प्रश्न असा आहे की
संपूर्ण देश कोरोना विरोधात लढाई लढत आहे हे सर्वानीच मान्य केले पाहिजे.परंतु
संघी भाजपा कोरोनां विरोधातील लढाई लढत नाही हे देखील सर्वानी मान्य केलेच पाहिजे
असे माझे मत आहे.कारण कोरोना हा साथ रोग आहे आणि या रोगावर नियंत्रण आणि सर्वेक्षण
हा आरोग्य विभागाच्या कार्याचा भाग आहे असे असताना भाजपा विरोधी राज्यात राजकारण
करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे पथक तयार करून त्या राज्यावर
नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय पथक म्हणून त्या राज्यात पाठविलेले आहे.आत्ता अमित
शहा यांच्या राजकारणाचा अनुभव जवळ जवळ देशातील प्रत्येकी नागरिकांना आला आहे.महाराष्ट्र
राज्याची सत्ता पुन्हा आपल्या हातात यावी यासाठी अमित शहा यांनी महाराष्ट्रात विशेष
लक्ष केंद्रित केले होते परंतु त्यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करता आले
नाही.असे असताना विदेशातील कोरोना विदेशातील लोकांनी भारतात आणला परंतु त्यांना
त्याचा त्रास तर झाला नाही,परंतु त्यांच्या माध्यमातून आलेला कोरोना मुंबई
पुण्यामध्ये बहुजन वस्ती धिंगाणा घालताना दिसत आहे.जिथे उच्च न्यायाधीशाचा
संशयास्पद मृत्यू होतो आणि तेथे आरोप यांच्यावर होतात परंतु त्याची चौकशी होत
नाही.परंतु डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे नात जावई यांना खोट्या केसमध्ये तुरुंगाची
हवा कोरोनाचा थैमान महाराष्ट्रात सुरु असताना खावी लागते हे विशेष आहे.
कोरोनाचे सावट महाराष्ट्रात असताना ठाकरे
सरकारवर विश्वास ठेऊन महाराष्ट्रातील जनता त्यांच्या बरोबर उभी असताना केंद्राचे
पथक येते आणि अहवाल बाहेर येतो आणि तो म्हणजे एकट्या मुंबईत कोरोना रुग्णाची
संख्या साडे सहा लाखाचा आकडा पार करणार असे जाहीर होते वेळीच सदरचा अहवाल
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाकरला आहे.अशा कोरोनाच्या साथ रोगावर महाराष्ट्रातील
जनता घाणरडे राजकारण सहन करणार नाही.असे असताना वारंवार राज्यापालाकडे जाऊन ठाकरे
सरकार यांच्या विरोधात राजकारण केले जाते. कोरोणाचा थैमान महाराष्ट्रात चालू
असताना केंद्रसरकार महाराष्ट्राला पैसे देत नाही,पीपीई किट देत नाहीत,गहू देत नाहीत,डाळ
देत नाहीत आणि मुख्यमंत्री फंडाला निधी देऊ नका असे सांगत आहे.त्यामुळे इथला लॉक डाऊन
उठू नये इथे कोरोना रुग्ण वाढावेत असेच संघी भाजपा वाल्यांच्या मनात आहे काय..?
असे बरेच प्रश्न महाराष्ट्रातील जनते समोर उभे रहात आहेत.जर असेच असेल तर मग एवढ्या
हाल अपेष्ठा सहन करून केंद्रसरकारच्या लॉक डाऊनमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्रातील
जनतेचे भलं होईल असे वाटत नाही.त्यामुळे ३ मे नंतरचा लॉक डाऊन आम्ही पाळणार नाही
सोशल डीस्टटिंग पाळणार नाही.आम्ही फिजिकल डीस्टटिंग पाळत आमचे कार्य आणि जीवनमान
पुन्हा एकदा स्वत:हून पूर्वपदावर आणू हे आता केंद्र सरकारने लक्षात घेतले पाहिजे.
बरोबर आहे... केंद्रातील सरकार व राज्यातील विरोधी पक्ष अजूनही घाणेरडे राजकारण करत आहेत.
ReplyDeleteअर्रर्रर्र...हे बीजेपी नकोच...
ReplyDeleteअर्रर्रर्र...हे बीजेपी नकोच...
ReplyDeleteकरोना हा रोग जागतिक राजकारणाची एक चाल आहे
ReplyDelete