या संपूर्ण महाराष्ट्राला लाखोंच्या मोर्चाने
काय दिले तर मी म्हणेन काही नाही.कारण आरक्षण हा खूप किचकट विषय आहे मराठा नावाची
जात कोठेही इतिहासात दिसत नाही.त्याचे अस्तित्व म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी
महाराजांची स्वराज्य सेना आणि या सेने मध्ये अठरा पगड जात आणि बारा बलुतेदार यांचे
शिवाय कोणी नाही.मराठा म्हणजे लढवय्या,मगरगट्टा ,मरहट्टा आणि ही सेना (वारकरी) तयार
करण्याचे कार्य केले ते संत तुकाराम महाराजांनी.....! त्यामुळे या मराठ्यांना या
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मानाचे स्थान आहे अशा मराठ्यांना पेशवाईकाळात वेगळे स्थान
देवून एक उच्च वर्णीय वर्ग म्हणून त्यांची एक नवीन ओळख निर्माण केली गेली आहे....आणि
पूर्वीपासून बामन वर्गाने हेच केले आहे.महार समाज पूर्वीपासून राज घराण्यातील होता
हे समजण्यासाठी देवगिरीचा राजा रामदेवराव जाधव याचा इतिहास समजून घ्यावा लागेल.....आणि
तो समजण्यासाठी श्रीकांत शेटे या लेखकाचे “वैदिक विरुध्द वारकरी” हे पुस्तक वाचावे
लागेल...आणि याचे इतिहासातील मग एकच उदाहरण देईन “तोरणागड” या किल्ल्याचे....! पूर्वी
तोरणागडाचे नाव “प्रचंडगड” असे होते.या गडाचा राजा हा महार राजा होता.शहाजी राजे
यांची स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज १६
वर्षाचे होते तेव्हा त्यांनी ती स्वराज्याची संकल्पना या राजा जवळ मांडली होती.त्या
महार राजाला त्यांचे स्वराज्य आवडले त्यांनी हा प्रचंडगड शिवरायांच्या ताब्यात देऊन
त्यांचा तो मावळा झाला....आणि शिवरायांनी या गडावर यल्ल्या मांगाच्या हातून स्वराज्याचे
पहिले तोरण चढविले आणि त्यांचे नामकरण तोरणगड असे झाले.नंतरच्या काळात शिवरायांनी राज्याभिषेक
करून घेतला तरी शुद्र म्हणून बामनांनी त्यांना राजा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला.तेव्हा
शिवरायांनी शाक्त धर्म पध्दतील २४ सप्टेंबर १६७४ मध्ये दुसरा राज्यभिषेक करून त्या
बामनांना विरोध केला म्हणून त्या बामनांनी छत्रपती शिवरायांचे अंत्यदर्शन रयतेला
होऊ दिले नाही.
नंतरच्या काळात त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन
छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्य चालविले.शिवरायांचा ज्या बामनांनी घात केला
त्यांना हत्तीच्या पायी देऊन यमसदनी धाडले.अशा बामनांनी छत्रपती संभाजी राजेना
औरंगजेबास पकडून देऊन त्यांना मनुवादी शिक्षा या बामनांनी औरंगजेबाच्या दिली.संभाजी
राजेंचे तुकडे कडून चोहो दिशेकडे फेकून देऊन त्यांचे शीर (मुंडके ) भाल्यावर
लटकवून त्याची मिरवणूक काढली आणि त्या घटनेचा आनंद साखर वाटली. छत्रपती संभाजी राजेंचा
अंत्यसंस्कार कोणी करायचा नाही अशी आरोळी दिली गेली होती.अशा धमक्यांना कोणतीही
भिक न घालता महार समाजाने आपल्या भाऊ बंधाचे म्हणजे आपल्या लाडक्या राजाचे
अंत्यसंस्कार केले अशी महार जात इतिहासात नोंद आहे.हे सर्व सत्य समजून घेण्यासाठी
लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी लिहिलेले “छत्रपती संभाजीराज्यांची संघर्षगाथा” (चित्रमय)
हे पुस्तक वाचावे लागेल.या पुस्तकात तर त्यांनी असे म्हटले आहे की,छत्रपती शिवाजी
महराजांचे निधन झाले नसून त्यांची या बामनांनी हत्या केली आहे.म्हणजे सांगायचे
तात्पर्य एवढेच आहे की,नेमका हा लाखोचा मोर्चा कोणाच्या विरोधात आणि कोणत्या
मागण्यासाठी होता.मुंबईत शेवटचा म्हणजे ५८ व्या मोर्चाचे नेतृत्व खासदार
संभाजीराजे यांनी कोणाच्या सांगण्यावरून केले हे सर्वानाच माहित आहे.तर याचे दुसरे
कारण म्हणजे या महार समाजाला आणि स्वराज्यासाठी लढा देणारे इतर जातींना टार्गेट
करण्यासाठी मराठा नावाचा अहंकार निर्माण करून बामना नंतर तुम्हीच श्रेष्ठ आहात अशी
भावना निर्माण करून स्वत:चे संरक्षण या बामनांनी करून घेतले आहे.याचे मी एकच
उदाहरण देईन ते म्हणजे नारायण राणे आणि त्यांचे कुटुंब आणि इतर तालेवार मराठा होय.
