भारत हा लोकशाही प्रदान देश आहे...आणि त्याची चार स्तंभ आहे हे कोणी नाकारणार
नाही.परंतु सध्याची परिस्थिती पहाता हे चार स्तंभ दिसत नाही अशी परिस्थिती आहे.आम्ही
संविधान बचाव संघर्ष समितीची लोक आहोत.जेथे जेथे संविधान बचावाचा प्रश्न निर्माण
होईल तिथे तिथे आम्ही बोलणार आहोत मग परिस्थिती कितीही गंभीर असो.भारत देशा समोर
कोरोना महामारीचे संकट उभे टाकले होते व आहे आणि अशा संकटाला देशाला सामोरे जायचे
होते.अशा वेळेस भारतीय संविधान प्रमाणे देशातील नागरिकांनी निवडून दिलेल्या
लोकांची बैठक होणे अत्यंत गरजेचे होते.त्यासाठी तातडीची ससंदीय मंडळाची बैठक
बोलावणे अत्यंत गरजेचे होते.विरोधी पक्षला पाचारण करणे अत्यंत गरजेचे होते....परंतु
तसे झाले नाही.अशी कोणतीही बैठक बोलाविण्यात आली नव्हती आणि संपूर्ण भारत देश लॉक डाऊन
करण्याचा निर्णय एकट्या प्रधानमंत्री यांनी घेतला आहे असे बऱ्याच जाणकारांचे
म्हणणे आहे. परंतु ते तसे नाही प्रधानमंत्री यांनी एक दिवसांच्या जनता कर्फ्यूचे
आवाहन भारत देशाच्या जनते समोर केले होते त्यानी ते स्वीकारून एक दिवसांचा जनता
कर्फ्यू स्वीकारला आणि तो पाळला देखील आहे.परंतु एक दिवसांच्या पाळण्यात आलेल्या
कर्फ्यूच्या माध्यमातून कोरोना हा साथ रोग आवरता येणार नाही याची कल्पना
असल्यामुळे तो संपूर्ण देशात जनता कर्फ्यूच्या माध्यमातून पुढे तो देशहितासाठी २१
दिवस जाहीर करण्यात आला.देशहिताचा प्रश्न असल्यामुळे संपूर्ण जनतेने आनंदाने प्रामणिकपणे
तो पाळला आहे हे कोणालाही नाकरून चालता येणार नाही.
परंतु कायद्यानुसार तो लॉक डाऊन १६
दिवसांचा असायला हवा होता.त्याचे कारण असे आहे की,एखाद्या महामारीचा साथ रोग
आक्रमण झाला तर त्याला समजण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा त्या विरोधात प्रबळ करण्यासाठी
हा लॉक डाऊन केला जातो हे आपण सर्वानी लक्षात घेतले पाहिजे.१६ एवजी तो २१ दिवसांचा
केला गेला ठीक आहे जगात या साथ रोगाने थैमान घातले आहे त्यामुळे पाच दिवस जास्तीचे
वाढविले असतील यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही.असे असताना सदर साथ रोग
नियंत्रणात आणता आला नाही आणि त्याला समजण्यास अधिक कालवधी लागत असल्याने आणखी तो
१९ दिवसांचा समाजहित समोर ठेवून तो जाहीर करण्यात आला आणि तो ही जनंतेने प्रामणिकपणे
स्वीकारलेला आहे.
परंतु या जनता कर्फ्यूमध्ये इथला
भारतीय नागरिक स्वत:चा स्वाभिमान गमावून बसल्याचे चित्र संपूर्ण देशात निर्माण झालेले
आहे.त्याचे तसे कारणही आहे रस्त्यावर जनतेच्या संरक्षणासाठी उतरलेला पोलिस
अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकावर दबाव तंत्राचा
वापर करू लागला.त्याला नाहक अपमानास्पद वागणूक देऊन अश्लील शिवीगाळ करून
त्याच्यावर लाठीने हल्ला करू लागला.त्याला गुन्हेगारा प्रमाणे वागणूक देऊन
त्याच्यावर तो गुन्हे दाखल करू लागला.त्याला समाजद्रोही म्हणून हिणवू लागला.अशा
बऱ्याच घटना देशात घडू लागल्या आहेत.त्यामुळे आता त्या जनतेला हे सर्व सहन होत
नाही तो आता असा विचार करू लागला आहे की, मी देशहितासाठी आणि समाजहितासाठी हा जनता
कर्फ्यू स्वत:हून स्वीकारलेला असताना पोलिस मला अशी वागणूक का देत आहे..? माझ्यावर
अन्याय करून माझा स्वाभिमान का हिणवून घेत आहे.सरकारने कायदेशीर प्रक्रियेतून हा
लॉक डाऊन माझ्यावर लादला नसून स्वखुशीने तो मी स्वीकारलेला आहे.माझी पोटा पाण्याची
वाट लावून,मी बेरोजगार होणार आहे याची माहिती असतना तो मी स्वीकारलेला आहे.आता मी
स्वीकारलेला लॉक डाऊन मधून ३ मे नंतर मी स्वत:हून या जनता कर्फ्यूतून बाहेर पडत
आहे आणि पुढे जनता कर्फ्यू मी पाळणार नाही असे तो म्हणू लागला आहे.त्यामुळे आता
सरकारने ३ मे नंतर इथल्या जनतेवर जनता कर्फ्यूच्या माध्यमातून लॉक डाऊन लादु नये.
No comments:
Post a Comment