१८५७ च्या उठावा नंतर ब्रिटीश सेनेत असलेली महार बटालियन बंद करून महार
सैनिकांची भरती बंद करण्यात येऊन १८७४ ला गाव नोकर वतन कायदा पास करून अस्पृश्यता
निर्माण करण्यात आली.ती मोडीत काढण्यासाठी महत्मा फुले यांनी लढा देऊन १९८४ ला वतन
कायदा मंजूर करून घेण्यात आला.त्यामुळे मराठा समाजाला हाताशी धरून अस्पृश्यता कशी
मजबूत होईल यासाठी साल १८८४ मध्येच पहिली हिंदू महासभा आयोजित करून मराठा समजामध्ये
भाऊ लक्ष्मण जाधव म्हणजेच भाऊ रंगारी याच्या माध्यमातून गणपती उत्सव सुरु करून
हिंदू – मुस्लीम तेढ निर्माण करण्यात आले.आता हिंदू – मुस्लीम तेढ आणि अस्पृश्यता
निर्माण झालेली होती.समाजातील प्रमुख घटक आपल्या हाताशी धरून गणपती नावाची भीती
त्यांच्या मनात निर्माण करून एक मराठा समाजाचे नेतृत्व असलेल्या छोट्या मोठ्या
समाजावर दबाव निर्माण करून आता हिंदू – मुस्लीम तेढ आणि अस्पृश्यता आणखी मजबूत
केली गेली.१८८४ ला पहिल्या हिंदू महासभे नंतर १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
स्थापन करण्यात आलेली होती यातील जहाल गटाचे नेतृत्व बाळकृष्ण गंगाधर टिळकांनी
केले आहे.आता सार्वजनिक गणपती उत्सव टिळकांच्या हातामध्ये आला होता त्यामुळे हिंदू
धर्माच्या प्रचाराला मोठा जोर निर्माण झाला होता.यातच १८९७ मध्ये प्लेगची साथ आली
होती महत्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे दत्तक पुत्र डॉ यशवंत फुले
यांनी प्लेगच्या रुग्णासाठी हडपसर येथील ससाणे नगर मध्ये हॉस्पिटल सुरु केले
होते.मुंढवा येथे गायकवाड घराण्यातील एकुलता एक १० वर्षाचा मुलगा प्लेगच्या रोगाने
पिडीत झाला होता याची खबर सावित्रीबाई फुले यांना लागली होती.त्या मुलाला बैलगाडीमध्ये
टाकून त्या हडपसर येथील ससाणे नगर येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्या होत्या त्याची लागण
सावित्रीबाई फुले यांना झाली होती.त्या गायकवाड घराण्यातील त्या एकुलत्या एक मुलाला
वाचविण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचे बलिदान गेले.भारतातील पहिली महिला शिक्षिका
समाज सुधारिका सावित्रीबाई फुले यांचे मानव कल्याणासाठी १० मार्च १८९७ मध्ये बलिदान
गेले आहे.(क्रमश😊
No comments:
Post a Comment