त्यामुळे महार समाजाला सोडून इतिहास कधीच
पूर्ण होऊ शकत नाही म्हणून डॉ बाबसाहेब आंबेडकर म्हणाले होते जो इतिहास वाचत नाही
तो इतिहास घडवू शकत नाही.त्यामुळे आपण लक्षात घेतले पाहिजे की,महार या देशाचा
इतिहास पुरुष आहे...आणि हा इतिहास पुरुष असल्यामुळे पूर्वीपासून बामनांचे षडयंत्र
कधीच पुरे होऊ देत नसल्यामुळे शेकडो एकरने जमिनी असलेला या महार समाजाला त्यांनी अस्पृश्य
म्हणून घोषित केले होते....आणि त्यांच्या परंपरा आपल्या ताब्यात घेऊन त्यामध्ये
मनुवाद घुसेडून त्यांनी इथली मानसिकता ताब्यात घेतली आहे...आणि त्याच मानसिकतेतून बहुजन
समाजावर अन्याय अत्याचार घडविण्याचे षडयंत्र पूर्वीपासून ते आजपर्यंत सुरूच ठेवली
आहे.छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील रयत असणारा बहुजन समाजाला मनुवादी विचाराच्या
माध्यमातून गुलाम बनलेला समाजाला यातून बाहेर काढण्याचे कार्य महात्मा फुले यांनी
सुरु करून खरा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या समोर मांडण्याचे कार्य केले
आणि शिवराय कसे शेतकऱ्यांचे कैवारी होते ते दाखवून दिले.शेतकरी समजून घेण्यासाठी
त्यांनी लिहिलेले “शेतकऱ्यांचे आसूड” ह्या पुस्तकाचे आवर्जून वाचन केले पाहिजे.अशा
महापुरुषाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरुचे स्थान दिले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजवेषक असे
कार्य केले आहे त्यांना जागतिक विद्वता म्हणून जगाने मान दिलेला आहे....आणि त्याचे
मी एकच उदाहरण देईन ते म्हणजे स्वतंत्र भारताला दिलेली राज्यघटना होय...! आणि या राज्यघटनेत
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला नागरी हक्क संरक्षण कायदा...! परंतु अडचण आपली
अशी आहे की,इथला भारतीय नागरिक त्या राज्यघटनेचे वाचन आणि आभ्यास करीत नाही.देशद्रोही
आणि समाजकंटक जे सांगतील तेच तो ऐकतो.त्यामुळे अशी ही संकोचित वृत्ती आपल्याला या
संपूर्ण बहुजन समाजात पाहायला मिळत आहे.त्याचे मी एकच उदाहरण देईल मराठवाडा संदर्भातील
सतरा वर्ष चाललेला नामांतराचा लढा होय.मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे नाव द्यावे अशी मागणी पुढे आली.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत भावना
असलेला समाज रस्त्यावर उतरला होता.हे पाहून मनुवादी विचारांनी आपला सडका मेंदू
बाहेर काढला आणि त्याकाळी संपूर्ण देशात दलितावर अमानुष अत्याचाराच्या घटना
घडल्या.याच काळात महार समाजाच्या शेकडो एकर जमिनी जे तालेवार मराठा गुपचूप गिळत
होते.,,,ते आता बिनधास्तपणे महार समाजाच्या आणि इतर दलित समाजाच्या जमिनीची लुट त्यांनी
जोरदार सुरु केली होती.दलितांचा आणि त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाचा प्रश्न
ऐरणीवर आलेला होता. सर्व दलितांना संरक्षण देण्याची चर्चा राजकीय गोठात मोठ्या
प्रमाणात सुरु झाली होती.आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी केंद्रीय स्तरावर विशेष
कायदा सन १९८९ मध्ये संमत करण्यात आला.या कायद्याला नाव देण्यात आले “दलित अन्याय
अत्याचार प्रतिबंध कायदा” म्हणजेच अॅट्रोसिटी अॅक्ट कायदा होय.या
कायद्यामध्ये ५९ जातींना सरक्षण देण्यात आलेले आहे.या कायद्याचा प्रचार आणि प्रसार
व्यवस्थितपणे न झाल्यामुळे अन्यायग्रस्त जाती पर्यंत आजही तो पोहचला नाही.सदरच्या
कायद्यानुसार दलितांच्या जमिनी बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात घेणे,बेकायदेशीर दस्त
तयार करणे,महसूल अभिलेखात बेकायदेशीर फेरफार करणे,अतिक्रमण करणे,दलित शेतकऱ्याला
दहशत करून कवडीमोल भावने त्याच्या जमिनी विकत घेणे,त्याच्या जमिनीवर अतिक्रमण करणे
अशा व्यक्तीवर सदर कलामा गुन्हा नोंद करण्याची तरतूद करून त्याला संरक्षण देण्यात
आले आहे.
