लोकसभा निवडणुकीत एकंदरीत दलित जनता प्रकाश आंबेडकर यांचे प्रती भावनिक झालेली आपल्याला पाहिला मिळालेली आहे.आंबेडकरी जनतेने या निवडणुकीत रिपब्लिकन गटबाजीला कोणताच थारा दिला नसल्याचे स्पष्टपणे जाणविलेली आहे.परंतु स्वत:ला बाबासाहेब आंबेडकर यांचे पेक्षा शहाणे समजणाऱ्या लोकांचीही कमी नसल्याचे आपल्याला पाहिला मिळाले आहे.एकंदरीत इथला ओबीसी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी स्पष्टपणे उभा राहिलेला आपल्यालाला पाहिला मिळालेला आहे.प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरातून पराभूत करून वंचित बहुजन आघाडीला कमीत कमी मते कशी पडतील याचीच काळजी परकीयापेक्षा स्वकीयांनी घेतल्याची दिसून आलेली आहे.आंबेडकरी चळवळीचे हित जोपासविण्याऐवजी कॉंग्रेस-राष्टवादी व भाजप-शिवसेना यांचे हित कसे जोपासता येईल याचीच काळजी घेतलेली दिसत आहे.उदाहरण द्यायचे झाले तर मनुवादी विचारांचा पक्ष बळकट कसा होईल आणि जळते घर पुन्हा कसे उभे राहील याची काळजी रिपब्लिकन नेत्यांनी घेतली आहे यांमध्ये पॅथरही पाठीमागे राहिलेली नाही.स्वत:ला विचारवंत म्हणविणारे प्रकाश आंबेडकर यांना कसे भाजपासाठी काम करीत आहेत याबाबत बोंबलताना आपल्याला पाहिला मिळालेले आहे.त्यामुळे आंबेडकरी जनतेची कोणाला किती काळजी होती व आहे हे जनतेने पाहिलेले आहे.त्यामुळेच त्यांच्या शब्दाचा मान ठेऊन कोणीही कॉंग्रेस-राष्ट्रवादी किंवा भाजप -शिवसेनेला अतिशहाणे सोडून मदत केलेली नाही.
प्रकाश आंबेडकर यांचा पराभव एक राजकारण होते त्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी किंवा भाजप -शिवसेना यशस्वी जरी झाली तरी ते प्रकाश आंबेडकर यांचा झंजावात रोखू शकलेली नाही हे वंचित बहुजन आघाडीला पडलेल्या मतावरून दिसून येते.परंतु बहुजन जनतेमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा जो संदेश गेला आहे तो अतिशय महत्वाचा संदेश गेला आहे तो असा की,बहुजन समाजाला जर सत्तेचे दारे कोण उघडे करू शकतो.... तर ते प्रकाश आंबेडकर करू शकतात असा विश्वास अलुतेदार आणि बलुतेदार यांनी प्रकाश आंबेडकर यांचेवर ठेवलेला दिसून येतो.त्यामुळे जनतेने इतर रिपब्लिकन नेत्यांना स्पष्टपणे नाकाल्याचे दिसून येते.स्वस्वार्थासाठी रिपब्लिकन पक्षाचे केलेले तुकडे पहाता जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे.
एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत आणि गोपीचंद पाडळकर यांनी विजयाची सीमा जवळ जवळ गाठली असल्याचे दिसून आलेले आहे.प्रकाश आंबेडकर यांचेवर जो तडजोडीचा आरोप लावला गेला आहे त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या कुटुंबाचा किवा राजकीय म्हणून निवडून येण्याचा त्यांना फायदा झालेला आहे काय…? या प्रश्नाची उत्तरे आरोप करणारे यांनी द्यावीत असे आमच्या सकल मराठी समाजाचे त्यांना आव्हान आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पाहिले आणि त्यांना पडलेल्या मतांची टक्केवारी पाहिली तर आपल्याला असे दिसून येईल कि,प्रकाश आंबेडकर यांनी जे जातीयनिहाय उमेदवार उभे केलेले होते.त्यामुळे मतांची अदला बदल झालेली पाहिला मिळालेली आहे.बौध्द समाजाचा लहान भाऊ म्हणून मातंग समाजाच्या लातूर येथील उमेदवाराला लाखोची मते पडलेली आहेत.त्यामुळे मातंग समाजाचा विश्वास आता प्रकाश आंबेडकर यांचेवर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळे अलुतेदार आणि बलुतेदार यांनी आपल्या मतांचा पाऊस करून एक नवीन समीकरणे उभी केल्याची दिसत आहेत.आता त्यांना विश्वास वाटला आहे की,वंचित म्हणून आम्हाला जी सत्तेची दारे कोण उघडे करून देऊ शकतात तर ते प्रकाश आंबेडकर देऊ करून शकतात.म्हणूनच कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांना पडलेली मते पहाता त्यांच्या अर्ध्याहून अधिक मते वंचित बहुजन आघाडीला पडलेली आहेत.वंचित बहुजन आघाडीला जी ४१ लाख मते ११ महिन्यात पडलेली आहेत त्याची गोळाबेरीज मोठ्या प्रमाणात झालेली असून ती विश्वाससार्थक मते असल्याचे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.
वंचित बहुजन आघाडी कोणाचीही बी टीम नव्हती व नाही..परंतु ज्यांनी बी टीम म्हणून आरोप केला आहे...ते आज कर्त्युत्वहीन असल्यामुळे आणि चुकीच्या घेतलेल्या निर्णयामुळे जनतेने त्यांना पराभूत कलेले आहे.उदाहरण द्यायचे झाले तर शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे देता येईल.राजू शेट्टी यांनी नेहमी भांडवलशाही विरोधात काम केले आहे परंतु यावेळी त्यांनी भंडावलशाही बरोबर राहिल्याने त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते त्यांचेवर नाराज झाले होते आणि दुसरे कारण म्हणजे पक्षांच्या आघाड्या बदलत राहायच्या म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजपा बरोबर आणि या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर त्यामुळे जनतेने त्यांना नाकरले आहे परंतु हे मान्य न करता केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे माझा पराभव झाला असे म्हणून स्वत:च्या बुद्धीचे प्रदर्शन त्यांनी केले आहे.असाच आरोप कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार अशोक चव्हाण यांनी केला आहे.परंतु त्यांना हे माहित आहे की,संपूर्ण देशात आम्हाला नाकारले आहे आणि का नाकारले आहे याची कोणतीही कारणेमीमांसा न देता वंचित बहुजन आघाडीमुळे आमचा नऊ ठिकाणी पराभव झाला आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे.वंचित बहुजन आघाडीने कोणाचाही पराभव केला नसून तिसरा पर्याय म्हणून दिलेला आहे असे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.(क्रमश:)
This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete