Friday, May 4, 2018

मुंबई विद्यापीठास छत्रपती संभाजी महाराज यांचे नावे देण्यात यावे.....!


आपणा सर्वांना प्रथम
    जय जिजाऊ
       जय शिवराय
          जय शंभूराजे
              जय भीम
शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांनी तुळापुर येथे स्वराज्य संकल्पित करून सराज्याचे भगवे निशाण शिवरायांच्या हातामध्ये दिले होते.शिवरायांनी स्वराज्याचे भगवे निशाण घेऊन अलुतेदार आणि बलुतेदार यांचा वर्ग एकत्र करून स्वराज्य स्थापन केले.अशा अलुतेदार आणि बलुतेदार यांचे स्वराज्यातील योगदान निश्चित करण्याचे कार्य गेल्या तीन चार वर्षापासून सकल मराठी समाज करीत आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य संदर्भात दोन बाजू आहेत हे आता नव्याने जगासमोर येऊ लागले आहे.त्याकाळी शिक्षण बंदी असताना शंभूराजे यांनी १४ भाषा अवगत केल्या होत्या.त्यामध्ये प्रामुख्याने ब्रज (भोजपुरी),मराठी,हिंदी,संस्कृत,मोडी,कन्नडी, तमिळ असे बहुभाषिक साहित्य आपल्या विचार कौशल्यावर संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज यांनी निर्माण केले आहे. खऱ्या अर्थाने साहित्य,कला व शिक्षण यांच्या जोरावर माणसाला असाध्य ते साध्य करण्याची शक्ती मिळू शकते हे साडेतीनशे वर्षापूर्वी शंभूराजे यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले.छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण – सातशतक – नखशिकांत – नायिकाभेद - अशी उच्च कोटीची मानवी मुल्य व विचार संपदा निर्माण करून मानवाला विचार बंधनातून मुक्तीचा मार्ग मोकळा केला आहे. छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्य रक्षण पराक्रम,मुत्सदेगिरी यावर बहुतांश प्रकाश पडलेला आहे.परंतु साहित्यिक संस्कृत पंडित व रयतेला समतेचा,स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणूनही राज्यांचा गौरव होणे तितकेच महत्वाचे आहे.त्याकाळात भारतातील बहुतांश राजांना परकीयांशी व इतर राज्यांशी संवाद साधण्यासाठी भाषेची अडचण येत असेल तर त्यासाठी दुभाषकाची गरज लागत असे मात्र त्याकाळात भारतातील छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव राजे असे होते की,ज्यांना कधीही दुभाषकाची गरज भासली नाही.कारण स्वत: राजांनाच त्याकाळातील उपयोगात असणाऱ्या सर्व राजभाषा अवगत होत्या.
        अशा पराक्रम – मुत्सदेगिरी – कवी – संस्कृत पंडित तसेच साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज यांनी मुंबईचा ब्रिटीश गव्हर्नर केजविन याचे बरोबर ८०,००० पॅकोडा चलनामध्ये मुंबई खरेदी करण्याचा करार केला होता.परंतु सुरतचे ब्रिटिश व्यापारी यांनी केजविन याला असे सुनाविले की,जर मुंबई संभाजीराजे यांना दिली तर संपूर्ण पश्चिम किनारा स्वराज्याच्या ताब्यात जाईल.तेव्हा हा करार करू नकोस तेव्हा केजविन याने त्यांचे ऐकले आणि मुंबई हातामध्ये घेण्याचे स्वप्न छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्ण होऊ शकले नाही.आज मुंबई आपल्याकडे आहे त्यामुळे अलुतेदार आणि बलुतेदार यांचा जर सन्मान करायचा असेल आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जर गौरव करायचा असेल तर मुंबई विद्यापीठला “छत्रपती संभाजी महाराज विद्यापीठ” असे नाव देण्यात यावे अशी मागणी सकल मराठी समाज यांचे वतीने “शंभूराजे सन्मान अभियान” माध्यमातून सरकारकडे करण्यात आलेली आहे.या अभियानाचा पहिला टप्पा म्हणून स्वाक्षरी मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा संकल्प सकल मराठी समाज यांनी केला आहे.आणि तो छत्रपती संभाजी महाराज यांचे १४ मे २०१८ रोजीचे जन्म दिनाचे औचित्य साधून शंभूराजे यांचे जन्मस्थळ किल्ले पुरंधर पासून सुरु करण्यात येऊन संपूर्ण पुणे जिल्ह्यातून त्याची सुरुवात होऊन तो संपूर्ण महाराष्ट्रात राबविणार आहोत.तरी या “शंभूराजे सन्मान अभियान” या उपक्रमाच्या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन आपला पाठींबा दर्शविण्यात यावा ही आपणास नम्रविनंती.
                              धन्यवाद



 मा.राजेश खडके                 मा.संतोष शिंदे                  मा.विकास साळवे
  समन्वयक                     जिल्हाध्याक्ष                    शहर अध्यक्ष
वतन बचाओ आंदोलन            संभाजी ब्रिगेड पुणे              भारिप बहुजन महासंघ

No comments:

Post a Comment