Saturday, March 14, 2020

पेशवे-होळकर यांचे १८०२ मध्ये हडपसर येथे झालेल्या युध्दामुळे पेशव्याला ब्रिटीशांचे मांडलिक व्हावे लागले...!

मला दुसऱ्या बाजीराव पेशव्यापासून सापडलेला इतिहास आणि त्याच्या सनावळी नुसार घटनाक्रम मी आपल्या समोर मांडीत आहे --:

 श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे २७ आक्टोंबर १७९५ मध्ये निधन झाले.याकाळात खर्ड्याचे युध्द झाले होते मराठे हे युध्द हरले होते कळंब येथील महार योध्दा सिद्धनाक महार याने पटवर्धन याचा जीव वाचविला आणि मराठ्यांची हरलेली लढाई या सिद्धनाक महार याने जिंकून दिलेली होती याचीही इतिहासात नोंद आहे.पहिल्या बाजीराव पेशव्याच्या निधना नंतर ५ डिसेंबर १७९६ मध्ये श्रीमंत पेशवे बाजीराव रघुनाथ हे दुसरा बाजीराव पेशवेपदी विराजमान झाले होते.महिन्या भरातच त्यांची व्दितीय पत्नी सरस्वतीबाई यांचे ६ जानेवारी १७९७ मध्ये निधन झाले.नाना फडवनीस यांचा बाजीराव पेशवे अत्यंत आदर करीत होते.परंतु त्यांचे आणि शिंदे यांचे कधी जमले नाही तेव्हा त्याला ताब्यात घेऊन डांबून ठेवण्याचे आदेश शिंदे यांनी त्यांचा फ्रेंच सेनापती मेजर फिलोज याला दिले होते त्याने ३१ डिसेंबर १७९७ मध्ये नाना फडवणीस याला अटक करून अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये तुरुंगात डांबून ठेवले होती..बाजीराव पेशव्यानी नाना फडवणीस यांची ८ जून १७९८ मध्ये सन्मानपूर्वक शिंदे यांचेकडून सुटका करून घेतली होती.२३ एप्रिल १८०० मध्ये बाजीराव यांनी अमृतरावांची दिवाण म्हणून नेमणूक केली होती परंतु बाजीराव यांचे बरोबर त्यांचे जमले नसल्याने २० जुलै १८०० मध्ये अमृतराव कारभार सोडून जुन्नरला निघून गेले.१६ एप्रिल १८०१ मध्ये बाजीराव यांनी शनिवार वाड्यामध्ये विठोजी होळकर यांची फसवणूक करून त्यांना जेरबंद करून २०० छड्या मारून हत्तीच्या पायी देऊन त्यांची हत्या केली होती.याची खबर यशवंतराव होळकर यांना मिळाली त्याचा त्यांना खूप राग आला आणि त्यानी बाजीराव पेशाव्यावर हल्ला करण्याचे ठरविले त्यानंतर २५ आक्टोंबर १८०२ मध्ये हडपसरच्या मैदानात पेशवे होळकर असे मोठे युध्द झाले.बाजीराव हे युध्द हरला जीवाच्या भितेने तो पुण्यातून पळून गेला.बाजीराव पेशव्याच्या लक्षात आले की,आता आपले राज्य संपले आहे आणि आपला जीव वाचवायचा असेल तर नक्कीच काहीतरी दुसरा विचार करावा लागेल. तेव्हा तो ८ डिसेंबर १८०२ मध्ये वसईला आला तेथून तो मुंबईकडे रवाना झाला आणि १० डिसेंबर १८०२ मध्ये मुंबई मध्ये गव्हर्नर डंकन याला भेटला आणि स्वराज्य त्याच्या स्वाधीन केले.डंकन याने पुण्याचा रेसिडेंट लेफ्टनंट कर्नल बॅरी क्लोज याला बोलावून बाजीराव याचे बरोबर वाटाघाटी करण्यास सांगितले.३१ डिसेंबर १८०२ मध्ये वसई येथे बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्या मध्ये तह झाला. मार्च १८०३ मध्ये यशवंत होळकर पुणे सोडून उत्तरेकडे रवाना झाले.१३ मे १८०३ मध्ये सर आर्थर वेलस्ली याने बाजीराव पेशव्यांना हिज हायनेस बाजीराव पंडित प्रधान बहादरअशी उपाधी देऊन पुन्हा पेशवाईच्या मनसदीवर बसविले....आणि आपले मांडलिक केले.मांडलिक पेशव्याने आपल्या सेनेची जबाबदारी ही बापू गोखले याचेवर सोपविली होती.

1 comment:

  1. सलाम तुम्हाला साहेब

    ReplyDelete