Wednesday, January 3, 2018

आम्ही समतावादी स्वराज्यातील मराठी सरदारच.....कोणीही आमचा इतिहास बुजवू शकत नाही....! आता तरुण आपल्या पूर्वजांचा इतिहास शोधत आहे....! गोविंद महार झिंदाबाद - झिंदाबाद – झिंदाबाद......! सिद्धनाक महार झिंदाबाद - झिंदाबाद – झिंदाबाद......! डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.....!

आम्ही समतावादी स्वराज्यातील मराठी सरदारच.....कोणीही आमचा इतिहास बुजवू शकत नाही....! आता तरुण आपल्या पूर्वजांचा इतिहास शोधत आहे....!
गोविंद महार झिंदाबाद - झिंदाबाद – झिंदाबाद......!
सिद्धनाक महार झिंदाबाद - झिंदाबाद – झिंदाबाद......!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.....!
राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी समाज
समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी जिजाऊ प्रकाशन यांचे वतीने प्रकाशित केला आहे.त्यास मान्यता युगपुरुष खेडेकर साहेबानी दिली आहे.मला त्यांचे कौतुक करावेसे वाटते कारण त्यांनी खुल्या मनाने सांगितले आहे आणि त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की,संभाजी महाराज यांची स्वराज्यात ३८ दिवस धिंड काढून मनुस्मृती प्रमाणे हत्या करण्यात आली.अस्पृश्य महार गोविंद गोपाळ महार (गायकवाड) याने त्यांचे तुकडे गोळा करून आपला भाऊबंद मेला असे सांगून आपल्याच महार वाड्यात संभाजी महाराजांचा अंत्यविधी केला.त्या गोविंद गोपाळ महार यांची समाधी नंतरच्या काळात त्याच महार वाड्यात उभारलेली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात अस्पृश्य शब्दाला थारा नव्हता.कारण त्यांचे मराठी सरदार यांच्यामध्ये महार योद्धे भरपूर होते....आणि तिसरे छत्रपती शाहू महाराज यांचा महार योध्दा मराठी सरदार सिद्धनाक महार याने स्वराज्यातील २५० सरदार यांचे प्रत्येकी १०० ठोकाळ गडी घेऊन वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी संकल्प करून भीमा कोरेगाव येथे ५०० महार सैनिका सोबत दुसरा बाजीराव पेशवा आणि त्याचा सरदार बापू गोखले यांचे विरुध्द युध्द करून त्यांचा पराभव केला आणि बापू गोखले याला याच महार योद्ध्यानी आडवा केला असल्याचा इतिहास सांगत आहे.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव याठिकाणी जाण्या अगोदर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले होते.१९२७ मध्ये भीमा कोरेगाव याठिकाणी त्यांनी त्या स्वराज्याच्या महार शूर वीरांना सलामी देऊन १९२७ मध्येच स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात मनुस्मृती दहन केली आहे....आणि त्यांनी असे उद्गार काढले आहे की “जो इतिहास वाचणार नाही,तो इतिहास घडविणार नाही” यांचे संकेत काय आहेत.ज्या महार सैनिकांच्या स्मरणार्थ विजयस्तंभ उभारला त्याच महार सैनिकांना ब्रिटीशानी सेनेत घेणे बंद केले होते.त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटीशा विरोधात संघर्ष करून त्यांना असे सुनावले की “आमच्या पूर्वजांनी शिपाईगिरीच केली आहे.तेव्हा पुन्हा महार वीरांना ब्रिटिशांनी सेनेत घेण्यास सुरुवात केली.याचे संकेत काय आहेत हा विचार आपण का करीत नाही.

No comments:

Post a Comment