विषय असा आहे की
गेल्या दहा पंधरा वर्षात भारतातील प्रत्येक व्यक्ती संविधान आणि लोकशाहीचे गोडवे
गायला लागला होता.मोठ्या आक्रमकपणे तो आपले
अधिकार ठासून सांगू लागला होता.याची जाण संविधान विरोधी शक्तीना झालेली होती.यातच
२०१४ चे मोदी सरकार यांनी पुलवामा हल्ल्या संदर्भात पाकिस्तानवर केलेला हल्ला या
संदर्भात बरेच आरोप प्रत्यरोप करण्यात आलेले होते.पुलवामा हल्ला झाला होता की
घडविला होता यावर अद्याप ठोस उत्तर कोणाला मिळाले नाही.असे होत असताना कलम ३७० च्या
मुद्यावर संपूर्ण देशात मोठा धुमाकूळ झालेला होता.२०१९ च्या मोदी सरकारने CAA – NPR
– NRC कायदा लागू केल्याने देशातील वातावरण ढवळून निघाले असताना मोदी सरकारच्या
विरोधात संपूर्ण देशात दलित – मुस्लीम – ओबीसी मोठ्या प्रमाणात एकत्र झाल्याचे चित्र
निर्माण झालेले होते.यातच भारत हिंदूराष्ट्र असल्याच्या वावड्या उठू लागल्या
होत्या.त्यामुळे २०२५ ला आरआरएस या संघटनेला १०० वर्ष पूर्ण होताना दिसत आहे.त्यामुळे
त्यांना हिंदुराष्ट्राची संकल्पना अस्तित्वात आणून महोत्सवी वर्ष सुरु करायचे
आहे.परंतु २०२४ ला पुन्हा लोकसभेच्या निवडणुका लागत असल्याने देशातील स्थिती पहाता
पुन्हा मोदी सरकार सत्तेत येईल असे त्यांना वाटत नाही.त्यामुळे मुस्लीम समाजाचा विरोध
हिंदुराष्ट्र बळकट करू शकते याची पूर्ण जाण असल्यामुळे धार्मिक कार्यक्रमावर
मोठ्या प्रमाणात जोर देण्याचे कार्यक्रम राबविले जात आहेत.त्याचे जिवंत उदाहरण
द्यायचे झाले तर पालघर येथील दोन साधूंच्या झालेल्या हत्येच्या सुरु असलेल्या
राजकारणा वरून देता येऊ शकेल.जर संपूर्ण भारतात जर कोरोनाने धुमाकूळ घातला असताना
सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात सापडलेले असताना संपूर्ण देश कोरोना विरुध्द लढत
असताना संघी भाजपा धार्मिक मुद्द्याला हवा का देत आहेत....त्यांना कोरोना विरोधातील
लढा महत्वाचा का वाटत नाही असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे.आता
जनता असे म्हणत आहे की,कोरोनाच्या विरोधी लढ्यात आम्ही सहभागी असताना धार्मिक लढा
का उभारला जातोय...मग कोरोनाचे खरेच सावट आहे काय...? जर असते तर संघी भाजपावाले
कोरोना संदर्भात गंभीर असले असते......(क्रमशJ
No comments:
Post a Comment