यामध्ये ५०० महार सैनिक होते त्यांनी सिद्धनाक महार याच्या नेतृत्वाखाली पेशव्याच्या विरोधात लढणार असल्याचे ब्रिटीशाना सांगितले त्यांनी ते मान्य केले. सिद्धनाक महार याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला मानवंदना दिली आणि पेशवाई संपविण्याचा संकल्प करून शनिवार वाड्यावर हल्ला करण्यास निघाला.भीमा कोरेगाव येथे आल्यानंतर ब्रिटीश सैन्यातील ५०० महार सैनिक सिद्धनाक महार याला भेटून त्यानी त्यांचे विरुद्ध लढण्याची व्यक्त केलेल्या इच्छेला मान देऊन त्यांना सामील करून घेतले....आता सिद्धनाक महार याच्या नेतृत्वात लढण्यासाठी २५ हजार ५०० महार योध्दा झाले होते.तो पर्यंत पेशवा भीमा कोरेगाव याठिकाणी रजपूत मराठा यांची फौज घेऊन पोहचला होता....आता अठ्ठावीस हजार रजपूत मराठा विरुध्द पंचवीस हजार पाचशे असे महार योध्दा स्वराज्याचे भगवे निशाण घेऊन समोरा समोर ठाकले होते.दिनांक ३१ डिसेंबर १८१७ रोजी युध्द सुरु झाले होते.......हा म्हणता म्हणता एक एक रजपूत मराठा यांना महार योद्धे आडवे करीत चालले होते.छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येने माखलेली भीमा नदी रजपूत मराठ्यांच्या रक्ताने धुवून निघत होती.युध्दाचा दुसरा दिवस उजाडला होता....आता पहाट झाली होती दुसरा दिवस म्हणजे १ जानेवारी १८१८ चा दिवस उजाडला होता....तरिही युध्द सुरु होते.आपण युध्द हरणार आहोत याची पेशव्याला चाहूल लागताच त्याने रणभूमी सोडून सासवड कडे पळ काढला हे पाहून पेशव्याचे उरले सुरलेले रजपूत मराठा सैरावैरा पळू लागले जातीयवादी पेशवाई आणि मनुस्मृतीवर महार योद्ध्यांनी विजय मिळविला होता.समतावादी छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला सिद्ध्नाक महार या योद्ध्याच्या नेतृत्वाखाली महार योद्ध्यानी घेतला होता आणि त्याची तारीख १ जानेवारी १८१८ इतिहासात नोंद झाली.याची खबर शनिवार वाड्यावर असणाऱ्या पेशव्याचा पाहुणा नातू याला लागली होती.लागलीच त्याने शनिवार वाड्याला आग लावून तो जाळून टाकला.....आणि शनिवार वाड्यावर ब्रिटीश युनियन जॅक उभारून त्याने शरणागती पत्करली.स्वराज्याचा गद्दार पेशवा पळून गेला....तर त्याचा पाहुणा ब्रिटीश सरकारला शरणागत झाला.त्यामुळे बिटीशांनी त्याला पेन्शन सुरु केली आजही त्या नातुचे वंशज ती पेन्शन खात आहेत.कमरेला तलवार आणि पाठीला ढाल लावून असणारा महार योद्ध्याला स्वराज्यात खूप मोठा मान प्राप्त होता.....त्यात त्याने समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेऊन आणखी मान मिळविला होता.....त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आमच्या बाप जाद्यानी पूर्वीपासून शिपाईगिरीच केली आहे.
