आतापर्यंत बरेच इतिहासकार आणि संशोधकांनी केलेले संशोधन पाहिले त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचली त्यातील जर कोणाचे कौतूक करावेसे वाटले तर लेखक चंद्रशेखर शिखरे यांचेच करावे असे मला एक विश्लेषक म्हणून वाटत आहे.त्याचे कारण असे आहे की,छत्रपती संभाजी महाराजांची हत्या कशी झाली यावर त्यांनी संशोधन करून छत्रपती संभाजीराजांची संघर्ष गाथा (चित्रमय) हे पुस्तक जिजाऊ प्रकाशन यांचे वतीने प्रकाशित केले आहे.त्यांच्या त्या लिखाणावरून स्वराज्यात तीन प्रकारचे “मराठा” आढळून येतात.एक जो छत्रपती शिवाजी महाराज यांचे बरोबर प्रामाणिक स्वराज्यात होता.तो मराठा “जगदंब”ला मानतो.....आणि शिवराय नेहमी “जगदंब”च म्हणायचे त्यांनी “भवानी” हा शब्द कधीही उच्चारला नाही......आणि दुसरा होता तो “रजपूत मराठा” याने कधीही शिवरायांना आपले मानले नाही....नेहमी त्यांच्या विरोधातील कारवाया मध्ये सहभागी असायचा आणि हा “रजपूत मराठा” वैदिक धर्म पंडितांचा मानसिक गुलाम होता व आहे....हा “भवानी”ला मानणारा समाज आहे.जी “भवानी” जिने छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षात दुष्टांत देऊन शत्रूचा नाश करण्यासाठी तलवार दिली असे वैदिक धर्म पंडितांचे म्हणणे आहे.त्यांच्या सांगण्यावरून सत्य मानणारा आणि ते जे सांगतील ते तो करणारा मराठा म्हणजे “रजपूत मराठा” होय.आणि हा रजपूत मराठा मरेपर्यंत बामनाना कधी सोडत नाही...ते वैदिक धर्म पंडितांना आपल्या जीवनाचा शिल्पकार मानीत असतात.वैदिक धर्म पंडितांनी याच “रजपूत मराठा” यांचे माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची हत्या करून.....त्यांचे अंत्यदर्शन रयतेला होऊ दिले नाही.याच “रजपूत मराठा” यांच्या हातून प्रामाणिक मराठा सरदार यांच्या हत्या घडविल्या.....जे सापडले त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी दिले.काहींचा कडेलोट केला तर काहीना सुळावर चढविले.अशा संभाजीराजांना या “रजपूत मराठा” सरदार यांनी वैदिक धर्म पंडिता बरोबर राहून औरंगजेबाच्या सरदाराकडून पकडून दिले.हेच “रजपूत मराठा” वैदिक धर्म पंडित यांचे बरोबर होता......म्हणून त्यांना संभाजीराजांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देता आली.त्यांना जो वाचवयाला जाणार त्यांचे शीर हेच “रजपूत मराठे” अलग करीत असे....वढू येथे संभाजीराजांना वाचविण्यासाठी पाच “मराठी सरदार” (धनगर) यांनी हल्ला केला असता,याच “रजपूत मराठा” यांनी त्यांचे शीर धडापासून अलग केले.
