Tuesday, February 26, 2019

कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जर खरेच खोटारडे मोदी नको आहेत...तर सोलापूरची जागा आंबेडकर यांना देऊन आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणावे…! राजेश खडके सकल मराठी समाज


रोज मिडीयावर आम्ही ऐकत आहे की,जातीवादी पक्षाला आणि खोटारड्या मोदीला दूर ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाला सोडून महाआघाडीत सामील व्हावे.परंतु प्रकाश आंबेडकर यायला तयार नाहीत त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा जातीवादी भाजप-सेनेला होत आहे.परंतु हे मत केवळ राजकारण करण्यासाठी आणि आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठीच कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडून पेरल्या जात आहेत असे आमच्या सकल मराठी समाजाचे मत आहे.प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस बरोबर युती करण्यासाठीचा प्रस्ताव एमआयएम पक्षाला बरोबर घेण्यापूर्व कॉंग्रेसला दिलेला होता हे सर्वांनाच माहित आहे.परंतु प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्रात काहीच ताकद नाही असे म्हणून त्यांच्या प्रस्तावाचा विचार कॉंग्रेसकडून करण्यात आलेला नव्हता. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी स्वराज्यातील अलुतेदार आणि बलुतेदार यांना बरोबर घेऊन एमआयएम पक्षाबरोबर वंचित बहुजन आघाडी स्थापन करून सभेचे आयोजन केले आणि संपूर्ण महाराष्ट्रात अहोरात्र फिरून वंचित घटकांना बरोबर घेऊन सभा यशस्वीपणे पार पाडल्या तेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीत यावे असे आवाहन केले आहे.परंतु सदरचा प्रस्ताव मान्य करण्याकरीता वंचित घटकांना सत्तेमध्ये घेण्याचे आणि संविधान अबाधित राहण्यासाठी आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याविषयीचा कार्यक्रम कॉंग्रेसने द्यावा असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसकडे ठेवला.परंतु सोलापूरच्या कार्यकर्त्यांचा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असा आग्रह धरला की,प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर मधून लोकसभेची निवडणूक लढवावी त्यांना विजयी करण्याची जबाबदारीही सोलापूरच्या कार्यकर्त्यानी घेतली आहे.त्यामुळे सोलापूरची जागा कॉंग्रेसने वंचित बहुजन आघाडीसाठी सोडावी अशी कॉंग्रेसकडे मागणी आहे.सोलापूर लोकसभेतून सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक लढवीत असतात त्यामुळे ती जागा देण्याची मानसिकता कॉंग्रेसची नाही.खरेच जर कॉंग्रेसला जातीयवादी पक्षाला बाहेर ठेवायचे आहे आणि खोटारड्या मोदीला सत्तेपासून दूर करायचे आहे तर त्यानी सोलापूरची जागा वंचित बहुजन आघाडीला देण्यास काहीच हरकत नाही.राष्ट्रवादीचे नेते म्हणतात आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी प्रस्तावाला आमचा पाठींबा आहे,परंतु कॉंग्रेस यासाठी तयार नसल्याचे वातावरण सर्वत्र दिसत आहे.जर कॉंग्रेसचा खरेच अजंठा धर्मनिरपेक्ष आहे असे जर ते मानीत आहेत तर महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यापासून ते का दूर जात आहे असा आमच्या सकल मराठी समाजाचा प्रश्न आहे.एकंदरीत पाहिले तर कॉंग्रेस महत्वाकांक्षा ठेऊन काम करीत आहे तर प्रकाश आंबेडकर वंचित घटकांसाठी आणि संविधान वाचविण्यासाठी काम करीत आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका ही योग्यच आहे.कॉंग्रेस जरी म्हणत असली की आम्ही वंचित बहुजन आघाडीला चार जागा द्यायला तयार आहोत त्यात काही अर्थ नाही कारण आजची परिस्थिती अशी आहे की,वंचित बहुजन आघाडी स्वबळावर जरी लढली त्यांच्या ३ ते ४ जागा जिंकून येण्याची परिस्थिती आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करतात या मताशी आमची सकल मराठी समाज बिलकुल सहमत नाही.मात्र आरएसएसवादी भाजपा आणि कॉंग्रेस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आम्ही मान्य करतो.आणि जर खरेच असे नसेल तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मोदीला बाहेर ठेवण्यासाठी सोलापूरची जागा आंबेडकर यांना देऊन आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणावे…!

Thursday, February 21, 2019

आरएसएस बरोबर दोन हात करण्याची तयारी असेल तरच आम्ही कॉंग्रेस बरोबर...अन्यथा नाही…! पुलवामा हल्ल्या संदर्भात मोदींनी देशाची माफी मागावी…! सकल मराठी समाज

