डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्माची तीन तत्व सांगितलेली आहेत.
त्याचप्रमाणे प्रबोधनकार ठाकरे यांनी ब्राह्मणेतर देवता सांगून समतेचे भगवे निशाण म्हणजे स्वराज्याचा भगवा ध्वज सांगितलेला आहे.गौतमीपुत्र सिध्दार्थाने बौध्द धम्माची तीन तत्वे पाली भाषेत विकसित करून भगवे वस्त्र धारण करून भगवान गौतम बुध्द झालेले आहेत.
ज्यांना बौध्द धम्माचा आभ्यास आहे असी लोक हे तीन तत्वे कधीही नाकरू शकत नाहीत आणि बुध्दानी बौध्द धम्माची सांगितलेली तीन तत्वे कोणीही विसरू शकत नाहीत.या तीन तत्वांना आपल्या पर्यंत पोहचविणारे शिव शंभू फुले शाहू आंबेडकर आहेत.म्हणून बुध्द तत्वज्ञानानुसार हे आपल्यासाठी बुध्द आहेत आणि यांच्या विचारावर चालणारा हा बौध्द धम्म समतेच्या विचारांचा आहे.बौध्द धम्माला धर्मात रुपांतर केल्यामुळे हा विचार धर्म म्हणून एका वर्गापुरता मर्यादित होताना दिसत आहे.परंतु अभ्यासू आणि जाणकार मंडळी याच तत्वानुसार चालत आहेत.त्यातले जिवंत उदाहरण द्यायचे झाले तर मी शरद पवार यांचे देईन.काही लोकांना आश्चर्य वाटेन परंतु बौध्द धम्माचा अभ्यासू व्यक्ती वैचारिक पातळीवर मी मांडलेले माझे वैचारिक मत खोडू शकणार नाही याची मला खात्री आहे.
“शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा” हे बोध वाक्य आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच बौध्द धम्माच्या तीन तत्वानुसार दिलेले आहे आणि ते आपण सर्व भारतीयांनी स्वीकारलेले आहे म्हणून तर या भारतातील प्रत्येक व्यक्ती शिक्षण हक्कासाठी देशभर संघर्ष करताना दिसत आहे.इथल्या नागरिकासाठी विकास करणेसाठी आणि आपला हक्क मिळविण्यासाठी सत्ता हाती असणे गरजेचे आहे याची आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाण करून दिलेली आहे.आणि त्या तीन तत्वाचा अंगीकार केल्यास आपली हार कधीच होणार नाही,यासाठी ही तीन तत्वे आपण समजून घेतली पाहिजे.प्रत्येक अभ्यासू व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमासमोर ठेऊन आपली वाटचाल करीत असतो आणि त्यातील एक उदाहरण द्यायचे झाले तर मी शरद पवार यांचे देईन.सन २०१९ चा शरद पवार यांचा राजकीय आभ्यास केला तर तर त्यांनी विधानसभा निवडणुकीत पूर्णत: या तीन तत्वांचे पालन केले आहे असे मी मानतो.२०१९ चे त्यांचे कार्य खूप मोठे आणि मोलाचे होते आणि आहे असे स्पष्टपणे माझे मत आहे आणि कोणताही जाणकार व्यक्ती हे नाकारणार नाही.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही तीन तत्वे कोणती….? तर मी तुम्हास सांगतो आणि त्याचे वैचारिक विश्लेषणही देतो.शरद पवार हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.एक विचारांच्या वर्गाचा त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध असताना त्यांनी आपली वैचारिक पातळी कधीही ढासळू दिलेली नाही.आणि त्या विरोधात मोठ्या प्रमाणात ते उभे राहिलेले आहेत.आणि म्हणूनच एक अशी व्यावस्था आहे जी या महाराष्ट्रातील व्यक्तीला दिल्लीच्या तक्तावर बसून देत नाहीत असो.मग त्या तीन प्रमुख तत्त्वातील पहिले तत्व म्हणजे “बुद्धंम शरणं गच्छामी” असे आहे म्हणजे बुद्धांना शरण जा असे आपल्या स्वयं गौतम बुध्दानी सांगितलेले आहे.मग बुध्द म्हणजे कोण ज्याला सत्याचा ज्ञान प्राप्त झाले आणि त्यानी मानवकल्याणकारी धर्माचे पालन केले आहे.त्यामुळे शिव शंभू फुले शाहू आंबेडकर हे आपल्यासाठी बुध्द आहेत म्हणून आपण त्यांना शरण जातो आणि या बुद्धांच्या प्रतिमा आपल्याला बौध्द विहारात पाहायला मिळतात.दुसरे तत्वज्ञान म्हणजे “धम्मंम शरणं गच्छामी” धम्म म्हणजे चांगले विचार म्हणजे मानवकल्याणकारी विचार होय.गौतम बुद्धांच्या समतेच्या विचारांचे पालन याच बुध्दानी म्हणजे शिव शंभू फुले शाहू आंबेडकर यांनी केले असल्यामुळे आपण यांच्या विचरांना शरण जातो.आणि तिसरे तत्वज्ञान म्हणजे “संघम शरणं गच्छामी” म्हणजे संघ आणि संघ म्हणजे एकत्रितपणा चांगली समाजव्यवस्था उभारण्यासाठी आपल्यातली एकी फार महत्वाची आहे.चांगली समाजव्यवस्था किंवा एखादे चांगले कार्य करण्यासाठी एकत्र येणे सर्व समाजातील लोकांना एकत्रित आणून शिव शंभू फुले शाहू आंबेडकर यांनी चांगले कार्य केलेले आहे.म्हणून यांनी उभारलेल्या संघाला आपण सर्व शरण जातो.जो या तीन तत्वाला शरण गेला तो नेहमी यशस्वी झालेला आहे.
हेच विचार समोर ठेऊन शरद पवार यांनी शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आणि इतर यांना एकत्रित आणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले स्वराज्याचे संविधान डोळ्यासमोर ठेऊन भाजपाच्या विरोधात लढा उभा केला आणि तो भारतीय संविधानाला समोर ठेऊन २६ नोव्हेंबर या दिवसांचे औचित्य साधून शिव शंभू फुले शाहू आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर “महाविकास आघाडी” स्थापन करून याचे नेतृत्व शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले आहे.
त्यामुळे हे तीन तत्व किती महत्वाचे आहेत याची पुन्हा आठवण शरद पवार यांनी आपल्याला या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून करून दिलेली आहे. म्हणून मी स्पष्टपणे म्हणतो “बौध्द धर्म नसून धम्म” आहे.म्हणून बौध्द धम्मीय लोकांचे आपण संरक्षण केले पाहिजे.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली २२ प्रतिज्ञापैकी १० प्रतिज्ञा समता प्रस्थापित करण्यासाठीची आहे आणि हा बौध्द धम्मीय व्यक्ती समता प्रस्थपित करण्याचे कार्य करीत असतो.
No comments:
Post a Comment