संभाजी ब्रिगेड पुरोगामी कशी….? कारण ब्रह्म विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारले आहे...!
विषय असा आहे की,चार
पुस्तके वाचणारा किंवा लिहिणारा कोणताही व्यक्ती उठतो आणि डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी भारतीय समाजाला दिलेले ज्ञान खोडण्याचे कटकारस्थान करीत
असतो. खरे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जर आम्हाला
कोणी दाखविले असतील तर ते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांनी दाखविलेले आहे.त्यांच्या समतावादी स्वराज्याचा कारभार आम्हाला दाखवून
त्याचा उपभोग आम्हाला देण्याचे महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
केले आहे.या दोन्ही महापुरुषांनी वैदिक धर्म व्यवस्था नाकरून त्यांची
मनुस्मृती दहन केली आहे.ब्रह्म विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती याला
छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यात कधीही स्थान दिलेले नाही ही सत्यता
आहे आणि ते नाकरून चालणार नाही.वयाच्या चौदाव्या वर्षी शंभूराजे यांनी
बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांचे समतावादी कार्य
किती मोलाचे होते हे दाखवून “बुध” म्हणजे “विद्वान" म्हणून त्यांचा गौरव या
ग्रंथामध्ये केला आहे.म्हणजेच विद्वान हा नेहमी भूषणावह असतो ते त्यांनी
दाखवून दिलेले आहे.परंतु त्यांचे नंतर उभ्या राहिलेल्या पेशवाईने
जातीव्यवस्था निर्माण करून इतिहास बदलण्याचे कार्य केले आहे.अशा व्यवस्थेला
संपविण्याचे माहान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर केले आहे. ब्राह्मण हत्या
(ब्रह्म हत्या) पाप आहे अशी म्हण प्रचलित असताना छत्रपती संभाजी महाराज
यांनी ब्राह्मणाचा वध करून बुध्दनीती वापरली आहे हे विसरता कामा
नये.छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याला घातक असा मानवधर्मीय शत्रूचा
वध करून जातीयवादी व्यवस्था उलथून टाकण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला
आहे...तर अशा शंभूराजे नंतर जर वैदिक धर्म पंडितांचा आणि त्यानी उभ्या
केलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा मनुस्मृती दहन करून बामणी व्यवस्था उलथून
टाकण्याचे कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.छत्रपती संभाजी
महाराज यांनी स्वत:चा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार करून त्यानी स्वराज्याची
राजमुद्रा पिंपळाच्या पानावर कोरून हे राज्य बुध्द विचारांचे आहे हे
दाखवून दिलेले आहे.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांचा
आभ्यास करून “बुध्दभूषण” नावाची प्रिंटींगप्रेस उभारून एक प्रकारे छत्रपती
संभाजी महाराज यांचा सन्मानच केला आहे.कारण “बुध” आणि “बुध्द” या दोन्हीचा
अर्थ एकच विद्वान आणि “भूषण” चाही अर्थ एकच आणि तो म्हणजे भूषणावह असा
आहे.त्यामुळे या दोन्ही महापुरुषांनी बुध्दनितीवरच कार्य केले आहे हे
समजण्यास काहीच कारण नाही.या सर्व बाबींचा आभ्यास मराठा सेवा संघ यांनी
करून एक बहुजन समाज घडविण्यसाठी “संभाजी ब्रिगेड” हे सामाजिक संघटन स्थापन
करून छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य जगासमोर आणण्याची फार मोठी
संकल्पना निर्माण केली होती.संघटना स्थापनेचा उद्देश अतिशय चांगला होता
त्यासाठी त्याग देण्याची तयारीही त्यांनी मोठ्या प्रमाणात केली परंतु
समाजात आतपर्यंत रुतलेली धर्म भावना ते खोडू शकले नाहीत.ब्रह्म विष्णू महेश
राम कृष्ण गौरी गणपती यांना केलेला विरोध त्यांना समाज मान्यता मिळण्यास
होणारी अडचण आणि राजकीय व्यावस्थेकडून होता असलेला मोठा विरोध त्यामुळे
त्यांना त्यांचा मार्ग बदलावा लागला.सामाजिक काम करीत असताना समाजाचे
परिवर्तन करावे लागते परंतु पुढे त्यांच्यात परिवर्तन झाले आणि त्यांनी
शंकराला महापुरुष करून तो समाजापुढे मांडावा लागला.राम कृष्ण यांना आपले
महापुरुष दाखवून त्या दोघांचा समाजात मान निर्माण करण्यात आला.गणपती याला
इतिहासात कोणताही आधार नसताना केवळ गणप्रमुखाची उपमा देऊन जानवेधारी
ब्राह्मण स्वीकारून त्याला भाऊ रंगारी यांची उपमा देण्यात आली.त्यामुळे
त्यांचे कार्य हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात असल्यामुळे
पर्यायाने ते शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात जात
आहे.त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांनी नाकारलेला पहिला
६ जूनचा राज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा करून इथल्या वैदिक धर्म
पंडितांचे बळ वाढवीत आहेत.त्यामुळे आमचे असे म्हणणे आहे की,संभाजी ब्रिगेड
पुरोगामी कशी….? कारण ब्रह्म विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारले आहेत…!
No comments:
Post a Comment