पुलवामा हल्ल्या संदर्भात देशात एक मोठी सांशकता निर्माण झाली असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.जेव्हा देशाचा प्रधानमंत्री मला व्हायचे आहे अशी स्वप्न बघणाऱ्या नरेंद्र मोदीने देशाला सांगितले की,मी रेल्वेस्टेशनवर चहा विकत होतो.परंतु ज्या रेल्वे स्टेशनवर मोदी चहा विकत होते असे सांगतात तेव्हा ते रेल्वेस्टेशनच नव्हते असे मोदी बरोबर असणाऱ्या प्रवीण तोगडिया यांनी सांगितले आहे.नरेंद्र मोदी यांना भारताच्या इतिहासात प्रधानमंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी केलेले प्रत्येक निर्णय त्यांना घ्यायचे आहे त्यामुळे साडेचार वर्षात त्यानी युध्द सोडले तर जवळ जवळ सगळेच निर्णय घेतले आहे.पुलवामा हल्ल्या संदर्भात वापरण्यात आलेले साडे तीनशे किलोचे आरडीएक्स आले कोठून आणि भारतीय जवानांना घेऊन चाललेल्या वाहनाला धडकते कसे..? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी बुलढाणा येथे उपस्थित केला आहे.त्यानी नरेंद्र मोदी यांना स्पष्ट इशारा दिला आहे की,निवडूक जिंकण्यासाठी पाकिस्तान बरोबर युध्द करू नको.तू केलेल्या वाईट कृत्याबद्दल देशाची माफी माग मोठ्या मनाने देश तुला माफ करेन.परंतु मोदी हा आरएसएस\\ या संघटनेचा मोहरा आहे त्यामुळे त्याच्या हातात काही नाही आणि अशा प्रकारे जे बॉम्बस्फोट झाले आहेत जसे पुण्यातील जर्मन बेकरीतील स्फोट,मुंबई येथील डायमंड मर्चंट मधील स्फोटातील आरोपी सर्वांनाच माहित असल्यामुळे ते सापडलेले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे.प्रकाश आंबेडकर म्हणतात मला ही सत्ता वंचित घटकांच्या हातात आणायची आहे.परंतु इतिहासकाळापासून वंचितांना मुख्य प्रवाह बाहेर ठेवण्याचे जे षड्यंत्र चालत आलेले आहे ते षड्यंत्र मला मोडीत काढायचे आहे.आणि ते षड्यंत्र मोडीत काढण्यासाठी आरएसएस या संघटनेला संविधानाच्या चौकटीत आणले पाहिजे.मात्र त्यांना संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठीचा जो वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव कॉंग्रेस का मान्य करीत नाही असा माझा प्रश्न आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत.आरएसएसकडे कॉंग्रेसच्या काळात एके ४७ सारखी हत्यारे आलेली आहेत.त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की,जर या प्रस्तावाला कॉंग्रेस मान्य करीत नाहीत तर याचा अर्थ सरळ सरळ होतो की,या आरएसएसचे संगोपन कॉंग्रेसच करीत आहे.त्यामुळे आता देशात गंभीर प्रश्न या चर्चेने प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.त्यामुळे पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांनी जो लढा सुरु केला होता तोच लढा प्रकाश आंबेडकर यांनी सुरु केल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.गोव्या संदर्भात जेव्हा प्रश्न उपस्थित झाला होता तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन मार्ग सांगितलेले होते.त्यातील पहिला मार्ग असा होता की,गोवा विकत घ्या.नाहीतर लीजवर घ्या,नाहीतर सैन्य घुसवून संपवून टाका.याचप्रमाणे आजची परिस्थिती आपण हाताळू शकतो परंतु ही परिस्थिती तुम्ही हाताळण्यासाठी तयार आहात काय…? की याच मुद्द्यावर राजकारण करून भाजपा सरकारचे अपयश झाकून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी युध्द करायचे आहे…? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असल्याचे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.त्यामुळे एकंदरीत कॉंग्रेस संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो अतिशय गंभीर प्रश्न आहे त्यामुळे जो पर्यंत आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणले जात नाही तो पर्यंत देश सुखी होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे.


Monday, February 18, 2019

स्वराज्य ते संविधान म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे संविधान कोठे आहे…..? सकल मराठी समाज राजेश खडके


छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे…...प्रथम त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम…!
हा लेख लिहित असताना मनाला अत्यंत वेदना होत आहे...कारण छत्रपती शिवराय खरे आम्हाला समजले नाही किंवा आम्हाला समजू दिले गेले नाहीत.परंतु ज्या वेळेस मानव धर्म आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा आपल्याला छत्रपती शिवराय यांचे स्वराज्याचे संविधान दिसते तर वैदिक धर्म पंडित यांची मनुस्मृती दिसते.या भारताची खरी सुरुवात सिंध प्रांत म्हणून सुरु झालेली आहे.आणि त्या सिंध प्रांतात स्त्री शक्तीचे राज्य होते याची कल्पना आणि प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आता आलेला आहे.आज आपण त्याच सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणतो.परंतु हा हिंदू शब्द इतिहासात कधी दाखल झाला याला काही पुरावे नाहीत.त्यामुळे आपण जगत असलेली संस्कृती ही सिंधू संस्कृतीच आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.मानवकल्याणकारी स्त्री संस्कृतीने आपल्याला शेतीचे संशोधन दिलेले आहे.शेतीची अवजारे संशोधन म्हणून दिलेली आहे.या विकासामुळे आपल्याला एका ठिकाणची स्थयिक अशी वस्ती दिलेली आहे.त्यामुळे आपल्याला सामाजिक जीवन मिळालेले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळेच सिंधू संस्कृतीमध्ये असलेले विद्वान (बुध्द) यांनी विचार (धम्म) आणि सामाजिकता म्हणजेच एकी (संघ) दिलेला आहे.ही संस्कृती साडेतीन हजार वर्षापूर्वीची आहे.त्यानंतर क्षेत्ररक्षक म्हणून आणि पहिला पुरुष शेतकरी म्हणून बळीराजा याचा मान केला जातो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपण “बळीराजा" म्हणतो.म्हणून या भारत देशातील प्रत्येक महापुरुषाने या बालीराजालाच महत्व दिलेले आहे.आणि हाच मानवकल्याणकारी विचार गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेला आहे.त्यानी नेहमी विद्वानांचा सन्मान करून तो सन्मान या सिंध प्रांतातील लोकांनी करावा असे त्यांचे म्हणणे होते.विद्वानांनी दिलेला विचार नेहमी जपला पाहिजे असेही त्यानी सांगितले आहे.आणि या विद्वानांनी दिलेली सामाजिकता सर्वांनी जपली पाहिजे असेही त्यानी सांगितलेले आहे.मनुष्यातील भेदभाव हा मानवहित जपणारे नसून मानवी कल्याणाला घातक आहे असे त्यानी सांगितलेले आहे.म्हणून भगवे वस्त्र धारण करून “भगवान बुध्द” झाले आणि त्यांनी जगाला बुध्द म्हणजे विद्वानांचे तत्त्वज्ञान दिलेले आहे,जीवन हेच सत्य आहे आणि मानवकल्याण विचारच महत्वाचा आहे असे त्यांनी सांगितेलेले आहे.आणि मानवाला खरे जीवन हे पिंपळाचे झाड देते म्हणजे चौवीस तास अॉक्सिजन देते म्हणून गौतम बुद्धांचे विचार आधुनिक विचार असल्यामुळे साऱ्या जगाने ते स्विकारलेले आहे.त्यांचे विचार सम्राट अशोक यांनी स्वीकारून संपूर्ण राज्य त्याचे आचरण केले असा विचार आनंतकाळ टिकून रहावा यासाठी संपूर्ण तत्कालीन भारतामध्ये बुध्द विहार,स्तूप,लेण्या उभारलेल्या आहेत.त्यामुळे वर्णाश्रम धर्म त्यांनी कधीही या भारतात उभा राहू दिला नाही.पुढे वर्णाश्रम धर्म जोपासणारे वैदिक धर्म पंडित यांनी याच सम्राट अशोकाचा वंश संपवून ते बौध्द राज्य आपल्या ताब्यात घेऊन संपूर्ण भारतात वर्णाश्रम धर्म प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती.परंतु महाराष्ट्रातील पंढरपूर येथील बुध्द विहारातील गौतम बुद्धांना “पांडुरंग” म्हणजे कमळाचे फुल अशी उपमा देऊन संत नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदाय स्थापन करून भगवान गौतम बुध्द यांचे भगवे वान आणि सम्राट अशोक यांचा भगवा ध्वज घेऊन मानवकल्याणकारी बौध्द विचार विचार घेऊन मनुस्मृतीच्या विचारणा रोखण्याचे कार्य केले.आणि त्याची परंपरा संत तुकाराम महाराज यांचेपार्यंत पोहचली आहे.त्यामुळे भगव्या ध्वजाखाली केलेले कार्य हे मानव कल्याणकारी आहे हे समजण्यास कारण आहे.आजच्या महाराष्ट्र राज्यात जवळ जवळ अडीच हजार बुध्द लेण्या आहेत आणि याच लेण्यामध्ये सिंधू संस्कृती मधील स्त्री शक्ती म्हणजे “नेऋती” म्हणजे अधिशक्ती आहे.आणि याच अधिशक्तीला छत्रपती शिवाजी महाराज “जगदंब” म्हणत असत.त्यामुळे शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांनी हेच समतेचे निशाण म्हणजे मानव कल्याणकारी ध्वज शिवरायांच्या हाती देऊन “स्वराज्य स्थापनेची” संकल्पना हातात दिली.याच स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा यासाठी शिवरायांनी स्त्रीची बेअबदा आता स्वराज्यात चालणार नाही हे दाखविण्यासाठी स्त्रीची बेअबदा करणाऱ्या गुजर पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा चौरंगा केला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी दरी डोंगर पिंजून काढलेली आहेत.त्यामुळे त्यांचा आणि बौध्द लेण्यांचा संपर्क शंभर टक्के आलेला आहे हे नाकरून चालणार नाही.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वैदिक धर्माच्या विरोधात जाऊन मानव धर्म राज्य स्थापन केले आहे.अभिषिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य होते.त्यामुळे अशा स्वराज्याला संविधान असणे गरजेचे आहे.कारण संविधान नसेल गटर स्वराज्य चालविता येत नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याला संविधान दिलेले होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.जर त्यांनी संविधान दिले नसते तर स्वराज्य कारभार त्यांना चालविता आला नसता आणि छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्याचे गद्दार यांना त्यांची दरबारात हेरिंग घेऊन शिक्षा सुनाविता आली नसती. स्वराज्याला महसूल गोळा करता आला नसता आणि रयतेला स्वत:चे राज्य वाटले नसते त्यामुळे त्यांचे संविधान हे गायब केले असल्याचा आरोप आमच्या सकल मराठी समाजाचा या बामणी व्यवस्थेवर आहे.परंतु स्वराज्याचे वंशज म्हणून त्या संविधानाची प्रत त्यांच्या वंशाजाकडे होती त्यामुळेच ती बाबासाहेब आंबेडकर यांना प्राप्त झालेली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य समतेचे होते म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी जनते समोर आणले. रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधली आहे.त्यांना जशी शिवरायांची समाधी सापडली तशी पुणे महानगरपालिका यांना सिहागडा वरील तानाजी मालुसरे यांची समाधी सापडलेली आहे.त्यामुळे मनुवादी व्यवस्थेचे महात्मा फुले यांचे वरील आरोप फोल ठरले आहेत.त्याचे कारण असे की,तानाजी मालुसरे यांची समाधी स्वत: शिवराय यांनी बांधली तर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी स्वत: छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधली आहे.त्याच प्रकारे वढू येथील गोविंद महार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी स्वत: बांधलेली आहे. त्यामुळे बामणी व्यवस्थेने केलेले विरोध याचाच पुरावा देतात की,वारकरी सांप्रदाय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य याचा आणि मनुस्मृतीच्या वर्णाश्रम धर्म याचा काही एक संबध नव्हता व नाहीये.त्यामुळे स्त्री शक्ती आणि मानव कल्याण हाच खरा धर्म मानला गेला आहे.परंतु यापासून इथली रयत दूर जावी आणि समतेचा विचार विसरून जावा.यासाठी बामणी व्यावस्थेने ”आर्य सनातनी हिंदू धर्म" व्यावस्था स्थापन करून जातीय व्यवस्था बळकट करण्यासाठी पेशवाईने स्थापन केलेले गणपती यांचे अष्टविनायक मंदिर यांना हिंदू संकल्पनेत निर्माण करून व्दिराष्ट्र संकल्पना मजबूत करण्यासाठी समतेचा राजा म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपवून टाकली.गणपती उत्सवाचा माध्यमातून पहिली हिंदू-मुस्लीम दंगल घडवून समतेच्या राजाला आर्य सनातनी हिंदू धर्म संरक्षक केले आहे.परंतु डॉ बाबसाहेब आंबेडकर यांची १९२० मध्ये कोल्हापूर गादीचे छत्रपती शाहू महाराज यांनी भेट घेऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या संविधानाची प्रत देऊ केली होती.छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगितला होता.तेव्हा आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा अभ्यास केला.त्याचप्रमाणे वारकरी सांप्रदाय याचा अभ्यास करून संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून स्वराज्याचे कार्य पुढे नेण्यासाठी समता सैनिक दल स्थापन करून कोरेगाव भीमा याठिकाणी शूर वीरांना मानवंदना देऊन छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे झाले असल्याचे संकेत देऊन इतिहासाकडे सगळ्यांचे लक्ष वेधून चवदार तळ्याचा सत्याग्रह करून मनुस्मृतीचे दहन त्यांनी केले आहे.त्यामुळेच इथल्या भूमी पुत्राला न्याय देण्याचे थोर मोठे कार्य त्यानी केले आहे.सिंधू संस्कृतीचे विचार महत्वाचे आहेत आणि आधुनिकता महत्वाची आहे त्यानी :रुपयाची समस्या” हा ग्रंथ लिहून इथला बळीराजा जागविण्यासाठीची योजना त्यानी तयार करून इथली अर्थव्यावस्था मजबूत करण्याचे कार्य केले आहे.स्वराज्यातील महार योध्यांचे स्थान बळकट करण्यासाठी “महार बटालियन" स्थापन करण्यास इथल्या ब्रिटीश व्यवस्थेला भाग पाडले आहे.एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज.महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे कार्य हे इथल्या वैदिक धर्म पंडितांच्या आणि आर्य सनातनी हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात होते.त्यामुळेच यांची व्दिराष्ट्र संकल्पनेला मोठ्या प्रमाणात विरोध करून पाकिस्तानची वेगळी निर्मिती रोखण्याचा मोठ्या प्रामाणात प्रयत्न आंबेडकर यांनी केला होता.स्वतंत्र भारताचे संविधान लिहून त्यामध्ये यांना हक्क व अधिकार देऊन ते भारताला प्रदान केले आहे.जेव्हा हे संविधान प्रदान करीत असताना संविधान सभेत भाषणात त्यानी छत्रपती शिवराय यांचा उल्लेख करून शिवरायंचे सराज्य होते म्हणजेच संविधान होते म्हणून मला हे संविधान लिहायला सोपे झाले असे ते म्हणाल होते.अशा तत्त्वज्ञ असणाऱ्या महापुरुषांचे पुतळे विश्वशांती घुमटात बसविण्याचा नकार एमआयटी संस्थेचे संस्थापक विश्वनाथ कराड यांनी दिला आहे.अशा कृत्यचा विरोध आणि निषेध पर्त्येक स्तरातून झाला पाहिजे.त्यामुळे स्वराज्य ते संविधान असा जो प्रवास झालेला आहे त्याचे सर्वात जास्त श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांना जाते.त्यामुळे आर्य सनातनी व्यावस्थेने भारत देशाचे संविधान बदल्याचे षड्यंत्र सुरु केले आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा एक वर्ग आहे जो शिवारायंचा सत्य इतिहास स्वीकारतो आणि दुसरा असा एक वर्ग आहे जो घराणेशाही मानतो आणि मनुवादी विचारसरणी जोपासतो तो छत्रपती शिवाजी महाराज यांना एक धर्मीय रुपात जगासमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.त्यामुळे अशा लोकांना सकल मराठी समाजाचा एकच प्रश्न आहे की,छत्रपती शिवाजी महाराज यांचे संविधान कोठे आहे….?