            १ जानेवारी १८१८ चे हरलेले युध्द वैदिक धर्म पंडितांच्या मनाला लागले हळू हळू त्यानी समाजात अस्पृश्या बद्दल आणखी घृणा निर्माण करण्याचे कटकारस्थान जोरात सुरु केले.धार्मिक पायंडा रुजविण्याचे कार्याला गती मिळाली यासाठी पेशव्याने उभे केलेले अष्टविनायक मंदिरा मधील मोदक खाणारा गणपती सर्वसामान्य लोकांच्या घरात कसा कास जाईल याचे शकली ते लढवू लागले.परंतु वैदिक धर्म हा फक्त ब्राह्मण समाजाचा धर्म होता इतरांना त्या धर्मात स्थान नव्हते.....समतावादी रयतेला धार्मिकतेची बंधने पुन्हा घालणे गरजेचे होती.परंतु त्याकाळी शिवलिंग मंदिराकडे रयतेचा लगाव होता.त्यांनी नवीन साहित्य निर्माण करण्याचे ठरविले त्यानुसार प्रथम त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश याचा प्रचार आणि प्रसार जोरात सुरु केला.राम आणि कृष्ण याचा तर प्रचार आणि प्रसार यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येपासून केला होता.संभाजीराजांचे शीर भाल्यावर लावून नवीन मराठी वर्षाच्या निमित्ताने राम आयोध्यात आल्याचे कारण रयतेला सांगून गुढीपाढवा हा सण जोरात सुरु करण्यात आला.या सणाच्या रयतेच्या घरोघरी समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शीर गुढीच्या माध्यमातून उभे करण्यात आले.या गुढीच्या माध्यमातून कडू लिंबाचा पाला आणि गुळ सेवन करून दर वर्षी संभाजीराजांचा कडू घास काढान्यास रयतेला भाग पाडले.आता जर पेशवाईचा मोदक खाणारा गणपती जर उभा राहिला तर स्वराज्यातील समता संपवायला वेळ लागणार नाही याची त्यांना जाणीव झाली होती.परंतु स्वराज्याचा रक्षक असणारा महार योद्धा संपल्याशिवाय ब्राह्मण व्यावस्था उभी राहणार नव्हती.....याची त्यांना जाणीव ब्राह्मणी व्यवस्थेला होती. महात्मा ज्योतिबा फुले या समतेच्या रक्षकाचा दिनांक ११ एप्रिल १८२७ मध्ये जन्म झाला.यांनी  रयतेपासून लपविले गेलेले समतावादी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची  समाधी साल १८६९ मध्ये रायगडावर जाऊन शोधली.आणि त्यांची पहिली जयंती १९ फेब्रुवारी १८६९ मध्ये साजरी करून त्यांचे दबलेले समतावादी विचार रयते समोर आणले.याचा सनातनी वैदिक धर्म पंडितांना खूप राग आला.आणि त्यांनी रजपूत मराठा यांना फुलेना त्रास कटकारस्थान रचले. त्यांच्या हत्येचा प्रयत्नही भरपूर वेळा केला गेला.त्यानी लोकांना समतावादी जीवन जगता यावे म्हणून महात्मा जोतीबा फुले यांनी २४ सप्टेंबर या समतावादी स्वराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सत्यशोधक धर्माची २४ सप्टेंबर १८७४ मध्ये स्थापना करून रयतेच्या हातात भगवे निशाण देऊन नवीन समतावादी पर्व सुरु केले.परंतु याला कॉर्न्ट्रर करण्यासाठी वैदिक धर्म पंडितांनी गुजरात मधील टंकारा गावात स्वामी दयानंद सरस्वती यांचे आश्रमात १८७५ मध्ये आर्य सनातनी हिंदू धर्माची स्थापना केली.बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी  समतावादी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मवादी आणि जातीयवादी ठरविण्यासाठी हा हिंदू धर्म प्रस्थापित करण्यासाठी साल १८८४ मध्ये पहिल्या हिंदू महासभेचे आयोजन केले होते.पेशवाईचा गणपती मोदक खातो असे दाखवून सोजवळ असे गणपतीचे चित्र निर्माण करून त्याचा बाळकृष्ण गंगाधर टिळकांनी साल १९९५ मध्ये सार्वजनिक गणपती उत्सव सुरु केला.