Wednesday, April 10, 2019

अमोल कोल्हे यांनी खासदार होण्यासाठीच….“स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज” ही टीव्ही मालिका विकली…? राजेश खडके सकल मराठी समाज


छत्रपती संभाजी महाराज हे समतावादी विचारांचे होते म्हणून शिवरायांनी केलेला पहिला वैदिक धर्म पद्धतीतील राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार शंभूराजे यांनी करावयास लावला.शाक्त पंथ म्हणजे सिंधू माता नेऋती पूजक असणारा समूह होय.आणि हा समूह बौध्द लेण्यातील सिंधू माता पूजक होतां तिलाच आज आपण काली माता आणि मरीआई म्हणून मानतो.त्यामुळे हा शाक्त पंथ आणि वैदिक धर्म एकमेका परस्पर विरोधी आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापरिनिर्वाण नंतर शंभूराजे यांनी वैदिक धर्म पद्धत नाकारून शाक्त पंथानुसार स्वत:चा राज्याभिषेक करवून घेतला आणि स्वराज्याची राजमुद्रा ही पिंपळाच्या पानावर कोरली आहे. त्यामुळे त्यांनी रामदास स्वामी कधी मान्य केला नाही.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांची मोठ्या प्रमाणावर रयतेत बदनामी करण्यात आली.परंतु काही इतिहासकार यांनी शंभूराजे सन्मान अभियान राबवून त्यांचा सत्य इतिहास बाहेर काढला परंतु इथल्या मनुवादी व्यवस्थेने तो नाकरून त्यांचेवर दबावतंत्र निर्माण केले.याचाच एक भाग म्हणून अमोल कोल्हे यांनी “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज” ही टीव्ही मालिका सुरु केली त्यात त्यानी सुरुवातीला चांगली मांडणी केली परंतु ज्यावेळेस रामदास स्वामी यांचे पात्र दाखविण्याची वेळ आली तेव्हा इथल्या बहुजन मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेड यांनी अमोल कोल्हे यांना मोठ्या प्रमाणात विरोध केला की रामदास हे पात्र नसताना त्याचा इतिहास का तयार करीत आहात.तेव्हा त्यांनी रयतेला भावनिक साद घालीत मी कोणत्या दबावात ही मालिका दाखवीत आहे त्याचे कथन करीत असताना मी माझे घर या मालिकेसाठी विकले आहे असे ठासून सांगत मला ही मालिका पूर्णपणे दाखवू द्या असे म्हटले.लोकांनी त्याचे भावनिक ह्केला मान्यता दिली.परंतु जेव्हा त्यांनी राजकीय निर्णय घ्यायचे ठरविले तेव्हा इतिहासात न घडलेल्या वैदिक धर्म पंडित यांची जवळीक शंभूराजे यांचे बरोबर दाखवायचे काम सुरु केले आणि राज्यभिषेक बदलण्याचे कार्य करून शंभूराजे यांना धर्मवीर करण्याचा प्रयत्न करून समतेपासून दूर नेण्याचे काम सुरु केले आहे.जेव्हा त्यानी त्यांचा उमेदवारी अर्ज शिरूर लोकसभेतून दाखल केला आणि त्यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र पाहिले असता असे दिसून येते की,छत्रपती संभाजी महाराज यांना भावनिक असलेल्या मावळ्यांची घोर फसवणूक केली आहे.कारण त्यांनी भरलेला आयकर पहाता २०१२ ते २०१८ पर्यंत लाखोंचा आयकर भरला आहे.जी सदनिका त्यांनी विकली आहे असे म्हणतात आजही ती मुंबईची सदनिका तशीच आहे.त्यांची एकंदरीत मालमत्ता पाहिली तर ती कोट्याच्या घरात आहे.त्यांची मालमत्ता किती आहे याचे आम्हाला देणे घेणे नाहीये परंतु मालिका तयार करण्यासाठी घर विकले आहे असे म्हणणे गैर आहे.त्यातच वैदिक धर्म पंडित यांचे संभाजीराजे यांनी लागून पालन केले आहे हे दाखविणे चुकीचे आहे.केवळ मला खासदार व्हायचे आहे म्हणून जर हा खेळ असेल तर आम्ही सकल मराठी समाज म्हणून पचनी का पाडून घ्यायचा असा आमचा प्रश्न आहे.म्हणून आम्ही असे म्हणतो की,अमोल कोल्हे यांनी खासदार होण्यासाठी “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज” ही मालिका विकली आहे.ज्या बाबासाहेब पुरंधरे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केली अशांचा सत्कार राज ठाकरे यांनी केला आहे.आणि आज तेच या अमोल कोल्हे यांचा प्रचार करणार आहे.आमच्या सकल मराठी समाजाचे एवढेच आहे की,छत्रपती संभाजी महाराज यांचे राजकारण करू नका…! तुम्हाला खासदार व्हायचे असेल तर आपल्या कार्य कर्तुत्वावर व्हा पण शंभूराजे सन्मान अभियानास कोणतेही गाल बोट लावू नका.ते समतावादी होते त्यांना धर्मवीर बनवू नका…!

No comments:

Post a Comment