Thursday, February 14, 2019

सोन्याची संधी आमदार श्री गिरीश बापट सोडतीलच कसे…? त कसबा मतदार संघाचे राजकारण…! अरविंद शिंदे आणि रविंद्र धंगेकर यांच्या समोर श्री निंबाळकर यांनी लावला बकेट घोटाळा आरोप..तर त्याला जलपर्णी निविदा प्रकरणी शिंदे आणि धंगेकर यांनी ठोकले..? राजेश खडके सकल मराठी समाज


प्रकरण होते बकेट घोटाळा प्रकरणी अतिरिक्त आयुक्त श्री निंबाळकर यांनी नगरसेवक यांचेवर स्थायी समितीच्या बैठकीमध्ये लावलेले आरोप..! या संदर्भात अरविंद शिंदे यांनी त्या नगरसेवकांची नावे जाहीर करा असा सूर लावला आणि सदर प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी केली.परंतु १०००० बकेट एवजी फक्त ५०० बकेट वाटप करावी आणि बाकीचे पैसे आम्हाला द्या असे नगरसेवक बोलत असल्याचा गंभीर आरोप केल्यामुळे नगरसेवक अरविंद शिंदे यांचा राग अनावर झाला.आता या प्रकरणात अतिरिक्त आयुक्त श्री निंबाळकर यांनी कोणाचे नाव घ्यावे असा प्रश्न निर्माण झाला.त्यामुळे चिडलेल्या नगरसेवक अरविंद शिंदे यांचे समोर जलपर्णी निविदा प्रकरणी घोळ झाल्याचा मुद्दा समोर आला याला नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी जोड दिली.त्यामुळे या दोन्ही नगरसेवकांनी आपल्या समर्थक यांचेबरोबर महापौर यांच्या दालनात आंदोलन सुरु केले.त्यामुळे महापौर यांनी अतिरिक्त आयुक्त श्री निंबाळकर यांना आपल्या दालनात चर्चेंसाठी बोलावून घेतले.महापौर यांच्या दालनात श्री निंबाळकर आल्यानंतर त्यांना या नगरसेवकांनी आणि त्याच्या समर्थकांनी बेदम मारले.त्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल करावा अशी भूमिका कसबा विधानसभा आमदार श्री बापट यांनी घेतली.आणि जामीन मिळू नये अशी तजवीज त्यांनी केली.आता इथे असा प्रश्न आहे की,बकेट घोटाळा प्रकरणी संशय कोणावर घ्यायचा नगरसेवक अरविंद शिंदे आणि रविंद्र धंगेकर यांचेवर घ्यायचा की,सगळ्या नगरसेवक यांचेवर घ्यायचा असा पुणेकर जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि याचे उत्तर श्री निंबाळकर यांनी दिले पाहिजे.अरविंद शिंदे यांना राग नेमका कशाचा बकेट प्रकरणी आरोप केला म्हणून आहे की,खरेच जलपर्णी प्रकरणी निविदा घोटाळा प्रकरणी आहे.नगरसेवक अरविंद शिंदे आणि रवींद्र धंगेकर कसबा विधान सभेचे भविष्यातील उमेदवार आहेत.आज जरी अरविंद शिंदे यांनी पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मागितलेली असेल तरी उद्याची त्यांची आणि धंगेकर यांची कसबा विधानसभेवर दावेदारी आहे.आता विषय आहे आमदार बापट यांनी या प्रकरणात उडी का घेतली..तर त्यांनी उद्याचे राजकारण केले आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे कारण श्री बापट यांनी एक तीर मध्ये दोन शिकार करायचा प्रयत्न केला आहे.कारण त्यांनी पुणे लोकसभेला भाजपा कडून उमेदवारी मागितलेली आहे.आणि अरविंद शिंदे यांनी कॉंग्रेसकडून मागितलेली आहे.त्यामुळे अरविंद शिंदे जर स्वकर्त्युत्वाने डॅमेज होत असतील तर अशी संधी का सोडायची म्हणून श्री बापट हे समोर आले आहेत.आता याचा परिणाम अरविंद शिंदे यांच्या उद्याच्या लोकसभेच्या उमेदवारीवर व्हावा असा त्यांचा कयास आहे असे समजण्यासा काय हरकत आहे.तसेच कसबा विधान सभेतून आमदार श्री बापट यांच्या सून निवडणुकीस इच्छुक आहेत त्यामुळे येथे रविंद्र धंगेकर जर स्वकर्त्युत्वाने डॅमेज होत असतील तर..ही सोन्याची संधी आमदार श्री गिरीश बापट सोडतीलच कसे…?

Friday, February 8, 2019

देशाच्या कोणत्याही विद्यार्थ्यांच्या समोर जर प्रश्न केला की सक्षम प्रधानमंत्री कोण बनू शकेल तर त्याचे उत्तर असेल प्रकाश आंबेडकर,बहन मायावती आणि शरद पवार….पण नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असणार नाहीत…! सकल मराठी समाज राजेश खडके

एका वृत्तवाहिनीने एकदा विद्यार्थी यांचे समोर प्रश्न केला की,या भारतात महात्मा गांधी यांचे नंतर श्रेष्ठ कोण आहे…? आता अशा प्रश्नांना उत्तर कसे देणार तो विद्यार्थी असा मला प्रश्न पडला होता.कारण जर गांधी श्रेष्ठ आहेत तर मग गांधी नंतर श्रेष्ठ कोण असणार…? आणि त्याचे उत्तर विद्यार्थी काय देणार….? तो तर असे म्हणू शकत नाही की,गांधी नंतर श्रेष्ठ वल्लभभाई पटेल किंवा नेहरू आहेत म्हणून...आणि अभ्यासू व्यक्ती तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव महात्मा गांधी नंतर तर कदापी घेणार नाही.मग अशा प्रश्नांना उत्तर काय तर गांधी श्रेष्ठ….! म्हणजे त्या वृत्तवाहिनीचा हाच खेळ होता की,या देशात महात्मा गांधीच श्रेष्ठ आहे असे त्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवायचे होते.त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाचे असे म्हणणे आहे की,त्या वृत्तवाहिनीचा प्रश्न चुकीचा होता.कारण आमचे असे म्हणणे आहे की,मोहन गांधी यांना या देशात श्रेष्ठ ठरविले कोणी…? याचे पहिले उत्तर त्या वृत्तवाहिनीने दिले पाहिजे होते...नाहीतर त्या विद्यार्थ्या समोर असा प्रश्न केला पाहिजे होता की,या देशात सर्वात श्रेष्ठ कोण..? तर त्याचे उत्तर देताना विद्यार्थ्यांचा संभ्रम निर्माण झाला नसता.आणि त्याने सरळ उत्तर दिले असते की,या देशात श्रेष्ठ डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत.असाच एक प्रश्न सध्या प्रधानमंत्री संदर्भात वृत्तवाहिन्यानी सुरु केला आहे.या भारत देशाचा प्रधानमंत्री २०१९ ला कोण..? बनू शकतो.नरेंद्र मोदी की राहुल गांधी की अन्य कोणी..? आता याचे उत्तर तो विद्यार्थी काय देणार तो असेच म्हणणार नरेंद्र मोदी म्हणून कारण राहुल पेक्षा उजवे नरेंद्र मोदी ठरतात आणि पक्ष बलाबल डोळ्यासमोर ठेऊन भाजपा आणि कॉंग्रेसला राष्ट्रीय स्तरावर बघितले जाते त्यामुळे अन्य व्यक्तीला मतदान त्या प्रमाणे होत नाही आणि आपल्या समोर त्या दोघांचेच नावे चालविली जातात.हा मिडीयाचा मानसिक खेळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.जर खरेच प्रधानमंत्री संदर्भात पोल घ्यायचा असेल तर मिडीयाने असे विचारले पाहिजे की,देशाचा प्रधानमंत्री बनण्याची क्षमता कोणात आहे आणि सक्षम प्रधानमंत्री कोण असू शकतो तर त्याचे विद्यार्थी नक्कीच उत्तर देईल आणि त्याचा पोल असेल प्रकाश आंबेडकर,बहन मायवती आणि शरद पवार साहेब….!


Tuesday, February 5, 2019

मोदी बँकेतील फिक्स डीपॉजीट हडप करणार...तुम्हाला रडायला देखील संधी नाही….! हवे तर तुमच्या खासदाराला विचारा….! सकल मराठी समाज राजेश खडके


प्रकाश आंबेडकर यांची विश्वाहार्था अलुतेदार आणि बुलतेदार यांच्या मध्ये वाढत चाललेली आहे त्यामुळे तो वंचित बहुजन आघाडीच्या सभेला लाखोच्या संखेत गर्दी करीत आहे.त्यामुळे जी विश्वाहार्थ आंबेडकर यांच्या संदर्भात उभी राहिलेली आहे ती टिकविण्यासाठी ते शर्त करीत आहेत त्याचा प्रत्यक्ष अनुभव माळीनगर येथील सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या भाषणातून आला.ते बोलत असताना असे म्हणाले की,केवळ मोदी सरकार जनतेला सुरुवातीपासून दिशाभूल करीत आलेले आहे.मोदीना जगातील कोणताच देश व्हिजा देऊ शकत नाही ते जे देश फिरत आहेत ते केवळ प्रधानमंत्री असल्यामुळे त्यांना इतर देशात येण्या जाण्याची परवानगी मिळते.मोदींचे शिक्षण हे दहावी नापास आहे ते का सांगत नाही ते खोटे का..? बोलत आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला ५० कोटी देणे संदर्भात पहिला करारनामा झाला होता आणि त्या करारावर नेहरू आणि पटेल यांच्या सह्या होत्या....नंतर पटेल म्हणाले पाकिस्तानला काहीच द्यायचे नाही तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की,करारनामा संदर्भातील आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वास निर्माण करणे भारताच्या दृष्टीने महत्वाचे आहे.त्यामुळे तो करारनामा पूर्ण करणे हे गरजेचे आहे जर तो पूर्ण करीत नसाल तर मी उपोषण करतो आणि भारताने पाकिस्तान बरोबर केलेला पहिला कराराची अमलबजावणी करण्यात आली.त्यामुळे ५० कोटी रुपये गांधीनी दिले नाहीत तर लोहपुरूष पटेल यांनी दिले पण हाच आरोप ठेऊन नथुराम गोडसे याने महात्मा गांधीना गोळ्या घातल्या असे आरएसएसवाले सांगतात.अतिशय मार्मिक आणि वैचारिक मांडणी करून आंबेडकर यांनी यांचा खोटारडेपणा उघड केला आहे.त्यामुळे जे बजेट गोयल यांनी संसदेत मांडले आहे त्याची विश्वाहार्थ आता इथल्या जनतेला राहिलेली नाही त्यामुळे बजेट मधील आकडे खोटे असल्याचे जनता आता म्हणत आहे.आरएसएस ही सड्यागड्यांची संघटना आहे म्हणजे संटे असणारांची संघटना आहे त्यामुळे अशा संघटना संविधानाच्या चौकटीत आणल्या पाहिजेत.नाहीतर हे देशाचे वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाहीत.या भाजप सरकारला हातातील सरकार जाण्याची भीती वाटत असल्यामुळे हिंदू-मुस्लीम दंगल उभारून हा देश राममंदिराच्या माध्यमातून अशांत करण्याचा मोहन भागवत यांचा मानस असल्यामुळे तो आपण पूर्ण होऊ द्याचा नाही यासाठी शांती मार्च प्रत्येक ठिकाणी काढण्यात यावा असे आवाहन देखील आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की,रिजर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा देऊन आपल्याला भविष्यात येणाऱ्या संकटापासून सावध केले आहे.त्याचे कारण असे की,रिजर्व बँकेत जनतेचे जे आठ लाख कोटी रुपयांचे फिक्स डीपॉजीटरुपी रक्कम आहे ती रक्कम उर्जित पटेल यांचेकडे मोदी यांनी मागणी करून आग्रह धरून दबाव आणला होता.उर्जित पटेल यांनी ती रक्कम देण्याची तयारी दाखविली नाही आणि त्याने राजीनामा देऊन देशातील जनतेला जागृत केले आहे.याची गंभीर दखल जनतेने घेतली पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.त्याचे कारण असे आहे की,बँकेतील फिक्स डीपॉजीट रकमेतील १०० रु पैकी २५ रु रिजर्व बँकेत ठेवावे लागतात आणि १० रु शासनाकडे बॉंडमध्ये ठेवावे लागतात आणि राहिलेल्या ६५ रुपयावर सदर बँकेचा अधिकार रहातो.त्यामुळे ज्या बँकेत जनतेचे म्हणजे तुमचे फिक्स डीपॉजीट आहे ती बँक जर बुडीत झाली तर तुमचे पूर्ण १०० रुपये परत देण्याची हमी त्या २५ रुपयावर रिजर्व बँक देते.परंतु हिच बँकेतील फिक्स डीपॉजीट रक्कम हडप करण्यासाठी मोदी सरकारने रिजर्व बँकेची हमी काढून घेण्याचा कायदा संसदेमध्ये सादर केला आहे आणि तो कायदा २०१९ च्या पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मंजूर करणार आहे त्यामुळे तुमची म्हणजे जनतेची बँकेतील फिक्स डीपॉजीट रक्कम जुलै ३० पर्यंत सुरक्षित रहाणार आहे.आणि यावर जर जनतेचा विश्वास नसेल तर तुम्ही तुमच्या खासदाराला या कायद्या संदर्भात विचारणा करून माहिती घ्या असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले आहे.एकंदरीत हे भाषण ऐकले तर आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,सदरची बाब अतिशय गंभीर असल्यामुळे इथल्या जनतेने याची दखल घेतली पाहिजे.नाहीतर पुन्हा मोदी सरकार निवडून आले तर रडायला देखील संधी राहणार नाही.