भगवे निशाण या उत्सवाचे प्रतिक करून त्यांना हिंदू धर्माचे दाखविण्यासाठी पहिली हिंदू मुस्लीम दंगल घडविण्यात आली.या दंगलीत जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा निर्माण करण्यात आल्या.परंतु हे सर्व करण्यासाठी त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जिवंत असताना करता येऊ शकत नव्हते.हे सर्व त्यानी महात्मा ज्योतिबा फुले यांचा २८ नोव्हेंबर १८९० मध्ये निधन झाल्यानंतर केले आहे येथे ही नोंद महत्वाची आहे.याच बरोबर महार योध्दा संपविणे गरजेचे होते....म्हणून टिळकांच्या माध्यामतून ब्रिटीश सरकारवर दबाव निर्माण करण्यात आला की,महार योद्ध्यांची कमरेची तलवार आणि पाटीवरील ढाल काढण्यात यावी....महार योद्ध्यांची जो पर्यंत ढाल तलवार जात नाही तो पर्यंत त्यांची जमीनदारी आणि वतनदारी जाऊ शकत नव्हती.....कारण स्वराज्यातील जमिनीचे बहुतांश क्षेत्र महार समाजाकडे होते.तेव्हा इंग्रजांच्या माध्यमातून या ब्राह्मणी व्यावस्थेने जमिनी काढण्याचे ठरविले.इंग्रजांनी त्यांच्या क्षेत्राचे मोजमाप करून त्यांची १००% जमिनी काढून घेऊन त्यांना इनाम म्हणून जगण्यासाठी १२.५% जमिनीचे क्षेत्र परतावा म्हणून दिले.तरीही महार समाजाकडे वतन म्हणून २०० आणि ३०० एकर जमिनी शिल्लक राहिल्या. महार योद्ध्यांच्या कमरेचे तलवार आणि पाटीची ढाल अशा पद्धतीने ब्राह्मणी व्यावस्थेने काढून घेऊन त्यांना निशस्त्र केले....ते साल १८८४ चे होते.पहिल्या हिंदू महासभेचे सालही १८८४ चे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.दलितांच्या उध्दारासाठी सत्यशोधक धर्माची स्थापन करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेले समतावादी स्वराज्याचे भगवे निशाण याचेवर मोदक खाणाऱ्या गणपतीचे अस्तित्व बाळकृष्ण गंगाधर टिळकांनी निर्माण केले आहे.१८८४ ला गावकामगार कुळकर्णी ब्राह्मण होते त्यात त्यांनी एक खोड करून ठेवली ती म्हणजे इनाम वाटत असताना महाराना गावातील साच्छ्तेची कामे करण्याची अट घातली.घानरेडी कामे करण्याच्या बदल्यात महाराना इनाम जमीन देण्यात आली आहे असे भासविले.आणि ज्या दिवशी इनाम जमिनी दिल्या त्याच दिवशी महाराना १००% दलित केले या कारभाराची बक्षीस म्हणून  टिळकांनी सिंहगडाची जमीन देण्यात आली.

Wednesday, December 13, 2017

समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला .. १ जानेवारी १८१८ भीमा कोरेगाव



शहाजीराजे यांनी १६१६-१७ मध्ये पुणे (निजबत मुंजेरी) येथील हाडकीच्या (महार समाजाच्या) जागेत लाल महाल बांधला.”नागरवास” गावात हत्तीच्या वजना एवढी तुळा करून तेवढ्या वजनाचे सोने चांदी धन धान्य गोरगरीब रयतेला देऊन स्वराज्याची संकल्पना निर्माण केली. तुळा केले वरून ”नागरवास” गावचे नाव “तुळापुर” पडले.१९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी येथे शिवरायांचा जन्म झाला.शहाजीराजे यांचे सहकारी नेताजी पालकर - वीर बाजी पासलकर – शेलारमामा यांचेकडून शिवरायांना युध्द कलेचे शिक्षण मिळाले.आता संकल्पित स्वराज्य अस्तित्वात आणण्याची वेळ आली होती.“प्रचंडगड” याचे रायनक परवारी महार राजे शहाजीराजे यांचे सहकारी होते.शहाजीराजे यांच्या संकल्पित स्वराज्यासाठी “प्रचंडगड” शहाजीराजे यांचेकडे स्वाधिन करण्याचे रायनक परवारी यांचे “वचन” होते.