दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अशोक सोनाने यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला जे ठणकावून सांगितले आहे की,येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर बॅलेट पेपर वापरला नाही आणि त्या निवडणुका जर EVM मशीनवर घेतल्या तर त्या होऊ देणार नाहीत अशी घेतलेली भूमिका ही योग्यच असल्याचे मत आमच्या सकल मराठी समाजाचे झालेली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेचे सर्वच पक्षांनी आणि मतदारांनी स्वागतच केले पाहिजे.त्याचे कारण असे आहे की, लोकसभेचा प्रत्येक उमेदवार आज प्रत्येक मतदाराला संशयाने बघायला लागलेला आहे आणि त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रामाणिक कार्यकर्त्याना असे वाटते की, त्यांना मुस्लीम समाजाने मतदान केले नाही.त्यामुळे त्यांच्या प्रती एक अविश्वासाचे नाते निर्माण झालेले आहे.त्यांना त्यांची प्रामाणिकता सिद्ध करण्याची वेळ या EVM मशीनने आणलेली आहे.असाच प्रकार शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे राजू शेट्टी यांचे झालेले आहे.आज मतदार अचंबित झालेला आहे त्याला त्याने केलेल्या मतदानावर विश्वास राहिलेला नाही.ज्याला द्यायचे त्याला त्याचे मतदान झाले आहे काय…? याबाबत तो संभ्रमित झालेला आहे.त्यात मराठा समाजाचे नेते शरद पवार यांना देखील स्वत:च्या कन्या सुप्रियाताई सुळे संदर्भात EVM मशीनवर प्रश्नचिन्ह निर्माण करून लोकशाही धोक्यात येईल असे उदगार काढावे लागले होते.त्यानंतर पार्थ पवार यांचा जो सव्वा दोन लाख मतांनी पराजय झालेला आहे तो पराजय अविश्वास दर्शवित असल्याचे जाणकार यांचे मत आहे.ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा जो पराभव झालेला आहे तो त्यांना संभ्रमात पाडत आहे यापेक्षा नवल म्हणजे अमेटी मतदार संघ हा नेहरूंचा मतदार असल्यामुळे १९५२ पासून याठिकाणी पराभव झालेला नाही.परंतु स्मृती इराणी यांचेकडून राहुल गांधी यांचा झालेला पराभव कोणी मान्य करू शकत नाही.त्यातच प्रकाश आंबेडकर यांचा संपूर्ण देशात झंझावत असताना दोन मतदार संघातून त्यांचा पराभव होतो आणि त्यांचे विरुद्ध निवडून येणाऱ्या धोत्रे यांना मंत्रीमंडळात घेतले जाते आणि आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न होतो.ही खेळी अतिशय भयानक खेळी असल्याचे जाणकार यांचे मत आहे.त्यामुळे जो पर्यंत मतदार यांची विश्वासहर्ता निवडणूक आयोग निर्माण करीत नाही तो पर्यंत लोकशाही आहे असे कोणाला वाटणार नाही.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिका त्यांना बी टीम म्हणणारे मान्य करीत नाही तो पर्यंत त्यांच्या बाबतही विश्वासहर्ता जनमाणसात निर्माण होणार नाही असे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.त्यामुळे EVM मशीन संदर्भात प्रकाश आंडबेकर यांची भूमिका प्रामाणिकच….त्यांना बी टीम म्हणणारे यांची भूमिका काय….?
No comments:
Post a Comment