Saturday, December 22, 2018
वंचित बहुजन आघाडीत सामील होण्याचा सकल मराठी समाजाचा वाचा प्रस्ताव
१ मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे
शंभूराजे यांनी वयाच्या १५ व्या वर्षी "बुधभूषण" नावाचा ग्रंथ लिहून प्रकांड पंडित अशी स्वत:ची ओळख निर्माण केली.त्यानंतर त्यांनी "नायिकाभेद" "नखशिकांत" आणि "सातसतक" असे एकूण चार ग्रंथ लिहिले आहेत.छत्रपती संभाजी महाराज यांना चौदा भाषेचे अवगत होत्या.स्वराज्याला मुंबई जोडण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी मुंबईचा ब्रिटीश गव्हर्नर केजविन याच्याकडून मुंबई खरेदीचा करार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.परंतु सुरतच्या ब्रिटिशानी तो करार होऊ दिला नाही.त्यामुळे मुंबई स्वराज्याला जोडण्याचे स्वप्न अधांतरीत राहिले.जर मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिल्यास ते स्वप्न पूर्णत्वास आल्यासारखे होईल.आणि आजच्या तरुणांना छत्रपती संभाजी महाराज यांचा सत्य इतिहास समजला जाईल.असे झाल्यास शंभूराजे यांचा सन्मान होईल.
२ दादरचे नामांतर "चैत्यभूमी" असे करावे-:
जागतिक विद्वत्ता म्हणून ज्यांचेकडे पाहिले जाते अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा यासाठी संविधान लिहिले.संविधानातील प्रत्येक भारतीय नागरीक मानवी मुल्ये समजून घेऊन तो मानवी धर्म जतन करेल.यासाठी आंबेडकरांनी बौध्द विचारांच्या २२ प्रतिज्ञाच्या माध्यमातून "सभ्यता" दिली आहे.अशा महामानवाचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले.वास्तविक पहाता त्यांची समाधी दिल्ली येथे झाली पाहिजे होती.परंतु त्यांचे पार्थिव देह दिल्ली येथून मुंबई येथे आणण्यात आले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जो संघर्ष करावा लागला.त्या संघर्षाचा इतिहास जागरूक रहावा यासाठी दादरचे नाव "चैत्यभूमी" असे करावे.त्यामुळे त्यागाचे प्रतिक म्हणून या संघर्षाकडे पाहिले जाईल.
३ देशातील शिक्षण क्षेत्रात भारतीय संविधान हा एक "विषय" म्हणून बालवाडीपासून शिकविणे
सक्तीचा करण्यात यावा -:
स्वातंत्र भारताला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करून २६ नोव्हेंबर
१९४९ साली प्रदान केले.या संविधानाच्या कायद्यानुसार संपूर्ण भारत देश चालत आहे.या संविधानामुळे भारतीय नागरिक आपले हक्क व अधिकार प्राप्त करून घेत आहे.भारतीय संविधानाने दिलेल्या हक्क व अधिकारा बरोबर प्रत्येक नागरिकाला जबाबदारी दिलेली आहे.जर प्रत्येक नागरिकाला बालवाडीपासून संविधानाची ओळख निर्माण झाली तर त्याच्या शिक्षणामुळे त्याच्या पालकांनाही साविधानाची पूर्ण माहिती अवलोकन होईल.त्यामुळे हा समाज व भारत देश सदृढ होण्यास मोठे योगदान प्राप्त होईल.
४ भारतातील संपूर्ण नद्या एकमेकाला जोडून नदीजोड प्रकल्प राबविण्यात यावा -:
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी "रुपयाची समस्य" हा प्रबंधक लिहून ब्रिटीश प्रशासनाला जागरूक केले होते.भारताची प्रगती ही रुपयावर आधारित असल्याचे स्पष्टपणे त्यात त्यांनी म्हटले आहे.आणि हा रुपया जर सदृढ क्रतायचा असेल तर इथली कृषी म्हणजे शेतीचा विकास करणे गरजेचे आहे.आणि यासाठी भारतातील पाण्याची समस्या दूर केली पाहिजे.देशातील भौगोलिक परिस्थितीमुळे पाण्याचा संचय हा काही भागात केंद्रित आहे.तर काही भाग कायमस्वरूपी दुष्काळी आहे.नदीजोड प्रकल्पामुळे पाण्याचे विकेंद्रीकरण होऊन दुष्काळी भागालाही समृध्द होण्याची संधी मिळेल.तेसेच शहरावरचा वाढता बोजा विकेंद्रित होऊन भारताच्या अर्थव्यावस्थेला चालना मिळेल.
५ शेतमालाची साठवणूक करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावरती गोदाम (गोडाऊन) उभारण्यात यावेत -:
शेतकरी यांच्या मालाला हमी भाव मिळावा म्हणू तो नेहमी प्रयत्नात रहातो.शेतातील त्याचा माल तो जेव्हा बाजारात आणतो त्यावेळेस बाजारात भाव नेहमी वर खाली होत असतो.ज्या वेळेस तो बाजारात त्याचा माल घेऊन आल्यावर त्याला रास्त भाव मिळेल असे नाही.परंतु खर्चिक प्रवासाने आणलेला माल त्याला पुन्हा प्रवास खर्चाने घेऊन जाणे परवडत त्यांनी त्याला तो माल हमी भाव मिळेपर्यंत साठवणूक करून ठेवण्याची व्यावस्था नसते त्यामुळे त्याला तो माल पडेल त्या किमतीत विकावा लागतो.त्यामुळे त्याचे नुकसान होते.जर त्याला हमी भाव मिळेपर्यंत त्याचा माल साठवणूक करून ठेवण्याची व्यावस्था गोदामच्या माध्यमातून झाली तर तो त्याचा माल बाजारात रास्त किमतीत विकू शकतो.
६ नाशवंत शेत मालाला हमी भाव मिळण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर "शीतगृह" (कोल्ड स्टोअरेज) उभारण्यात यावीत.