आता संकल्पित स्वराज्य स्थापन करण्याची वेळ आली होती.शहाजीराजे यांनी गौतम बुद्धांचा भगवा विचार आणि सम्राट अशोक यांच्या समतावादी लोकशाही लोकहितवादी राज्याचे भगवे निशाण शिवरायांच्या हातामध्ये देऊन माता जिजाऊ यांचे सोबत नेताजी पालकर - वीर बाजी पासलकर – शेलारमामा यांना शिवगंगा खोऱ्यामध्ये रायनाक परवारी यांचे नावे लखोटा देऊन पाठविले.वीर बाजी पासलकर यांचा मांग दरीतील सहकारी यल्या मांगाला बरोबर घेऊन रायनाक परवारी यांचेकडे लखोटा सोपवून  “प्रचंडगड” स्वराज्याच्या स्वाधिन करून यल्या मांगाच्या हातून स्वराज्याचे पहिले तोरण म्हणून प्रचंडगडावर पहिले भगवे निशाण उभारले....आणि त्याचे पुढे नामकरण झाले ते “तोरणगड” या तोरणागडाचा म्हणजे स्वराज्याचा पहिला गडकरी म्हणून शिवरायांनी यल्ल्या मांगाची निवड केली.शिवरायांच्या स्वराज्यात दोन सरदार कार्यरत होते एक होता तो “मराठी सरदार” म्हणजे अठरा पगड अलुतेदार आणि बारा बलुतेदार होय.त्यामध्ये सुरुवातीचे “मराठी सरदार” म्हणजे रायनाक परवारी आणि यल्ल्या मांग आहेत.आणि दुसरा होता तो “मराठा सरदार” त्यामध्ये होते ते मराठा....! स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून वीर बाजी पासलकर यांची शिवरायांनी निवड केली.नेताजी पालकर – वीर बाजी पासलकर – हैबतराव शिळीमकर हे स्वराज्याचे पहिले “मराठी सरदार” होय.शिवरायांनी काशीच्या गागा भट्टा कडून पहिला राज्यभिषेक करून घेतला.मात्र ब्राह्मण धर्माने त्यांना राजा मानण्यास नकार दिला होता.....कारण शिवराय हे “महार राजे” होते.संभाजी राजांच्या सांगण्यावरून शिवरायांनी पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्यभिषेक शाक्त धर्म पध्दतीत करून घेऊन समतावादी पर्व सुरु करून मनुस्मृतीने लादलेली सप्त बंदी मोडण्याची सुरुवात त्यानी केली.सनातनी धर्मावरील हल्ला वैदिक धर्म पंडितांना रुचणारा नव्हता त्यानी स्वत:चा सनातनी धर्म प्रस्थापित करण्यासाठी गौतम बुद्धांची हत्या करून एक लाख बौध्द भिकुंच्या कत्तली त्यांनी केल्या होत्या.वारकरी सांप्रदायाची स्थापना करणारे संताची हत्या त्यांनी केली होती ते गप्प बसणारे नव्हते.त्यांचेकडे त्यांचे गुलाम म्हणून स्वराज्याचे विरोधक राजपूत मराठा होता.त्यांना बरोबर घेऊन त्यांनी रायगडावर संभाजीराजे नसताना छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर विषप्रयोग केला त्यात त्यांची हत्या झाली.मराठा सरदार हंबीरराव मोहिते यांनी या मारेकऱ्याना अटक करून संभाजी महाराज यांचे समोर हजर केले.संभाजीराजे यांना त्यांना तुरुंगात टाकण्याचे आदेश केले....आणि संभाजीराजेनी त्यांचा राज्यभिषेक शाक्त धर्म पध्दतीत करून ते छत्रपती झाले.त्यानी शिवाजी महाराज यांच्या मारेकरी यांनी चार वर्ष सुनावणी चालवून दोषी ठरल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी मनुस्मृती लादलेले सप्त बंदी मोडून त्यानी समतावादी स्वराज्य विस्तार मोठ्या प्रमाणात वाढविला.सनातन्यांना याचा खूप राग आला होता त्यांना त्यांचा सनातनी धर्म पुन्हा धोक्यात आल्याची जाणीव झाली त्यानी रजपूत मराठा यांना बरोबर घेऊन संभाजीराजांची हत्या करण्याचे षड्यंत्र सुरु केले तीन वेळा संभाजीराजाना विषप्रयोग करण्याचा प्रयत्न सुरु केला....परंतु संभाजी महाराज त्यातून बचावले.