शहाजीराजे - माता जिजाऊ
संकल्पित आणि शिवराय स्थापित स्वराज्य म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली आणि
अफजलखानाचा कोथळा काढला इतपर्यंत सिमित नव्हते.तर स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीला
समाधान कसे मिळेल आणि तो समाधानी कसा होईल असा दुष्टीकोन ठेऊन स्थापित केलेले
राज्य म्हणजे स्वराज्य होय.सप्तबंदी लादणारे मनुस्मृतीचे राज्य म्हणजे स्वराज्य
होऊ शकत नाही म्हणून शिवरायांनी स्थापित केलेले स्वराज्य हे समतावादी होते हे आपण
लक्षात घेतले पाहिजे.अशा समतावादी स्वराज्याचे रक्षक होते ते छत्रपती संभाजी
महाराज हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे.संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वयाच्या १६
व्या वर्षी ग्रंथ लिहिला त्यांना कीर्ती मिळाली.परंतु वयाच्या १४ व्या वर्षी
शंभूराजे यांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला त्यांना धर्मवीर बनवून कट्टर
हिंदुत्ववादी म्हणून एका धर्माच्या चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरु
झाल्याचे आपल्याला पाहिला मिळत आहे.ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली ते ज्ञानेश्वर यांना
श्रेष्ठ मानतात परंतु ज्यांनी बुधभूषण – सातशतक – नायिकाभेद – नखशिकांत असे
ग्रंथ लिहून मोठ्या प्रमाणात मानवीमुल्य जपणारे समाज उपयोगी साहित्य निर्माण केले.कवी,संस्कृत पंडित,साहित्यिक,समतेचे राज्य निर्माण करणाऱ्या अशा महान राजाच्या
समाधीस्थळा पासून आपण अनभिज्ञ आहोत याची आम्हाला खंत वाटते.जगातील मोठा राजा
असणारा औरंगाजेब आणि त्याचप्रमाणे एकाच वेळी पाच शत्रू विरोधात लढणारा पराक्रमी
एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते हे आपण विसरलो आहे.अशा राजाला आमने
सामनेच्या लढाईत कोणीही शत्रू हरवू शकत नाही याची कल्पना जेव्हा औरंगाजेबास आली
तेव्हा शंभूराजे यांचे नातेमंडळीना फितूर करून विश्वासघाताने जेरबंद करून त्यांची
हत्या करण्यात आली.हे आपण याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.अलुतेदार आणि बलुतेदार
यांच्या मनात स्थान निर्माण करणारे राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते हे आपण
लक्षात घेतले पाहिजे.शंभूराजे यांचे कर्तुत्व एवढे महान असताना त्यांना बदनाम
करण्याचे मोठ्या प्रमाणात राजकारण घडलेले आहे आणि घडत आहे हे आपण लक्षात घेतले
पाहिजे.समतावादी असणारा महान राजा आज आपल्या समोर कट्टर हिंदुत्ववादी म्हणजे धर्मवीर
बनून समोर आणला जात आहे आपण वेळीच सावधान झाले पाहिजे.यासाठी छत्रपती संभाजी
महाराज यांची वाटचाल ही जागतिक कीर्तीची होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे.संपूर्ण समुद्री
पश्चिम किनारा स्वराज्याच्या ताब्यात यावा यासाठी शंभूराजे इंग्रज गव्हर्नर केजविन
याचे बरोबर करार करून मुंबई विकत घेण्याचा प्रयत्न सुरतच्या इंग्रजांमुळे फोल ठरला
यावरून आपण लक्षात घेतले पाहिजे की,किती दूर
दृष्टीचा राजे होते संभाजी महाराज म्हणून अशा राजाला एका धर्माच्या पलीकडे घेऊन
जाणे हे आपले आद्य कर्त्यव आहे.म्हणून सकल मराठी समाज यांचे वतीने अलुतेदार आणि
बलुतेदार यांच्या सन्मानासाठी “शंभूराजे सन्मान अभियान” हा उपक्रम सुरु करण्यात
आलेला आहे.
राजेश खडके
सकल मराठी समाज
No comments:
Post a Comment