Sunday, January 14, 2018

छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या स्वराज्यात ३८ दिवस धिंड काढून झाली....तेव्हा तुझे पूर्वज काय करीत होते.....? याचे उत्तर तुझे तूच शोध अशी आज्ञा माता जिजाऊ यांनी मला केली आहे.




काल माता जिजाऊ यांची जयंती होती त्यांना मानाचा मुजरा घालून आम्ही तुळापुर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर गेलो. कारण सध्या मला खूप अस्वस्थ वाटत आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन संघर्षावर लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी संभाजीराजांची संघर्षगाथा (चित्रमय) हे पुस्तक लिहिले आहे.या पुस्तकाला पुरुषोत्तम खेडेकर यांनी मान्यता दिलेली आहे.गेल्या दोन वर्षापासून हे पुस्तक मी कित्येक वेळा वाचले असून आजही मला त्या पुस्तकातील संभाजीराजांच्या जीवन संघर्षातून बाहेर पडता येईना...! भीमा कोरेगाव येथील समतावादी विचारावर जी हल्ल्याची घटना घडली आहे...आणि त्या घटनेमागे जी दोन नावे पुढे आली आहे. त्यातील पहिले नाव आहे ते मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे आणि दुसरे नाव आहे ते मिलिंद एकबोटे यांच्या कार्याचा विचार केला तर हे लोक छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बदलू पहात आहेत.संभाजीराजे समतावादी असताना त्यांना संरमजामशाही पद्धतीत त्यांची वढू येथील समाधी ताब्यात घेऊन त्यांना धर्मवीर बनवून समस्त जाती धर्माचा अपमान करीत आहे.लेखक चंद्रशेखर शिखरे यांच्या पुस्तकातील लिखाण वाचल्यानंतर आणि त्यातील चित्र पाहिल्यानंतर मन अस्वस्थ झाल्याशिवाय रहात नाही.राहून राहून मला मन सारखे विचारते की शिवरायांनी  पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत करून समतापर्व सुरु केल्यामुळे  वैदिक धर्म पंडितांनी रजपूत बरोबर घेऊन छत्रपती शिवरायांची विषप्रयोग करून हत्या केली.तरीही आम्ही त्यांनी नाकारलेला राज्याभिषेक साजरी का....? करतो.मला त्याचे उत्तर सापडत नाही म्हणून मी अस्वस्थ झालो आहे.संभाजीराजानी स्वत:चा राज्यभिषेक शाक्त धर्म पद्धतीत करून शिवरायांच्या हत्या करणाऱ्यांना लोकशाही पद्धतीत देहदंडाची शिक्षा दिली.अशा समतावादी राजाची स्वराज्यातून ३८ दिवस धिंड काढीत असताना आमचे पूर्वज काय करीत होते...? असा प्रश्न मला सारखे माझे मन विचारीत आहे त्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे.माझे मन मला म्हणते तू हा प्रश्न इतिहासाला विचार तू गप्प बसू नको राजा आपला समतावादी विचारांचा होता आणि आहे त्याला धर्मवीर बनवू देऊ नकोस.लेखक चंद्रशेखर शिखरे म्हणतो की,छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे वैदिक धर्म पंडित आणि त्यांचे गुलाम रजपूत यांनी मिळून औरंगाजेबाच्या माध्यमातून केली आहे.असे असताना स्वराज्यातील आमचे पूर्वज काय करीत होते असे माझे मन मला सारखे विचारीत आहे त्यामुळे मला अस्वस्थ वाटत आहे.माझी अस्वस्थता कमी करण्यासाठी मी माता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा करून तुळापुर येथे गेलो ज्याठिकाणी संभाजी महाराज यांची हत्या झाली त्याठिकाणी जाऊन विचार केला.....भीमा भामा इंदायणी या नद्यांना प्रश्न केला की,तुम्ही समतावादी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मनुस्मृती प्रमाणे झालेल्या हत्येचे साक्षीदार आहात.तेव्हा तुम्ही मला खरे सांगा नेमके काय झाले....? त्यांनी मला असे सांगितले की,याचे उत्तर आम्ही तुला आता देऊ शकत नाही....कारण वैदिक धर्म पंडित आम्हाला तीन नद्यांचे संगम म्हणून तीर्थक्षेत्र घोषित करण्याच्या प्रयत्नात आहे.त्यामुळे तू राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांना जाऊन विचार ते तुला मार्गदर्शन करतील.तेव्हा मी माता जिजाऊ यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी भीमा भामा इंद्रायणी यांना नमन करून पुणे महानगरपालिकेने बांधलेल्या लाल महालाच्या प्रतिकृती मधील माता जिजाऊ यांना मानाचा मुजरा करण्यासाठी गेलो.आणि त्यांच्या चरणी नमन करून त्यांना विचारले की, माता छत्रपती शिवरायांनी जो पहिला राज्याभिषेक नाकरून संभाजीराजांच्या सांगण्यावरून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत केला आहे.आणि संभाजीराजांनी त्यांचाही राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत केला आहे तो तुम्हाला मान्य आहे काय...? तेव्हा माता जिजाऊ मला म्हणाल्या की तो राज्यभिषेक मला मान्य केला आहे...आणि छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या स्वराज्यात ३८ दिवस धिंड काढून झाली याबाबत माता जिजाऊ म्हणाल्या याचे उत्तर तूच शोध त्यामुळे मी त्यांना नमन करून उत्तर शोधण्यास निघालो आहे.


राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी समाज
 


No comments:

Post a Comment