महाराष्ट्रातील पश्चिम महराष्ट्रामध्ये
दलितांच्या हजारो एकरने जमिनी आहेत.त्यामध्ये एकट्या महार समाजाच्या
सगळ्यात जास्त जमिनी आहेत.त्या जमिनी येथील तालेवार मराठ्यांनी दहशत व राजकीय
ताकदीच्या बळावर महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून बळकाविलेल्या आहेत.त्या जमिनी
सोडवून घेण्यासाठी दलित समाज मोठ्या संख्येने बाहेर पडल्यामुळे अॅट्रोसिटी अॅक्ट
कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे इथली व्यावसायिक मंडळी आणि
राजकीय मंडळी तसेच तालेवार मराठा वैतागला असल्यामुळे त्यांनी या अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्याची
बदनामी करण्याचे षड्यंत्र आखले होते.यातूनच त्याने पोलोस प्रशासनाला हाताशी धरून
अन्यायग्रस्त दलित समाजावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र सुरु केले.तरीही
दलित समाज या षडयंत्राला बळी पडला नाही.त्यांनी कोणतीही माघार न घेता या तालेवार
मराठ्यांच्या विरोधात आपला लढा सुरूच ठेवला.
त्यातच कोपर्डी हत्याकांड प्रकरण घडले दुर्देवाने या घटनेत प्रथमच दलितांवर
आरोप झाला त्यांचेवर दोषारोप पत्र दाखल झाले आहे त्यांचे वकीलपत्र खोपडे नावाच्या
वकिलाने घेतले आहे.सदरच्या अमानुष घटनेचा सर्वच स्थरातून निषेध करण्यात आला आणि या
अमानुष घटनेचा जास्तीत जास्त प्रमाणात निषेध होणे गरजेचे होते व आहे.परंतु घटनेचे राजकीय
भांडवल पडद्यामागून पुढे आले ते म्हणजे दलितांना बदनाम करण्याचे येथूनच अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्याचा
विरोध सुरु झाला.पश्चिम महाराष्ट्रातील तालेवार मराठ्यांनी पडद्यामागून या
कायद्याच्या विरोधाला हवा देण्याचे काम सुरु केले संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चाची
तयारी सुरु झाले मराठा तरुणांना पुन्हा एकदा आरक्षणाचे गाजर दाखविण्यात येऊन तुम्हाला
शिक्षणात व नोकरीत कशी अडचण होते.याचे भूत तरुणांना व तरुणीना दाखविण्यात आले आणि
त्यांच्या तोडून अॅट्रोसिटी अॅक्ट कायदा किती भयानक
आहे असे त्यांचे तोंडून वदविण्यात आले.मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे पाहून अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्याचा
९०% गैरवापर होतो असे विधान सातारचे उदयनराजे भोसले यांनी केले...आणि मराठा
समाजाचे अधिष्टान असणारे त्यांची अस्मिता आणि नेतृत्व असणारे जाणता राजा अशी पदवी
मिळविणारे शरद पवारांनी अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्यामध्ये बदल
आवश्यक आहे असे वक्तव्य केले....आणि अॅट्रोसिटी अॅक्ट
कायद्याच्या विरोधात ५८ मोर्चे निघाले.
अशा या लाखोंच्या
मोर्चातून मराठा तरुणांना काय मिळाले तर काही नाही होय मात्र यातून एक घटना नक्की
घडली ती म्हणजे हा मराठा समाज ५९ जातीपासून दुरावला गेला आणि बहुजन समाजाचे
नेतृत्व गमावून बसला.मात्र यातून आणखी एक घटना घडली ती म्हणजे दलितांची जमीन बळकाविणारे
तालेवार मराठ्यांचे संरक्षण झाले म्हणून आजही पुणे जिल्ह्यात अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्या नुसारच्या ५१ हजार तक्रारी प्रलंबित आहेत.पोलीस अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्यानुसारच्या तक्रारी अर्ज आज स्विकारत
नाही.कोर्टाने केलेले आदेशाला पोलीस जुमानत नाहीत.महसूल विभाग दलितांच्या तक्रारी
गंभीर घेत नाही.
No comments:
Post a Comment