Friday, April 5, 2019

वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असताना माझी उमेदवारी का….? राजेश खडके (भाग-१)

               माझ्या आयुष्यातील गेली १७ वर्ष मी शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारावर माझ्या पूर्ण ताकदीनिशी येईल त्या परिस्थितीला तोंड देत सामाजिक कार्य करीत आहे.हे करीत असताना माझ्या वाटचालीतील या टप्प्यावर असताना काही म्हत्वाचे निर्णय हे घ्यावेच लागतात.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मला जो मार्ग दाखविला आहे.त्यावरून चालताना भारतीय लोकशाहीच्या न्यायिक तत्वांची जपवणूक करणे हे माझे पहिले कर्त्यव्य आहे.सध्या देशात सरंजामशाहीने वागणारे प्रतिगामी सरकार आलेले आहे.त्यांचा उद्देश येथील लोकशाही व्यवस्था भोई सपाट करून हुकुमशाही लादण्याचे प्रकार चालू आहेत.यातच भारतीय लोकशाहीचा म्हणजेच सर्वात महत्वाची २०१९ ची निर्णायक निवडणूक आहे.आणि याक्षणी माझ्यावर झालेल्या समता बंधुता न्याय व स्वतंत्र असा मानवतावादी विचारांना प्रामाणिक राहून मी याक्षणी शांत कसा बसू.....?



                                            गेली दोन वर्ष मी अलुतेदार आणी बलुतेदार सहकारी यांच्यासह सकल मराठी समाज हा लोकशाही विचार घेऊन विविध उपक्रम,आंदोलने करून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे.याची सुरुवात आम्ही स्वराज्यापासून करून संविधानापर्यंत त्याचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत.याचाच भाग म्हणून मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आम्ही केली आहे.त्यासाठी सामान्य नागरीकापासून ते खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यापर्यंत सर्वच स्तरातून या उपक्रमास पाठींबा मिळाला.त्यानंतर विविध उपक्रम राबवीत असताना २०१७ च्या शेवटी व १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव याठिकाणी प्रतिगामी शक्तीकडून मानवतेवर हल्ला झाला.त्यानंतर एकंदरीत महाराष्ट्रातून एक राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतर येऊन या प्रतिगामी विरुद्ध मानवतावादी आंदोलनाची सूत्रे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी हातात घेऊन प्रतीगाम्यंचा डाव उधळून लावला.अशा परिस्थितीत सकल मराठी समाजाने या येणाऱ्या सामाजिक बदलात कृतीशील सहभाग घेतला.त्यानंतर प्रतीगामी शक्तीकडून या सामाजिक बदलात खोडा घालण्यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचेवर टीकेची झोड उडविली.अशा वेळी आम्ही प्रतिगामी शक्तीकडून बोलणाऱ्या सरकारच्या प्रतिनिधीवत तात्काळ कारवाई करावी.अशी मागणी केली.त्यातूनच पुढे आगळा वेगळा उपक्रम म्हणून प्रकाश आंबेडकर यांना झेडप्लस सुरक्षा द्यावी असा उपक्रम राबविला.त्यातही सर्व मानवतावादी समाज घटकांनी सहभाग घेतला.अशा वेगवेगळ्या घटना घडत असताना मी माझ्या सहकारी यांच्यासह आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासंदर्भात पुण्यातील शासकीय विश्रामगृह याठिकाणी फुलपगार सर यांची भेट घेतली व निवेदन दिले.परंतु महाराष्ट्रभर चाललेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या झंझावातामुळे त्यावेळी भेट होऊ शकली नाही.त्यानंतर फुलपागार सरांच्या संपर्कात राहून भेट घेण्याचा प्रयत्न चालू ठेवला.त्यावेळी आम्हाला मुंबई किंवा अकोला याठिकाणी आपल्याला जाऊन भेट घ्यावी लागेल असे सांगितले.तशी तयारी आमची असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला तुम्हीच प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात जा असा निरोप दिला.


पुढे सकल मराठी समाजाचे चाललेले कार्यक्रम बघून भारिपच्या पदाधिकारी यांनी मला बाळासाहेब व्यस्त असल्याने आपण आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांची भेट घ्यावी असे सांगितले.त्यानुसार माझ्या सहकारी यांच्यासह अंजलीताईंची पुण्यात भेट घेतली व आमची भूमिका त्यांचे समोर मांडली.भूमिका मांडीत असताना या प्रतिगामी शक्तीना नेस्तनाबूत करण्याचे कार्य करणाऱ्या आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची इच्छा आम्ही मांडली.पुढे सकल मराठी समाजाच्या वतीने पुणेस्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान याठिकाणी समतावादी राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे नियोजन केले.या सोहळ्यासाठी अंजलीताई आंबेडकर यांना आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातसून म्हणून आमंत्रित करून मार्गदर्शन करण्याची विनंती केली.त्याचा मान ठेवून आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांनी सदर कार्यक्रमात उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन करून आम्हाला पुढील कार्यासाठी उर्जा दिली.(क्रमश:)




















































No comments:

Post a Comment