शेतकरी जेव्हा नाशवंत शेतमाल बाजारात आणतो तेव्हा जर त्याला हमी भाव मिळाला नाही तर तो माल त्याला पडेल त्या किमतीत विकावा लागतो किंवा तो रस्त्यावर फेकून द्यावा लागतो.त्यामुळे तो कर्जबाजारी होऊन त्याला आत्महत्या करावी लागते.परंतु जर तालुका स्तरावर शीतगृह उभारली गेली तर त्याचा माल त्याला हमी भावात विकता येईल.कारण हमी भाव मिळेपर्यंत त्याचा माल त्याला शीतगृहात ठेवता येईल
७ शासकीय क्षेत्रातील कामकाजात आऊट सोर्सिंग पद्धत बंद करण्यात यावीत -:
शासनाने आपले कामकाज करण्यासठी शासकीय कार्यालये उभारलेली आहेत.त्यामध्ये सेवा करण्यासाठी नोकर भरती केली आहे.शासन सेवा खर्च आणि सेवकांचा पगार हा जनतेच्या करातून केला जातो.असे असताना त्यांची कामे आऊट सोर्सिंगाला दिली जातात.त्यामुळे जनतेवर आणखी भार पडतो.जर कामकाज वाढले असेल तर शासनाने नोकर भरती करावी आणि आऊट सोर्सिंग पद्धत बंद करावी.
८ प्रत्येक तालुका स्तरावर एमआयडीसी झोन निर्माण करून स्थानिक पुत्रांना रोजगार उपलब्ध कराव -:
एकंदरीत पहाता तालुका स्तरावर एमआयडीसी झोन निर्माण केल्यास नव नवीन उद्योग तालुका स्तरावर उभारली जातील.त्यामुळे तालुक्या बरोबर त्याच्या आजूबाजूच्या गावांची परिस्थिती सुधारेल.आणि त्या आजूबाजूंच्या गावांना प्राधन्य मिळून त्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होईल.सदरच्या उपलब्ध रोजगाराची प्रथम संधी स्थानिक भूमी पुत्रांना देण्यात यावी.
सारांश
सदरचा प्रस्ताव देशकल्याण आणि जनकल्याण स्तरावर आहे त्याचे कारण असे की,सदरच्या प्रस्त्वातील मागण्या जर शासन स्तरावर मान्य झाल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.त्यामुळे देशातील ७० ते ७५ टक्के बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे.आपल्या रुपयाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वाढणार आहे.इथला बळीराजा आंडीत होणार आहे.पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.कृषी प्रदान संस्कृतीकडे देशाची पुन्हा एकदा वाटचाल सुरु होणार आहे.औद्योगिक क्षेत्रात वाढ होणार आहे.सदरच्या प्रास्ताविक मागण्या खर्चिक आहे.त्याची तजवीज शासनाने इंटरनेट सेवेतून सक्तीने केल्यास या प्रास्ताविक मागण्या पूर्ण होऊ शकतात.यासाठी इच्छाशक्ती व संसदीय राजकारण महत्वाचे आहे.असे सकल मराठी समाजाचे स्पष्ट मत आहे.त्यामुळे संसदीय राजकीय तडजोडी शिवाय हा आमचा प्रस्ताव मान्य करता येणार नाही आणि या प्रास्तविक मागण्यासाठी सकल मराठी समाज बांधील आहे.
सकल मराठी समाजाची संसदीय मागणी पुढील प्रमाणे -:
सदरच्या प्रास्ताविक मागण्या मान्य करून सदरच्या प्रस्तावाला मान्यता देऊन सकल मराठी समाजाला संसदीय राजकारणात सामवून घ्यावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुणेशहर विधानसभा मतदार संघातील पाच मतदार संघ राखीव ठेवावेत.सदरचे मतदार संघ पुढील प्रमाणे -:
१ खडकवासला मतदार संघ
२ वडगावशेरी मतदार संघ
३ भोर -वेल्हा-मुळशी मतदार संघ
४ कसबा मतदार संघ
५ हडपसर मतदार संघ
प्रस्ताव सादरकर्ते सकल मराठी समाज समन्वयक
राजेश नारयण खडके प्रफुल्ल गुजर अविराज मराठे अंकुश गायकवाड
Tuesday, December 18, 2018
महार योध्याचे योगदान आधुनिक भारत घडविण्यासाठीच……!
वर्षाचा
डिसेंबर हा अखेरचा महिना असतो आणि वर्षाभरात काय चांगले किंवा काय वाईट
घडले याची शहानिशा राजकीय आणि सामजिक स्तरावर केली जाते.या वर्षाचा आम्ही
सकल मराठी समाजाला काय मिळाले किंवा काय देण्याचा प्रयत्न केला याचा आढावा
घेतला आहे.हा आढावा घेत असता काही जुने मित्र तुटली तर काही नवीन मित्र
जुडली आहेत.सकल मराठी समाजाचे समन्वय करणे खूप अवघड बाब आहे परंतु हि बाब
पूर्ण करण्याचे धाडस महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
पूर्ण केल्याचे आता जवळ जवळ सर्वच मानीत आहे.त्यामुळे बामणी व्यवस्थेने
सोशल मिडीया वार रूम तयार करून या दोन महापुरुषांना सोशल मिडीयावर बनावट
आयडीच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रामाणात सुरु केला
आहे.याच बरोबर यांनी प्रत्येक समाजात आणि प्रत्येक चळवळीत दलाल निर्माण
केल्याचे आता सकल मराठी समाजा समोर गेल्या वर्षभरात आलेले आहे.......मग त्यातून
आंबेडकरी चळवळ पण सुटलेली नाही.परंतु या द्लालांचा काय फायदा झाला किंवा
भविष्यात काय फायदा होणार आहे याचे काहीच कारण दिसून आलेले नाही.परंतु काही
कारणांची मीमांसा केली तर काही गोष्टी समोर आल्या आहेत आणि त्यातील प्रमुख
बाब म्हणजे या दलालांच्या माध्यमातून मग तो दलाल मराठा समाजातील का असा
ना याचे मूळ जर शोधले तर इथला “महार” संपविणे एवढेच धोरण असल्याचे मोठ्या
प्रमाणात समोर आले आहे.हे कोणी मान्य करणार नाही परंतु याचा जर त्या
व्यक्तीने खोलात जाऊन आभ्यास केला तर ही बाब त्याच्या पुढे आल्या शिवाय
राहणार नाही.काही इतिहास आभ्यासकरांचे म्हणणे असे आहे की,भारताचे मूळ हे
“महार” शब्दात अडकले आहे.कारण भारतातील प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व हे
“महार” गणात अडकलेले आहे आणि महार गण हा शाख्य कुलीन गण असल्याचे
बाबासाहेबांच्या समोर आलेले होते.या गणात स्त्री ला खूप महत्व दिले गेलेले
आहे.त्यामुळेच सिंधू संस्कृती ही या देशातील मूळ संस्कृती असल्याचे इथल्या
इतिहास आभ्यासकरांचेही म्हणणे आहे.कारण सिंधू संस्कृती ही आधुनिक संस्कृती
होती.तांत्रिक संस्कृती होती म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाणे परिपूर्ण अशी संस्कृती
होती.इथे मानवी विकास महत्वाचा मानला जात होता. त्यामुळे मानवाच्या खऱ्या
विकासाला याच सिंधू संस्कृतीत म्हणजे स्त्री शक्तीला ज्ञानाची संस्कृती
म्हटले जाते.म्हणून छत्रपती संभाजी महाराज याच तांत्रिक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान
प्राप्त असलेल्या स्त्री शक्तीचे पूजक होते.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज
यांनी पहिला वैदिक धर्म पद्धतीतील राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक
विज्ञानवादी राज्याभिषेक करून आधुनिक स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न
केला.बामणी व्यावस्थेचा मूळ शत्रू हा "ज्ञान" आणि "विज्ञान आहे.त्यामुळे आता
हे स्वराज्य संपविणे महत्वाचे होते.त्यामुळे ज्यांनी ज्यांनी विज्ञानवादी
आधुनिक भारत उभारण्याचा प्रयत्न केला त्यांना या बामणी व्यवस्थेने
संपविण्याचे कटकारस्थान इतिहासात केल्याचे आता जवळ जवळ स्पष्ट झाले
आहे.त्यामुळे गौतम बुध्द,वारकरी सांप्रदाय निर्माण करणारे संत
संपविलेले आहेत.यातून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज देखील सुटले
नाहीत.अशा विज्ञानवादी स्वराज्याच्या उभारणीला बामणी व्यावस्थेने छेद देऊन
इथला मूळ आधुनिक संघर्षवादी जमात म्हणजे महार संपविण्यासाठी शुद्रातून
अतिशूद्र म्हणजे अस्पृश्य म्हणून महार समाजा बद्दलची भावना प्रस्थापित
करण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु अशा बामणी व्यवस्थेला मोडीत काढण्यासाठी
महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून
त्यांनी उभारलेले आधुनिक स्वराज्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.आणि
त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी पहिली शिवजयंती साजरा करून इथला
संघर्षवादी “महार" समाजाच्या इतिहासाला गती देऊन सत्यशोधक समाजाची स्थापना
करून नव्याने आधुनिक भारताची निर्मिती केली.परंतु बामणी व्यावस्था गप्प
बसली नाही त्यांनी पुन्हा एकदा आधुनिक भारताच्या विकासाला बाधा निर्माण
करण्यासाठी शिवजयंती उत्सव बंद करण्यासाठी व्दिराष्ट्राची संकल्पना निर्माण
करून आर्य सनातनी हिंदू धर्माची स्थापना करून शाख्यकुलीन गणप्रमुखाची
मोदकरुपी गणपती निर्माण करून त्याचा उत्सव सुरु करून आधुनिक भारताच्या
निर्मितीला पुन्हा एकदा छेद दिला.परंतु या व्यवस्थेला तडा देण्यासाठी
भीमराव रामजी आंबेडकर यांनी आधुनिक भारताचे स्वराज्य संस्थापक छत्रपती
शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा इतिहास दाखविणारे महात्मा ज्योतिबा फुले
यांना गुरु मानून पुन्हा एकदा भारताची वाटचाल आधुनिक भारताकडे सुरु
केली.इथली बामणी व्यावस्था निर्माण करण्यासाठी जो “महार” समाज संपविण्याचे
कटकारस्थान झाले होते त्याला पुन्हा एकदा छेद देत महार समाजापुढे लावलेला
“अस्पृश्य” शब्द उखडून फेकण्याचे महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
इथला कायस्थ प्रभू (जंगम स्वामी) याला बरोबर घेऊन केले आहे.आधुनिक भारताच्या
विकासाला बाधा असणारी “मनुस्मृती" याच कायस्थ प्रभू (जंगम स्वामी) याला बरोबर
घेऊन दहन केली आहे.१८७५ ला स्थापन झालेला आर्य सनातनी हिंदू धर्म
रुजविण्यासाठी राम व कृष्ण यांना काल्पनिक ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांची
उपाधी देऊन आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारा राम नावाचा धनुष्यधारी गणप्रमुख
याचेवर ताबा मारला आहे.सिंधू संस्कृती मधील आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त
असणारी स्त्री “नेऋती” हिला विष्णू पत्नी लक्ष्मीचे नाव देऊन सिंधू
संस्कृतीवर ताबा मारला आहे.परंतु या सर्व गोष्टींचा आभ्यास करून बाबासाहेब
आंबेडकर यांनी सिंधू संस्कृतीला उजाळा देण्यासाठी गौतमी पुत्र सिद्धार्थ
यांनी प्रस्थापित केलेला आधुनिक विचार म्हणजे बौध्द धम्म याचा आभ्यास करून
आधुनिक भारत घडविण्यासाठी ज्या जाती जमाती यांनी कार्य केला अशा जाती जमाती
बामणी व्यावस्थेने अविकसित ठेवल्या अशा लोकांना “आरक्षण” विषय निर्माण
करून पुन्हा एकदा आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांना स्वतंत्र भारतात
संरक्षण देऊन हक्क व अधिकार दिले.मानव कल्याणकारी विज्ञानवादी असणारा विचार
म्हणजे बौध्द धम्म स्वीकारून पुन्हा एकदा भारत देशाची वाटचाल आधुनिक
भारताकडे केली.हा धम्म संपूर्ण भारतात पोहचविण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर
यांना पुरासा वेळ मिळाला नाही आणि ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचे
महापरिनिर्वाण झाले.त्यांनी निर्माण केलेले साहित्य नष्ट करून काही
साहित्यात बदल करण्याचे कटकारस्थान काही शिक्षित वर्गाला बरोबर घेऊन या
बामणी व्यावस्थेने केले आहे.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेत
असतांना इथला संघर्षवादी महार समाजाचे अस्तित्व अबाधित राहण्यासाठी “महार
रेजिमेंट" पुन्हा स्थापित करून भारतीय सेनेत जिवंत ठेवली आहे.परंतु आधुनिक
विचार म्हणजे बौध्द धम्म संपविण्यासाठी इथली व्यावस्था कार्यरत झालेली
होती.या बौध्द धम्म व्यवस्थेत काही त्यांचे दलाल निर्माण करून “महार
अस्तित्व” संपविण्यासाठी हा बौध्द धम्म बदनाम करण्याचे कटकारस्थान झाल्याचे
आता समोर आलेले आहे.बाबासाहेबांनी भारताच्या प्रत्येक नागरिकांना न्याय
मिळण्यासाठी नागरी हक्क संरक्षण कायदा निर्माण केला होता परंतु केवळ
“महार” अस्तित्व संपविण्यासाठी “महार” शब्दाचा उच्चार जातीयवादी व्देष असा
करून साल १९८९ ला अक्ट्रोसिटी कायद्याची निर्मिती केली आहे.त्यामुळे आज
आम्ही बौध्द जरी असलो तरी आमचे ऐतिहासिक अस्तित्व हे “महार” आहे जो या
देशाच्या प्रशासन व्यावस्थेचा मुख्य घटक आहे.आणि तेच अस्तित्व अबाधित
राहावे म्हणून दरवर्षी आपण १ जानेवारीला भीमा कोरेगावला महार योद्ध्यांना
मानवंदना द्यायला जात असतो.
मित्रहो हाच खरा इतिहास आहे आणि जो आभ्यास करेल,इतिहासाचे संशोधन करेल त्याच्या समोर हा इतिहास येईल.त्यामुळे ज्याला विरोध करायचा असेल त्याने पहिला ह्या सर्व बाबी तपासल्या पाहिजे आणि जेव्हा तो तपसेल तेव्हा तो या इतिहासाचे समर्थन करेल आणि आधुनिक भारताच्या वाटचालीमध्ये आपले योगदान निश्चित करेल…..!
धन्यवाद
राजेश खडके
समन्वयक सकल मराठी समाज
मित्रहो हाच खरा इतिहास आहे आणि जो आभ्यास करेल,इतिहासाचे संशोधन करेल त्याच्या समोर हा इतिहास येईल.त्यामुळे ज्याला विरोध करायचा असेल त्याने पहिला ह्या सर्व बाबी तपासल्या पाहिजे आणि जेव्हा तो तपसेल तेव्हा तो या इतिहासाचे समर्थन करेल आणि आधुनिक भारताच्या वाटचालीमध्ये आपले योगदान निश्चित करेल…..!
धन्यवाद
राजेश खडके
समन्वयक सकल मराठी समाज
Tuesday, December 4, 2018
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त माझे दोन शब्द....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज
मित्रानो आपणा सर्वांना जय भीम
आज
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आहे.प्रथम डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त कोटी कोटी प्रणा....! यांना
प्रणाम करीत असताना मला छत्रपती शिवराय यांच्या
महापरिनिर्वाण दिनाची आठवण झाली म्हणून मी ती तुम्हाला सांगू इच्छितो.रयत
आणि समाज जसे नेतृत्व चालवत असते तसे ते चालत असते.त्या समजाचे नेतृत्व
किंवा त्या रयतेचा राजा चांगला असेल तेथील प्रजा त्या राजाने किंवा त्या
नेतृत्वाने दाखविलेल्या मार्गावर चालत असते फक्त त्यासाठी सहकारी चांगले
असणे गरजेचे आहे.परंतु छत्रपती शिवराय यांच्या व्दितीय पत्नी महाराणी सोयरा
बाई साहेब यांना स्वार्थ भावनेने पछाडलेले होते त्यांच्या मनात त्या भावना
उत्पन्न करण्याचे कार्य छत्रपती शिवराय यांचे मंत्रीमंडळात असणारे वैदिक
धर्म पंडितांनी केले असल्याचे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे.त्यामुळे एवढ्या
मोठ्या राजाला अग्नी न मिळता भडाग्नी देण्यात आला होता.अशाच प्रकारे
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचीही हीच अवस्था झाली होती.
छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर त्यांना त्यांचे पुत्र शाहू यांचेकडून
अग्नी मिळाला नाही परंतु महार योध्यानी त्यांचेवर अंत्यसंस्कार केल्याचे
जवळ जवळ आता समोर आले आहे.त्यामुळे हा एक बामणी कावा होता हे सिद्ध झाले
आहे.
रयतेसाठी काम करणाऱ्या महापुरुषांचा नशिबी याच गोष्टी या
बामणी व्यावस्थेने केल्या आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी अहोरात्र कष्ट करून
संविधान दिले.आणि मानवी जीवनाचा उध्दार व्हावा म्हणून इथल्या भारतीयांना
मानवी मुल्ये जपणारा विचार म्हणजे बौध्द धम्माची जान करून दिली.बौध्द धम्म
काय आहे हा सोप्या भाषेत भारतीयांना कळावा म्हणून २२ प्रतिज्ञा त्यांनी
तयार करून त्या मी म्हणून लाखो लोकांच्या समोर त्यांनी घेतल्या आहेत.त्याचे
अनुकरण त्याकाळी त्यांच्या अनुयायांनी केले आहे.या बौध्द धम्माचे आचरण
पद्धत आणि त्याचे अनुकरण कसे करायचे हे सांगायच्या आतच
डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे छत्रपती शिवराय यांचे प्रमाणे महापरिनिर्वाण झाले.त्यांच्या मृत्यूचे
कारण आजही त्यांच्या अनुयायी यांना अधिकृत कळाले नाही.त्याकाळी
त्यांच्या मृत्यूचे कारण कळावे यासाठी मोठा संघर्ष पुढे उभा राहिला.परंतु
डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले असल्यामुळे त्यांची समाधी दिल्ली
येथे होणे गरजेचे होते.कारण ते जागतिक कीर्तीचे नेते होते.परंतु तसे न होता
त्यांना मुंबई येथे घेऊन जावे असे कोणी सांगितले यांचे स्प्ष्टीकरण होत
नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे पार्थिव देह दिल्लीहून मुंबईत कसे आणायचे असा प्रश्न त्यांच्या
कुटुंबियांना सोडवावा लागला आहे.मुंबईत त्यांचे पार्थिव देहावर
अंत्यसंस्कार कुठे कारावे यासाठी संघर्ष करावा लागला आहे.शासनाने राष्टीय
सन्मान करणे अपेक्षित होते पण तो झाला नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या मृत्यूला कारणीभूत इथला बामणी कावा होता हे आता जवळ जवळ सर्वश्रुत
झाले आहे.परंतु त्यांनी दिलेला बौध्द धम्म की धर्म या मध्ये त्यांचे
अनुयायी अडकले गेले आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सोप्या भाषेत दिलेल्या २२ प्रतिज्ञा कोणी समजून
घ्यायला तयार नाही.त्यांनी दिलेली समता प्रस्थापित करण्यासाठी कोणी पुढे
यायला तयार नाही.त्यांनी दिलेले विचार जनमाणसात घेऊन जायला कोणी तयार
नाहीत.जातीवादी शक्तीना आणि संविधान वाचवायला प्रत्यक्षपणे पुढे कोणी यायला
तयार नाही.जो तो या सर्व गोष्टींचे राजकारण करू पहात आहे असे स्पष्टपणे
जाणवत आहे.
असो या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एक संकल्प करूयात
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यात घेऊयात आणि मानव जातीच्या उद्धारासाठी एकत्र येऊयात...!Saturday, October 27, 2018
Friday, October 19, 2018
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात “आम्ही” या शब्दाचा ....तर बौध्द धम्म स्वीकारताना “मी” या शब्दाचा प्रयोग केला आहे.........!
विषय असा आहे की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशातील
प्रत्येक नागरिकांना भरभरून दिलेले आहे.खरा भारत घडविण्याचे कार्य त्यांनी संत
कबीर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून केले आहे. संत कबीर यांच्या
वारकरी सांप्रदाय यांच्या माध्यमातून खरा “बुध्द” समजून घेतला आहे तर महात्मा
ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून समतावादी स्वराज्य आणि समतावादी बुध्द छत्रपती
संभाजी महाराज समजून घेतले आहे.त्यामळे शेतकरी,कष्टकरी,स्त्री संरक्षण आणि इथला
निवासी समजून घेतला आहे.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंधू संस्कृती पासून
ते पेशवाई पर्यंत चांगला आभ्यास झालेला होता म्हणून त्यांच्या लक्षात आले की,खरा भारत घडवायचा असेल तर
पुन्हा येथे सिंधू संस्कृती प्रस्थापित केली पाहिजे.म्हणजे इथली शेती विकसित केली
पाहिली,इथली रुपयाची समस्या सोडविली पाहिजे.कष्टकरी कामगार यांचे शोषण थांबविले
पाहिजे.इथली जातीय व्यवस्था नष्ट केली पाहिजे थोडक्यात काय तर “समता” प्रस्थापित
केली पाहिजे....हाच खरा “बौध्द” भारत असेन तो मला घडवायचा आहे.म्हणून डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी बौध्द धम्माची दीक्षा स्वत: घेतली आहे.संविधानात डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी “आम्ही” शब्द वापरला आहे.आणि बौध्द धम्माची दीक्षा घेत असताना “मी”
शब्द वापरला आहे हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे “बौध्द” हा धर्म नसून
गौतमी पुत्र सिध्दार्थ यांनी सिंधू संस्कृती समोर ठेऊन दिलेले विचार आहे.आणि ते
विचार आपल्या पर्यंत पोहचावे आणि इथला “मानव” विकसित व्हावा यासाठी त्यांनी “पाली”
भाषेत बुध्द वंदना विकसित केली आहे.त्यामुळे बौध्द विचार हे केवळ मानवाचे कल्याण
करणारा विचार आहे.आणि हेच विचार “मी” पाळीन यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:
बावीस प्रतिज्ञा तयार करून त्या लाखो जन समुदायी यांच्या समोर घेतल्या आहेत.परंतु
काही अज्ञानी व्यक्तींनी या बौध्द विचारांना धर्माचे स्वरूप दिलेले आहे.जर बौध्द
हा धर्म असता तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “मी” शब्दाचा वापर केला नसता त्यानी “आम्ही”
या शब्दाचा वापर केला असता हे आपण का लक्षात घेत नाही.कारण संविधानात सर्व
भारताच्या नागरिकांना गृहीत धरून “आम्ही” या शब्दाचा प्रयोग डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांनी केला आहे.परंतु येथे त्यांनी “मी” शब्द वापरून स्वत:ने या मानव कल्याणाची जबाबदारी
घ्यावी असे संकेत दिलेले आहे.
Thursday, October 11, 2018
डॉ बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माफ करा...! तुम्ही दिलेली समता आम्ही प्रस्थापित करू शकलो नाही...! तुम्हाला राष्ट्रध्वज तिरंगा अर्पण करू शकलो नाही..!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले ते चौथी शिक्षण स्वराज्यातील सातारा गादीचे
छत्रपती प्रतापसिंह भोसले यांनी स्थापन केल्या शाळेमध्ये झाले आहे.पत्रकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “मूकनायक” हे वृत्तपत्र काढून समाज
प्रबोधन केले तेव्हा त्यांचे कौतुक करण्यासाठी स्वराज्यातील कोल्हापूर गादीचे
आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक करून त्यांचे समवेत जेवण करून
सर्वोतोपरी सहकार्य केले.अशा प्रकारे इतिहासाचे जाणकार असणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समतावादी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
माध्यमातून समतावादी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजला त्यामुळे त्यांना
“बुध्द” समजले.बुध्द समजल्यामुळे डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांना वारकरी
सांप्रदाय समजाला आणि या सर्वांचा शोध म्हणून तीन दिवस त्यांनी सिंहगडावर मुक्काम
केला.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना “तुळापुर” आणि
“वढू बुद्रुक” चा इतिहास समजला.छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येमुळे त्यांना
“मनुस्मृती” समजली.”मनुस्मृती” समजल्यामुळे भीमा कोरेगावची लढाई समजली.यासर्व
गोष्टी समजल्यामुळे त्यांना सिंधू संस्कृती समजली आणि सिंधू संस्कृती समजल्यामुळे
प्राचीन भारत देश समजला आणि त्यातील कृषी संस्कृती समजली.कृषी संस्कृती
समजल्यामुळे त्यांनी “रुपयाची समस्या” हा
प्रबंधक” लिहिला.त्यामुळे भारत देश
कसा घडवावा लागेल हे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे “नदीजोड प्रकल्प” राबविण्यावर
त्यांचा जोर होता आर्थिक नीती कशी असावी हे त्यानी ठरविले होते.परंतु या सर्व
गोष्टी करायला अडचण काय....? तर त्याचे उत्तर त्यांना मनुस्मृतीच्या माध्यमातून
मिळालेच होते.त्यामुळे इथला “कर्मकांड” व “मनुस्मृतीचा कायदा” आणि हे सर्व
राबविणारी इथली पेशवाईतील “मनुवादी व्यावस्था” ह्या सर्व जबाबदार आहेत हे
त्यांच्या लक्षात आले होते.म्हणजे एकंदरीत या सर्वांचा शत्रू एकच आणि तो म्हणजे
“विषमता” आणि ही विषमता मनुवादी व्यवस्थेने प्रत्येक क्षेत्रात पेरून ठेवलेली आहे.
त्यामुळे त्यानी इतिहास पूर्णपणे समोर न आणता त्याकडे इशारे देत त्यानी त्यांचे
कार्य सुरु करण्याचे ठरविले होते.छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतल्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे गुरु संत कबीर व महात्मा
ज्योतिबा फुले यांचे विचारावर कार्य करण्याचे ठरविले.मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात
कोणतेही पाठबळ नसताना एकटा माणूस बौध्द विचार घेऊन तसेच सम्राट अशोकाचे बौध्द
साम्राज्य डोक्यात ठेऊन देश घडवायला निघाला होता.इथला अस्पृश्य यांचा लढा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेसाठी क्षम्य होता....त्यांचा खरा लढा
होता तो मनुवादी व्यवस्थेच्या विरोधातील “भारत देश” आणि त्या दिशेने त्यांनी आपली
पावले टाकली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पूर्णपणे लढा समजला होता त्याचे स्वरूप त्यांना
समजले होते म्हणून त्यानी भारत देश जर घडवायचा असेल तर “समता” केंद्रस्थानी ठेवली
पाहिजे.आणि जो पर्यंत “समता” या भारत देशात प्रस्थापित होणार नाही तो पर्यंत भारत
देश घडविला जाणार नाही याची पूर्ण जाण डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांना झाली होती.आणि इतिहासात हीच “समता”
प्रस्थापित व्हावी यासाठी शंभूराजे यांनी शाख्य कुलीन शाक्त पंथ स्वीकारून वयाच्या
चौदाव्या वर्षी म्हणजे १६७१ मध्ये विद्वान हा नेहमी भूषणावह असतो असे मान्य करून
“बुधभूषण” नावाचा ग्रंथ लिहून “प्रकांड पंडित” म्हणून उदयास आले.अशा शंभूराजे
यांचे सांगण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी वैदिक धर्मानुसार ६ जून १६७४
मध्ये केलेला पहिला राज्याभिषेक नाकरून तीनच महिन्यात २४ सप्टेंबर १६७४ मध्ये
शाक्त पंथानुसार दुसरा राज्याभिषेक करून “शाक्त पंथाला” राजाश्रय दिला होता
त्यामुळे चिडून जाऊन वैदिक धर्म पंडितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची हत्या
घडविली.परंतु अंत्यसंस्कार त्यांचेवर माना सन्मानाने झाले नाहीत.त्यानंतर स्वत:
शंभूराजे यांनी स्वत:चा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार नुसार करून ते छत्रपती संभाजी
महाराज झाले.ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली गौतमी पुत्र सिध्दार्थ यांना सत्याचा बोध
झाला अशा बोधीसत्व वृक्षाच्या पानाची “राजमुद्रा” तयार करून “समता” प्रस्थापित करण्याचे कार्य स्वराज्यात
जोरात सुरु केले.त्यामुळे वैदिक धर्म पंडितांचा विषमतावादी “वर्णाश्रम धर्म”
धोक्यात आल्याची त्यांना जाणीव झाली,त्यामुळे त्यानी मोगलाईला हाताशी धरून तुळापुर
येथे “मनुस्मृती” प्रमाणे हत्या करून समतावादी स्वराज्य दाबण्यासाठी पेशवाईचा पाया
रचला.औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या शंभूराजे पुत्र शाहू महाराज यांनी वढू येथील
छत्रपती संभाजी महाराज यांची ज्यांनी अंत्यसंस्कार करून समाधी उभारली त्यांना काही
गावे इनामे देऊन त्यांचा सन्मान केला.परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचे
अंत्यसंस्कार मानसन्मानाने मनुवादी व्यवस्थेने होऊ दिले नाही.छत्रपती शिवराय यांचे
गुरु संत तुकाराम महाराज यांनीही समतावादी स्वराज्य उभारणीत मोठे योगदान दिले
असल्यामुळे त्यांचेही अंत्यसंस्कार मानसन्मानाने मनुवादी व्यवस्थेने होऊ दिले
नाहीत.त्याच प्रमाणे डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांचे गुरु
महात्मा ज्योतिबा फुले यांनी समतावादी राज्याभिषेक डोळ्या समोर ठेऊन २४ सप्टेंबर
या समतावादी राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले यांनी २४
सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून समतावादी समाज निर्माण केला.त्यामुळे
या मनुवादी व्यवस्थेने त्यांचेही अंत्यसंस्कार मानसन्मानाने होऊ दिलेले नाहीत.आणि
या सर्व गोष्टीची साक्ष इतिहास आपल्याला देत आहे.अशा या २४ सप्टेंबर समतावादी राज्याभिषेक
दिनाचे आणि सत्यशोधक समाज स्थापनेचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “समता” प्रस्थापित करण्यासाठी प्रथम समतेचे संरक्षण
व्हावे हा दृष्टीकोन ठेऊन २४ सप्टेंबर १९२४ मध्ये “समता सैनिक दल” स्थापन केले
आहे.या समता सैनिक दलाच्या सदस्यांना आदर्श अशी आचारसंहिता देऊन डॉ बाबासाहेब आंबेडक यांनी समतावादी छत्रपती संभाजी महाराज यांच्या
हत्येचा बदला स्वराज्याचे सरदार सिद्धानाक महार यांनी भीमा कोरेगाव येथे घेऊन
जातीयवादी पेशवाईचा अंत केला.अशा शूर वीरांना भीमा कोरेगाव येथे येऊन त्यांना
मानवंदना करून भीमा कोरेगाव येथून ७ कि.मी.वर असलेल्या वढू ब्रुद्रुककडे हात करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी असे उद्गार काढले आहेत की.”जो इतिहास
वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाही” म्हणून इतिहासाकडे आपले लक्ष वेधले
आहे.”समता” प्रस्थापित करायची असे ठरविलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीने लादलेला सप्तबंदीचा कायदा मोडीत
काढण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी केला आहे.स्वराज्याची राजधानी
असलेल्या राजगडाच्या परिसरात मनुस्मृतीचे दहन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेच्या विरोधात समतेचे पाऊल टाकून मनुवादी
व्यवस्थेला मोठा हादरा डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला
होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या लढ्याची प्रचीती म्हणून ब्रिटीश सरकारने
भारताला स्वातंत्र्यता देण्याचे पहिले पाऊल म्हणून “गोलमेज परिषद” स्थापन करून
भारताचा लोकव्यावस्थेचा आढावा घेण्यासाठी इथल्या भारतीय निवासी यांना न्याय
देण्यासाठी “सायमन कमिशन” भारतात पाठविले होते.परंतु इथल्या काँग्रेसी मनुवादी
व्यावस्थेने सायमन कमिशनला विरोध केला होता.सायमन कमिशन भारतातून इंग्लंड मध्ये
गेल्यावर १९३० मध्ये ब्रिटीश सरकारने भारत स्वतंत्र करणार असल्याचे जाहीर करून
इथल्या जनगननेनुसार राजव्यास्थेमध्ये भागीदारी कशी असावी यासाठी गोलमेज
परिषेदेच्या बैठीकीचे आयोजन १९३१-३२ मध्ये केले.मोहन करमचंद गांधी यांचे
निकटवर्तीय पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर येथे २६ जानेवारी १९३० मध्ये
कॉंग्रेसचा झेंडा फडकाऊन भारत देशाचा स्वातंत्र दिवस साजरा केला आहे. डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय
लोकांचे गोलमेज परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करून त्यांची भागीदारी कशी राहील याची
मांडणी १९३१ च्या पहिल्या जनगननेनुसार केली होती.परंतु कॉंग्रेसचे नेते मोहन
करमचंद गांधी यांनी डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांच्या
नेतृत्वाला कडाडून विरोध केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटीश सरकारकडी मगासवर्गीयांची
मांडलेली भागीदारी कॉंग्रेसला मान्य झाली नाही.त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मागणी पूर्ण करू नये अशी भूमिका घेऊन संपूर्ण देश
पेटविण्याची भाषा करून गोलमेज परिषदेतून निघून भारतात आले.भारतात आल्यावर ब्रिटीश
सरकार यांनी गांधीना अटक करून पुणे येथील येरवडा कारागृह येथे ठेवले.अहिंसेचा
प्रचार करणाऱ्या गांधी यांनी येरवडा कारागृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधात स्वत:ची हत्या करण्याचे हिसंक आंदोलन
म्हणजे “प्राणांतिक उपोषण” सुरु केले.डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचेवर
मनुवादी कॉंग्रेसकडून जीवघेणे हल्ले सुरु झाले.काँग्रेसी मनुवादी षडयंत्राला डॉ बाबासाहेब आंबेडकर झुकले नाहीत.हे पाहून मनुवादी कॉंग्रेसने
मागासवर्गीय समाजावर हल्ले करून हिंसा रुजविण्याचे कार्य जोरात सुरु केले समाजाची
हानी होणार हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आले.आपली
मागणी इथल्या मागासवर्गीय समाजाच्या मानव उद्धारासाठी आहे त्याचा उपभोग घ्यायला जर
तोच समाज जिवंत नसेल तर काय उपयोग होणार याची जाणीव करून २४ सप्टेंबर १९३२ मध्ये
“पुणे करार” झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यातून प्रथम समाजासाठी अश्रू आले आणि ते
म्हणजे पुणे करारावर स्वाक्षरी करीत असताना.अशा प्रकारे स्वतंत्र झालेल्या भारताचा
मोहन करमचंद गांधी यांनी पुन्हा मनुवादी कॉंग्रेसला हवा असलेला लढा सुरु केला आणि
तो लढा म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर विरुध्द गांधी असा होता
आणि तो गांधींच्या मृत्यू पर्यंत चालला.यातच १९३५ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या धर्मात कर्मकांडाला महत्व दिले जाते माणूस
म्हणून कोणाला पाहिले जात नाही अशा धर्मात राहणार नसल्याचे जाहीर केले होते ते
योग्य वेळेचे आणि संधीची वाट पहात होते.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला
होता औपचारिक राष्ट्रपती म्हणून डॉ राजेंद्र प्रसाद यांनी तर प्रधानमंत्री म्हणून
गांधीचे निकटवर्तीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कारभार हाती घेतला होता.स्वतंत्र
भारताची राजघटना लिहिण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील ८ विद्वान
व्यक्तीना पत्र लिहिली परंतु सर्वानी असमर्थता दर्शविली.तेव्हा त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना स्वातंत्र भारताची राज्यघटना लिहावी
म्हणून निमंत्रित केले.डॉ
बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र
भारताचे पहिले “कायदामंत्री” झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून स्वत:च्या
तब्येतीची कोणतीही तमा न बाळगता या स्वतंत्र भारताच्या नागरिकाला न्याय देण्यासाठी
अतोनात कष्ट केले आहे.स्वतंत्र भारतात स्त्रीला हक्क व सन्मान मिळावा म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यसभेत १९५२ मध्ये “हिंदू कोड बिल”
सादर केले ते मान्य केले नाही म्हणून त्यांनी राजीनामा देऊन ते बाहेर पडले. डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रबंधकांवर भारतीय रिजर्व बँक स्थापन झाली आहे.कामगार जो उपभोग घेत आहे तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्टावर घेत आहे.स्त्रीला जो हक्क
अधिकार प्राप्त झाला आहे तो डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या
कष्टाचे फलित आहे.स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरिक स्वत:ला सुरक्षित जो समजतो तो त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसारच...त्यानी या भारतातील प्रत्येक
नागरिकाला दिलेल्या नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार परंतु या कायद्याला बगल
देण्याचे कार्य इथल्या काँग्रेसी मनुवादी व्यावस्थेने केले आहे हेही आपण याठिकाणी
लक्षात घेतले पाहिजे.”समता” प्रस्थापित करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अतोनात कष्ट केलेले आहे.१९३५ साली ज्या धर्मात
कर्मकांडाला महत्व दिले जाते माणूस म्हणून कोणाला पाहिले जात नाही अशा धर्मात
राहणार नसल्याचे जाहीर केल्याप्रमाणे डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर
येथे १४ आक्टोंबर १९५६ साली बौध्द धम्माची दीक्षा घेऊन बौध्द विचारांच्या
व्यक्तीसाठी २२ प्रतिज्ञा डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी विकसित
करून दोनच वर्षात संपूर्ण भारत बौध्दमय करीन म्हणजे विद्वान लोकांचा देश असल्याचे
जाहीर करीन अशी घोषणा केली.कारण बौध्द याचा अर्थ विद्वान असा होतो म्हणून शंभूराजे
यांनी १४ व्या वर्षी विद्वान हा भूषणावह असतो असे म्हणून “बुधभूषण” नावाचा ग्रंथ
लिहिला आणि त्याच विद्वान लोकांचे साहित्य निर्माण करणारी “बुध्दभूषण” नावाची
प्रिटींग प्रेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारली होती.छत्रपती
संभाजी महाराज यांनी सिंधू संस्कृतीच्या स्त्री शक्तीला व गौतम बुद्धांना प्रमाण
मानून शाक्त पंथ पद्धतीत स्वत:चा राज्याभिषेक करून बोधीसत्व वृक्षाच्या पानावर
राजमुद्रा काढून समतावादी राज्य निर्माण केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारत देशाची वाटचाल
समतेच्या दिशेने नेली आहे.आणि त्यासाठी बौध्द विचारांच्या व्यक्तीला २२
प्रतिज्ञाच्या माध्यमतून सिंधू संस्कृती देऊन त्या २२ प्रतिज्ञा मधील १० वी
प्रतिज्ञा ”मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीन” अशी दिली.त्यामुळे मनुवादी
व्यावस्था हादरून गेली “समता” प्रस्थपित झाल्यास आपली मनुवादी व्यवस्था आणि धर्म
व्यवस्था अडचणीत येईल त्यामुळे डॉ
बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी
दिलेले विचार राहिले नाही पाहिजे.जसे छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज
यांची हत्या घडवून त्यांचे विचार दाबले गेले त्यांचेवर अंत्यसंस्कार मानासन्मानाने
केले नाही.त्यांचे विचार बराच काळ दडवून राहिले.त्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा घात झाला दिल्ली येथे रहात्या घरी ६
डिसेंबर १९५६ रोजी डॉ बाबासाहेब
आंबेडकर रात्री झोपल्या
नंतर ते सकाळी उठलेच नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचेही असेच झाले त्यांना तर
अग्नीही दिला गेला नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू संशयित ठरला त्यांचे
पोस्टमार्टम त्याकाळी मनुवादी यांनी होऊ दिले नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळ त्यावेळी कोणी विश्वासू व्यक्ती नव्हता.त्यांच्या
महापरिनिर्वाणाची खबर वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरली दु:खाचे डोंगर सर्वावर
कोसळले होते.भारत देशाचे तत्कालीन प्रधानमंत्री कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
पंडित जवाहरलाल नेहरू डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचे घरी आले
त्यांनी त्यांचे दर्शन घेतले.त्यांचेवर दिल्ली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्याचे आदेश त्यांनी शासन व्यवस्थेला दिले नाही त्यानी दर्शन घेतले व ते निघून
गेले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव देहावर
कुठे अंत्यसंस्कार करायचे काही ठरले नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर हे मुंबई
येथील राजगृही होते.डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांचे नातू
प्रकाश आंबेडकर २ वर्षाचे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त या देशाला आणि इथल्या नागरिकांना
न्याय देण्यासाठी आपले जीवन वेचले होते स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठी
त्यांनी कधी पैसे कमाविले नाही त्यांनी त्यागच केला आहे.त्यामुळी आता दिल्ली मधून
पार्थिव देह मुंबईत कसे आणायचे विमानाची तजवीज कशी करायची आणि तजवीज केली तर त्या
विमानाचे भाडे कसे द्यायची कोण जाणे त्या सूर्यपुत्राने म्हणजे भैय्यासाहेबानी काय
तजवीज केली असेल विमानाने डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव
देह मुंबईत आणले गेले.ज्या भारताचे घटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतो अशा भारत देशात स्वत:ची सेना
असताना त्या सेनेची विमाने असताना,हेलिकॉप्टर असताना कोणतीही तजवीज या भारत
देशाच्या राजकीय व्यवस्थेने आणि प्रशासन व्यवस्थेने केली नाही ही या देशातील
प्रत्येक नागरिकाची शोकांतिका आहे.मुंबईत राजगृहावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव देह आणल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार
करण्यासाठी कोठेही जागा उपलब्ध होऊ शकली नाही.शासकीय इतमामाची कोणतीही तयारी
नव्हती सामन्य व्यक्ती मृत्यू पावल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे
देशाच्या घटनाकार डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांना तिरंगा
ध्वज अर्पण करण्यात आलेला नव्हता.राजगृहामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनीच स्थापन केलेला शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा
ध्वज अर्पण करण्यात आलेला होता.खूप वाद झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईत त्यांना जागा
उपलब्ध झाली.त्यामुळे अशा घटनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही राष्ट्रध्वज तिरंगा देऊ शकलो नाही त्यांचेवर
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करू शकलो नाही म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माफ करा तुम्ही दिलेली समता आम्ही प्रस्थापित करू
शकलो नाही.
धन्यवाद
राजेश
नारायण खडके
समन्वयक सकल मराठी समाज
मो.नं.९८८१७९५३०७
Subscribe to:
Posts (Atom)