Tuesday, December 4, 2018

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त माझे दोन शब्द....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


मित्रानो आपणा सर्वांना जय भीम
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आहे.प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त कोटी कोटी प्रणा....! यांना प्रणाम करीत असताना मला छत्रपती शिवराय यांच्या महापरिनिर्वाण दिनाची आठवण झाली म्हणून मी ती तुम्हाला सांगू इच्छितो.रयत आणि समाज जसे नेतृत्व चालवत असते तसे ते चालत असते.त्या समजाचे नेतृत्व किंवा त्या रयतेचा राजा चांगला असेल तेथील प्रजा त्या राजाने किंवा त्या नेतृत्वाने दाखविलेल्या मार्गावर चालत असते फक्त त्यासाठी सहकारी चांगले असणे गरजेचे आहे.परंतु छत्रपती शिवराय यांच्या व्दितीय पत्नी महाराणी सोयरा बाई साहेब यांना स्वार्थ भावनेने पछाडलेले होते त्यांच्या मनात त्या भावना उत्पन्न करण्याचे कार्य छत्रपती शिवराय यांचे मंत्रीमंडळात असणारे वैदिक धर्म पंडितांनी केले असल्याचे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे.त्यामुळे एवढ्या मोठ्या राजाला अग्नी न मिळता भडाग्नी देण्यात आला होता.अशाच प्रकारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचीही हीच अवस्था झाली होती. छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर त्यांना त्यांचे पुत्र शाहू यांचेकडून अग्नी मिळाला नाही परंतु महार योध्यानी त्यांचेवर अंत्यसंस्कार केल्याचे जवळ जवळ आता समोर आले आहे.त्यामुळे हा एक बामणी कावा होता हे सिद्ध झाले आहे.
रयतेसाठी काम करणाऱ्या महापुरुषांचा नशिबी याच गोष्टी या बामणी व्यावस्थेने केल्या आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी अहोरात्र कष्ट करून संविधान दिले.आणि मानवी जीवनाचा उध्दार व्हावा म्हणून इथल्या भारतीयांना मानवी मुल्ये जपणारा विचार म्हणजे बौध्द धम्माची जान करून दिली.बौध्द धम्म काय आहे हा सोप्या भाषेत भारतीयांना कळावा म्हणून २२ प्रतिज्ञा त्यांनी तयार करून त्या मी म्हणून लाखो लोकांच्या समोर त्यांनी घेतल्या आहेत.त्याचे अनुकरण त्याकाळी त्यांच्या अनुयायांनी केले आहे.या बौध्द धम्माचे आचरण पद्धत आणि त्याचे अनुकरण कसे करायचे हे सांगायच्या आतच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छत्रपती शिवराय यांचे प्रमाणे महापरिनिर्वाण झाले.त्यांच्या मृत्यूचे कारण आजही त्यांच्या अनुयायी यांना अधिकृत कळाले नाही.त्याकाळी त्यांच्या मृत्यूचे कारण कळावे यासाठी मोठा संघर्ष पुढे उभा राहिला.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले असल्यामुळे त्यांची समाधी दिल्ली येथे होणे गरजेचे होते.कारण ते जागतिक कीर्तीचे नेते होते.परंतु तसे न होता त्यांना मुंबई येथे घेऊन जावे असे कोणी सांगितले यांचे स्प्ष्टीकरण होत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव देह दिल्लीहून मुंबईत कसे आणायचे असा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांना सोडवावा लागला आहे.मुंबईत त्यांचे पार्थिव देहावर अंत्यसंस्कार कुठे कारावे यासाठी संघर्ष करावा लागला आहे.शासनाने राष्टीय सन्मान करणे अपेक्षित होते पण तो झाला नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूला कारणीभूत इथला बामणी कावा होता हे आता जवळ जवळ सर्वश्रुत झाले आहे.परंतु त्यांनी दिलेला बौध्द धम्म की धर्म या मध्ये त्यांचे अनुयायी अडकले गेले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सोप्या भाषेत दिलेल्या २२ प्रतिज्ञा कोणी समजून घ्यायला तयार नाही.त्यांनी दिलेली समता प्रस्थापित करण्यासाठी कोणी पुढे यायला तयार नाही.त्यांनी दिलेले विचार जनमाणसात घेऊन जायला कोणी तयार नाहीत.जातीवादी शक्तीना आणि संविधान वाचवायला प्रत्यक्षपणे पुढे कोणी यायला तयार नाही.जो तो या सर्व गोष्टींचे राजकारण करू पहात आहे असे स्पष्टपणे जाणवत आहे.
असो या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एक संकल्प करूयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यात घेऊयात आणि मानव जातीच्या उद्धारासाठी एकत्र येऊयात...!

2 comments:

  1. जय शिवराय जयभीम
    वास्तवतावादी सत्य खडके सर

    ReplyDelete