मग त्यांनी शिवाजी महाराज यांनी उभी केलेली गुप्तचर यंत्रणा पोखरण्यास सुरु केले त्यामध्ये आपले गुलाम रजपूत मराठा घुसविण्याचे कटकारस्थान सुरु केले.स्वराज्याचे “मराठा सरदार” गुपचूप पध्दतीत संपविण्याचे कार्य जोरात सुरु झाले.त्यांना माहित होते की संभाजी महाराज संपले की स्वराज्य संपणार आहे आणि ते आपल्या ताब्यात येणार आहे.औरंगाजेबाचे स्वराज्य ताब्यात घेण्याचे खूप जूने स्वप्न होते.रजपूत मराठा आणि वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबास त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे लालच दिले.तेव्हा संभाजी महाराज यांना पकडून देण्याचे आश्वासन या लोकांनी दिले...त्याला ते मान्य झाले.संगमेश्वर येथील शृंगारपुरात संभाजी महाराज गेले होते....त्यांचे बरोबर त्यांचे काही निवडक लोक बरोबर होते...त्यामध्ये संताजी घोरपडे होता.पूर्व नियोजित कटकारस्थाना नुसार संभाजी महाराज यांना औरंगाजेबाच्या अडीच हजार सैनिकांना धरून दिले....तेथून ठरल्याप्रमाणे संताजी घोरपडे पळून गेला.सनातनी यांनी ठरल्याप्रमाणे जेरबंद संभाजी महाराज यांना ७०० कि.मी चा प्रवास करीत ३८ दिवस धिंड काढीत स्वराज्य संकल्पित “तुळापुर” येथे आणले.औरंगाजेबास मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यास भाग पाडले....त्याच्याकडून आपल्या मनाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांची “तुळापुर” येथे हत्या करून स्वराज्य संपवून पेशवाईची मुहूर्तमेढ रोवली गेली.एका राजाची एवढी अमानुष हत्या आपल्याकडून करून घेतली त्याला त्याचा पश्चाताप झाला....स्वराज्य संपले होते.मनुवादी विचारांनी समतावादी संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या माध्यमातून धर्मवीर बनविण्यात आले.स्वराज्याच्या दोन गाद्य निर्माण करण्यात आल्या.एक गाडी सातारा येथे तर दुसरी गादी कोल्हापूर येथे हलविण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांची संभाजी महाराज यांनी बांधलेली समाधी दुर्लक्षित करण्यात आली.लाल महालावर ताबा मारून त्याचा शनिवार वाडा करण्यात आला.शनिवार वाड्यातून स्वराज्याची सूत्रे हळू लागली स्वराज्याचे “मराठा सरदार” यांना भूलविण्यात आले.स्वराज्य चालवीत असल्याचा भ्रम निर्माण करण्यात आला. “मराठा सरदार” सरदार संपविण्यासाठी पेशवाईकडून सूत्रे हलविण्यात येऊ लागली.संभाजी महाराज यांची हत्या औरंगजेबाने स्वराज्य म्हणून केली असे बिंबविण्यात आले....आणि पानिपतचे युध्द घडवून स्वराज्यातील एक लाख घरामध्ये बांगड्या फोडण्यास भाग पाडले.....आता “मराठा सरदार” संपला होता.पेशवाईने “मराठी सरदार” संपविण्यासाठी पराकोटीचा जातीवाद निर्माण केला.सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज यांचेकडे भोरचे “मराठी सरदार” म्हणून सिद्धनाक महार होते.आता पेशवा “रजपूत मराठा” यांचे माध्यमातून राजा झाला होता....त्याने स्वराज्याचे टाकसाळ (चलन) बंद करून स्वत:ची टाकसाळ (चलन) निर्माण केली होती.पेशव्याची स्वराज्याची गद्दारी आता पुढे आली होती.छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येची खरी उकल स्वराज्याला झाली होती....ते समतावादी विचारांचे होते आणि त्यांनी सप्तबंदी मोडून मनुस्मृतीला विरोध केला होता....