मुळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हे स्वार्थ राजकारणावर उभे राहिलेले संघटन आहे.साल १९९९ ला शरद पवार कॉंग्रेस मधून बाहेर पडून हा पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे.आज या पक्षाला २० वर्ष पूर्ण झालेली आहे.शरद पवारांनी ५० वर्षात काय केले हे कोणीही त्यांना विचारीत नाही....परंतु पवार साहेबांनी २० वर्षात काय केले असा सर्वसामन्य जनतेचा विषय आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जर विचार केला तर फक्त हा मराठा समाजातील लोकांना सत्तेच्या राजकारणात घेऊन जाणारा पक्ष म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरूण या पक्षाकडे आकर्षित होत आलेला आहे तो सोडला तर इतर समाज त्यांच्याकडे आकर्षित होताना गेल्या २० वर्षात दिसलेला नाही.त्यामुळेच प्रकाश आंबेडकर त्यांना जातीवादी पक्ष म्हणत असतात ते एकदम बरोबर आहे.ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व मराठा समाजाकडे असते….त्याच प्रमाणे शहरी भागाचे नेतृत्वही मराठा समाजाकडे असते.राजकीय दृष्टीकोनातील मराठा समाज सामाजिक दृष्टीकोनातून प्रबल करावा यासाठी त्यानी खेडेकर यांना संभाजी ब्रिगेड स्थापन करण्यास सांगितली आणि मराठा समाजाला राजकीय बळ देण्याचे काम ही संभाजी ब्रिगेड करीत राहिली...परंतु या संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता म्हणून घडविण्याऐवजी मोठ्या प्रमाणात ठेकेदार म्हणून घडविण्यात आलेले आहे. म्हणून या संघटनेच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या ठेकेदार यांचे टेंडर मिळविण्यासाठी आपापसात हाण्यामाऱ्या डोके फोडाफोडीच्या घटना घडून आपसी मतभेद निर्माण झालेले आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून इथला बहुजन समाजाची दिशाभूल करून त्यांचेवर वर्चस्व करायचे असा एकमेव दृष्टीकोन त्यांचा होता.परंतु ज्याप्रमाणे आरक्षण मागणी घेऊन हा मराठा समाज अक्ट्रोसिटी अक्ट कायद्याला विरोध करण्यासाठी लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरला तेव्हाच बहुजन नेतृत्व म्हणून हा समाज पुढे लयास जात आला. त्याचे कारण की,मराठा समाजाकडे नेहमी देणारा समाज म्हणून पाहिले गेले होते परंतु तो आता मागणी करणारा समाज असल्यामुळे त्याचे नेतृत्व लयास गेलेले आपल्याला लोकसभा निवडणुकीत पाहिला मिळालेले आहे.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे ठेकेदार,व्यावसायिक आणि स्वस्वार्थाने उभे राहिलेले लोक आहेत त्यांना शरद पवार प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणत आहेत….आणि अशा कार्यकर्त्याना ते आरएसएस भाजपाकडून चिकाटी शिका असे ते म्हणत आहे...चिकाटी हा शब्द आणि हा विषय संघटनेच्या विचारांना जोडणारा शब्द आहे जिथे कार्यकर्ता प्रामाणिक आणि निष्ठावान घडतो….असे संघटन राष्ट्रवादी कॉंग्रेस उभे करण्यात अपयशी ठरलेली आहे.पक्ष संघटनेसाठी प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज लागत असते.तसे कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे असणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचा वार्ड आणि त्याचा मतदार संघ शाबूत ठेवणे महत्वाचे वाटते.त्यामुळे तो शाबूत ठेवण्यासाठी तो कोणत्याही पक्षाकडे जाऊन त्या पक्षाची उमेदवारी घेऊन त्याचा मतदार संघ शाबूत ठेवण्याचे काम करणार...त्यामुळे चिकाटी ठेवण्याचा शरद पवारांनी दिलेला सल्ला तो मान्य करणारा नाही...म्हणून तो कार्यकर्ता म्हणतो पवार साहेब मला माझा मतदार संघ महत्वाचा….तुमची चिकाटी घेऊन काय करू…! त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,राष्ट्रवादीला प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज आहे.
No comments:
Post a Comment