वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करीत मुस्लीम संघटना-मौलवी यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीने विकत घेऊन त्यांचे मार्फत फतवे काढून अकोला व सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांना पराभूत करून ८० % मराठा मतदार भाजप-शिवसेना यांचेकडे मराठा मूक मोर्चा व मराठा क्रांती मोर्च्याच्या माध्यमतून वळवून हुकुमशाही सरकार आणले आहे.
एकंदरीत शरद पवारांचे राजकारण याला कारणीभूत आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.त्याचे कारण असे आहे की,शरद पवार यांना महाराष्ट्रातील भविष्यातील राजकारणात मराठा समाजात आपल्या नंतर नेतृत्व उभे राहू नये तसेच बहुजन चळवळीतील ओबीसी-दलित नेतृत्व उभे राहू नये याचीच काळजी जास्त वाटत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
एकंदरीत शरद पवार यांचे राजकारण पाहता ते सावरकरवादी असल्याचे स्पष्टपणे या लोकसभा निवडणुकीतून दिसून आलेले आहे.आपली प्रधानमंत्री बनण्याची महत्वकांक्षा पूर्ण होणार नसल्याचे त्यांना माहित होते.त्यामुळे कॉंग्रेस आणि गांधी घराण्याने मला माझ्या महत्वकांक्षापासून दूर नेले त्यामुळे ती कॉंग्रेस संपूर्ण देशातून संपली पाहिजे आणि गांधी घराण्याला पुन्हा प्रधानमंत्री पद मिळाले नाही पाहिजे यासाठी त्यांनी देशातील २२ पक्षांना गाफील ठेऊन त्याचे कपटी मनाने नेतृत्व केले होते.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या माध्यमातून उद्याच्या राजकारणात मराठा समाजाचे नेतृत्व करण्याकरीता इतर मराठा पुढे येऊ नये म्हणून धूर्त राजकारण करून इथला मराठा भाजपाकडे वळविलेला आहे.आपल्या नंतर आपला पुतण्या मराठा नेतृत्व करू नये यासाठी त्यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठीची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे उघड झाले आहे.
आपली कन्या सुपियाताई सुळे यांना निवडून आणण्याठीचे प्रयत्न म्हणून आणि केलेल्या तडजोडी मध्ये बारामतीच्या जागेला कोणताही धोका मिळू नये यासाठी EVM मशीनवर आरोप करून लोकशाहीचा मुद्दा उपस्थित करून बारामतीची जागा राखून ठेवल्यानंतर EVM मशीन मुद्दा निकाली काढला आहे.
केवळ सिंचन घोटाळाप्रकरणी कोणतीही कारवाई होऊ नये अशी तडजोड करून केवळ निवडून आल्यानंतर मंत्रीपदी वर्णी लावावी लागेल म्हणून शिवसेनेचे जुने नेते आनंत गीते यांचा पराभव करून सुनील तटकरे,शिवाजीराव आढळराव यांचा पराभव करून अमोल कोल्हे तसेच आढसूळ यांचा पराभव करून नवनीत राणा यांना विजय दिलेला आहे.उदयनराजे भोसले हे मराठ्यांचे दैवत असल्यामुळे त्यांचा पराभव करणे आवघड झाले असते आणि संपूर्ण महाराष्ट्रात याची मोठी बोंब झाली असती म्हणून त्यांना विजय देण्यात आलेला आहे.
मात्र याबाबत छगन भुजबळ यांनी भाजप-शिवसेनेचा विजय हा EVM मशीनचा विजय असल्याची खरी खंत बोलून दाखविलेली आहे.त्यामुळे पहिल्यांदा EVM मशीनचा वापर हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने कसा करायचा आहे याचा धडा गुरु म्हणून शरद पवार यांनी त्यांचे शिष्य नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे.त्यामुळेच भाजपाच्या विरोधातील पक्ष-पार्ट्यांना एकत्रित करून त्यांचा पराभव निश्चित केलेला होता.त्यातच देश स्वतंत्र झाल्यापसून कधी न हरलेला नेहरुंचा मतदार संघ अमेटी मध्ये नेहरू घराण्याचा पराभव करून गांधी घराणे भाजपाच्या माध्यमातून संपविलेले आहे.
त्यामुळे बरोबर राहून शत्रू कसा संपवायचा याचे चांगले राजकारण शरद पवार यांना जमलेले आहे.स्वत:चा नातू पार्थ पवार याचा पराभव करून घेऊन आपल्याकडील लक्ष दुसरीकडे वळविलेले आहे असे असताना अजित पवार नावाचे भविष्यातील वारे थंड करण्यासाठी पिंपरी-चिंचवड मतदार संघातून खूप मोठ्या प्रमाणात पार्थ पवार याचा पराभव करवून घेतला आहे.
त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाची बी टीम म्हणून शरद पवार यांचेवर केलेला आरोप खरा आहे.दलित नेतृत्व आता बहुजनांचे नेतृत्व करीत असल्यामुळे पुढील काळात दिल्लीतील प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील मोठे नेतृत्व असेल याची कल्पना असल्यामुळे स्वत: शरद पवार यांनी मुस्लीम संघटना आणि मौलवी यांना हाताशी धरून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा विजय रोखण्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी यशस्वी ठरली..तर मुस्लीम फॅक्टर राबविण्यात ओवीसी -आंबेडकर अपयशी ठरले…! नाहीतर मुस्लीम समाज वंचित बहुजन आघाडी बरोबर असता तर अकोल्यात ४५% मते घेऊन तर सोलापुरात ३८% मते घेऊन भाजपचा प्रकाश आंबेडकर यांनी पराभव केला असता….!
No comments:
Post a Comment