काल माळीनगर येथे प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मंचकावरून केलेले भाषण अतिशय मार्मिक होते.या सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आपण सर्वानी पाहिला आहे.या सभेचे आकर्षण हे बाळासाहेब यांनी केलेली वैचारिक मांडणी होती.या सभेत त्यांनी हिंदूचे दोन प्रकार सांगितलेले आहेत.जो पूर्वीपासून हिंदू संस्कृती म्हणून जीवन जगत आलेला मूळ भारतीय आणि वैदिक धर्म पंडितांनी १८७५ मध्ये स्थापन केलेला आर्य सनातनी हिंदू धर्म होय.यावेळी प्रकाश आंबेडकर असे म्हणाले की,पूर्वीपासून इथला हिंदू मरीआईला पुजत आलेला आहे.आणि वैदिक धर्म पंडितांचा हिंदू हा आयोध्याच्या रामायणातील काल्पनिक रामाला पुजत आलेला आहे.त्यामुळे दोन प्रकारचे हिंदू या भारतात जीवन जगत आहेत.त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,माढा लोकसभा मतदार संघाचा उमेदवार या सभेत त्यांना शिक्कामोर्तब करायचा होता म्हणून त्यांनी आपले लक्ष या मतदार संघातील पंढरपुरला येणाऱ्या वारकरी सांप्रदाय यांच्याकडे वळवायचे होते आणि ते त्यानी वळविले असल्याचे आमचे मत आहे.त्याचे कारण असे आहे की,संत नामदेव महाराज यांनी याच पंढरपुरातील विठ्ठलाला पांडुरंग म्हणजे कमळाचे फुल असे नाव देऊन वारकरी सांप्रदाय स्थापन करून समतावादी विचार पेरण्यासाठी कार्य या वैदिक धर्म पंडितांच्या विरोधात सुरु केले.त्यामुळे श्रीराम या नावाच्या खाली या देशात आरएसएसने राजकारण करण्यासाठी राममंदिर हा मुद्दा उपस्थित करून इथला हिंदू संस्कृतीनुसार जीवन जगणाऱ्या व्यक्तीला आर्य सनातनी हिंदू धर्माची लागण व्हावी आणि व्दिराष्ट्र पध्दतीतील त्यांची असणारी संकल्पना हिंदू-मुस्लीम दंगल करून पुन्हा ती प्रेरित करून मनुस्मृती लागू करण्याचे त्यांचे मनसुभे पुन्हा एकदा सत्ता मिळवून त्यांना प्रस्थापित करायची आहे.त्यांचे हेच मनसुभे प्रकाश आंबेडकर यांनी ओळखून मोहन भागवत यांनी २१ तारखेला राममंदिर उभारण्याची घोषणाच्या विरोधात शांती मार्च आंदोलन पुकारून ते मनसुभे उधळण्याचे सामाजिक राजकारण केले आहे.एकंदरीत पहाता संविधान संपवून मनुचे राज्य आणण्याचे कटकारस्थान आरएसएसने शिजविलेले आहे.त्यामुळे त्यांचा शांती मार्च म्हणजेच समतावादी स्वराज्य त्यांना साविधांच्या माध्यमातून टिकवून ठेवायचे आहे आणि यासाठी तुम्ही सर्वानी माझे हात बळकट करा असाच संदेश त्यानी दिलेला आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी वैदिक विरुध्द वारकरी असा समतेचा लढा सुरु केला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.आणि यासाठीच त्यानी कॉंग्रेसकडे असा प्रस्ताव सादर केला आहे की,जर कॉंग्रेसला संविधान वाचवायचे असेल तर त्यांनी आरएसएस या संघटनेला संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा पोग्राम जाहीर करावा मगच आम्ही आघाडीत येण्या संबधी विचार करू..! परंतु याबाबत कॉंग्रेस काहीच भूमिका घ्यायला तयार असल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या ४८ जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.
No comments:
Post a Comment