Monday, October 14, 2019

छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान धम्म चक्र प्रवर्तन दिनात मोजले पाहिजे…! राजेश खडके सकल मराठी समाज


धम्म चक्र प्रवर्तन दिन विद्वान मोठ्या उत्सहात साजरा करीत असतात…आणि ज्याला गौतम बुध्दानी दिलेला धम्म समजतो तो छत्रपती संभाजी महराज यांचे बलिदान विसरू शकत नाही असे माझे स्पष्ट म्हणणे आहे.पाच हजार वर्षापुर्वीची सिंधू संस्कृती आता बऱ्याच जणांना उजागर करून गेलेली आहे.त्यामुळे इतिहासकार आणि अभ्यासक यांनी संशोधन करून सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून स्त्री शक्तीचे दर्शन आपल्याला दिलेले आहे.ह्या सिंधू संस्कृतीने आपल्याला कृषी प्रदान केलेले आहे.संघटन म्हणजे संघ शक्तीचा आभ्यास आणि सभ्यता आपल्याला दिलेली आहे.मानव कल्याण हेच सूत्र सिंधू संस्कृतीचे होते त्यामुळे आजही सिंधू मातेला आपण पूजनीय मानून तेथील नेऋत्ती राण्यांचे आजही आपण वेगवेगळ्या रुपात पूजन करीत आलेलो आहे आणि करीत आहे.ज्या लोकांचा बौध्द लेण्या,स्तूप,विहार यांचा अभ्यास झालेला आहे...त्यांचा सिंधू संस्कृतीचा आभ्यास झालेला आहे असे मी मानतो. विद्वतेचे दर्शन या सिंधू संस्कृतीने दिलेले आहे.म्हणून या सिंधू संस्कृतीवर आर्य्यानी दीड हजार वर्षानंतर आक्रमण करून इथली सिंधू संस्कृती आपल्या ताब्यात घेऊन तिथला इतिहास बदलण्याचे कार्य केले आहे.आणि या सिंधू संस्कृतीमध्ये चातुर्वर्ण व्यावस्था निर्माण करण्याचे कार्य केले आहे.हे सर्व करण्यासाठी आर्यांनी मनुस्मृती नावचा ग्रंथ तयार करून आर्य श्रेष्ठ कसा हे दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.आर्य भारतात येण्यापूर्वी या ठिकाणी शिवलिंग पूजले जायचे परंतु त्याला महेश (शंकर) याचे रूप कधी देण्यात आलेले नव्हते.
गौतमी पुत्र सिध्दार्थ यांनी जीवन म्हणजे काय..? याचा शोध लावला.आणि जीवन म्हणजे प्राणिमात्रांच्या जीवनाचे खरे मूल्य हे मानव कल्याणकारी धर्मात असल्याचे खरे ज्ञान त्यांना पिंपळाच्या वृक्षाखाली प्राप्त झाले.जीवन या सत्याचा बोध याच पिंपळाच्या वृक्षाखाली झाल्यामुळे त्याला बोधिसत्त्व वृक्ष असे म्हटले जाऊ लागले.हेच समतेचे ज्ञान जगातील प्राणिमात्राला देण्यासाठी त्यांनी भगवे वस्त्र परिधान केले.त्यामुळे त्यांना भगवान गौतम बुध्द असे म्हणू लागले.त्यांचे त्या भगव्या वस्त्राचे अनुकरण त्यांच्या अनुयायी केले.आणि साऱ्या जगाला मानव कल्याणकारी धम्म म्हणजे विचार त्यानी दिले त्याचे प्रबोधन त्यानी केले.त्यांना सिंधू संस्कृती समजून आली...आणि त्यांनी बुध्द वंदना (प्रार्थनां) पाली भाषेत तयार करून सिंधू संस्कृतीच्या विद्वानांना,विचारांना आणि त्यांच्या संघ शक्तीला शरण गेले आहेत. म्हणजेच “बुद्धम शरणंम गच्छामी” “धम्मं शरणंम गच्छामी” “संघम शरणंम गच्छामी" होय.
गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झालेनंतर सम्राट अशोक यांनी मोठे युध्द केले आणि त्या युध्दात मानवसंहार मोठ्या प्रमाणात झाला होता ते पाहून त्यांचे मनं खिन्न झाले होते.तेव्हा त्यांना बुध्दांनी दिलेले ज्ञान अवगत झाले आणि त्यानी गौतम बुद्धांचा धम्म स्विकारला.म्हणजे मानव कल्याणकारी मार्ग निवडला.समतेचा मार्ग निवडला आणि आपल्या संपूर्ण साम्राज्यात तो प्रस्थापित केला.असा मानव कल्याणकारी धर्म अनंत काळापर्यंत टिकून रहावा यासाठी त्यांनी आपल्या पुत्राला बौध्द लेण्या,स्तूप,विहारे बांधण्यास सांगितली आणि त्यानी ते कार्य संपूर्ण बौध्द साम्राज्यमध्ये विस्तारित केले.असा धम्म लुप्त व्हावा यासाठी आर्याकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले.परंतु हा धम्म टिकवून ठेवण्याचे कार्य इथल्या वारकरी सांप्रदाय मंडळी यांनी हा समतेचा भगवा पताका घेऊन हा धम्म टिकविण्याचे कार्य सुरु ठेवले.परंतु हा समतेचा पताका नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न वैदिक धर्म पंडित यांचेकडून करण्यात आले.वेद हे शूद्राची बोलायचे नाही अन्यथा मनुस्मृतीच्या शिक्षेप्रमाणे त्यांची जीभ छाटली जायची.संस्कृत लिखाण केल्यास हात छाटले जायचे अशा प्रकारे विविध शिक्षा मनुस्मृतीमध्ये दिलेल्या आहेत.
शहाजीराजे यांना सम्राट अशोकानंतर पुन्हा एकदा संपूर्ण भारत बौध्द साम्राज्य करायचे होते…आणि सम्राट अशोकानंतर दुसऱ्या बौध्द साम्राज्याचे सम्राट व्हायचे होते. परंतु हा सत्य इतिहास उजागर होऊ नये यासाठी इथल्या व्यावस्थेने शहाजीराजे यांचे योगदान पुढे येऊ दिले नाही.मात्र समतेचा भगवा ध्वज आणि राजमुद्रा छत्रपती शिवराय यांना देऊन स्वराज्य म्हणजे धम्म राज्य निर्माण करण्यासाठी दिलेले योगदान कोणाला लपविता आलेले नाही.छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या १४ वर्षी “बुधभूषण” ग्रंथ लिहून बुध्दाची ओळख असल्याचा पुरावा दिलेला आहे.शाक्त पंथाचे अनुकरण करून सिंधू माता आणि बौध्द लेण्याचा प्रदीर्घ आभ्यास असल्याचे दाखवून दिलेले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला वैदिक धर्म पद्धतीतील ६ जूनचा राज्याभिषेक नाकारून २४ सप्टेंबर १६७४ मध्ये दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार केलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापरिनिर्वाण नंतर शंभूराजे यांनी स्वत:चा राज्यभिषेक शाक्त पंथानुसार करून स्वराज्याची राजमुद्रा त्यांनी पिंपळाच्या पानामध्ये कोरलेली आहे.संपूर्ण स्वराज्य धम्म राज्य त्यांनी केले त्यामुळे वैदिक धर्म पंडित छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर चिडून होते.जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी औरंगाजेबाच्या माध्यमातून मनुस्मृतीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केलेली आहे.
हा इतिहास उजागर राहण्यासाठी वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळापासून ७ कि.मी.च्या अंतरावर असणाऱ्या भीमा कोरेगावचा इतिहास जागरूक केला आहे.आणि रायगडच्या परिसरात मनुस्मृती दहन केली आहे.त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाचे असे म्हणणे की छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान धम्म चक्र प्रवर्तन दिनात मोजले पाहिजे…!

No comments:

Post a Comment