स्वराज्य म्हणजे मराठी माणसाचा स्वाभिमान आणि अभिमान...आणि पेशवाई म्हणजे मराठी माणसाचा अपमान व लाचारी असे समीकरण पेशवाईत होते.मात्र अशा पेशवाईला तडा देण्याचे काम होळकर आणि महार योध्दा सिद्धनाक महार याने केले आहे.याच मनुवादी व्यवस्थेला दाबण्याचे कार्य प्रतीशिवाजी राजे उमाजी नाईक यांनी केले असल्याची इतिहासात नोंद सुध्दा झालेली आहे.परंतु ब्रिटीश काळात १८५७ च्या उठावा नंतर ब्रिटीश प्रशासनात पेशवाईच्या पिलावळीने शिरकाव करून इथे मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता प्रस्थापित करण्याचे कार्य केले गेले.इथली महसुली व्यवस्था ताब्यात घेऊन जो त्यांच्या व्यावस्थेत सहभागी होईल अशा लोकांना अनाजी पंताच्या योजनेनुसार जमीनदार करण्याचे काम त्याकाळी कुळकर्णी यांनी केले असल्यामुळे इथली जातीयव्यवस्था बळकट करण्यास आणि धर्माद शक्ती उभी करण्यास या जमीनदार यांच्या कडून मदतच झालेली आहे.परंतु अशा व्यावस्थेला तडा देण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी करून रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मान देऊन त्यांची पहिली जयंती साजरी करून त्यांचे स्वराज्याचे विचार पेरण्याचे कार्य करून इथल्या अस्पृश्य यांना न्याय देण्याचे कार्य केले.परंतु आनाजी पंताची पिलावळ शांत काही बसली नाही.टिळक-आगरकर यांनी या महात्मा फुले यांना विरोध करून सत्यशोधक चळवळ मारण्यासाठी आर्य सनातनी हिंदू धर्म स्थापन करून त्याची पेरणीचे काम केले.परंतु महार योध्दा म्हणून जन्म घेतलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कार्य पुढे करून मनुवादी व्यवस्थेचे असणारे संविधान मनुस्मृती दहन करून इथली मनुवादी व्यवस्था उलथवून टाकून समतावादी स्वराज्याचे संविधान लागू करून इथल्या अलुतेदार आणि बलुतेदार यांना न्याय देण्याचे कार्य त्यानी केले आहे.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पाहून इथल्या कुळकर्णी यांनी मराठा नावाची जात निर्माण करून महसुली दप्तरी त्याची नोंद करून मराठा जातीचा एक वर्ग स्थापन केला होता.अशा वर्गाला बरोबर घेऊन त्यांची घराणे निर्माण करून त्यांचेवर मोठ्या प्रमाणात स्वत:ची राजकीय व्यावस्था शरद पवार यांनी उभी केलेली आहे.आज अशा समाजाला पेटवून देण्याचे कार्य इथल्या मनुवादी व्यावस्थेने निर्माण करून इथला मराठा कमकुवत करण्याचे कटकारस्थान करण्यात आले.या मध्ये मराठा नेत्यांचा किती सहभाग होता याचे जाणीव सगळ्यानाच झालेली आहे.ज्या शरद पवारांनी जाणता राजा म्हणून जो किताब मिळविलेला आहे.त्याचा मान त्यांनी काला शपथविधीला दांडी मारून ठेवला असल्याचे आमचे मत आहे.कारण छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठीमागच्या लाईनित उभे करून औरंगाजेबाने त्यांचा अपमान केला होता त्याचे चोख उत्तर त्यानी दरबारातच औरंगाजेबास दिले असल्याची इतिहासात नोंद आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य लाटण्याचा प्रयत्न इतिहासात झालेला असल्याचे आपणास माहित आहे.त्याच प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देऊन उभे केलेले स्वराज्य लाटण्यासाठीचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरु आहे.हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रकाश आंबेडकर मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहेत.परंतु यांना भाजपाचे हस्तक म्हणून लेबल लावण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्याला पहिला मिळत आहे.काल शपथविधी सुरु असताना प्रकाश आंबेडकर हे विधानसभेत वंचित समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी बैठक घेत होते.शपथविधी महासोळाव्यात पाचव्या लाईनिचा पास देऊन मराठा नेतृत्वाचा अपमान दिल्ली येथे करण्यात आला आहे.परंतु इतिहास डोळ्यासमोर ठेऊन शरद पवार यांनी हा अपमान सहन न करता सदरच्या महासोळाव्यास दांडी मारलेली आहे.(क्रमश:)
Tri te tikdech janar......sattechi lalach
ReplyDelete