विषय असा आहे की,हा भारत देश हिंदुराष्ट्राकडे वाटचाल करीत असताना आता स्पष्टपणे दिसत आहे.परंतु हे होत असताना निसर्गाचा करिष्मा बघा जिकडे तिकडे खोदकाम होताना बुध्द मूर्ती आणि बुध्द विहारे बाहेर येताना दिसत आहे.बहुजन विचारांचा मराठा गौतम बुद्धांना कुणबी म्हणून स्विकारायला लागला आहे.अलुतेदार आणि बलुतेदार आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपले म्हणू लागला आहे.असे असताना समतावादी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या घराण्यातील वंशज असणारे उदयनराजे भोसले यांना माता जिजाऊचा अपमान करणारा बाबासाहेब पुरंदरे आणि मनुस्मृतीप्रेमी मनोहर भिडे प्रिय वाटू लागला आहे.संघाची हिंदुराष्ट्र संकल्पना प्रिय वाटू लागली आहे.म्हणूनच ते म्हणतात की,लोकशाही नसती तर मी सगळेच आरक्षण रद्द केले असते.आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,रयतेचे हे स्वराज्य निर्माण करण्या करीता छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांनी केलेले कष्ट आणि दिलेले बलिदान विसरले कि काय असा प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे.
मनुस्मृतीने शुद्र आणि अतिशूद्र ठरविलेल्या लोकांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन ब्रिटीश सरकारकडे आरक्षणाची मागणी केली होती.त्यासाठी भारतात आलेले सायमन कमिशनला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती आणि ह्याच आरक्षणासाठी त्यांनी आपल्या जीवाचे बलिदान देण्याची तयारी देखील दर्शविली होती.परंतु हिंदूप्रेमी महात्मा गांधी यांनी या मागणीला विरोध केला आणि राखीव मतदार संघ पुणे कराराच्या माध्यमातून आपल्या पदरी पाडून घ्यावा लागला.परंतु हे आरक्षण जेव्हा आपल्या पदरी पाडून घेत असताना काही अटी शर्ती लागू करण्यात आल्या होत्या.यावरून स्पष्टपणे जाणविते की. सुरुवातीपासून शुद्र आणि अतिशूद्रांना मानसन्मान देण्यास किती मोठ्या प्रमाणात विरोध होता.
आज या आरक्षणाच्या माध्यमातून इथला शुद्र आणि अतिशूद्र संसदेत जाऊन बसला आहे.अशा लोकांना पुन्हा संसदेत घेऊन जाण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची दारे खोलून दिलेली आहेत.अहोरात्र कष्ट करून इथला शुद्र आणि अतिशुद्र एक करून मोठ्या प्रामाणात त्यांनी संसदेत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु इथल्या राजकीय व्यवस्थेला म्हणजेच इथल्या संघाच्या काँग्रेसीवाल्यांना हे नको होतो.त्यामुळे त्यानी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचे षड्यंत्र करून त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले होते.स्वराज्यात त्याच शुद्र आणि अतिशूद्र यांना अलुतेदार म्हणत आणि त्यांना प्रकाश आंबेडकर हे वंचित म्हणत आहे.मात्र सातारा गादीचे छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांना हा “वंचित” शब्द आवडत नाही.त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आवडत नाही म्हणून ते म्हणतात संविधान नसते तर मी आरक्षण रद्द केले असते म्हणजेच त्यांना हा शुद्र आणि अतिशूद्र वंचित म्हणून संसदेत गेलेला आवडत नाही.
पुढच्या वर्षी म्हणजे २०२० साली आरक्षणाचा करार संपणार आहे त्यामुळे तो करार पुन्हां होऊ नये यासाठी संघाने काळजी घेतली म्हणून आरक्षण रद्द करण्याची भाषा उदयनराजे भोसले यांच्या मुखातून बोलली जात आहे.हिंदुत्ववादी संघटनांच्या आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधी यांच्या माध्यमातून संविधान बदल्याची भाषा बोलली जात आहे.परंतु हे सर्वजण विसरले आहेत आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे घराणे जिवंत आहे आणि आजही त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर शुद्र आणि अतिशूद्र यांच्या सन्मानासाठी संघर्ष करीत आहे.२०२० ची खेळी त्यांनी ओळखलेली आहे.म्हणून त्यांनी लोकसभा निवडणुकीत जातीनिहाय वर्ग उभा करून ही खेळी मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.त्यामुळे त्यांना आपण साथ दिली पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.
इथला मराठा समाज आजही अज्ञानी आहे त्याला या खेळ्या समजत नाही तो खोट्या अहंकाराने पछाडलेला आहे त्याचे होत असलेले वाटोळे त्याला दिसत नाही,त्याने डोळे मिटलेले आहे.ज्या दिवशी त्याचे डोळे उघडतील त्यादिवशी त्याला त्याने केलेली चूक लक्षात येईल.परंतु तेव्हा ती वेळ त्याच्याकडे नसेल आणि पश्चाताप शिवाय त्याच्याकडे मार्ग नसेल.
परंतु इथले आरक्षण जर रद्द केले गेले...आणि आणि इथले संविधान बदलले गेले तर इथल्या राजकीय व्यवस्थेला ते पेलविणार नाही.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इथला शुद्र आणि अतिशुद्र यांना “शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा” असा मूलमंत्र दिलेला आहे त्यामुळे तो शिकून बुध्द झालेला आहे आणि एकत्रित येऊन आता तो संघर्ष करीत आहे.देशातील कानाकोपऱ्या प्रत्येक व्यक्ती हे आरक्षण आणि हे संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलेला असेल.आणि तो जेव्हा रस्त्यावर उतरलेला असेल त्या वेळेस मात्र आरक्षण विरोधी आणि संविधान विरोधी लोकांना लपायला जागा राहणार नाही.त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाचे असे म्हणणे आहे.तुम्ही आरक्षण तर रद्द करून बघा….तुम्ही संविधान तर बदलून बघा…!