Sunday, February 3, 2019

वैदिक विरुध्द वारकरी असा लढा प्रकाश आंबेडकर यांनी सुरु केला असून...लोकसभेच्या ४८ जागा लढणार…! राजेश खडके सकल मराठी समाज


काल माळीनगर येथे प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मंचकावरून केलेले भाषण अतिशय मार्मिक होते.या सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आपण सर्वानी पाहिला आहे.या सभेचे आकर्षण हे बाळासाहेब यांनी केलेली वैचारिक मांडणी होती.या सभेत त्यांनी हिंदूचे दोन प्रकार सांगितलेले आहेत.जो पूर्वीपासून हिंदू संस्कृती म्हणून जीवन जगत आलेला मूळ भारतीय आणि वैदिक धर्म पंडितांनी १८७५ मध्ये स्थापन केलेला आर्य सनातनी हिंदू धर्म होय.यावेळी प्रकाश आंबेडकर असे म्हणाले की,पूर्वीपासून इथला हिंदू मरीआईला पुजत आलेला आहे.आणि वैदिक धर्म पंडितांचा हिंदू हा आयोध्याच्या रामायणातील काल्पनिक रामाला पुजत आलेला आहे.त्यामुळे दोन प्रकारचे हिंदू या भारतात जीवन जगत आहेत.त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,माढा लोकसभा मतदार संघाचा उमेदवार या सभेत त्यांना शिक्कामोर्तब करायचा होता म्हणून त्यांनी आपले लक्ष या मतदार संघातील पंढरपुरला येणाऱ्या वारकरी सांप्रदाय यांच्याकडे वळवायचे होते आणि ते त्यानी वळविले असल्याचे आमचे मत आहे.त्याचे कारण असे आहे की,संत नामदेव महाराज यांनी याच पंढरपुरातील विठ्ठलाला पांडुरंग म्हणजे कमळाचे फुल असे नाव देऊन वारकरी सांप्रदाय स्थापन करून समतावादी विचार पेरण्यासाठी कार्य या वैदिक धर्म पंडितांच्या विरोधात सुरु केले.त्यामुळे श्रीराम या नावाच्या खाली या देशात आरएसएसने राजकारण करण्यासाठी राममंदिर हा मुद्दा उपस्थित करून इथला हिंदू संस्कृतीनुसार जीवन जगणाऱ्या व्यक्तीला आर्य सनातनी हिंदू धर्माची लागण व्हावी आणि व्दिराष्ट्र पध्दतीतील त्यांची असणारी संकल्पना हिंदू-मुस्लीम दंगल करून पुन्हा ती प्रेरित करून मनुस्मृती लागू करण्याचे त्यांचे मनसुभे पुन्हा एकदा सत्ता मिळवून त्यांना प्रस्थापित करायची आहे.त्यांचे हेच मनसुभे प्रकाश आंबेडकर यांनी ओळखून मोहन भागवत यांनी २१ तारखेला राममंदिर उभारण्याची घोषणाच्या विरोधात शांती मार्च आंदोलन पुकारून ते मनसुभे उधळण्याचे सामाजिक राजकारण केले आहे.एकंदरीत पहाता संविधान संपवून मनुचे राज्य आणण्याचे कटकारस्थान आरएसएसने शिजविलेले आहे.त्यामुळे त्यांचा शांती मार्च म्हणजेच समतावादी स्वराज्य त्यांना साविधांच्या माध्यमातून टिकवून ठेवायचे आहे आणि यासाठी तुम्ही सर्वानी माझे हात बळकट करा असाच संदेश त्यानी दिलेला आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी वैदिक विरुध्द वारकरी असा समतेचा लढा सुरु केला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.आणि यासाठीच त्यानी कॉंग्रेसकडे असा प्रस्ताव सादर केला आहे की,जर कॉंग्रेसला संविधान वाचवायचे असेल तर त्यांनी आरएसएस या संघटनेला संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा पोग्राम जाहीर करावा मगच आम्ही आघाडीत येण्या संबधी विचार करू..! परंतु याबाबत कॉंग्रेस काहीच भूमिका घ्यायला तयार असल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या ४८ जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

