Saturday, August 10, 2019
कलम ३७० रद्द परंतु पाक व्याप्त काश्मिरचे काय…? POK साठीचे बलिदानाचे काय..? राजेश खडके सकल मराठी समाज
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३७० ला विरोध केला होता हे सत्य आहे आणि कलम ३७० त्यांनी लिहिलेच नाही...जम्मू काश्मिरची जनता त्यावेळी भारतात यायला तयार होती...त्यामुळे कलम ३७० बनविण्याचा काहीही संबध नव्हता.परंतु त्यावेळी जे राजकारण झाले त्यामुळे कलम ३७० तयार झाले सुरुवातीला या कलमाला मोठ्या प्रमाणात विरोध झालेला होता.आज त्याला ७० वर्षे झालेली आहे.असे असताना आणि कलम ३७० मध्ये आता काही शिल्लक राहिले नव्हतेच कारण त्या कलमाला हळू हळू कमजोर करण्यात आलेले होते.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तो रद्द करणे सयुक्तिक नव्हते.त्याचे कारण असे की,आताच्या काळात काश्मिरी जनता मनापसून आणि बुद्धीपासून आपल्या भारत देशापासून तुटलेली होती दूर झालेली होती.त्यामुळे तेथील जनतेला विश्वासात घेणे अतिशय गरजेचे होते.परंतु जसे भाजपा सरकार आले आहे तसे इथला भांडवलशहा आणि धार्मिक व्यवस्था बळकटीकरण करणे संदर्भातील पावले उचलली जात आहे याचा अनुभव आता जवळ जवळ सगळ्यानाच होत आहे.कलम ३७० रद्द करीत असताना भाजप सरकारने पाक व्याप्त काश्मिरचा मुद्दां सोडून दिल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. केवळ आणि केवळ इथला भूमाफिया त्याठीकाणी प्रस्थापित करण्यासाठी आणि तेथील पर्यटन व्यवस्था ताब्यात घेण्यासाठी कलम ३७० रद्द करण्यात आलेले आहे.भारत हा सवैधानिक देश आहे तो जनमताचा आदर करीत असतो परंतु कलम ३७० रद्द करण्यासाठी ज्याप्रकारे अमलबजावणी करण्यात आली ती एक हुकुमशाही पद्धतीची अमलबजावणी होती असे स्पष्ट आपल्या समोर आलेले आहे.त्यामुळे कलम ३७० भारत देशाच्या दृष्टिकोनातून नुकसान दायक आहे कारण पाक व्याप्त काश्मिर हा प्रश्न आपण सोडला असल्याचा निर्णय आहे.परंतु यासाठी जे लाखो लोकांचे बलिदान गेले आहे त्याचा विचार या भाजप सरकारने केला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट म्हणणे आहे.त्यामुळे एक प्रकारची हुकुमशाही या देशात नांदायला सुरुवात झाली आहे काय…? आता असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment