जळगांव
जिल्हयातील बहुतांश शेती ही अवर्षण प्रणव क्षेत्रात येत असल्याने येथील
शेतकऱ्यांना हवामानाच्या लहरीपणाचा फटका नेहमीच बसत असतो. यामुळे येथील
शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पन्नाची शाश्वती मिळावी याकरिता भुसावळ
तालुक्यातील बोहर्डी ब्रु व खु.गावाची कोरडवाहू शाश्वत शेतीच्या
प्रयोगासाठी जिल्हा कृषि विभागाकडून निवड करण्यात येऊन राष्ट्रीय कृषि
विकास योजनेतंर्गत कोरडवाहू शाश्वत शेती कार्यक्रम सन 2011-12 यशस्वीपणे
राबविण्यात आला आहे.
जळगांव कृषि उपविभागाच्या भुसावळ तालुक्यातील मौजे बोहर्डी ब्रु व खु.
गावातील एकूण 78 लाभार्थ्यांची सदरच्या कार्यक्रमांतर्गत निवड करण्यात आली
यात 12 महिला शेतकरी, 15 अनुसूचित जातीतील व 51 इतर जातीतील शेतकऱ्यांचा
समावेश असून सुमारे 100 हेक्टर क्षेत्रावर सदरचा कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात शेती बरोबरच इतर जोडधंदे जसे पशुपालन, शेळीपालन इ.चा अवलंब
करण्यात आला. तसेच शेतीतील उत्पन्नाचे मूल्यसंवर्धनाच्या दृष्टीने विविध
नावीन्यपूर्ण कृषि अवजारांचा पुरवठा करणे, व पीक प्रात्याक्षिकांची जोड
देऊन शाश्वत शेती कार्यक्रम बोहर्डी येथे राबविला जात आहे. गावातील सर्व
लाभार्थ्यांनी कृषी विभागाकडून एकत्रित सभा आयोजित करुन सदरचा कार्यक्रम
राबविण्याबाबतचे योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कृषि विभागाच्या
आत्मा, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, रोहयो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा,
सेंद्रीय शेती विकास कार्यक्रम आदि योजनांची सांगड घालून गावांमधील
शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला.
मुळ योजना राबवितांना एकुण 78 लाभार्थ्यांना म्हशीचे वाटप करण्यात आले. व
याबरोबर वैरण विकास योजनेशी सांगड घालून चारा प्रश्न सुध्दा सोडविण्याचा
प्रयत्न करण्यात आला. गहू, हरभरा, कापूस, कडधान्य इ. पिकांच्या
प्रात्याक्षिक आयोजित करण्यात येऊन संपुर्ण निविष्ठंचा पुरवठा करण्यात आला.
सेंद्रिय शेती योजनेमध्ये लाभार्थ्याला संद्रिय शेतीचे महत्व विशद करुन
योजना कालावधी सुमारे 200 बि डी कंपोस्ट युनिट, 10 गांडूळ खा युनिट व
ग्लिरिसीडीयाची लागवड करुन सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याचा दृष्टीने
प्रयत्न केला. आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी सहली, प्रशिक्षण व ठिबक
सिंचनासाठी फर्टिगेशन किटचे अत्यंत माफक दरात वाटप करण्यात आले. राफअ
योजनेअंतर्गत सुक्ष्म, कल्टिव्हेटर, कृषिव्हेटर, इले. मोटार, डिझेल पंप व
पीव्हीसी पाईपचे वाटप करण्यात आले. याबरोबरच उत्पादीत दुधाच्या विपननासाठी
गावातील मुंबई कृषि विज्ञान मंडळास दुध संकलन केंद्रास मान्यता देण्यात आली
व या मंडळास यासाठी अवजारे व साधने घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
बोहर्डी ब्रु व खु. गावांमध्ये सदरच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी
कार्यक्षमपणे करण्यात आल्याने गावांमधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ
झालेली आहे. कोरडवाहू शाश्वत शेती विकास कार्यक्रम 2011-2012 बोहर्डी
गावांसह संपूर्ण भुसावळ तालुक्यात कृषि विभागाच्या वतीने राबविला जात असून
2012-12 मध्ये ही या कार्यक्रमात तालुक्यातील सुमारे अडीचशे लाभार्थ्यांची
निवड झालेली आहे.
--सुनिल सोनटक्के,माहिती अधिकारी, जळगांव.
No comments:
Post a Comment