प्रतिशिवाजी राजे उमाजी नाईक यांचा मृत्यू बोधीसत्व वृक्षावरच….आणि छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला गौतम बुध्दाच्या माध्यमातून दिले बोधीसत्व वृक्षच…! राजेश खडके सकल मराठी समाज


 
प्रथम प्रतिशिवाजी राजे उमाजी नाईक यांचा आज स्मृतीदिन आहे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन …..! क्रांती शब्द राजे उमाजी नाईक यांचे समोर छोटासा आहे असे मला वाटते...परंतु क्रांतीच्याही पुढे जाऊन राजे उमाजी नाईक यांनी काम केल्यामुळे लोक त्यांना प्रतिशिवाजी राजे उमाजी नाईक असे म्हणत असे…! त्याचे कारण असे आहे की,छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य मोगलाईपेक्षा वैदिक धर्म पंडीत यांचेपासून सुरक्षित ठेवायचे होते आणि ते स्वराज्य सुरक्षित ठेवायचे काम युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे.त्यामुळे त्यांना लोक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणतात.राजे उमाजी नाईक यांना स्वराज्याची प्रेरणा जी मिळाली ती छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून म्हणून उमाजीराजे यांनी त्यांचा पेहराव व राहणीमान चालचलन छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रमाणे केले होते.उमाजी नाईक यांनी पेशवाई विरुध्द भीमा कोरेगाव येथे लढण्यासाठी आपले सहकारी पाठविले होते.१ जानेवारी १८१८ च्या जातीयवादी स्वराज्य बुडव्या पेशव्याच्या विरोधात लढण्यासाठी राजे उमाजी नाईक यांना जाता आले नाही कारण ते तुरुंगात होते.परंतु त्यांचे सहकारी या युध्दात मोठ्या प्रमाणात शहीद झाले आहेत.तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान पुरंधरचा किल्ल्याची निवड केली होती.साल १८२२ मध्ये त्यांनी स्वत:चा राज्यभिषेक करून स्वराज्य निर्मितीची पावले पुढे टाकली होती.परंतु ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची हत्या करून स्वराज्य लाटण्याचा प्रयत्न केला त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे औरंगाजेब यांचेकडून करून घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेले समतावादी स्वराज्य बुडवून जातीयवादी पेशवाई लागू केली होती ती जातीयवादी पेशवाई स्वराज्याचे प्रामाणिक सरदार सिध्द्दनाक महार यांनी भीमा कोरेगाव येथे संपविली होती.परंतु पेशवाईची पिलावळ जिवंत राहिली होती.राजे उमाजी नाईक यांना जेव्हा स्वराज्यातील रयत प्रतिशिवाजी म्हणून मानु लागली तेव्हा सातारच्या छत्रपती भोसले यांनी त्यांचा मानसन्मान केल्याच्या नोंदी आपल्याला इतिहासात सापडतात. त्यामुळे पुन्हा उभे होत असलेले स्वराज्य इथल्या वैदिक धर्म पंडितांना नको होते तेव्हा त्यानी ब्रिटिशांना मदत करण्याच्या बदल्यात राजे उमाजी नाईक यांची फसवणूक करून त्यांना ब्रिटीशांच्या ताब्यात दिले.ज्याप्रमाणे शंभूराजे यांच्या शरीराची मृत्यूनंतर विटंबना झाली त्याच प्रमाणे पुणे येथील तहसील येथील कचेरीत पिंपळाच्या झाडाला लटकावून त्यांना फाशी देऊन त्यांचे मृतदेह कित्येक दिवस बेवारसप्रमाणे लटकावून ठेवला होता.परंतु एक बाब मला येथे आवर्जून सांगविसी वाटते आणि माझ्यासाठी ती अभिमानाची बाब आहे आणि ती म्हणजे राजे उमाजी नाईक यांची हत्या ज्या झाडावर केली आहे ते झाड होते बोधिसत्व वृक्षाचे म्हणजे राजे उमाजी यांना ज्या झाडावर लटकविले होते ते पिंपळाचे झाड होते आणि आजही ते झाड त्याठिकाणी आहे.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा ही बोधीसत्वाच्या वृक्षावर म्हणजे पिंपळाच्या पानावर होती,त्याचप्रमाणे प्रतिशिवाजी राजे उमाजी नाईक यांना बोधिसत्व वृक्षाखालीच मरण आले.आणि १९५६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बोधीसत्व वृक्षाचीच ओळख करून दिलेली आहे.

Saturday, February 2, 2019

नक्षलवादाने मारले दहा हजार तर दहशतवादाने मारले लाखो...तरीही हम है हिंदुस्थानी...तेलतुंबडे यांची अटक केवळ वंचित बहुजन आघाडीचा प्रचार दाबण्यासाठीच…! सकल मराठी समाज राजेश खडके


जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाला एक विश्वास होता की,आम्हाला न्याय डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच देऊ शकतात त्यामुळे हा समाज त्यांच्याकडे आस लावून बसला होता.तसे पाहिले तर त्यांच्या जमिनीला तसूभरही कोणी हात लावू शकत नाही असे संरक्षण बाबासाहेबांनी त्यांना दिले होते.मग हा आदिवासी समाज नक्षलवादी का झाला असा प्रश्न कोणी विचारताना दिसत नाही...मात्र नक्षलवाद सामाजिक स्थरावर संपविण्याचे सोडून त्यांनाच संपविण्याची भाषा केली जात आहे.जो पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर हयात होते तो पर्यंत न्यायाची अपेक्षा या आदिवासी समाजाला होती परंतु १९५६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले तसा या समाजाचा विश्वास कोणी जिंकू शकले नाही आता आपला वाली गेल्याची भावना या आदिवासी समाजाला झाली आणि त्यांनी १९५७ ला न्याय मिळण्यासाठीचे संघटन उभारले परंतु मोठ्या प्रमाणात त्यांचेवर अन्याय सुरु झाला आणि १९५८ साली त्यांनी हत्यार उचलून नक्षलवाद उभारला आहे.या नक्षलवादी यांनी न्याय मिळविण्यासाठी बंदुकीच्या जोरावर जी दहशत उभारली त्याचे समर्थन कोणी करू शकत नाही.त्यांनी आतापर्यंत ज्या हत्या केल्यात त्याचेही समर्थन कोणी करू शकत नाही.परंतु ते मूळ भारतवासी आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातुची असेल आणि ते त्यांच्यासाठी संवैधानिक पाउले जर उचलत असतील तर यात वावगे काय आहे…? असा आमच्या सकल मराठी समाजाचा प्रश्न आहे.या नक्षलवादी यांनी आत्ता पर्यंत दहा हजार लोक मारले आहेत..परंतु जे लोक मारले आहेत ते प्रशासनातील लोक मारले त्यानी जनसामान्य लोक कधीही मारलेले नाहीत.परंतु दहशतवादी हल्ल्यात मग तो हिरवा हल्ला असोत की,भगवा हल्ला असोत यात आतापर्यंत सामान्य लाखो लोक मारले गेले आहेत याचे समर्थन आपण का करतो असा आमचा प्रश्न आहे.स्वातंत्र भारतात जो विना परवाना हत्यार उचलेल तो दहशतवादीच त्याचे समर्थन आपण करू शकत नाही.मग आपण आरएसएस या संघटनेने एके-४७ सारखे हत्यार बाळगलेले आहेत.त्यांच्या कार्यकर्त्याकडे बंदुका बॉम्ब सापडले जातात अशा लोकांना आपण संरक्षण देत आहोत असा आमच्या सकल मराठी समाजाचा प्रश्न आहे.पुणे पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांचेवर नक्षलवादी असल्याचे आरोप केली होते.परंतु आरोप करणारे पोलीस सह आयुक्त श्री पाटील यांचेवर कारवाई करा अशी मागणी घेऊन सकल मराठी समाज रस्त्यावर उतरला त्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगितले की,यल्गार परिषदेचा आणि भीमा कोरेगाव दंगलीचा कोणताही संबध नाही.परंतु त्यांची बदली करण्यात आली.जसे मुख्यमंत्री श्री फडवणीस यांचे मर्जीतील अधिकारी जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा यल्गार परिषद आणि भीमा कोरेगावचा संबध जोडण्याच केविलवाणा प्रयत्न करीत प्रकाश आंबेडकर यांचे मेव्हणे श्री तेलतुंबडे यांचेवर भीमा कोरेगाव दंगलीचा आरोप केला त्यांना बेकायदा अटक करून वंचित बहुजन आघाडीचा प्रचार दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.त्यामुळे भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणात तेलतुंबडे यांना गवण्याचा प्रयत्न म्हणजे फक्त राजकारण आहे.त्यामुळे पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असल्याचे सांगून लागलीच त्यांची सुटका करण्याचे आदेश मे.न्यायालयाने दिल्यामुळे तेलतुंबडे यांची सुटका करण्यात आलेली आहे.

Friday, February 1, 2019

टिळकांची कॉंग्रेस सवर्णवादी….तर गांधीची कॉंग्रेस ओबीसीवादी…! इंदिरा गांधी प्रमाणे आजची कॉंग्रेस आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणेल काय..? प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत…! राजेश खडके सकल मराठी समाज


आम्ही स्वतंत्र भारतात रहातो काय…? आणि आमच्या स्वतंत्र भारतामध्ये संविधान लागू आहे काय…? असा प्रश्न आज सर्वांनाच पडला आहे.त्याचे कारण असे की,काय दिवसापूर्वी गांधी पुण्यतिथी निमित्त हिंदू महासभेने कार्यक्रम आयोजित केला होता.त्या कार्यक्रमामध्ये हिदुत्ववादी लोकांचे विकृत दर्शन संपूर्ण देशाला झाले म्हणजे काय तर मृत्यू नंतर या हिंदू महासभेने मोहन करमचंद गांधी यांना गोळ्या घातल्या आणि रक्ताचा पहात वाहिला गेला.ज्या नथुराम गोडसेने गांधीची सुंता करून हत्या केली म्हणजे हिंदू मुस्लीम दंगल भडकाविण्याचे काम केले अशा गोडसेचा विजयदिवस साजरा केला जातो हीच बाब भयानक आहे.काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाले त्यामध्ये ते असे म्हणाले की,टिळकांची कॉंग्रेस ही सवर्णवादी होते त्याचे कारण की,१९८४ मध्ये याच टिळकांनी हिंदू महासभेची स्थापना केली होती आणि या हिंदू महासभेचे कॉंग्रेस मध्ये रुपांतर करून जहालवादी विचाराने ब्रिटीशांच्या विरोधात कार्य सुरु केले.परंतु १९१६ मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मोहन गांधी यांनी १९२० ला टिळकांचा मृत्यू झालेनंतर कॉंग्रेस ताब्यात घेतली.ताब्यात घेतलेल्या कॉंग्रेसचे सवर्णवादी कॉंग्रेस सोडून त्यांनी गावातल्या ओबीसी असणाऱ्या व्यक्ती पर्यंत पोहचविली...आणि पुढे याच लोकांनी कॉंग्रेस मोठ्या प्रामाणात वाढविली.त्यामुळे हिंदू महासभेची ध्येय आणि उद्दिष्टे संपुष्टात आल्यामुळे १९२५ मध्ये पुन्हा नव्याने हिंदू महासभेची स्थापना झाली.कॉंग्रेस मधून गांधीला कंटाळून बाहेर पडलेल्या बळीराम हेगडेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ची स्थापना केली.नथुराम गोडसे याच संघटनेचा कार्यकर्ता होता हे विसरून चालणार नाही.पुढे नेहरू नंतर कॉंग्रेसची झालेली अवस्था सुधारण्यासाठी इंदिरा गांधी यांनी कॉंग्रेस हातात घेतली.आणि याच आरएसएसला संविधानिक प्रक्रीयेमध्ये आणण्याचे कार्य सुरु झाले आणि इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि ते काम बंद पडले.अशा प्रकारे आरएसएसकडे आज एके-४७ सारखी हत्यारे आहेत.नेमकी हत्यारे कशासाठी लागत आहे असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित करून आरएसएस यांना कायदेशीर प्रक्रीयेमध्ये आणा अशी घोषणा करून एक प्रकारे आरएसएस यांच्या विरोधी यल्गारच पुकारला आहे.त्यामुळे महाआघाडीत या असे कॉंग्रेसने राजगृहावर येऊन आवाहन केले तेव्हा आघाडीचा प्रस्ताव म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसकडे अशी मागणी केली आहे की,अशा आरएसएस संदर्भात त्यांना संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा काय कार्यक्रम आहे तो आमच्या वंचित बहुजन आघाडीकडे सादर करा मग आघाडीत येण्याविषयी बोलणी पुढे सरकेल..त्यामुळे टिळकांची कॉंग्रेस सवर्णवादी….तर गांधीची कॉंग्रेस ओबीसीवादी…! इंदिरा गांधी प्रमाणे आजची कॉंग्रेस आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणेल काय..? या प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याशी आणि त्यांच्या मागणीशी आमची सकल मराठी समाज सहमत आहे.