पुढे राज्यात देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले.लोकशाहीला निर्माण झालेला प्रतिगामी धोका मोडून काढण्यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचित अलुतेदारा बलुतेदार यांना संघटीत करून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली.याची घोषणा होताच मोठ मोठ्या जनसागराच्या सभा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात गाजू लागल्या.आणि येथील प्रस्थापित राजकीय व्यवस्था हादरली.आम्हीही महाराष्ट्रात होणाऱ्या कार्न्तिकारी बदलात सहभागी होऊन देशातील लोकशाही टिकविण्यसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी स्वातंत्र्यचा विचार घेऊन सदर आघाडीत सामील होण्याचे ठरविले.
मी सकल मराठी समाजच्या सर्व सहकारी यांच्यासह बैठक घेऊन त्या संदर्भातील चर्चा केली.सर्व संमतीने आठ मागण्यांचा प्रस्ताव आम्ही वंचित बहुजन आघाडीतील भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष मा.अशोक सोनाने यांची रीतसर भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी प्रस्ताव सादर केला.तसेच हा प्रस्ताव सादर केल्यानंतर सोशल मिडीयावर त्याचे स्वागत झाले.आणि या प्रस्तावाला मान्यता म्हणून संभाजी ब्रिगेड,बहुजन मोर्चा,भीम साम्राज्य संघटना,सम्राट अशोक सेना,क्रांती मजदूर सेना,रिपब्लिकन मान्तंग सेना,मानवी हक्क सुरक्षा महासंघ,भोईराज समाजिक संस्था या संघटनांनी प्रस्तावासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सहभागी होऊन पाठींबा दिला.
प्रस्ताव सादर करून सदरच्या प्रस्तवावर विचार होणेसंदर्भात आदरणीय अंजलीताई आंबेडकर मा.लक्ष्मण माने आणि मा.अशोक सोनाने यांच्या संपर्कात राहिलो.परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे किंवा इतर काही कारणामुळे आम्हाला या प्रस्तावावर उत्तर मिळाले नाही.तरी देखील मी माझ्या लिखाणाच्या माध्यमातून,कार्यक्रमाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी व आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थनात सकल मराठी समाजाची भूमिका मांडीत राहिलो.वास्तविक वंचित घटकांना न्याय देत असताना होणाऱ्या राजकीय बदलांनी महाराष्ट्र ढवळून निघत असताना आमच्या प्रस्तावावर निर्णय होऊन या संदर्भात आम्हाला कळविले जाईल अशी अपेक्षा होती.परंतु एकंदरीत घडणाऱ्या घटनांमध्ये आमचा प्रस्ताव कुठेतरी मागे पडला अये दिसते.नेमकी कारणे न कळाल्यामुळे या संदर्भात कोणालाही दोषी धरण्याचा संबध नाही.अशातच काही दिवस गेल्यानंतर प्रत्यक्ष आचारसंहिता लागू होऊन निवडणुकांची घोषणा झाली.प्रकाश आंबेडकरानी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदार संघात ताकदीने उमेदवारी लढविली जाईल.जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील असे जाहीर करून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभांचा धडाका चालू करून उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली.इतर पक्ष आघाड्या उमेदवारासाठी चाचपडत असताना सर्व प्रथम वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली.
या यादीचे वैशिष्ठ म्हणजे वंचितातील वंचित घटकांना लोकशाही प्रक्रियेत सामावून घेण्याचे काम केले.सकल मराठी समाजाच्या वतीने मी ही पुणे लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आगाडीकडून उमेदवारी मिळावी अशी अशा बाळगली.लोकशाही प्रक्रियेत गेले अठरा वर्ष काम करीत असताना मी केलेल्या कामांचा जनसंपर्काचा एक वंचित घटक म्हणून उं प्रक्रियेत समाविष्ठ होण्याचा माझा प्रयत्न राहिला.त्यासाठी माझे सहकारी यांनी त्यांना शक्य ते प्रयत्न केले.परंतु या प्रयत्नात असताना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विठ्ठल सातव यांचे नाव उमेदवार म्हणून समोर आले.अशाही परिस्थितीत मी वंचित बहुजन आघाडीकडून मला प्रचार करण्यासाठी अधिकृत संधी द्यावी अशी जाहीर मागणी केली.त्यावरही काही उत्तर मिळाले नाही.तरीही आम्ही आघाडीसाठीच्या प्रबोधनाचे काम चालू ठेवले.पुढे जसजशी निवडणूक रंगात आली.तसतश्या घडामोडी घडत गेल्या आणि अचानक अनिल जाधव यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर झाले.यासाठी लक्ष्मण मानेंचा पुढाकार महत्वाचा ठरला अशी चर्चा आहे.पुढे लोकसभेसाठी उमेदवारी सर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी एबी फॉर्म शिवाय अर्ज दाखल केला.वास्तविक वंचित बहुजन आघडीच्या उमेदवाराने जोरदार शक्ती प्रदर्शन करून वाजत गाजत फॉर्म भरण्याची गरज असताना असे का झाले हे माझ्या लक्षात आले नाही.
मला वाटते मला उमेदवाराकडून किंवा पुण्यातील पदाधिकारी यांच्याकडून संपर्क करून मी केलेल्या कार्याचा विचार करून मला सामावून घेतले जाईल असा अंदाज होता.तसे न घडल्याने एकंदरीत सार्वजनिक चर्चेने संभ्रम अवस्था निर्माण झाली.त्यावेळी मी मला मिळालेल्या लोकशाहीचा अधिकार वापरून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.यातील माझी भूमिका हीच संसदीय लोकशाहीत राजकारणाच्या माध्यमातून एक वंचित घटक म्हणून मानवतावादी समाज निर्मितीसाठी पुढाकार घेऊन लोकशाही प्रणाली बळकट करण्याचा माझा प्रयत्न आहे.परंतु आजपर्यंत केलेल्या कामातून काही जणांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असताना तुम्ही निवडणूक का लढवीत आहात अशी विचारणा केली.वास्तविक माझी भूमिका आजही आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसारच आहे.वंचित घटकांना न्याय मिळालाच पाहिजे व त्यातून लोकशाहीला बळकटी आली पाहिजे.आजही माझी भूमिका ही महामानवांच्या विचारांना धरूनच आहे.परंतु माझ्या भूमिकेशी कसा प्रामाणिक आहे.तसेच आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला पुणे मतदार संघ सोडून इतर मतदार संघात जाहीर पाठींबा दिलेला आहे.माझ्या अधिकाराचे संरक्षण करण्याची भूमिका ही मतदार यांचे समोर मीच मांडू शकतो असे मला वाटते.मला तो अधिकार घटनेने दिलेला आहे.आणि त्या अधिकाराचा वापर करूनच प्रतिगामी शक्ती विरोधात माझी उमेदवारी सकल मराठी समाजाचा पुरस्कृत म्हणून मी दाखल केलेली आहे.लोकशाही तत्व मानणाऱ्या सर्व नागरिकांना याव्दारे मी असे आवाहन करतो की,माझ्या उमेदवारीचा गैर अर्थ काढून आजपर्यंत मी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना मूठमाती देऊ नये.कोणत्याही पदाधिकारी यांना माझ्याशी चर्चा करायची असेल तर मी तयार आहे.
No comments:
Post a Comment