Wednesday, May 30, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ३) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा मनुवादी व्यावस्थेबरोबर आणि त्यांच्या मानुमृतीच्या विरोधातच का...?


रयत ज्या छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांना विसरली होती.त्यांचा स्वराज्याचा इतिहास विसरली होती.मनुस्मृतीने ज्या लादलेल्या सप्तबंदी शिवराय व शंभूराजे यांनी मोडीत काढल्या होत्या त्याची आठवण महात्मा ज्योतिबा फुले यांना झाली.त्यांनी लपलेला इतिहास पुन्हा एकदा शोधायला सुरुवात केली.जेव्हा ते रायगडावर गेले तेव्हा त्यांना छत्रपती शिवराय यांची समाधी सापडली.त्यांनी लपलेला शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा रयतेसमोर यावा आणि आपला राजा कसा होता याची पुन्हा रयतेला जाणीव व्हावी यासाठी त्यानी १८६९ मध्ये छत्रपती शिवराय यांची पहिली जयंती साजरा करून त्यांचे विचार रयतेमध्ये पोहचविण्याचे कार्य करून मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेने केलेली घाण साफ करण्याची सुरुवात करून ही मनुस्मृती जाळली पाहिजे असे बोलून दाखविले. मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेने या महात्मा फुले यांना खूप छळले खूप त्रास दिला.एवढे महान कार्य करीत असताना १८९० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.१८९१ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता.सातरा गादीचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांनी स्थापन केलेल्या शाळेमध्ये १ ली ते ४ थी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झाले.त्यामुळे शिवरायांचा इतिहास त्यांना जवळून माहित होता.त्यानी पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करण्याचे कार्य सुरु केले होते.त्यांना या कार्यात कोल्हापूर गादीचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी मदत केले.हेच ते शाहू महाराज यांनी बामणाला चापकाचे फटके मारून अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठविला होता.त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी मनुवादी बामणी व्यवस्था कशी फसवणूक करीत आहे हे त्यांच्या लक्षात आले होते.तेव्हा त्यांनी असे जाहीर केले की,या बामणाला राज्याच्या खजिन्यातून काही दिले जाणार नाही.त्याचा मान सन्मान केला जाणार नाही अलुतेदार आणि बलुतेदार यांना ५०% आरक्षण देऊन ते आरक्षणाचे जनक झाले आहेत.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि छत्रपती शिवराय यांचे पहिले पुत्र एक संभाजीराजे यांच्या सातारा गादी बरोबर तर दुसरे पुत्र राजाराम यांच्या कोल्हापूर गादी बरोबर कौटुंबिक संबध निर्माण झाले होते.बडोद्याचे संस्थानिक सयाजी गायकवाड यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर संबध प्रस्थापित केले होते.त्यामुळे स्वराज्याचे भगवे निशाण काय आहे याचा संपूर्ण आभ्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा झाला होता येथे आपण लक्षात घेतले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु म्हणून स्वीकारले होते त्याचे कारण मनुवादी व्यवस्था निकाली काढून शाक्त धर्मा नुसार राज्याभिषेक करून मानवता वादी समतेचा धर्म छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांनी रयतेत पोहचविला होता.अशा शिवरायंचे विचार रयतेमध्ये पोहचून स्त्री शिक्षणाचे दारे उघडे करून इथले दासत्व संपविण्याचे महान कार्य त्यांनी केले होते.सत्यशोधक धर्म स्थापन करून रयतेला भगवे निशाण महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिले असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना माहित झाले होते.त्यामुळे त्यांच्या लक्षात आले होते मानवतेचा खरा शत्रू इथली मनुवादी व्यवस्था आणि त्यांची मनुस्मृती आहे.त्यामुळे त्यांनी या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात जोमाने लढा सुरु केला.(क्रमश😊

No comments:

Post a Comment