या “रजपूत मराठा” सरदार आणि वैदिक धर्म पंडितांना माहित होते की,संभाजीराजे संपले की,स्वराज्य वाचवायला कोणी राहणार नाही.....परंतु त्याला जर संपवायचे असेल तर स्वराज्य संपले पाहिजे.असा मनसुबा त्यांनी त्यांचे डोळ्या समोर ठेऊन पूर्वनियोजित कटकारस्थान केले होते.त्याप्रमाणे त्यानी छत्रपती संभाजी महाराज यांची ३८ दिवस धिंड काढून स्वराज्यात मोठी दहशत या “रजपूत मराठा” यांनी केली होती.अशा वैदिक धर्मीय “रजपूत मराठा” यांना न घाबरता छत्रपती संभाजी महाराज यांचे तुकडे गोळा करून ते शिवून त्यांचा अंत्यसंस्कार महार समाजाने केला होता.....त्यानंतर औरंगाजेब पश्चातापाच्या खाईत खोलवर रुतत गेला..आणि त्याने पुन्हा कधीही हल्ला स्वराज्यावर केला नाही....कारण आता स्वराज्य संपले होते.औरंगाजेबाला कधीही स्वराज्य जिंकता आले नाही....अखेर त्याने मृत्यूला कवटाळून घेतले.वैदिक धर्म पंडितांचे कटकारस्थान “रजपूत मराठा” यांनी पूर्ण केले.लाल महालावर ताबा मारून बसलेला पेशवा आता या “रजपूत मराठा” यांचा राजा झाला होता......आणि राहिले साहिलेले स्वराज्याचे मराठे या पेशव्याने संपविण्याचे कार्य सुरु केले....त्यामध्ये प्रमुख मराठा सरदार स्वराज्याचा पहिला सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या वंशजाना या पेशव्याने शिवगंगा खोऱ्यातील वतन काढून घेऊन त्यांना मोसे खोऱ्यात हाकलून दिले.स्वराज्याचे पहिले तोरण चढविणाऱ्या मांगदरीतील यल्ल्या मांगाच्या वंशजाना “रजपूत मराठा” बनवून त्यांना मांगडे केले.जीवा महाराला “महाले” करून महार समाजातील अस्तित्व संपविण्याचा घाट घातला.अशा बऱ्याच घटना घडविल्या गेल्या आहेत...यातील इतिहासातील महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे ज्या शहाजीराजे यांनी १६१६ मध्ये “निसबत मुंजेरी” म्हणजे पुण्यामध्ये लाल महाल बांधला....आणि “नागरवास” गावामध्ये हत्तीच्या वजनाची तुळा करून तेवढे वजना एवढे सोने चांदी धन धान्य गोरगरीब लोकामध्ये वाटून स्वराज्य संकल्पित करून त्या गावचे नाव “तुळापुर” असे नामकरण झाले.त्याच तुळापुर मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करून स्वराज्य संपविले.आणि दुसरी महत्वाची घटना म्हणजे शहाजीराजे यांचे संकल्पित स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले.स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केला....त्याचा सन्मान म्हणून त्याची कबर बांधून दिवाबत्तीची सोय केले.....आजपर्यंत ती दिवाबत्ती त्या प्रतापगड पायथ्याशी जळत आहे.मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेला अंत्यदर्शन नहोऊ दिले नाही....संभाजीराजांनी बांधलेली समाधी या वैदिक धर्म पंडितांच्या “रजपूत मराठा” यांनी उध्वस्त करून ती झाकून टाकून त्यांचा इतिहास बुजविला होता....कोणालही त्या समाधी जवळ जाण्याची मुभा नव्हती.हळू हळू छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे समतावादी स्वराज्य संपविण्यासाठी वीर “मराठी सरदार” महार समाजाला गावापासून दूर करण्याचे कटकारस्थान जोरात सुरु झाले....पराकोटीचा जातीवाद सुरु झाला.या वैदिक धर्म पंडितांनी “रजपूत मराठा” यांच्या माध्यमातून त्यांचेवर अन्याय अत्याचार जोरात सुरु केले.स्वत:चे या समाजावर अधिष्टान निर्माण करण्यासाठी गणपती नावाचा मोदक खाणारा गणपती याचे आठ मंदिर या पेशव्याने निर्माण केले होते.परंतु “मराठी सरदार” यांच्या मनात स्वराज्य खेळत होते.आता साताऱ्यातून स्वराज्याची धुरा सुरु होती....आणि पुण्यातून म्हणजे शनिवार वाड्यातून स्वराज्य धुरा संपविण्याचे कार्य सुरु होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी दुर्लक्षित झाली होती.परंतु छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या आजही “मराठी सरदार” यांच्या मनात सलसलत होती.भोरचे महार सरदार सिद्धनाक महार सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज यांचे ते “मराठी सरदार” होते.पेशव्याने स्वत:ची “टाकसाळ”(चलन) सुरु केली होती.याची खबर छत्रपती शाहू महाराज यांना झाली होती.त्यांनी सरदार सिद्धनाक महार यांना बोलावून घेतले होते....आणि त्यांना सांगितले की,आता पेशवाई संपवायची वेळ आहे....स्वराज्य बुडव्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे.पेशवाई संपवून ती स्वराज्यात जोडून घे. छत्रपती शाहू महाराज यांचे आदेशावरून सरदार सिद्धनाक महार याने स्वत:चे निवडक असे २५० (अडीचशे) लोकांना प्रत्येकी १०० ठोकळ गडी घेऊन भीमा कोरेगाव याठिकाणी येण्याचे सांगितले.याची खबर ब्रिटीश सरकारला झाली होती.....त्यानी पेशवाईवर चढाई करण्याचे ठरविले होते....तेही त्याठिकाणी आले.अडीचशे लोकांचे प्रत्येकी शंभर गडी म्हणजे पंचवीस हजार लोक सरदार सिद्धनाक महार घेऊन आला होता.त्या ब्रिटीश सैन्यामध्ये ५०० महार सैनिक होते.त्यांना आपले भाऊबंध स्वराज्याचा विरोधक पेशवा याचे विरोधात लढण्यासाठी आलेला पाहून तेही पेशव्याच्या विरोधात लढण्यासाठी सरदार सिद्धनाक महार याच्या नेतुत्वात सामील झाले. पेशवा “मराठी सरदार” यांच्या विरोधात लढण्यासाठी “रजपूत मराठा” यांना घेऊन भीमा कोरेगाव याठिकाणी आला होता.जेथे छत्रपती संभाजी महाराज यांची धिंड काढून हत्या करण्यात आली होती.तेव्हा उघड्या डोळ्यांनी संभाजीच्या हत्येचा खेळ हा “रजपूत मराठा” पाहत आनंद घेत होता आज पेशवाईला वाचविण्यासाठी हाच “रजपूत मराठा” लढण्यासाठी समोर आला होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्तेचा बदला घेण्याची वेळ आली होती.पंचवीस हजार पाचशे महार योद्धे पेशवाईच्या “रजपूत मराठा” सरदार यांचेवर तुटून पडली होती.हा हा म्हणत प्रत्येक महार योद्धा त्या “रजपूत मराठा” सरदारचे मुंडके शरीरापासून दूर करीत होती. छत्रपती संभाजी महारांच्या रक्ताने माखलेली नदी “रजपूत मराठा” सरदारांच्या रक्ताने धुवून निघत होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्तेचा घेतलेला बदला त्या वीर मराठी सरदार यांना आनंद देत होती...जस जसे या “रजपूत मराठा” सरदारांचे ध्येय आडवे होऊ लागले तसतसे स्वराज्याची माती सुखी होऊ लागली होती. भीमा कोरेगावची लढाई पेशवे हरल्याची बातमी शनिवार वाड्यावर धडकली ....आता स्वराज्याचा भगवा पुन्हा लाल महालावर चढविला जाणार होता.परंतु लाल महालाचा झालेला शनिवार वाडा सरदार सिद्धनाक महार या मराठी सरदारच्या हातात पेशव्याला द्यायचा नव्हता.....कारण तो पुन्हा लाल महाल झाला असता...! म्हणून शनिवार----याने जाळून टाकला आणि नातू याने ब्रिटीश जॅक शनिवार वाड्यावर चढवून तो ब्रिटीशांच्या ताब्यात देऊन पेशव्याने ब्रिटिशा समोर शरणागती पतकरली.छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या बदल्याची तारीख १ जानेवारी १८१८ इतिहासात नोंद झाली.
राजेश खडके समन्वयक -: सकल मराठी समाज
No comments:
Post a Comment