म्हणून औरंगजेबाच्या माध्यमातून मनुस्मृती प्रमाणे त्यांना शिक्षा देऊन हत्या केल्याची माहिती शाहू महाराजांना आणि “मराठी सरदार” यांना झाली होती.शाहू महाराजांनी सिद्धनाक महार या मराठी सरदाराला बोलावून घेतले होते.....आणि त्याला आदेश केले की,आता संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेण्याची वेळ आली आहे.पराकोटीचा जातीवाद निर्माण करणारा पेशवा संपविण्याची वेळ आली आहे.तेव्हा सिद्धनाक महार याने स्वराज्यातील अडीचशे इतर “मराठी सरदार” यांना प्रत्येकी १०० ठोकळ गडी भीमा कोरेगाव याठिकाणी घेऊन येण्यास सांगितले होते.नगर मधून ब्रिटीश फलटण खडकी येथे युध्द करायला निघाली होती.....त्यांना भीमा कोरेगाव येथील युध्दाची माहिती मिळाली होती.त्या फलटण मध्ये ५०० महार सैनिक होते त्यांनी भीमा कोरेगाव येथे आपल्या भाऊबंदा बरोबर पेशव्याच्या विरोधात लढण्याचे ठरविले.“मराठी सरदार” सिद्धनाक महार यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सामील झाले.आता मराठी सरदार यांच्या नेतृत्वाखाली २५ हजार ५०० सैनिक लढण्यास तयार झाले होते.पेशव्या बरीबर रजपूत मराठा होता....युध्द सुरु झाले मराठी सरदार समोर येणाऱ्या रजपूत मराठ्यांना आडवे करीत चालला होता.संभाजी राजांच्या हत्येने रक्ताने माखलेले भीमा नदी रजपूत मराठ्यांच्या रक्ताने धुवून निघत होती....आता लाल महाला वरील शनिवार वाड्याच्या माध्यमातून स्वराज्यावरील ताबा उठण्याची वेळ आली होती....अखेर पेशवा हरला आणि तो पळून गेला.याची खबर शनिवार वाड्यातील पेशव्याचा वंशज नातू याला कळाली त्याच्या लक्षात आले की,सिद्धनाक महार पुन्हा एकदा स्वराज्याचे भगवे निशाण शनिवार वाड्यावर उभारून लाल महालाचे अस्तित्व उभे करणार...! लागलीच त्याने लाल महाल जाळला....आणि ब्रिटीशांचा युनियन जॅक उभारून त्याने शरणागती पत्करली.शहाजीराजे संकल्पित स्वराज्य शिवराय स्थापित स्वराज्य समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या करून स्वराज्य संपवून उभी राहिलेली पेशवाई मराठी सरदार यांनी संपवून समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येच्या बदल्याची तारीख १ जानेवारी १८१८ इतिहासात नोंद केली.त्या ५०० महार सैनिकांचा इतिहास अमर रहावा यासाठी ब्रिटीश सरकारने भिमा कोरेगाव याठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ “विजयस्तंभ” उभारला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या विजयस्तंभाला भेट देऊन अभिवादन करून त्यांनी असे वकतव्य केली की जो इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाही.अशा पराकोटीचा जातीवाद असणारी आणि समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची ज्या मनुस्मृती प्रमाणे हत्या केली त्याच मनुस्मृतीचे दहन करून संविधानाच्या माध्यमातून स्वतंत्र भारताला संविधान देत असतांना संसदेतील भाषणात असा उल्लेख केला की,सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य लोकशाही लोकहितवादी होते म्हणून मला संविधान लिहिण्यास सहज शक्य झाले.तेव्हापसुन आपण आपल्या ऐतिहासिक महार योध्यांचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी भीमा कोरेगाव याठिकाणी जाऊन त्यांच्या शौर्याच्या “विजयस्तंभ’’ येथे अभिवादन करतो.
राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी समाज