Saturday, March 14, 2020

महात्मा ज्योतिबा फुले ते महार योध्दा भीमा कोरेगाव आणि जय भवानी..! जय शिवाजी...!!




पेशव्याने केलेल्या वसई तहामुळे १० डिसेंबर १८०२ साली भारतावर इंग्रजी राजवट सुरु झाली आणि रयत गुलामीत गेली हे स्पष्टपणे दिसून येते..त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी पेशव्यांना दिलेल्या राज्यकारभाराच्या अधिकाराचा गैरवापर करून स्वराज्याची गद्दारी करून दुसरा बाजीराव याने रयतेचे हक्क व अधिकार १८०२ मध्ये इंग्रजी राजवटीला देऊन टाकले.अशा इंग्रजांच्या मांडलिक असणारा दुसरा बाजीराव याचा अंत करण्यासाठी सातारा गादीचे आदेश भोर प्रांतातील नागेवाडी गावचा महार योद्धा सरदार सिद्धानक महार ही उपाधी प्राप्त असलेले सेदुबीन नागनाथ महार याला मिळाले होते.वढू येथील शंभूराजे यांच्या समाधीचे दर्शन घेत भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ मध्ये पेशवाईचा अंत त्यांनी केला त्यांचे बरोबर उमाजी नाईक यांचे रामोशी योद्धा आणि स्वराज्याचे अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार त्यांच्या सोबत होते.१८२२ मध्ये उमाजी नाईक यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन पुरंधर येथे राज्याभिषेक करून ते राजे झाले होते.११ एप्रिल १८२७ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला होता.३ फेब्रुवारी १८३४ मध्ये मामलेदार कचेरी पुणे येथे झाडाला लटकावून राजे उमाजी नाईक यांची हत्या करण्यात आली होती यावेळी महात्मा ज्योतिबा फुले हे अवघे ७ वर्षाचे होते.इंग्रजी राजवटी मध्ये महार बटालियन मोठ्या प्रमणात कार्यरत होती.आणि ही महार बटालियन जर ब्रिटीश सैन्यात मजबूत जर झाली तर उद्याच्या स्वतंत्र भारताच्या राजकारणात मोठे अस्तित्व निर्माण करेन.आणि पुन्हा एकदा १८१८ चे युध्द सारखी परिस्थिती निर्माण जर झाली तर भारत देश सोडून पळून जाण्याची परिस्थिती निर्माण होईल.म्हणून यासाठी कोकणामध्ये रत्नागिरी याठिकाणी ब्राह्मणी व्यवस्थेने इंग्रजा विरुध्द एक उठाव करून इथली महार बटालियन बदनाम करून ती बंद करून महार योध्याचे अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी १८५७ चा स्वतंत्र उठाव उभा केला गेला.आणि या उठावाचा फायदा घेत ब्रिटीश राजवटीच्या प्रशासकीय कारभारात आपला शिरकाव ब्राह्मणी व्यवस्थेने करून घेतला.....आणि महार बटालियन बंद करण्याचे एक राजकारण केले.१८५७ चा उठाव झाला म्हणून इंग्रजी राजवटी कडून ब्रिटीश सैन्यात महार बटालियन बंद करून महार योध्यांची भरती बंद करण्यात आली.त्यानंतर ब्रिटीश प्रशासन व्यवस्था आपल्या ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता निर्माण करण्यासाठी ब्राह्मणी व्यावस्थेने मोठी मोहीम उघडली.त्यानी या महार योध्यांची उपासमार कशी होईल याची तजवीज सुरु केली.ब्रिटीश सैन्यातील पहिली महार योध्यांची भरती बंद करण्यात येऊन त्यांच्या हजारो एकर जमिनी ब्रिटीश सरकारच्या माध्यमातून काढून घेतल्या.महार योध्यानी स्वराज्यात मोठ्या प्रमाणात योगदान दिले होते.छत्रपती संभाजी महाराज यांच्या शाक्त धर्माच्या प्रचारात मोठे योगदान दिलेले होते आणि समतावादी स्वराज्यात मोठा वाटा निर्माण केला होता.जो पर्यंत इथला महार योध्दा संपविला जात नाही तो पर्यंत आपल्याला संपूर्ण भारत आपल्या प्रशासकीय व्यावस्थेच्या अमलाखाली आणता येणार नाही याची पूर्ण जाणीव ब्राह्मणी व्यवस्थेला झाली होती.त्यामुळे त्यानी ब्रिटीश सरकार यांच्या बरोबर राहून महार योद्ध्यांच्या जमिनी १००% काढून घेण्याचा कायदा १८७४ मध्ये पारित करण्यात आला.त्यामुळे खंडावर जगणारा महार योद्धा यांना खंड बंद झाला आणि त्याच्यावर उपासमारीची वेळ निर्माण झाली.ह्याची जाण महात्मा ज्योतिबा फुले यांना झाली होती कारण याच ब्राह्मणी व्यावस्थेने लपविलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आणि विचार त्यानी १८६९ मध्ये शोधून काढले होते.ते विचार पुन्हा स्वराज्याच्या रयतेमध्ये पोहोचावे यासाठी त्यांची जयंती उत्सव १८६९ मध्ये सुरु केला होता तेव्हा त्यांच्या लक्षात आले की,स्वराज्यात महार योद्ध्यांचे मोठे योगदान आहे.आणि स्वराज्यातील त्याचे योगदान संपविण्यासाठीच त्यांना अस्पृश्य घोषित करण्यात आले आहे.कारण पूर्वीपासून ब्राह्मणी व्यवस्था या देशात वर्णाश्रम धर्माच्या माध्यमातून ब्राह्मण क्षत्रिय आणि इतर शुद्र म्हणून त्यांची ही वर्ण व्यवस्था निर्माण केली होती.ही ब्राह्मणी व्यवस्था छत्रपती शिवराय यांना शुद्र म्हणीत असत त्यामुळे शुद्रातून अति शुद्र म्हणून या महार योद्ध्यांना अस्पृश्य महार घोषित करून त्यांना सार्वजनिक जीवन व्यवस्थेतून बाहेर करण्यात आलेले होते.जसे सार्वजनिक ठिकाणी त्यानी जमायचे नाही सार्वजनिक पाणवट्यावर पाणी भरायचे नाही.असे प्रकारे मनुस्मृतीचे कायदे अमल करण्यात त्यानी सुरुवात केली.स्वराज्यात महत्वाचे योगदान असलेला महार योद्धा आज शुद्रातून अति शुद्र म्हणजे अस्पृश्य झाला होता.तेव्हा महार योध्याचे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील महत्वाचे योगदान विचारात घेता महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक चळवळीची स्थापना करून स्वराज्याचा भगवा ध्वज हातामध्ये घेतला.या चळवळीच्या विरोधात ब्राह्मणी व्यवस्थेने १८७५ साली आर्य सनातनी हिंदू धर्माची स्थापना केली होती.१८८० मध्ये आपल्या वाड्यातील विहीर ह्या अस्पृश्य महार योद्ध्यांच्या वंशजासाठी महात्मा फुले यांनी खुली केली होती.आणि ब्रिटीश सरकारने या महार योध्यांची ब्राह्मणी व्यवस्थेच्या सांगण्यावरून काढून घेतलेली जमीन परत करावी अशी मागणी लावून धरली होती.तेव्हा महात्मा फुले यांच्या कार्याला यश आले आणि १८८४ ला वतन कायदा पास करून त्याचा साडेबारा टक्के परतावा म्हणून जमिनी परत देण्यात आल्या.परंतु इथल्या महसुली प्रशासनात ब्राह्मणी व्यावस्थेचा शिरकाव असल्यामुळे इथले कुळकर्णी यांनी बेकायदा असा फेरफार तयार केला की,नोकर वतन म्हणून ही जमीन महार योद्ध्यांना देण्यात आली आहे.अशा प्रकारे इथला भूमीपुत्र स्वराज्याचा महार योद्धा अस्पृश्य होऊन गावचा नोकर झाला.बाळकृष्ण गंगाधर टिळकांचा साल १८५६ मध्ये जन्म झाला होता ते १८८४ मध्ये २८ वर्षाचे होते हे आपण याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.त्यांनी गोखले - आगरकर यांना बरोबर घेऊन पहिली हिंदू महासभा १८८४ मध्ये आयोजित केली होती.मात्र महात्मा फुले जो पर्यंत जिवंत होते तो पर्यंत त्यांना त्यांच्या मनसुब्यात यश मिळत नव्हते.१९९० मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला.त्यांचे मृत्यूनंतर १४ एप्रिल १८९१ मध्ये डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता त्यांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ महार योद्धा होते.भीमरावांचे १ ते ४ पर्यंतचे शिक्षण सातारच्या छत्रपती प्रतापसिह भोसले यांनी स्थापन केलेल्या शाळेमध्ये झाले होते.शिक्षण करीत असताना त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले समजावून घेतले आणि त्यांना गुरु मानले.कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे गायकवाड यांचेकडून त्यांना काही शिवरायांच्या स्वराज्यातील माहिती मिळाली होती. स्वराज्याच्या घराणेशाही बरोबर डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे घरोब्याचे संबध होते.त्यामुळे शिवरायंचे स्वराज्य आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य त्यानी समजवून घेतले त्यामुळे त्यांना समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा आभ्यास झाला होता.परंतु देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी व्यवस्थेचे षड्यंत्र त्यांना कळून चुकले होते.त्यांना कायस्थ प्रभू ब्राह्मणांची अवस्था देखील माहित झाली होती.कायस्थ प्रभू ब्राहमणांना बरोबर घेऊन डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले होते.समता सैनिक दलाच्या सदस्याच्या डोक्यावर निळी टोपी प्रधान करून त्यांच्या हातामध्ये स्वराज्याचा भगवा ध्वज देण्यात आला होता. डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना शिवराय आणि शंभूराजे यांचे स्वराज्य माहित होते परंतु ब्राह्मणी व्यवस्थेने महार योध्यांची केलेली हालाखीची परिस्थिती आणि इथला अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार यांची शुद्र म्हणून दिलेली वागणूक माहित होती.त्यामुळे इथल्या अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार यांच्यामध्ये जातीयता निर्माण करून त्यांच्या अज्ञानपणाचा आणि भावनिक पणाचा फायदा ब्राह्मणी व्यवस्थेने घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले.इथला अस्पृश्य महार हा इतिहासतील बौध्द महार योद्धा असल्याचे आणि हा संपूर्ण भारत देश बौध्द असल्याचे त्यांचे लक्षात आले.तेव्हा त्यानी अस्पृश्येतेच्या विरोधात आणि शुद्र्तेच्या विरोधात अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार यांच्या स्वाभिमानाचा लढा त्यानी समतेचा लढा म्हणून सुरु केला.परंतु या भगव्या चळवळीला कॉनटर करण्यासाठी कॉंग्रेस मधून हेगडेवार बाहेर पडले आणि त्यांनी स्वयंसेवक (आरएसएस) ही संघटना स्थापन केली परंतु भगवा ध्वज हा समता सैनिक दलाकडे होता तो त्यांच्याकडे गेला कसा असा प्रश्न मला उपस्थित झालेला आहे.अस्पृश्य महार यांना स्वत:ची ओळख निर्माण व्हावी यासाठी डॉ बाबसाहेब आंबेडकर १९२७ मध्ये  भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट देऊन तेथील महार योद्ध्यांना अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार योद्ध्यांना मानवंदना देऊन त्यानी जो इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाहीअसे उद्गार काढून १९२७ मध्ये महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रहांच्या हातामध्ये स्वराज्याचा भगवा ध्वज हातामध्ये घेऊन जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यास सांगितल्या.कायस्थ प्रभू ब्राह्मण यांना बरोबर घेऊन स्वराज्याची राजधानी असलेल्या परिसरात १९२७ मध्ये मनुस्मृतीचे दहन केले.ब्राह्मणी व्यवस्थेने अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार यांच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन त्यांना या सत्याग्रही यांचेवर हल्ला चढविला पण हल्लेखोर यांचे हातामध्ये भगवा ध्वज नव्हता हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण भगवा ध्वज सत्याग्रहांच्या हातामध्ये होता त्यामुळे हा हल्ला स्वराज्याच्या भगव्या ध्वजावर करण्यात आलेला होता त्यामुळे इथेही आम्ही देशप्रेमीच होतो.ब्रिटीश सरकारला ज्यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्या संदर्भात जे निवेदन दिले त्या लेटरहेड वर जय भवानी जय शिवाजी असे लिहिले होते.त्यामुळे आम्ही इथही देशप्रेमीच होतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.१९२७ काळामध्ये ब्रिटीश सरकारने भारत स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा करून सायमन आयोगाची स्थापना केली होती आणि सायमन आयोगाच्या माध्यमातून १९३० ला इंग्लंड मध्ये पहिली गोलमेज परिषद आयोजित केली होती.या परिषदेत डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी प्रतिनिधित्व करून भारत स्वतंत्र चळवळीचे नेतृत्व करून भारतीयांच्या मागण्या त्यानी ब्रिटीश सरकार ठेवल्या होत्या.यानिमिताने कॉग्रेसने लाहोर मध्ये भारत स्वतंत्र उत्सव साजरा केला होता.त्यामुळे येथेही डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे देशप्रेम दिसून येते.परंतु कॉंग्रेसचे नेतृत्व करीत असलेले मोहन करमचंद गांधी यांना हे पटले नाही.त्यानी डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना विरोध करीत संपूर्ण भारत देश त्यांच्या विरोधात नेण्याचा प्रयत्न सुरू केले कारण स्वतंत्र चळवळीत त्यांना डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना श्रेठत्व द्यायचे नव्हते.अखेर डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी आपले कर्तुत्वाच्या जोरावर निवडणुकीच्या राजकारणात आपले यश प्राप्त करीत स्वतंत्र भारताच्या घटना समितीमध्ये दाखल होऊन त्यानी राज्यघटना तयार करून ती १९४९ मध्ये भारताला प्रधान करून संपूर्ण १९५० मध्ये भारतामध्ये समता प्रस्थापित केली.आणि स्वतंत्र भारताचा ध्वज भगवा असावा असा प्रस्थाव त्यानी स्वतंत्र भारताकडे सादर केला होता परंतु तो इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारला हेही आपण याठिकाणी लक्षात घेतेले पाहिजे.यावरून असे दिसते की,बौध्द महार योद्धा देश्प्रेमीच होता.दुसरा बाजीराव पेशव्याने रयतेचे अधिकार इंग्रजां १८०२ मध्ये देऊन त्यांना गुलाम केले होते.१५० वर्ष इंग्रजांनी आपल्याला गुलाम केले होते.भारताच्या राज्यघटनेनुसार स्वराज्याच्या रयतेला १९५२ च्या पहिल्या निवडणुकीच्या माध्यमातून आपले हक्क व अधिकार प्राप्त झाल्यामुळे त्याने पहिले मतदान करून स्वत:चा स्वतंत्र झाल्याचा आंनद व्यक्त केला.तेव्हा एकंदरीत संपूर्ण घडामोडी पहाता त्याच्या नोंदी पाहता इतिहासातील बौध्द महार योध्दा देशप्रेमी होता....आणि आजही बौध्द महार योद्धा देशप्रेमीच आहे.....!

1 comment:

  1. काय विनोदी लिखाण आहे रे ?

    ReplyDelete